अनुभव – चेतन तांडेल

मी नवी मुंबईत कंप्युटर ऑपरेटर म्हणून जॉब करतो. माझी डे अँड नाईट शिफ्ट असते. जेव्हा कधी नाईट शिफ्ट असायची तेव्हा मित्रांच्या गप्पा रंगायच्या. एक जण नुकताच दुसऱ्या ब्रांच मधून आमच्या ऑफिस मध्ये जॉईन झाला होता. आमच्या गप्पा ऐकून तोही आमच्यात लवकरच मिसळला. एके रात्री नाईट शिफ्ट असताना त्याने त्याच्या जुन्या ऑफिस मधला एक किस्सा सांगायला सुरुवात केली. तो म्हणाला की माझ्या जुन्या ऑफिस मध्ये रात्री थांबलो की पैंजण चे आवाज येतात आणि अंधाऱ्या कोपऱ्यात कोणी तरी उभ असल्याचा किंवा चालत गेल्याचा भास होतो. आणि हे मला नाही तर इतर जणांना ही जाणवत. सगळ्यांनी अगदी खोदून विचारले तसे तो अजुन सांगू लागला. पण त्याला कळत नव्हत की दुसऱ्या दिवशी याच विषयावरून त्याची खिल्ली उडवणार होतो. ठरल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी त्याची इतकी मस्करी केली की तो शेवटी रडकुंडीला आला. पुढच्या काही महिन्यात त्याची पुन्हा दुसरीकडे बदली झाली. आता ती झाली की त्याने स्वतःच करून घेतली हे त्याचे त्यालाच माहीत. लॉक डाऊन च्या आधी माझ्या लहान भावाला नेमके त्याच ऑफिस मध्ये जॉब मिळाला. सुरुवातीलाच नाईट शिफ्ट मिळाली. मी काही दिवस सुट्टी वर होतो. म्हणून मग माझा भाऊ म्हणाला की माझ्या सोबत चल. आपण काम आटोपून लवकर निघू. 

तसे ही नाईट शिफ्ट असल्यावर त्या ब्रांच ला अगदीच तुरळक स्टाफ असायचा. म्हणून मी यायला तयार झालो. त्या दिवशी आम्ही जेव्हा गेलो तेव्हा ऑफिस मध्ये पोहोचल्यावर कळले की इतर ३-४ जण सुट्टीवर आहेत. त्यामुळे आम्ही दोघच ऑफिस मध्ये होतो. भावाला घाबरवायला म्हणून मी त्याच्या नकळत आवाज काढू लागलो. पण तो त्याकडे लक्ष देत नव्हता. आपल्या कामात जरा जास्तच व्यस्त झाला होता. त्यामुळे मग मी ऐकटाच ऑफिस मध्ये फेऱ्या मारू लागलो. तितक्यात एका केबिन ची खिडकी उघडी दिसली. बाहेर वारा पाऊस सुरू होता म्हणून मी आत केबिन मध्ये गेलो आणि ती खिडकी बंद केली. जसे मी मागे वळलो तसे अवघ्या २-३ सेकांदासाठी मला पैंजनांचा आवाज आला. मी एकदम दचकलो. कळले नाही की नक्की भास होता की अजुन काही. पण भावा जवळ जाऊन त्याला विचारले पण तो म्हणाला की त्याला कसलाच आवाज आला नाही. आणि त्याने माझे बोलणे हसण्यावर नेले. एक दीड तासानंतर आम्ही काम आटोपून घरी आलो. अजूनही तो प्रसंग माझ्या मनात घर करून राहिला होता. दुसऱ्या दिवशी रात्री माझ्या घरी झोपलेलो. मध्य रात्र उलटून गेली असेल, वेळ माहीत नव्हती. मला अचानक जाग आली आणि पुन्हा पैंजणांचा आवाज येऊ लागला. मी खाडकन अंथरुणात उठून बसलो. काळीज भीती ने धडधडू लागले. 

कारण सतत असे वाटत होते की घरात कोणी तरी पैंजण घालून फेऱ्या मारतय. मी घड्याळात वेळ पाहिली. अगदी तीच वेळ झाली होती जेव्हा मला ऑफिस मध्ये असताना असाच आवाज आला होता. भास तर नक्कीच नव्हता आणि एव्हाना माझी झोप ही कुठच्या कुठे उडून गेली होती. मी त्या आवाजाचा सतत अंदाज घेण्याचा प्रयत्न करू लागलो. आणि असे जाणवू लागले की तो आवाज माझ्या खोलीत एका कोपऱ्यातून दुसऱ्या कोपऱ्यात ये जा करतोय. कोणी तरी होत जे माझ्याच खोलीत फेऱ्या मारत होत पण मला दिसत मात्र नव्हत. मनातल्या मनात मी हनुमान चालीसा चा जाप करत राहिलो. काही वेळा नंतर तो आवाज यायचा बंद झाला. सकाळ झाली. रात्रीचा प्रसंग आठवून अजूनही अंगावर शहारे येत होते. पण घरी कोणालाच त्याबद्दल बोललो नाही. दुसऱ्या दिवशी रात्री अगदी त्याच वेळेला पुन्हा तो आवाज यायला सुरुवात झाली. आता मात्र हिम्मत करून मी अंथरुणातून उठलो आणि संपूर्ण घर पालथं घातलं. पण माझ्याशिवाय कोणीही जाग नव्हत. तो आवाज नक्की कुठून येतं होता काहीच समजत नव्हत. पुढची काही रात्र तो आवाज मला तसाच येत राहिला. त्यामुळे माझ्या मनात भीती बसून राहिली होती. दिवस रात्र डोक्यात हेच. शेवटी न राहवून मी माझ्या आई ला सांगितले. ती म्हणाली की तुला भास झाला असेल. अचानक एके रात्री पासून तो आवाज यायचा बंद झाला. आता खरंच त्या ऑफिस मधल्या अंधाऱ्या केबिन पासून माझ्या घरात काही आल होत की तो आवाज अजुन कसला होता ते माहीत नाही. पण तो माझा भास नक्कीच नव्हता. 

Leave a Reply