अनुभव – केतन शिंदे

घटना आहे २०१० सालच्या दिवाळीत ली. आमच्या चाळीत प्रथा आहे की प्रत्येक वर्षी दिवाळी सुरू होण्या आधी जागरण करून नव नवीन प्रकारचे कंदील बनवायचे. पण त्या वर्षी दिवाळीच्या ९ दिवस आधी माझ्या प्रसाद नावाच्या मित्राच्या आजोबांचे वृद्धापकाळाने निधन झाले. पेश्या ने ते भगत होते पण सगळ्यांना ही गोष्ट माहीत नव्हती.

त्यामुळे या वर्षी दिवाळी नेहमी सारखी साजरी करायची की नाही कंदील वैगरे बनवायचा की नाही या बद्दल चर्चा चालू होती. कारण त्यांचे दिवस कार्य ही झाले नव्हते. पण नंतर संगनमताने दर वर्षी प्रमाणे कंदील बनवायचे नक्की झाले. सगळे साहित्य आणून ठेवले आणि रात्री कोणाला झोप येऊ नये म्हणून फराळ आणि चहा वैगरे सगळी सोय करून ठेवली होती. 

ठरल्याप्रमाणे जेवण वैगरे आटोपून आम्ही चाळी जवळच्या पाण्याच्या टाकी जवळ येऊन पोहोचलो. सगळ्यांनी काम वाटून घेतली आणि कंदील बनवायला सुरुवात केली. गप्पा गोष्टी ही सुरूच होत्या. सगळे जण आप आपले काम अगदी नीट मन लावून करत होते. आता २ वाजत आले होते. अर्ध्याहून जास्त काम पूर्ण झाले असावे तितक्यात अजय म्हणाला की जरा चहा साठी ब्रेक घेऊ म्हणजे तर तरी येईल आणि कामाला ही वेग येईल. 

काही वेळात चहा तयार झाला. आम्ही मस्त मजा मस्करी करत चहा चे घोट घेत होतो. जुन्या आठवणी रंगल्या होत्या. चहा चा ब्रेक झाला आणि आम्ही पुन्हा कामाला लागलो. काही लोकांचे असते की चहा नंतर लगेच प्रेशर येत आणि त्यातलाच मी ही एक होतो. त्यामुळे मी बाथरूम ला जाऊन येतो असे म्हणत तिथून बाहेर पडलो. दिवाळी असल्याने वेळेचे भान नव्हते. मी बाथरूम जवळ येऊन पोहोचलो. सगळेच बाथरूम रिकामे होते. 

मी एका बाथरूम मध्ये शिरलो आणि सगळ्याच बाथरूम चे दरवाजे अतिशय वेगाने उघड बंद होत आदळू लागले. मला कळेलच नाही बाहेर काय होतंय. आता आलो तेव्हा एकही जण इथे नव्हता आणि आता सगळे दरवाजे आदळत आहेत. भीतीने हात पाय लटपटायला लागले होते पण कसे बसे धीर धरून मी सगळे शांत व्हायची वाट पाहत होतो. काही वेळात तो आवाज थांबला तसे मी बाहेर आलो आणि सरळ घराच्या दिशेने चालू लागलो. तितक्यात मित्रांनी हाक दिली “शिंदे ये लवकर अजुन बरेच काम बाकी आहे”.

त्यांच्या हाकेला काहीही प्रतिसाद न देता मी निमूटपणे घराच्या दिशेने चालत राहिलो. घराजवळ पोहोचतच मी दार ठोठावल आणि तितक्यात मागून आवाज आला ” अरे केतन बाळा कुठे होतास प्रसाद ल बघितल स का?”.. तो आवाज ऐकून संपूर्ण अंगावर शहारे आले कारण तो आवाज दुसरा तिसरा कोणाचा नसून ९ दिवसांपूर्वी वारलेल्या प्रसाद च्याच आजोबांचा होता. मागे वळून बघण्याची हिम्मत होत नव्हती. मी दाराला जोरात धक्का देऊन आत शिरलो आणि समोरच्या अंथरुणात च भोवळ येऊन पडलो. 

सकाळी शुद्धीवर आलो तेव्हा सगळे मित्र घरी आले होते. त्यांनी मला घेरल आणि विचारू लागले की रात्री न सांगता घरी का गेलास, थांबायचे नव्हते तर तसे आधीच सांगायचे आम्हाला. मला थोड्या वेळा पुरता काही सुचलेच नाही. पण काही वेळा नंतर कालचा प्रसंग आठवला आणि माझ्या अंगावर शहारा आला. जेमतेम घडलेला प्रसंग मित्रांना सांगितला आणि ते ही निशब्द झाले. खरोखर तो प्रसंग मी माझ्या उभ्या आयुष्यात कधीच विसरू शकणार नाही. 

This Post Has 2 Comments

  1. Ashwini Jangam

    काही दिवसापुर्वी आम्‍ही तिघ ( म्‍हजे मी माझी लहान बहिण आणि लहान भाऊ ) एकत्र बसलो होतो. संध्याकाळीची वेळ असल्‍याने सहजच भूतां विषयी र्चचा रंगली. आमची र्चचा ऐकुन माझी आई आमचात ऐऊन बसली, आणि आम्‍हाला तीच्‍या सोबत घडलेल्‍या अनुभवा बद्‍दल सांगू लागली. ही गोष्‍ट 1993 सलची आहे तेव्‍हा मला मुंबईला ऐऊन फक्‍त एक वर्ष झाले होते. तुमचे वडिल तेव्‍हा watchmen ची नोकरी करत होते. त्‍या वेळी आम्‍ही घाटकोपर येथे राहत होतो, तुमचे वडिल watchmen असल्‍याने त्यांना यायला 1 ते 1:30 वाजत असे. आमच्‍याकडे टिव्‍ही नसल्‍याने मी जेवण उरकल्‍यावर पाटच्‍या चाळीत टिव्‍ही पाहायला जात असे. नेहमी प्रमाणे त्‍या दिवशी ही मी जेवण उरकुन 10:30 वाजता टिव्‍ही पाहण्‍या करता गेले. टिव्‍ही पाहता पाहता 12:30 कधी वाजुन गेले कळलंच नाही. उशीर झाला होता म्‍हणुन मी घाईने घरी जायला निघाले. गल्‍लीचा आत जाताच समोर एक हिरवी साडी घालुन बाई उभी दिसली. पण तेव्‍हा मला वाटले लता ( माझी भाची ) असेल. मी तिला आवाज दिला ( लता अग लता ) तस तिने झटकन मागे पाहिल, तीला बघुन माझ्‍या काळजाचा ठोका चुकला. ती लता न्‍हवती. तीचे केस मोकळे होते चेहर्‍यावर वेगळाच तेज अंग दागिन्‍यानी भरलेले तेवढ्‍यात माझी नजर तीच्‍या पाया कडे गेली माझा काळजात धस्‍स झाल तीचे पाय उलटे होते. आपण जंगम आहोत. आपल्‍या गळ्यात लिंग ( म्‍हणजे महादेवाची पिंड ) असल्‍याने तीने मला रस्‍ता दिला नाहीतर त्‍या दिवशी माझा शेवटचा दिवस होता. घरी गेले दार लाऊन झोपले मला खूप ताप भरला होता. त्‍याच बाईला शेजारच्‍या घरत काकीनी सुध्‍दा पाहील होत. दुसर्‍या दिवशी कळाले, त्‍या बाईने काही वर्षापुर्वी जाळून आत्‍महत्‍या केली होती. त्यानंतर ती बाई मला पुन्‍हा कधीही दिसली नाही.

    1. Ashwini Jangam

      Plzz hi story upload kara mazi

Leave a Reply