अनुभव – संग्राम गाढवे
हि गोष्ट 2017 ची आहे. मी नीट एक्झाम ची तयारी करण्यासाठी पुण्यात Aakash Institute मध्ये होतो. आणि तिथेच जवळ हॉस्टेल ला राहायचो. शिवजयंतीच्या च्या दोन दिवासा आधी आम्ही 8-9 मित्र सगळे हॉस्टेल च्या खाली गप्पा मारत बसलेलो होतो. रात्रीचे साधारण 1:20 झालेले. गप्पा आवरून सगळे वर झोपायला निघालो तेव्हा मी आणि माझा मित्र अनिकेत गप्पा मारत खाली च थांबलो.
हॉस्टेल चा Watchman ही सुट्टीवर होता. काही वेळ गप्पा मारून झाल्यावर आम्ही दोघेही वर जायला निघालो. अनिकेत वर गेला आणि मी पाण्याची बॉटल भरण्यासाठी खालीच थांबलो. पाणी भरताना माझी नजर जिन्याच्या दिशेला गेली तसे तिथून एक बाई वर जाताना दिसली. मला वाटले की हॉस्टेल च्या मालकाची बायको असेल. पण वेळ पाहता मी भरलेली बाटली तशीच ठेऊन तिच्या मागे धावत गेलो. पण वरच्या मजल्यावर पाहिले तर तिथे कोणीही नव्हते.
मी पुन्हा खाली बॉटल घ्यायला आलो आणि तितक्यात तिथल्या एका रिकाम्या खोलीतून बाईच्या ओरडण्याचा आवाज आला. मी दचकलो कारण त्या खोलीला 2 वर्षांपासून कुलूप लावलेलं होत. काही वेळासाठी नेमकं काय घडतंय हेच कळत नव्हतं. मी पटकन रूम च्या दिशेने वर निघायला वळलो आणि मघाशी दिसलेली बाई माझ्या अगदी समोर पाठमोरी उभी होती. पाठमोरी असल्यामुळे तिचा चेहरा दिसला नाही. मी दबक्या पावलांनी मागे चालू लागलो कारण भीतीने माझी दातखीळच बसली होती. मी कसा बसा माझा मित्र सिद्धांत ला कॉल केला आणि त्याला खाली बोलावले. मी पुन्हा समोर पाहिले तर तिथे मी एकटाच होतो. सिद्धांत आल्यावर मी रूम मध्ये गेलो.
अंथरुणावर पडणार तोच पुन्हा बाईच्या आरोळ्या ऐकू येऊ लागल्या. बाकी मित्र झोपले असल्यामुळे त्यांना कदाचित तो आवाज जाणवत नव्हता. मी ती रात्र कशी बशी काढली.
दुसऱ्या दिवशी हॉस्टेल जवळच्या चहा वाल्या कडे विषय काढला. त्याने सांगितले की मालकाच्या त्रासाला कंटाळून त्याच्या पहिल्या पत्नीने आत्महत्या केली होती. आणि आत्महत्या करण्या आधी मालकाने तिला त्याच खोलीत कोंडून ठेवलं होतं. त्या दिवसानंतर आम्ही ते हॉस्टेल सोडले आणि सगळे मित्र मिळून फ्लॅट भाड्यावर घेऊन राहत आहोत. यावर कोणाला विश्वास बसेल की नाही माहीत नाही पण ज्याला अनुभव येतो तोच समजू शकतो.