अनुभव – आदित्य शिंदेकर

हा अनुभव मला तेव्हा आला होतो जेव्हा मी ९ ला होतो. माझे गाव चंद्रपूर जिल्ह्यातले. आमच्या शाळेच्या सहलीचे नियोजन नागपूर च्या फन आणि फूड साठी करण्यात आले होते. आमच्या चार जणांचा ग्रुप होता. मी, माझे मित्र रोहित, आयान आणि वल्लभ. नागपूर तसे जवळपास २०० किलोमिटर वर आहे त्यामुळे आम्हाला सकाळी ६ वाजता निघायचे होते. शाळेची सर्व मुले सकाळी ५.३० पर्यंत शाळेत जमले आणि अगदी वेळेत आमचा प्रवास सुरु झाला. आमच्या ४ जणांचा ग्रुप बस च्या मागच्या मोठ्या सीट वर बसला होता. आम्ही खूप मस्ती करायचो म्हणून आमच्या सोबत सर सुद्धा बसले होते. ते असले की मस्ती जरा प्रमाणात असायची. आम्हाला पोहोचता पोहोचता १० वाजले. काही वेळात फ्रेश वैगरे होऊन दिवसभर मस्त मजा केली, दंगा केला आणि संध्याकाळी ५ च्या सुमारास आम्ही तिथून निघालो. रात्रीचा प्रवास करणार नव्हतो म्हणून समोरच एका लॉज मध्ये मुक्काम करायचे ठरले होते. रात्री चे ९ वाजले होते. मोहित आणि मला एक रूम दिली होती तर आयन आणि वल्लभ ला दुसरी. सगळ काही सुरळीत चालू होते पण त्यानंतर जे घडले ते आता आठवल्यावर ही अंगावर काटा येतो. मोहित आणि मी खूप जवळचे जिवाभावाचे मित्र आहोत. आणि मित्र सोबत असल की झोप कसली लागतेय. आमच्या गप्पा सुरू अल्या आणि बघता बघता वेळ कसा निघून गेला कळलेच नाही. घड्याळात वेळ पाहिली तर दीड वाजून गेला होता.

आयन आणि वल्लभ ची रूम आमच्या बाजूला अगदी लागूनच होती. त्यामुळे त्यांच्या रूम मध्ये काय सुरू आहे हे आम्हाला ऐकू यायचे. इतक्या वेळेपासून शांत असणाऱ्या त्यांच्या रूम मधून अचानक चित्र विचित्र आवाज येऊ लागले. आम्हाला वाटले की हे दोघे नक्कीच आमची मजा घेत आहेत, आम्हाला घाबरवत आहेत. म्हणून आम्ही मुद्दामून घाबरण्याचे नाटक करू लागलो, एकमेकांशी असे बोलू लागलो की त्यांना आवाज जाईल आणि खूप घाबरलो आहोत हे सुद्धा कळेल. आमची योजना यशस्वी ठरली. काही वेळानंतर तो आवाज बंद झाला. आम्ही मनात विचार केला की थकले असतील बिचारे. सगळं काही शांत झालं तसे आमच्या दारावर थाप पडली. मला वाटले यांची मस्करी अजुन चालूच आहे. मी रागातच उठलो आणि दाराजवळ जात म्हणालो “का रे.. तुम्हाला झोप नाही लागत का.. आले इथे टाईमपास करायला.” अस म्हणतच मी दरवाजा उघडला आणि समोर पाहतो तर काय.. एक ७०-८० वयाची म्हातारी माझ्या समोर उभी होती. मी जरा दचकलो च. पण नंतर वाटले की इथेच काम करणारी असेल. मी तिला म्हंटल ” आजी काही काम आहे का तुम्हाला..?”. पण ती काहीच न बोलता माझ्याकडे एक कटाक्ष टाकून निघून गेली. मला जरा विचित्र च वाटले. पण मी दुर्लक्ष करून पुन्हा आत झोपायला आलो. दीड पावणे दोन तास उलटले असतील. 

अंदाजे ३ वाजत आले होते. पुन्हा दरवाज्यावर थाप पडली. आता मात्र मी जरा घाबरतच उठलो आणि जाऊन दरवाजा उघडला. समोर माझे मित्र आयान आणि वल्लभ उभे होते. त्यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव सांगत होते की ते प्रचंड घाबरले आहेत. मी त्यांना काही विचारणार तितक्यात त्यांनी रूम मध्ये धाव घेतली. मी त्यांना काय झाले असे विचारत दरवाजा बंद केला. तसे ते म्हणाले की आम्हाला तुमच्या रूम मधून खूप चित्र विचित्र आवाज येत होते आणि नंतर दार वाजले. आम्ही दार उघडुन पाहिले तर एक म्हातारी बाई समोर उभी दिसली. हे ऐकून मी ही जरा विचारत पडलो. मोहित जरा भित्र्या स्वभावाचा असल्याने तो बराच घाबरला. आणि घाबरून हनुमान चालीसा म्हणू लागला. थोड्या वेळ सगळ काही शांत झालं. आता काय करायचे हा विचार आम्ही करत होतो. साधारण ३.३० वाजता पुन्हा आमच्या रूम चा दरवाजा वाजला. यावेळी आम्ही चारही जण एकाच रूम मध्ये होतो. चौघेही खूप घाबरलो होतो. दरवाजा उघडण्याची कोणाचीही हिम्मत होत नव्हती. पण बघता बघता समोरचा दरवाजा आपोआप उघडला गेला. आम्ही जीव मुठीत धरून ते भयाण दृश्य पहात होतो. दाराबाहेर कोणीही नव्हते. रूम मध्ये अचानक गारवा पसरला आणि झपकन रूम मधली लाईट गेली. माझ्या एका मित्राने रूम ची खिडकी उघडली तसा बाहेरून हलकासा प्रकाश खोलीत येऊ लागला.

तितक्यात अचानक तीच म्हातारी बाई अंधारातून आमच्या समोर आली आणि एक वेगळ्याच भाषेत बडबडू लागली. माझे तर हात पाय भीतीने लटपटू लागले, सर्वांग शहारत होत. मित्रांची ही तीच अवस्था झाली होती. मी कसे बसे स्वताला भानावर आणले, मित्रांना इशारा केला आणि देवाचे नाव घेत जोरात त्या रूम मधून बाहेरच्या दिशेला धावत सुटलो. बाहेर जाताच आजूबाजूच्या रूम चे दरवाजे बडवू लागलो. माझ्या ओम नावाच्या एका वर्ग मित्राने दरवाजा उघडला तसे आम्ही थेट आत शिरलो. त्याला घडलेला सगळा प्रकार सांगितला. तो ही भीती ने थरथरू लागला. आम्ही ती रात्र कशी बशी काढली. दुसऱ्या दिवशी आम्ही तिथल्या मॅनेजमेंट ला जाऊन सगळे काही सांगितले. ते सुरुवातीला काहीच सांगायला तयार नव्हते. पण आम्ही त्यांना बराच वेळ विचारत राहिलो म्हणून त्यांनी आम्हाला या मागचे कारण सांगितले आणि म्हणाले की कृपया या गोष्टीची बाहेर कुठे वाच्यता करू नका. काही महिन्यांपूर्वी एका वृद्ध महिलेचा जिन्यावरून पडून मृत्यू झाला होता. ती रात्री रूम च्या दारावर थाप देते. त्याचे बोलणे पूर्ण होत नाही तितक्यात मोहित म्हणाला की आम्ही येताना बाहेर पडलेल्या लिंबू मिरची ला लाथ मारून आत आलो होतो. कदाचित त्यामुळे असे काही घडले असावे. मोहित तिथून घरी आल्यावर ताप येऊन आजारी पडला होता. बऱ्याच दिवस त्याला ताप होता पण नंतर काही दिवसांनी त्याचा ताप उतरला. 

Leave a Reply