डार्क वेब किंवा डीप वेब ही इंटरनेट वरील अशी जागा आहे जिथे जगभरातल्या सगळ्या वाईट आणि बेकायदेशीर गोष्टी घडतात.. उदारहरणार्थ ड्रॅग्झ ची तस्करी, चाईल्ड पॉर्न, रेड रूम्स (अपहरण करून आणलेल्या लोकांना हाल करून मारणं तेही लाईव्ह), हिटमॅन विकत घेण (एखाद्याचा खून करण्यासाठी अज्ञात व्यक्तीला सुपारी देणं) आणि अश्या बऱ्याच गोष्टी ज्याचा तुम्ही कधी विचार ही केला नसेल.. तुम्ही म्हणाल की हे कसं शक्य आहे ? जरी हे अशक्य वाटत असले आणि बेकायदेशीर असले तरी या साठी विचत्र मनोविकाराची काही माणसे किती ही पैसे मोजायला तयार असतात. आणि या बाबत चे सर्व व्यवहार बिटकॉइन या डिजिटल करन्सी मधून होतात त्यामुळे ते कोणी दिले, कोणाला दिले या गोष्टी शोधणे जवळ जवळ अशक्य होतं. आपण पाहत असलेलं इंटरनेट हे केवळ 2% आहे. खरा भाग हा डीप वेब या जागेने व्यापला आहे.

डीप वेब एक्सेस करण हे तितकंस सोपं नाहीये. जर तुम्ही विचार करत असाल की काय मोठी गोष्ट आहे आत्ता गुगल करतो. तर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे गुगल डीप वेब च्या वेबसाईट्स ना इंडेक्स करत नाही याचा अर्थ डीप वेब ची एकही वेबसाईट तुम्हाला गुगल च काय तर याहू, बिंग किंवा इतर कोणत्याही सर्च इंजिन वर सापडणार नाही.. या वेबसाईट बहुदा .Onion या एक्सटेन्शन ने असतात. उदाहरणार्थ skdbeirihaaaa00dneihseewooqqppd.onion

अश्या वेबसाईट ना एक्सेस करण्यासाठी विशिष्ट प्रकारची राऊटर्स जसे टॉर किंवा ओनीयन राऊटर्स वापरले जातात. 

तर ही घटना साधारणतः 2003-2004 ची आहे. 

कॉलेज संपल्यावर आम्ही मित्र संध्याकाळी एकत्र जमायचो.. अशाच एके दिवशी गप्पा रंगात आल्या होत्या आणि विषय होता डीप वेब चा.. ती मित्रामधली पहिली चर्चा असल्यामुळे त्या बद्दल ची माझी उत्सुकता खूप वाढली. माझा स्वभावच उपद्व्यापी असल्यामुळे तस होणं साहजिक होत. त्यामुळे मी योग्य ती काळजी घेऊन डीप वेब एक्सेस करायचे ठरवले. पण म्हणतात ना की इंटरनेट च्या विश्वात कितीही काळजी घेतली तरी काही तरी उणीव राहतेच आणि तीच माझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी चूक ठरली..

तेव्हा डायल अप इंटरनेट असल्यामुळे स्पीड अतिशय कमी होता अगदी 2g इंटरनेट पेक्षा ही कमी. तसेच त्यावेळी गुगल वैगरे इतके प्रगत नव्हते. तरीही प्रॉक्सी सर्वर, आय.पी. मास्किग, घोस्ट स्क्रिप्ट (जी वापरून दर 10 मिनिटाला आपला आय.पी. चेंज होत राहतो आणि आपले लोकेशन शोधणे अशक्य होऊन बसते) या सारख्या बऱ्याच सुरक्षा कवचांच्या आत राहून मी महिनाभर डीप वेब एक्सेस केलं. या गोष्टींमुळे मला इंटरनेट वरची माझी ओळख लपवता येईल आणि मला कोणीही शोधू शकणार नाही असे वाटत होते. काही दिवसानंतर मला वाटू लागले की यात मी आता पूर्ण माहीर झालो आहे आणि काहीही करू शकतो. हळू हळू मी जे करायला नको होतं ते करू लागलो. अश्या चित्र-विचित्र साईट्स शोधून काढू लागलो ज्या कोणालाही न सापडणाऱ्या होत्या. साहजिकच पूर्ण बेकायदेशीर.

मला तो दिवस अजूनही आठवतोय, रात्री 1 वाजता मी एका साईट वर येऊन थांबलो. ती साईट म्हणजे एक फोरम होत ज्यावर वेगवगळे लोक येऊन आपला अनुभव सांगायचे. मी उत्सुकता म्हणून वाचायला सुरुवात केली. त्यात DIE999 या नावाने एक युझर होता. जस जसे त्याने लिहिलेलं मी वाचत गेलो तस तसे माझे हात थंड पडू लागले, अंगावर शहारे येऊ लागले.. तो माणूस साधा नसून एक खुनी होता.. त्याने लिहिले होते की मी माझ्या घरापासून 2 किमी अंतरावर राहत असलेल्या संपूर्ण कुटुंबाला एका रात्रीत डोकी चिरून जीवानिशी मारले आहे आणि त्यांच्या लहान मुलाला माझ्या घरी अपहरण करून आणले आहे. केलेल्या निर्घृण कृत्याचे त्याने अगदी विचित्र प्रकारे वर्णन करून लिहून ठेवले होते. पेज वाचून झाल्यावर मला वाटले की हा फक्त मस्करी किंवा उगाच काही तरी लिहायचे म्हणून लिहितो आहे पण मी जेव्हा 2रया आणि 3रया पेज वर जाऊन पाहिले तेव्हा त्याने या चित्तथरारक गोष्टीला पटवण्यासाठी त्या मृत व्यक्तींचे फोटो टाकले होते. त्या मुलाचे आई वडील होते ते.. ते पाहिल्यावर मात्र माझ डोकं सुन्न झाल आणि माझी विचार करायची शक्ती च संपली. डोक चिरलेल्या अवस्थेतले ते फोटो.. इतके भयावह फोटो मी कधीच पाहिले नव्हते.. मी इच्छा नसताना ही निव्वळ उत्सुकतेपोटी नेक्स्ट पेज वरच्या गोष्टी वाचल्या. माणूस इतका क्रूर होऊ शकतो ? हे सगळे करणारा कोणत्या मनोवृत्तीचा माणूस असेल ? त्याने पुढच्या पेज वरती तर अपहरण करून आणलेल्या मुलाचे कसे हाल करतोय याबद्दल किती तरी गोष्टी लिहून ठेवल्या होत्या.. आश्चर्य म्हणजे या सगळ्या गोष्टींचे तिथले कित्येक लोक समर्थन करत होते. 

मी मनात म्हणालो “बस.. हा सगळा प्रकार थांबवायलाच हवा”.. मी त्या अनुभवाचा रिस्पॉन्स म्हणून कमेंट करायला सुरुवात केली की हा काय विचित्र प्रकार आहे कोणाला काहीच कसे वाटत नाही मी पोलिसांना (सायबर क्राईम शाखेला) या साईट बद्दल कळवतोय आणि पुढचे ते बघून घेतील..

मी साईट वरून लॉग आऊट झालो. कम्प्युटर बंद करून झोपायला गेलो. 2 तास झाले तरी मला झोप लागत नव्हती सतत त्या पोस्ट आणि फोटो डोळ्यासमोर येत होते. काय चूक होती त्यांची आणि आता त्या मुलाचे काय या विचाराने डोकं सुन्न होत होतं. साडे तीन वाजत आले असतील माझ्या दारावर अचानक कोणी तरी जोरात हाताने थापा दिल्या. मी पटकन उठून पॅसेज लाईट लावला आणि दरवाजा उघडून पाहिले पण बाहेर कोणीही नव्हते. मी पुन्हा येऊन झोपलो पण का कोणास ठाऊक मला त्या साईट वर पुन्हा जाऊन पहावेसे वाटले की माझ्या कमेंट ला कोणी उत्तर दिले आहे का काही.. की ती डिलीट केली असेल. मी पुन्हा कम्प्युटर चालू केला आणि ती साईट पाहायचा प्रयत्न केला. या वेळी मात्र त्या साईट वर काहीच नव्हते कोणाचाही अनुभव नाही. मेन्यू दिसत होते पण प्रत्येकावर क्लिक केल्यावर फक्त ब्लॅंक पेज.. मी जवळपास सगळे मेन्यू पाहिले आणि एक शेवटचा बाकी राहिला होता. मी त्यावर क्लिक केले आणि तिथे फक्त एक लिंक दिली होती. त्यावर मी क्लिक केले आणि माझ्या पायाखालची जमीनच सरकली.. मी जे पाहिले त्याचा कधी स्वप्नातही विचार केला नव्हता.. काही वेळापूर्वी दार उघडून बाहेर पाहतानाचा माझा फोटो त्या साईट वर होता आणि फोटोखाली लिहिले होते की पोलिसांना कळव आणि तू मेलास.. पुढची 10 मिनिटं मी तसाच घाबरलेल्या अवस्थेत त्याच ठिकाणी माझ्याच फोटो ला पाहत राहिलो. मनात शेकडो विचार येत होते.. कस शक्य आहे हे? त्यांना मी कोण आहे, कुठे राहतो हे कसे कळले असेल ?. कमेंट करून 3 तास झाले असतील.. इतक्या लवकर ते मला कसे शोधून काढू शकले.? यातली काही लोक इथलीच असतील का ? एकाही प्रश्नाचं उत्तर माझ्याकडे नव्हत. खरी भीती मी त्या रात्री अनुभवली होती. 

या घटनेनंतर मी 2 महिने घरातून बाहेरही पडलो नाही. सतत वाटायचे की ती लोकं माझ्या मागावर असतील आणि मला त्याच पद्धतीने संपवतील. त्या घटनेनंतर मी पुन्हा डीप वेब कधीच एक्सेस केलं नाही. त्याच दिवशी मी ठरवले होते की या गोष्टीच्या वाट्याला कधीच जाणार नाही. आजही मी त्या गोष्टी चा विचार केला की माझ्या अंगावर काटा उभा राहतो, ती भीती, तो प्रसंग आजही माझे काळीज पिळवटून टाकतो.

(गोष्टीचा उद्देश तुम्हाला डीप वेब एक्सेस करण्यासाठी प्रवृत्त करणे हा अजिबात नाहीये. तसे काही विपरीत घडल्यास त्याला फक्त तुम्ही जबाबदार असाल. अडमिन्स या गोष्टीला जबाबदार ठरणार नाहीत.)

Leave a Reply