लेखिका – स्नेहा बस्तोडकर वाणी

कसल्यातरी विचित्र वासाने माझे अचानक डोळे उघडले. झोपेतून नाही. मी बेशुद्ध झाले होते बहुतेक. पण जस चामड्या च्या वासाने बेशुद्ध माणसाला शुधी वर आणतात अगदी तश्याच कसल्यातरी विचित्र वासाने मी शुध्दी वर आले होते. पण डोळे उघडून ही काही नीट दिसत नव्हते. थोड्या वेळा नंतर मी काहीशी भानावर आले आणि आठवले की काही वेळा पूर्वी मी माझ्या रूम च्या कपाटात लपले होते. मला claustrophobia म्हणजेच बंद जागेची अतिशय भीती वाटण्याचा आजार आहे. बंद जागेत असले की माझ्या शरीराला कंप सुटतो, श्वास गुदमरल्या सारखा होतो आणि डोळ्यां समोर अंधारी येते. पण काही वेळापूर्वी कपाटात लपण्यापलीकडे माझ्या जवळ दुसरा काही उपाय नव्हता. कारण बाहेर एक मांत्रिक होता. तो काही तरी काळी जादू चेटूक वगैरे करत होता. संपूर्ण रूम मध्ये धूर धूर झाला होता. 

मी दरवाजाच्या keyhole ला डोळा लावून पाहिलं. पण धुर साचल्यामुळे मुळे नीटस काही दिसत नव्हत. पण मला ते दोघे दिसले. मला अगदी आई वडिला सारखे असलेले माझे सासू सासरे आणि काळजात जणू कोणी जोरात खंजीर खुपसला अस वाटल. त्यांनी नेहमीच खूप प्रेम दिलं मला. माझा नवरा समीर जॉब मूळे नेहमी फिरती वर असायचा पण मला त्या दोघांनी कसलीच उणीव भासू दिली नाही. पण गेल्या काही दिवसात सगळा रंगच पालटला होता. माहित नाही नक्की कधी पासून. मेंदूवर जोर देऊन आठवून पाहिलं पण तरीही आठवत नाहीये की हा बदल त्यांच्या स्वभावात कधी पासून आणि का आला. पण गेले कित्येक दिवस ते असेच माझ्या रूम मध्ये येऊन काही धूप अगरबत्ती वगैरे खूप वेळ फिरवून निघून जातात. मला अस्थमा असल्याने ह्याचा मला त्रास होतो हे माहित असून ही. 

त्यांनी हल्ली तर माझ्याशी बोलायचे ही बंद केलंय. खूप वाईट वाटत मला. मी त्यांच्याशी संवाद साधण्याचा कित्येकदा प्रयत्न केला पण ते ऐकून न ऐकल्या सारखे करून निघून जातात. आणि आता तर हे सगळे हळू हळु वाढतच चाललय. कधी माझ्या रूम मध्ये अमावस्येच्या रात्री पिवळी राई भिरकावून जातात तर कधी रूम च्या बाहेर काळी बाहुली किव्हा लिंबू मिरची लावतात. ते हे सगळ का करत आहेत ते कळायला ही काही मार्ग नाहीये. पण मी ठरवले होते की समीर ह्या वेळी सुट्टीत घरी आली की त्याला या सगळ्या गोष्टी सांगेन.

पण आज आत्ता जे घडत य त्यातून मी जिवंत बाहेर पडू शकेल की नाही हे मला समजत नाहीये. देवाचे नाव घ्यायची ही इच्छा होत नाहीये. त्यांनीच तर आणली आहे ही वेळ. बाहेरून जोर जोरात करणं कर्कश्य मंत्रांचा आवाज येतोय. श्वास कोंडला जातोय मी पुन्हा बेशुध्द होणार बहुतेक कारण आता सहन ही होत नाहीये. गेले काही दिवस अस पुन्हा पुन्हा होत होत माझ्या सोबत. मधेच बेशुद्ध व्हायचे आणि वेगळ्याच काही ठिकाणी डोळे उघडायचे. मध्ये काय घडलं त्याचा विसर पडायचा. कपाटाच्या दारावर जोरात काहीतरी ठोकल्या च्या आवाजाने पुन्हा डोळे उघडले. 

मी पुन्हा keyhole ला डोळा लावून पहायचं प्रयत्न केला. पण डोळ्यां समोर चे दृश्य पाहून एखाद्याने काळीज जोरात पीळवटल अस वाटल. त्या लोकांसोबत समीर ही बसला होता. त्याला तिथे पाहून माझा धीर च संपला. त्याची ही साथ होती त्या लोकांना हे सगळं करण्यात. आता मात्र मला हे सगळे असह्य झाले. मी चिडून दार उघडण्याचा प्रयत्न केला जेणेकरून त्यांना समोर जाऊन जाब विचारू. पण त्या लोकांनी दाराला बाहेरून कुलूप लावले होते. मी जोर जोरात दार हलवायला सुरु केले तसे बाहेर मंत्रांचा आवाज ही अजून मोठा झाला. त्या आवाजाने माझ्या डोक्यात झिणझिण्या जाऊ लागल्या.

ना राहून मी शेवटी पूर्ण ताकदीनिशी आतूनच आवाज दिला “तुम्ही हे सगळं का करता आहात? मी तुमच काय बिघवडलं आहे? मला मुक्त करा ह्या सगळ्यातून” पण त्यावर बाहेरून जे ऐकू आले त्याने मी सुन्न च झाले. माझ्या सासू रडत म्हणाल्या “बाळा तुझ्या मुक्ती साठीच करतोय हे सगळं”. मी पुन्हा बाहेर पाहण्याचा प्रयत्न केला त्या माझ्या सासऱ्यांच्या खांद्यावर डोकं ठेवून रडत होत्या. समीर ने त्यांचा हात पकडुन ठेवला होता आणि तो ही ओक्साबोक्शी रडत होता. मी पुन्हा आवाज दिला ” हे काय चालू आहे सगळं कसली मुक्ती?” पण त्या नंतर ऐकू आलेला आवाज आणि दिलेले उत्तर ऐकून मला विजेचा तीव्र झटका बसल्यासारखे च झाले. बाहेरून माझ्या आईचा आवाज आला “सोनू, तू कधीच आम्हाला सोडून गेली आहेस पण तुझा….” एवढं वाक्य बोलता बोलता तिचे अश्रू अनावर झाले पुढे माझे बाबा बाहेरून म्हणाले “बाळा ही तू नाहीयेस. ह्या ठिकाणी तुझा आत्मा कोंडला गेला आहे. तू आम्हाला सोडून कधीच गेली आहेस” 

“बाबा हे सगळं काय बोलतात आहात तुम्ही? हे खोटं आहे. समीर तू तर बोल काही मला बाहेर काढ इथून”.

त्या मांत्रिकाने समीर ला दार उघडण्यासाठी खुणावले. मी हे सगळं आता पाहत नव्हते पण काय माहित कस सगळं समजत होत. त्यांनी हळू च येऊन दार उघडले आणि मी मोकळा श्वास घेऊन त्याला मिठी मारायचा प्रयत्न केला पण माझे हात त्याचा शरीराच्या आर पार जायला लागले. हे काय होत होते. “हे कसं शक्य आहे समीर हे काय होतंय माझ्या सोबत?” त्यांनी स्वतः चे रडू आवरून हवेतच नजर फिरवून मला उत्तर द्यायला सुरु केलं “शूभ्रा, तू आमच्यात या जगात नाहियेस आता. तू आम्हाला कधीच सोडून गेली आहेस पण तुझा आत्मा इथे बांधला गेला आहे. गेल्या महिन्यात आपल्या घरात चोरी झाली होती तेव्हा तू एकटीच होतीस. घाबरून स्वतः च जीव वाचवायला ह्या कपाटात लपली होतीस आणि अस्थमा च अटॅक येऊन तिथेच…” आणि तो पुन्हा रडू लागला. त्याला रडताना मला पाहवत नव्हत पण मी त्याला स्पर्श ही करू शकत नव्हते.

त्यांनी सांगितले तेव्हा ते सगळे चित्रं माझ्या डोळ्या समोर उभे राहिले. ते सगळं आठवल. हळू हळू सगळी कोडी उलगडू लागली. त्याच घटने नंतर माझ्या सासू सासऱ्यांच्या वागण्यात बदल झाला होता. मी कधीच मेली आहे म्हणून ते माझ्या रूम मध्ये धूप लावायचे. मी त्यांचा शी बोलायचं प्रयत्न करायचे तेव्हा कदाचित त्यांना मी ऐकू येत होते पण दिसत नव्हते म्हणून ते उत्तर न देता तिथून निघून जायचे. पण मी अजून हि आहे एखाद्या अतृप्त आत्म्या सारखी इथेच अडकलेली म्हणून ते माझ्या मुक्ती साठी त्या सगळ्या गोष्टी करत होते पिवळी राई, लिंबू मिरची वगैरे. ते बदलले नव्हते मी बदलले होते. मी एकदा शेवटचे म्हणून समीर च्या अश्रूंनी भिजलेल्या गालांना स्पर्श केला. त्याला मी दिसत नव्हते पण त्याला माझा स्पर्श जाणवला बहुतेक. ह्या साठीच माझा आत्मा असा भटकत होता कदाचित. समीर ची एक शेवटची भेट. आणि अचानक खूप प्रकाश येऊ लागला. डोळ्यांना सहन करण्या पलीकडे. आता त्या धुराचा त्रास होत नव्हता. हळू हळू समोरचे दृश्य धूसर होत गेले. माझ्यावर अपार प्रेम करणाऱ्या सगळ्यांचा चेहरा एकदा शेवटचा मनात भरून घेतला. देवाला एक शेवटचे मागणं केल की पुढच्या जन्मी ही मला ह्या सर्वांची साथ लाभू दे.

Leave a Reply