अनुभव – अभिराम
एका विचित्र कुतूहलाने, भूत, प्रेत, रहस्य इ. विषयात कमालीचे मन लागले. साहस आणि धाडस दाखवण्याचा लहानपणापासूनचा स्वभाव परंतु यातूनच पुष्कळ चांगले आणि वाईट अनुभव आले. त्यातलाच हा एक निवडक अनुभव..
अकोल्या पासून साधारण ६० किलोमीटर वर एक गाव होते. गावाच्या एका मंदिरात भागवत सप्ताह सुरू होता. उद्या सप्ताह संपणार म्हणून मंदिरात उपस्थित मंडळी महाप्रसादा चे आयोजन करण्याचे बोलत होते. यात कोण कोण काय काय पदार्थ आणेल यावर चर्चा सुरू होत्या. महाप्रसाद उत्तम व्हावा म्हणून जो तो आपल्यापरीने हातभार लावत होते. मी गोड धोड सगळं बघून घेईल अस गंगाबाई बोलल्या. हे सगळे चालू असताना एक भयावह कीचाळी ऐकू आली आणि जोरात कसलासा आवाज आला. एखादी अवजड गोष्ट विहिरीत टाकण्याचा.. काळजाचा ठोका चुकला आणि एक शांतता पसरली. कोणालाच समजल नाही काय झाले.
यात मंदिरातील एक पुजारी मोठ्यांनी ओरडू लागले अरे… कोणी वाचवा या बाईंनी विहिरीत उडी घेतली. ते बाहेरच्या बाजूला होते त्यामुळे त्यांना ते दिसले असावे. हे समजताच सगळ्या लोकानी मंदिराच्या आवारात असलेल्या त्या विहिरी कडे धाव घेतली, खूप प्रयत्न केल्यानंतर त्या बाईला बाहेर काढण्यात आले. सगळया बायकांनी ओळखले ही तर तारा आहे. गांगाबाईची सून. काही दिवसा आधीच हिला एक मुलगा झाला होता. पण अस काय घडलं हिने विहीरीत उडी का घेतली, काय चालू आहे.. घरचे हिला त्रास देतात का, नवरा मरतो का, अस सगळे बोलू लागले..
यात काही बायकांनी तिला एका खाटेवर ठेवले आणि सावरत होत्या.
अचानक ती खाडकन उठून बसली आणि एका धक्क्यात ५-६ बायकांना जोरात ढकलून पाडून टाकलं. आणि तिथेच खाली बसून अतिशय करड्या आवाजात खूप घाण, असहनिय तोंडाला येईल ते बोलू लागली. लोक अवाक होऊन पाहत बसले हा काय प्रकार चालू आहे. लगेच तारा च्या घरी निरोप देण्यात आला. तिच्या घरचे, तिचा नवरा, दिर, सासरे आणि बाकी सगळे धावत आले आणि हे सगळं पाहून पुतळ्या सारखे स्तब्ध झाले. कोणी जवळ जायचे धाडस करत नव्हते जो जवळ येईल त्याला ती मारत होती. एक अफाट शक्ती जणू तिच्यात आली होती. तेव्हाच भागवत सप्ताहाला आलेल्या लोकांना हे कळले आणि त्यांनी एक महाराज बोलावले. ते खूप तेजस्वी ,पोहोचलेले आणि जाणते होते. त्यांना कळले हा काही वेगळाच प्रकार आहे. त्यांनी अभिमंत्रित केलेलं पाणी तारा वर टाकल, पाणी पडताच ती तडफड्ड करू लागली आणि बेशुद्ध पडली. महाराजा च्या सांगण्यावरून तिला मंदिरात आणण्यात आले, तर ती वेग वेगळ्या आवाजात कनहू लागली. काही लोकांच्या साहाय्याने तिला दोरी आणि साखळ दडाने ने बांधून ठेवले.
यातच संपूर्ण गावात बातमी पसरली की मंदिरात खूप काही घडतं आहे. तिथली सगळी लोक मंदिरात काय झाले हे पहायला गर्दी करू लागले.
कसे बसे सगळ्यांना तिथून घरी जायला सांगितले आणि काही निवडक लोक मंदिरात थांबले. इकडे तारा काही वेळानंतर शुद्दी वर आली आणि परत त्या किळसवाण्या करड्या आवाजात बोलू लागली. महाराजांनी परत विचारले तू कोण आहेस, हिला का पकडल आहे. यावर ती महाराजांवर थुकली आणि खूप शिव्या देऊ लागली. त्यांनी भस्म तिच्या कपाळावर लावले आणि परत विचारले कोण आहेस तू..? यावर एकदम तिच्यातून आवाज आला “मी हिला घेऊन जायला आली आहे मध्ये येऊ नका..” हे ऐकताच तिथे उपस्थित लोकांच्या अंगावर काटा आला आणि पाया खालची जमीनच सरकली. गंगाबाई खाली कोसळल्या, त्यांनी डोळे फिरवले जणू त्यांना विजेचा झटकाच लागला होता. सगळे लाचार होऊन फक्त बघ्याच्या भूमिकेत उभे होते. आता महाराजांनी तिच्या भोवती राखेच रिंगण घालुन धूप लाऊन ४ दिवे लावले. महाराजांनी विचारलं का करते आहे हे सगळं.
एकदम तिच्यातून आवाज आला “मी वच्छी आहे, मी बाजूच्या गावात राहत होती.. बांधकाम कामगार असून मेहनत मजुरी करून माझ घर चालवत होती. मला बाळ होणार होत, पण आमच्या गावात एकही दवाखाना नसल्यामुळे मला इकडे आणले. मी आणि तारा एकाच दवाखान्यात गरोदर होतो. शेजारीच आमच्या दोघांचा पलंग होता. मी अतिशय गरीब परिस्थीतीत वाढले. मला आई वडील किंव्हा कोणी नातलग ही नव्हते. ताराला मात्र खूप लोक भेटायला यायचे आणि येताना तिला खूप प्रकारचे छान पदार्थ खायला घेऊन यायेचे. खूप वाटायचं ते सगळं खायला मला पण मिळालं पाहिजे पण माझ्या नशिबी फक्त वाळकी चीळकी भाकर. बाजूलाच असून ताराने मला कधी काही दिले नाही, कधी काही विचारले पण नाही उलट माझ्या कडे पाठ करून सगळं खात पित होती. शरीरात अन्नाअभावी त्राण नसल्याने बाळाला जन्म देताच माझा मृत्यू झाला. काही दिवसांनी माझे बाळ पण जग सोडून गेलं. कारण ते ही माझ्या सारखे नाजूक होऊन गेले. म्हणून मनच नाही तर पूर्ण आत्मा तिला मिळालेल्या त्या अन्नात घुटमळत राहिला. हे सगळं सांगत असतानाच तिथे असलेल्या सगळ्यांच्या लोकांच्या डोळ्यात अश्रू ओघळू लागले.
आपल्या आणि आपल्या बाळाच्या मृत्युला तारा जवाबदार आहे असं वाच्छिला वाटत होतं. या सगळ्यात खूप रात्र झाली. सगळे विचारांनी सुन्न होऊन बसले होते. पण महाराज हाच विचार करत होते की यातून ताराला कस वाचवायच. तिच्याकडून झाले ते चुकून झाले, तिने काही जाणूनबुजून अपराध केला नाही. त्यातून त्यांनी एक शक्कल लढवली. काही बायकांना सांगून भरपूर प्रमाणात पंच पक्वान्न बनवायला लावले आणि पहाट होण्याआधी तिथे ते आणायला सांगितले. पहाटे ४ वाजता सगळ्या बायकांनी ते सगळे पदार्थ तयार करून आणले आणि वच्छी समोर आणून ठेवले. त्याच्या वासाने वच्छी बेचैन झाली. इकडे तिकडे हाथ पाय मारू लागली. बांधलेले दोरखंड, साखळ्या तिने तोडून टाकल्या. एखाद्या भुकेलेल्या वाघिणी प्रमाणे तिने त्या अन्नावर उडी मारली. दोन्ही हातानी ते खाऊ लागली. अजून आणा, माझी भूक शमली नाही, अजून आणा.. इतकेच वाक्य ती सतत बोलत होती. बघता बघता सगळे पक्वान्न संपत आले, तेवढ्यात महाराजांनी मंत्र म्हणून अंगारा लावला आणि वच्छी मोठ्ठ्यांने ओरडली आणि विहिरीच्या दिशेने धावत सुटली. सगळेच घाबरले. पण विहिरीच्या कठड्यावर येताच ती बेशुद्ध पडली पण तरीही विहिरीत काही तरी पडण्याचा आवाज आला. तिने स्वतःलाच मुक्त केलं.
पुढचे चार दिवस तारा बेशुद्ध होती, तिला खूप अशक्त पणा आला होता. त्यात झालेला कुठलाच प्रसंग तिला आठवत नव्हता.
यातून सगळ्यांना एक गोष्ट कळली, अन्न नेहमी वाटून खायला हवे आणि एखाद्या गरजू ला तर दिलेच पाहिजे. काय माहीत कधी कोणाची अतृप्त वासना तुमच्या अन्ना वर उत्पंन होईल.