अनुभव – अभि म्हात्रे
मला या आधी कधी भूत, प्रेत या गोष्टींवर विश्वास नव्हता पण .. पण या एका घटनेने मला या सगळ्या गोष्टींचा विचार करायला भाग पाडले.
घटना साधारण ६-७ वर्षांपूर्वीची आहे. आमचं कुटुंब तास बरच मोठं आहे. पण काही कारणामुळे मी आणि माझे आई बाबा आम्ही दुसरी कडे राहायला गेलो होतो. आम्ही तिघे असल्यामुळे मी आणि बाबा बाहेर असायचो आणि आई जास्त वेळ घरी एकटी असायची. सगळे व्यवस्थित आणि सुरळीत चालू होत. पण काही अपरिहार्य कारणामुळे आम्हाला ते घर सोडावं लागलं. आम्हाला राहतं घर दोन दिवसात रिकाम करायचं होत. त्यामुळे बाबा दुसरी रूम वैगरे मिळतेय का ते पाहत होते.
तेव्हा मी शाळेत शिकत होतो. आणि माझ्या सोईसाठी मला त्रास कमी व्हावा म्हणून बाबा शाळेच्या परिसरात एखादी रूम किंवा छोटे घर भाड्यावर मिळते का ते पाहत होते. नशिबाने एक रूम मिळाली. जास्त वेळ न घालवता आम्ही लगेच सगळे समान शिफ्ट केले. दोन दिवस बरीच धावपळ करून बाबांनी सगळे नीट मेनेज केले होते. फ्लॅट वन बी एच के आणि तसा बराच मोठा होता. बेडरूम मध्ये एक हवेशीर बाल्कनी होती. मला तो फ्लॅट खूप आवडला. पण नंतर मला एक गोष्ट आठवली.
आम्ही समान शिफ्ट करत असताना आई बाबांचे या जागे बद्दल बोलणे कानावर पडले होते. आई म्हणत होती कि मी या जागे बद्दल मी चौकशी केली तेव्हा मला विचित्र गोष्टी कळल्या. आजू बाजूची लोक नको नको ते सांगत होती, गडबड आहे म्हणत होती. पण बाबानी तिला समजावून सांगितले की आपल्याला त्या जागेत शिफ्ट होण्याशिवाय दुसरा पर्याय नाहीये. बहुतेक नाईलाजाने आम्ही या ठिकाणी राहायला आलो होतो. पण मला तेव्हा या सगळ्या गोष्टींचं गांभीर्य नव्हत.
त्या फ्लॅट मध्ये शिफ्ट झाल्यावर सुरुवातीचे काही दिवस अगदी नीट गेले. मी दिवसभर शाळेत असायचो आणि बाबा दिवसभर ऑफिस मध्ये असायचे. त्यामुळे दिवसभर आई घरी एकटीच असायची. तिथे राहायला येऊन ५-६ दिवस झाले असतील आणि आई अचानक आजारी पडली. तिची तब्येत इतकी खालावली की आम्ही तिला दवाखान्यात घेऊन गेलो. डॉक्टर म्हणाले की अशक्त पणा आला आहे. त्यांनी औषध वैगरे लिहून दिली. पण आम्हाला आईच्या आजारी पडण्याचे काही कारण सपदात नव्हते.
काही दिवसानंतर औषध वैगरे घेतले म्हणून आई ला बरे वाटू लागले. पण त्या दिवशी आई आम्हाला अचानक म्हणाली “या घरात आपल्या तिघांशिवय अजुन कोणी तरी राहते य.”, बाबांनी तिला समजावून सांगितले पण नंतर ती आई तीच गोष्ट नेहमी सांगायची की या घरात अजुन कोणी तरी राहतेय. आम्हाला वाटले की आई ला भास वैगरे होत असेल म्हणून तिच्याकडे दुर्लक्ष केले. काही दिवस उलटून गेले असतील.
ती रात्र मला अजूनही चांगलीच आठवतेय. आम्ही आमचा दिनक्रम आटोपून रात्री गाढ झोपलो होतो. तितक्यात मला ओरडण्याचा आवाज आला आणि मी दचकून उठलो. बाबा झोपेत ओरडत होते आणि हातपाय झटकत होते. आई ने त्यांना उठवले आणि विचारले की काय झाले. वाईट स्वप्न वैगरे पडले का.. मी त्यांच्याकडे पाहिले तर ते घामाने ओलेचिंब झाले होते. आई ने त्यांना पाणी प्यायला दिले. ते थोडे शांत झाले आणि म्हणाले “हो वाईट स्वप्न होत बहुतेक.. कोणी तरी माझा गळा दाबत य अस वाटत होत.. ते स्वप्न इतकं भयानक होत की माझा श्वास खरच गुद मरल्या सारखा होत होता म्हणून मी हात पाय मारत होतो झोपेत..”
बाबांचे ते बोलणे ऐकून आई मात्र प्रचंड घाबरली होती. कारण इतके दिवस जाणवणारे ते जे काही होते त्याचा अनुभव बाबांनाही आला होता. दुसऱ्या दिवशी मी सकाळी तयारी वैगरे करून शाळेत निघून गेलो. शाळेत असल्यामुळे रात्रीच्या प्रसंगाचा विसर पडला आणि दिवस कसा निघून गेला कळलेच नाही. संध्याकाळी मी शाळेतून घरी आलो. आई बाजारात जायला म्हणून निघतच होती. जाताना ती मला म्हणाली की पाणी आले तर भरून ठेव. मी ही होकारार्थी मान डोलावली.
काही वेळात मी कपडे वैगरे बदलले आणि फ्रेश झालो. हॉल मध्ये येऊन बसलो आणि टिव्ही लावला. तितक्यात अचानक लाईट गेली. संध्याकाळची वेळ आणि अंधार पडायला सुरुवात झाली होती. लाईट नाही आणि त्यात घरात मी एकटा या विचारानेच भीतीने माझ्या अंगावर काटा येऊन गेला. तितक्यात पाणी भरायचे आठवले म्हणून किचन मध्ये गेलो. मेणबत्ती पेटून धक्क्यावर ठेवली आणि पाणी भरू लागलो. तितक्यात मला जाणवले की माझ्या मागे कोणी तरी उभे आहे तसे काळजात अगदी धस स झालं. माझ्या हृदयाची घडधड नकळत वाढली होती. मी झटकानागे वळून पाहिलं पण मागे कोणीही नव्हत.
तितक्यात लाईट आली. तसे मला जरा हायसे वाटले. आई ने जे सांगितले कदाचित त्यामुळे भास झालं असेल असे समजून मी त्या कडे दुर्लक्ष केलं. पण त्या नंतर मी जेव्हा जेव्हा घरी एकटा असायचो तेव्हा असे भास सतत व्हायला लागले. आणि त्या रात्री जे घडले ते खूप भयानक होते. त्या दिवशी आई बाबांना काही कामानिमित्त बाहेर गावी जावे लागणार होते. जाताना आई म्हणाली की आम्हाला यायला उशीर होईल, मी जेवण करून ठेवले आहे वेळेवर जेऊन घे, आमच्या साठी थांबू नकोस. आणि वाटले तर संध्याकाळी मित्राकडे जा.. आम्ही आलो की तुला फोन करू मग तू ये..
त्या दिवशी दुपार पासून लाईट नव्हती म्हणून कंटाळून गेलो होतो. आणि सहज म्हणून पडलो तर मला गाढ झोप लागली. जाग आली ती रात्री.. आता मित्राकडे जाणे ही शक्य नव्हते. मला इतके दिवस होत असलेला प्रकार आठवू लागला आणि त्यात मी आज पुन्हा घरी एकटा होतो. मी उठून बसलो. अजुन लाईट आली नव्हती. माझ्या मनातील भीती क्षणोक्षणी वाढत चालली होती. कधी आई बाबा घरी येतात असे झाले होते. मी स्वतःला च समजावू लागलो की अस काय नसत. मी हॉल मध्ये जाऊन बसलो आणि आई बाबांची वाट पाहू लागलो.
तितक्यात मला बेडरूम मधून कसलासा आवाज येऊ लागला. सुरुवातीला मला वाटले की मला भास होतोय पण मी नीट कानोसा घेऊ लागलो तसे मला जाणवले की बेडरूम मधून कोणाच्या तरी रडण्याचा आवाज येतोय. माझ्या अंगावर भीतीने शहारे येऊ लागले. पण मी हिम्मत करून उठलो आणि जाऊन बेडरूम चा अर्धा बंद दरवाजा पूर्ण उघडला. पण जसे मी दरवाजा उघडला तसा एका एकी आवाज अचानक बंद झाला. मला नको ते भास होत आहेत असे पुन्हा वाटू लागले तसे मी मागे वळलो आणि हॉल मध्ये येऊन बसलो.
आई ला फोन लावला पण नॉट रीचेबल येत होता. १०-१५ मिनिट झाली असतील आणि मला पुन्हा आतून रडण्याचा आवाज येऊ लागला. या वेळेस तो आवाज अगदी स्पष्ट होता. आता मात्र की पुरता घाबरलो. हातापायाला भीतीने काप र भरायला सुरुवात झाली होती. मला अजुन एक गोष्ट जाणवली की तो रडण्याचा आवाज हळु हळु वाढत चाललाय. मला पुन्हा जाऊन बघायची हिम्मत होत नव्हती पण जीव मुठीत धरून मी उठलो आणि बेडरूम च्याच दिशेने निघालो. बेडरूम च्याच दारात च मी स्तब्ध झालो. समोर चे दृश्य पाहिले आणि अंगावर सर्रकन काटा येऊन उभा राहिला.
समोर साधारण चाळीशीत ली एक बाई बसली होती. तिचे मोकळे सोडलेले लांबसडक केस चेहऱ्यावर पसरले होते. पण तिच्या कपाळावरचे लाल भडक कुंकू त्या केसांतूनही दिसत होते. मी दबक्या पावलांनी मागे सरकू लागलो तसे तिला माझी चाहूल जाणवली आणि तिने वर माझ्याकडे पाहिले. तिचे ते भयानक रूप पाहून मी जोरात ओरडलो आणि तशी ती माझ्या अंगावर धावून आली. मला अतिशय जोरात धडक बसावी तसे मी मागच्या भितींवर फेकलो गेलो. मी इतक्या जोरात भिंतीवर आपटलो की माझ्या डोक्याला जबर मार लागून माझी शुध्द हरपली.
डोळे उघडले तेव्हा मी हॉस्पिटल मध्ये होतो. शेजारी आई होती. रडत होती. मी शुध्दीवर येताच नक्की काय झालं ते मला विचारू लागली. मी सगळा प्रकार आई ला सांगितला तसे ती बाबांना चिडून म्हणाली की मी इतके दिवस तुम्हाला सांगत होते पण तुम्ही माझे बोलणे मनावर घेतले नाही. आज आपल्या मुलाच्या जीवावर बेतले. आता तरी माझे ऐका. पुढच्या काही दिवसात आम्ही ती जागा रिकामी करून दुसरी कडे राहायला गेलो. आम्ही चौकशी केली तेव्हा कळले की जो कोणी तिथे राहायला जायचा तो जास्त दिवस तिथे टिकत नव्हता. पण त्या जागेत असे नक्की काय होते हे मला आज पर्यंत नीट कळले नाही.