अनुभव – विकी पाटील

दर वर्षी आम्ही सगळे मित्र एक तरी ट्रीप प्लॅन करतो. या वर्षी आम्ही गोव्या ला जायचा प्लॅन केला होता. फेब्रुवारी महिन्यात आम्ही तिथे फिरायला गेलो होतो. दिवसभर सगळ्या ठिकाणी फिरून रात्री राहण्यासाठी आम्ही एक बंगला रेंट वर घेतला. आम्ही एकूण ४ जण होतो. बंगला तसा मोठा नव्हता पण छान होता. एक गोष्ट म्हणजे तिथे गेल्यापासून आम्हा सगळ्यांना विचित्र अनुभव येऊ लागले. कधी एक म्हातारी बाई आरामखुर्चीवर बसली आहे, कधी रिकाम्या खोलीतून वेगळा आवाज येत आहे असे चित्र विचित्र भास होत होते.

सुरुवातीला आम्ही दुर्लक्ष केलं पण नंतर ते भास अगदी प्रकर्षाने जाणवू लागले. जसे सकाळी अंघोळीला गेल्यावर अचानक शॉवर चालू होणे, अचानक लाईट बंद चालू होणे. त्यामुळे मग आम्ही तिथून काढता पाय घ्या यचे ठरवले. आम्ही साधारण २ दिवस तिथे राहिलो असू. ज्यांच्याकडून आम्ही तो बंगला भाड्यावर घेतला होता त्यांना आम्ही याची कल्पना दिली पण त्यांनी सरळ नकार दिला की इथे असे काहीही नाही. 

आम्हीही जास्त वाद न घालता सगळे सामान घेऊन निघालो. तिथून निघाल्यावर मित्र म्हणाला की काही किलोमीटर अंतरावर माझ्या काकांचा बंगला आहे तिथे जाऊ आपण. तसे आम्ही त्यांच्याकडे जायचे नक्की केले. तो जंगल पट्टीचा परिसर असल्यामुळे आम्ही त्या रस्त्याला लागण्या आधीच वाटेतून जेवणासाठी चिकन घेतले आणि गाडीच्या मागच्या सीट वर ठेवले. माझा मित्र राकेश गाडी चालवत होता. तो म्हणाला की जंगलाचा भाग आहे एखादे जंगली जनावर दिसले की कोणी गाडी थांबवायला लाऊन खाली उतरू नका. तसे आमच्यातला एक मित्र विनायक त्या बंगल्यात होत असलेल्या भासाबद्दल आठवण करून देऊन राकेश ची मस्करी करू लागला. रात्रीचा सुमारे एक वाजत आला होता.

आम्ही मजा मस्करी करत प्रवासाचा आनंद घेत होतो. तितक्यात अचानक एक जोरात आवाज आला आणि गाडी ला मागून दणका बसल्या सारखे झाले. असे वाटले की कोणी तरी भला मोठा दगड मारला असावा. तसे राकेश ने गाडी वेगात पळवायला सुरुवात केली. आम्हाला वाटले की चोरीच्या उद्देशाने एखादी टोळी आम्हाला लुटण्यासाठी असे करत असावी. कोणी काहीही बोलले नाही, आम्ही मात्र गाडीचा वेग कमी न करता पुढे जात राहिलो. काही वेळात आम्ही ठरलेल्या ठिकाणी पोहोचलो. 

आम्ही पटकन गाडीतून उतरून मागच्या बाजूला पाहायला गेलो. गाडीच्या मागच्या काचेला कोणी तरी ओरबडल्याच्या खुणा होत्या. दरवाजा उघडून पाहिले तर आम्ही आणलेले पार्सल गायब होते. गाडीचा मागचा दरवाजा न उघडता ते पार्सल कोणी आणि कसे काढून घेतले हे कळायला मार्ग नव्हता. तिथल्या बंगल्याच्या केअर टेकर ला आम्ही घडलेला प्रकार सांगितला तेव्हा ते म्हणाले की रात्रीच्या प्रवासाला असे मांस वैगरे न्यायचे नसते. तुम्ही थोडक्यात वाचलात. त्या रस्त्यावर आमच्या मागे लागलेले जंगली shwapad होते की अजून काही हे माहीत नाही पण तो प्रसंग आठवला की अंगावर शहारे आल्याशिवाय राहत नाहीत.

Leave a Reply