1. पक्ष्यांची सामूहिक आत्महत्या – जतिंगा, आसाम

जतींगा हे आसाम मधील हिरवळींनी आछादलेले एक छोटेसे गाव आहे. सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात आसाममधील जतिंगा गावात स्थलांतर करणारे हजारो पक्षी अतिवेगाने उडत येतात आणि येथील झाडांना आणि घरांना आपटून मरण पावतात. हे साधारण सूर्यास्त नंतर ७ ते १० या वेळेत घडते. तिथल्या स्थानिक लोकांत अशी समजूत आहे कि पूर्वीच्या काळी राहणारी वाईट शक्ती या पक्ष्याना तिथे आकर्षित करते. पण खरे सांगायचे तर ते असं का करतात, हे एक न उलगडलेलं मोठं कोडं आहे.

2. लोकतकचा तरंगता तलाव – मणिपूर

मणिपूरचा लोकतक तलाव हे जगातील एक नैसर्गिक आश्चर्य आहे. या तलावात अनेक अशी बेटं आहेत जी तरंगत राहतात. माणसं या बेटांवर शेती करतात. तसेच तेथे जगातील काही दुर्मिळ प्राणीही आढळतात. दरवर्षी हजारो पर्यटक या बेटांना भेट देतात.

3. रुपकुंड तलाव – उत्तराखंड 

उत्तराखंडात हिमालयाच्या कुशीत १६,५०० फुटांवर रुपकुंड तलाव आहे. इथे कोणत्याही प्रकारची मानवी वस्ती अस्तित्वात नाही. तरीही इथे ६०० हुन जास्त मानवी सांगाडे पाहायला मिळतात.. १९४२ साली एका ब्रिटिश गार्ड ने हे सांगाडे शोधून काढले तेव्हा असा समज झाला होता कि हे सांगाडे जपानी सैनिकांचे आहेत जे दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी सीमा रेषा ओलांडताना मरण पावले होते. पण नंतर वैज्ञानिकांनी शोधून काढले कि हे सांगाडे ९ व्या शतकातील लोकांचे आहेत जे एका भयंकर नैसर्गिक आपत्तीत सापडून मरण पावले होते. 

4. कुंभलगड किल्ल्याच्या भिंती – राजस्थान 

चीनच्या ग्रेट वॉलबद्दल तर आपल्याला माहित असेलच. पण, राजस्थानच्या कुंभलगड किल्ल्याला असलेली ३६ किलोमीटरची भिंत ही जगातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात लांब भिंत आहे. हि भिंत किल्याला पूर्णपणे सुरक्षित ठेवण्याचा उद्देशाने बांधली गेली आहे. त्यामुळे डोंगरावरील चढ-उतार असू देत कि अजून अडथळे हि भिंत सलग ३६ किलोमीटर पर्यंत पसरली आहे. या भिंतीत जवळपास ३०० मंदिरं आहेत.

5. कोलकत्यातील वडाचे झाड

कोलकत्याच्या बोटॅनिकल गार्डनमध्ये असलेले हे वडाचे झाड म्हणजे एक आश्चर्य आहे. हे वडाचे झाड म्हणजे एक जंगलच आहे. ते २०० वर्ष जुने आहे. ते इतके पसरले आहे की त्याचा परीघ जवळपास २०० मीटर इतका प्रचंड आहे.

6. चुंबकीय टेकडी – लडाख 

लेह लडाख येथे असलेली चुंबकीय टेकडी हे एक मोठे आश्चर्य आहे. इथे एका विशिष्ट जागी न्यूट्रल गीअरमध्ये गाडी उभी केल्यास ती चढण असताना हि आपोआप या टेकडीकडे आकर्षित होते. गुरुत्वाकर्षणावर मात करणारी जागा नक्कीच पाहण्याजोगी आहे.

7. कोडीन्ही गाव – केरळ

केरळमधील या २००० लोकवस्ती असलेल्या गावात तब्बल ३५० जुळ्यांचा जन्म झाला आहे. दर १००० लोकांमागे ४२ जुळ्यांचा जन्म या गावात नोंदवला गेला आहे. या गावात इतकी जुळी मूळ कशी जन्माला येतात हे मात्र गूढ च आहे.

8. पंबन बेटावरचे तरंगते दगड – रामेश्वरम

रामेश्वरमनजीकच्या पंबन बेटावरुन रामाने रामसेतू बांधला अशी आख्यायिका आहे. याच बेटावर असे काही दगड आढळतात जे पाण्यावर तरंगतात. सुनामी मुळे हे दगड तिथल्या भागात विखुरले आहेत. रामाने सेतू बांधण्यासाठी हेच दगड वापरले असावेत अशी समजूत आहे. हि दगडं आजही पाण्यावर तशीच तरंगतात. 

9. झाडांच्या मुळांचे पूल – चेरापूंजी, मेघालय 

मेघालयमधील लोकांनी इथल्या जंगलातील झाडांच्या विस्तृत मुळांना असा काही आकार दिला की त्या मुळांचे साकव तयार झाले. गावातील लोक हे साकव दळणवळणासाठी वापरतात. जगातला झाडाच्या मुळाचा ५० मीटर लांबीचा पूल हि याच भागात आहे.

10. लटकते खांब – लेपक्षी, आंध्र प्रदेश 

आंध्र प्रदेशातील लेपक्षी मंदिरातील ७० खांबांपैकी एक खांब असा आहे जो कोणत्याही आधाराशिवाय लटकतो. या खांबाच्या खालून एखादा कपडा किंवा ओढणीही आरपार जाऊ शकते. ब्रिटिशांच्या काळात एका इंजिनिअर ने हा खांब हलवून या मागचे कोडे उलगडण्याचा प्रयत्न केला होता पण तो पूर्ण पणे अयशस्वी ठरला. आजही हा खांब कोणत्याही आधाराशिवाय कसा लाटकतोय हे कोड उलगडू शकले नाहीये. 

https://youtu.be/2kxEIXK9Fa4

Leave a Reply