अनुभव – अमोल मधुसूदन खाडे
मी सध्या ओल्ड पनवेल (नवी मुंबई ) इथे एका flat मध्ये वास्तव्यास आहे.
माझे सर्व बालपण पनवेल मधेच गेले. मी आत्ता 38 वर्षांचा आहे. माझ्या आयुष्यात आत्तापर्यन्त चार वेळा भुताटकी चे अनुभव आले आहेत त्यापौकी हा एक खूप जवळचा अनुभव.. माझी आजी …. आम्हा दोघा भावंडांपैकी मी तिचा खूप लाडका होतो. मी लहान असताना ती माझे खूप लाड करायलाची. जुनी माणस असल्यामुळे तीला कसलाच आजार नव्हता. पण जशे तिचे वय वाढत गेले तिची तब्येत बिघडत गेली. एके दिवशी ती आजारी पडली तिला खूप ताप आला होता. तसं बघितलं तर त्या वेळी आम्हा सगळ्यांनाच ताप आला होता. तापाची साथ होती. आम्ही सगळे त्या तापातून बरे झालो. पण आजी काही दिवसांनी बरी झाली. एक रात्री मी हॉल मधे होतो झोपायची वेळ झाली होती. आजी आली आणि तिने दरवाजाच्या काड्या लावल्या आणि परत स्वयंपाक खोलीत गेली, नंतर थोडयावेळानी परत आली आणि काड्या लावून गेली. मी तिच्याकडे बघतच बसलो. दुसऱ्या दिवशी सकाळी मी हे सगळं माझ्या आईला सांगितले तेव्हा आई बोलली कि आजीची स्मृती गेली आहे, तिच्या लक्षात नाही राहत म्हणून ती एकच गोस्ट परत परत करते.
एकदा मध्यरात्री माझी झोप उडाली, आमच्या घरात आजी, मी, माझा मोठा भाऊ, आई आणि बाबा असायचो पण माझी झोप थोडासा जरी आवाज आला कि लगेच उडते. मला स्वयंपाक खोलीत कोणी तरी असल्याचे जाणवले कारण स्वयंपाक खोलीत पाय घासत चालण्याचा आणि डब्बे उघडल्याचा आवाज येत होता. मी फटकन उठलो आणि स्वयंपाक खोलीतला दिवा लावला आणि मला दिसलं कि आजी काळोखामधे डबे उघडून तपासात आहे. तीला जेव्हापासून विस्मरण होतय तेव्हापासून तिला सारखी भूक लागायची कारण तिला ती जेवल्याचं आठवत नसतं. हे थोडं विचित्र होत पण असो… हे असंच चालू असायचं. ती मध्यरात्री यायची मी तिला खायला देऊन तिला तिच्या खोलीत झोपायचो…. कधी कधी मी खूप वैतागायचो कारण माझी झोपमोड व्हायची सकाळी उठून कामाला पण जायचं असायचं. एकदा मध्यरात्री माझी झोप परत उडाली. मला स्वयंपाक खोलीत परत पाय घासत चालायचा आणि डब्बे उघडल्याचा आवाज आला. मी थोडा वैतागत लगेच उठलो आणि स्वयंपाक घरातला दिवा लावला. आणि बघितलं तर माझ्या अंगावर काटाच आला मी थोडा स्तब्ध झालो. कारण मला अचानक आठवल कि कालच सकाळी माझी आजी वारली होती, संध्याकाळी तिचे अंतिम संस्कार पण झाले होते.
मी जेव्हा दिवा लावला तेव्हा तिथे कोणीच नव्हते. मला हा प्रकार समजायला वेळ लागला नाही कारण ह्याच्या आधी ही मी लहान असताना मैदानाजवळ सायकल चालवताना एक बाई गायब झाल्याचा विचित्र अनुभव आला होता. पण मी आजीचा खूप लाडका होतो त्यामुळे ती मला कुठलाही त्रास देणार नाही ह्याची मला खात्री होती. त्यादिवसापासून रोज मद्यरात्री आजीच्या पायाचे चालण्याचा आवाज, डब्बे उघडल्याचा आवाज यायचा, घरात सगळ्यांना हे आवाज ऐकू यायचे पण कोणाची जाऊन बघायची हिम्मत होत नसे, मी मात्र कुतूहल म्हूणन मुद्दामून स्वयंपाक खोलीत तिला बघायला जायचो पण ती मला कधीच दिसली नाही, कधी कधी मी आवाज यायला सुरु झाला कि हळूच अजिबात आवाज नं करता अलगत बघायचो पण मला ती कधीचं नाही दिसली… एकदा तर मध्य रात्री संपूर्ण शांतता असताना फ्रिज वर ठेवलेला पेला जोरात खाली पडण्याचा आवाज आला नेहमी प्रमाणे मी उठलो आणि पेला ठेऊन परत झोपायला गेलो … फ्रिजच्या कंपनामुळे तो पडला असावा असे मला आजही वाटते कारण तेव्हा मला आजीच्या पायांचा आवाज आला नव्हता पण हा सगळा प्रकार माझ्या आजीचे दिवस संपल्यावर आपोआप बंद झाले.