अनुभव – ऋषिकेश फुलारे

आमचे गाव रायगड जिल्ह्यात आहे. आमचं गाव कोकणात असल्याने आमच्या आंब्याच्या बागा आहेत. रात्री कोणी आंबे चोरू नयेत म्हणून माझे वडील रोज आंब्याच्या बागेत जाऊन राखण करत असत. एके दिवशी मी सुद्धा त्यांच्याकडे खूप हट्ट केला की मला सुद्धा यायचे आहे. माझ्या हट्टापायी ते मला घेऊन जायला तयार झाले. आम्ही जेऊन वैगरे रात्री १० वाजता निघालो असू. आमच्या बागे जवळच शंकराच मंदिर होत. त्या मंदिरात शक्यतो कोणीच येत नसे. आम्ही सुद्धा कधी गेल्याचे आठवत नाही. मी लहान असल्याने मला त्याच कारण माहीत नव्हत आणि तस ही मी विचारणं कधी महत्त्वाचं समजलो नाही. त्या दिवशी अमावस्या होती त्यामुळे इतर रात्री प्रमाणे चंद्राचा प्रकाश नव्हता. आणि म्हणून च अंधार गडद जाणवत होता.

आम्ही तिथे पोहोचल्यावर एकदा संपूर्ण बागेत एक फेरी मारून आलो. सर्व नीट बघून आलो. एका झाडाखाली खाट टाकली होती तिथे वडिलांनी झोपायची तयारी केली. आम्ही दोघं ही ११ च्या सुमारास झोपून गेलो. रात्री मला अचानक जाग आली आणि मी सहज उठून खाटेवर बसलो. तसे मला कसलासा आवाज ऐकू आला म्हणून मी उठून काही अंतर चालत त्या आवाजाच्या दिशेने गेलो. बरीच लोकं चालत मंदिराजवळ जाताना दिसली. त्यांच्या हातात दिवे होते. मला वाटल की सकाळ झाली असेल, गावातील लोक आली असतील. पण नंतर मला वेगळीच शंका आली. कारण ती सगळी लोक एका विशिष्ट प्रकारच्या रांगेत चालत होती. ती रांग खूप मोठी होती आणि सतत लोक येताना दिसत होती. मी अजून एक गोष्ट पाहिली की कोणीच कोणाशी बोलत नाहीयेत. मी बराच वेळ उभे राहून हे सगळे पाहत होतो. 

मनात अनेक विचार आले की ही लोक गावातली तर दिसत नाहीयेत. आणि इतकी लोक गावात असूच शकत नाही. या मंदिरात जास्त कोणी जात नाही मग आज अचानक.. मी जरी लहान असलो तरी काही गाडी विचित्र घडतय हे मला जाणवू लागलं. मी दबक्या पावलांनी तसाच मागे आलो. खाटेवर पडून वडिलांना घट्ट मिठी मारली आणि झोपून गेलो. सकाळी जाग आली तर डोळे उघडतं नव्हते. अंग खूप जड झालं होय. याच कारण म्हणजे मला खूप ताप आला होता. वडील मला लगेच डॉक्टरांकडे घेऊन गेलो, औषध वैगरे घेतली पण माझा ताप काही जात नव्हता. तो दिवस असाच गेला. दुसऱ्या दिवशी ही सगळी औषधे वेळेवर घेतली. पण तरीही ताप काही कमी होईना. उलट तो वाढतच चालला आहे असे वाटत होते.

घरी आई ला शंका आली की कधी नव्हे ते हा आंब्याच्या बागेत झोपायला गेला होता आणि तेव्हा पासूनच हे सगळे झालेय. तिने मला विचारले तेव्हा मी सगळा प्रकार तिला सांगितला. वडील ही तिथेच होते. ते मला म्हणाले की ती भुतांची महापूजा होती महादेवा साठी.. ती लोक त्या मंदिरात येतात , कुठून येतात माहीत नाही पण त्यांना शक्यतो कोणी पाहू शकत नाही. तू कसे पाहिलेस माहीत नाही. माझ्या आजीला सांगितले तेव्हा ती बोलली की याला घेऊन जा शंकराच्या मंदिरात आणि याच्या अंगावरून नारळ उतरवून टाका. आजी ने सांगितल्याप्रमाणे करण्यात आले आणि अवघ्या काही तासात माझा ताप पूर्णपणे उतरला.

Leave a Reply