काही वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. १० वी ची परीक्षा झाल्यावर कंप्युटर इंजिनीयर चा डिप्लोमा करायचा निर्णय घेतला होता. कॅप राऊंड मध्ये नंबर लागला तो नाशिक ला. मी मुंबईत राहत असले तरीही काहीही करून तिथे जाणे भाग होते. त्यामुळे रूम वैगरे बघून तिथे शिफ्ट झाले. शेअरिंग रूम होती. प्रत्येक रूम चे एग्रिमेंट १ वर्षांचं असायचं त्यामुळे एक तर ते रिनिव करायला लागायचे किंवा ती रुम बदलायला लागायची. जेव्हा माझ्या सोबत हा जीवघेणा प्रसंग घडला तेव्हा मी डिप्लोमा च्या थर्ड इअर ला होते. 

त्या वर्षी मी ज्या रूम मध्ये मी राहत होते तिथे किचन वैगरे होते. म्हणजे एक हॉल आणि किचन अश्या दोन रूम होत्या. मेस चा टिफीन यायचा त्यामुळे तसे काही बनवायला लागायचे नाही. फक्त कधी कधी वेळी अवेळी भूक लागली तर काही बनवून खाल्ले तरच. त्या रूम मध्ये आम्ही सहा मुली राहायचो. म्हणजे मी धरून ७. प्रत्येकीला एक लहान बेड होता. मी किचन मधल्या बेड वर झोपायचे. त्या सगळ्या मुलींमध्ये मीच लहान होते म्हणजे ४ जणी डिग्री कॉलेज ला होत्या आणि दोघी जणी जॉब करत होत्या. 

आमच्या रूम च्या ऑनर होत्या त्या खाली रहायच्या. त्या अधून मधून त्यांच्या मुलीकडे जीचे लग्न झाले होते तिला भेटायला जायचा आणि कधी कधी तिथेच काही दिवस रहायच्या. मला जो अनुभव आला त्याच्या काही दिवस आधी त्या त्यांच्या मुलीकडे गेल्या होत्या. त्या दिवशी नेहमी प्रमाणे कॉलेज ला जाऊन आले. टिफीन आला होता म्हणून जेवण वैगरे करून सगळे आटोपले आणि झोपून गेले. साधारण ११.३० च्या सुमारास माझ्या फ्रेंड चा कॉल आला. तसे मी त्याच्याशी बोलत बसले. मी भिंतीकडे तोंड करून बोलत होते. अर्धा पाऊण तास उलटला असेल. आमचे बोलणे झाल्यावर मी फोन ठेवला आणि पाणी प्यायला म्हणून बेड वरून उठायला वळले तसे समोरचे दृश्य पाहून अंगावर सर्रकन काटा आला. 

माझ्या बेड शेजारी बरेच जण बसले होते. माणसं होती की अजुन काही माहीत नाही पण माणसाच्या आकाराच्या गडद आकृत्या भासत होत्या. भीतीने होणारी माझ्या हृदयाची धडधड मला स्पष्ट ऐकू येत होती. त्यातला एका कडे माझे लक्ष वेधले गेले. जुन्या काळातले खेडेगावात ले लोक जसा पेहराव करतात अगदी तसाच पेहराव परिधान केल्या सारखे वाटले. काय करावे काही सुचत नव्हते. मी थोडा अंदाज घेतला आणि डोळे बंद करून बेड च्या लोखंडी पाईप सारख्या भागावरून उडी मारून हॉल मध्ये धावत गेले. मी खूप घाबरले होते. सगळ्या रूम मेट्स ना उठवले आणि घडलेला प्रकार सांगितला.

माझ्या सोबत घडलेला भयानक प्रसंग ऐकुन त्या सगळ्या ही बऱ्याच घाबरल्या. त्यातला एका मुलीने झटकन उठून कॅलेंडर पाहिले आणि म्हणाली की आज अमावस्या आहे. तिचे ते एक वाक्य ऐकुन आम्हा सगळ्यांची झोपच उडाली. हा सगळा प्रकार रूम ओनर ला सांगायचे नक्की झाले. माझी अवस्था खूपच वाईट झाली होती. मला भीतीने ताप भरला होता. पहाट झाली तसे आम्ही बाहेर जाऊन चहा वैगरे घेऊन येऊ असा विचार केला आणि रूम चा दरवाजा उघडला. तितक्यात खालून गेट चा आवाज आला. आम्ही पटकन खाली पाहायला गेलो तर आमच्या रूम ओन र आल्या होत्या. 

आम्हाला जरा आश्चर्य वाटलं की इतक्या पहाटे या घरी आल्या म्हणजे रात्रभर प्रवास झाला असणार. आमच्यापैकी ३ जण त्यांच्याकडे गेलो आणि सहज म्हणून त्यांना विचारले की काकू तुम्ही इतक्या सकाळी कसे आलात. तसे त्या म्हणाल्या की आज काकांचा वाढदिवस आहे, त्यांच्यासाठी ताट ठेवायचे आहे म्हणून आलेय. पुन्हा जाणार आहे. काका म्हणजे रूम ओन र चे मिस्टर. आम्हाला त्यांच्या बद्दल जास्त काही माहीत नव्हते पण त्यांनी विष घेऊन आत्महत्या केली होती असे ऐकण्यात आले होते. त्या मागचे कारण आम्हाला माहीत नव्हते. आम्ही बोलता बोलता विषय काढला आणि काल रात्री घडलेला भयानक प्रसंग त्यांना संगीत ला. 

काकू मात्र अजिबात विश्वास ठेवायला तयार नव्हत्या. उलट आम्हाला म्हणाल्या की काहीही सांगून रूम ची बदनामी करून नका. त्या आमच्या सोबत वर आल्या होत्या. त्या नंतर आम्ही तिथल्या आजूबाजूच्या परिसरात चौकशी केली आणि मला जाणवले की काल जे दिसले होते ते बहुतेक काकाच होते. अजुन एक गोष्ट कळली की ते जेव्हा हयात होते तेव्हा ही त्यांनी वरची रूम रेंट वर दिली होती आणि तिथे काही मुली रहायच्या. ते काका स्वभावाने खूप चांगले होते आणि त्या मुलींना आपल्या स्वतःच्या मुलीसारखी माया करायचे. कधी काही कार्य असले कोणाचा वाढदिवस असला की त्या मुलींसोबत साजरा करायचे. 

बहूतेक त्या रात्री तेच आले होते. इतरांच्या बोलण्यावरून त्यांचा जो पेहराव असायचा अगदी तसाच त्या रात्रीही होता त्यांचा. मी माझ्या घरी आल्यावर आई बाबांना सगळे सांगायचं प्रयत्न केला पण त्यांना असे वाटले की माझा हा फक्त भास होता. पण मला माहितीये जे घडले तो माझा भास नक्कीच नव्हता. 

तुम्ही ही गोष्ट ऐकल्यानंतर आता मागे फिरून पाहू नका कदाचित तुम्हाला ही ….

Leave a Reply