कधी एखादा अकस्मित मृत्यू होतो आणि त्याचे गूढ मृत्यू नंतर ही तसेच कायम राहते. पण प्रत्येक वेळी असे होत नाही. असे म्हणतात की मृत्यू नंतर ही त्या बद्दल चे गूढ उलगडले जाऊ शकते. असाच हा एक चित्त थरारक अनुभव.

घटना आहे मनोरी इथली. माझ्या भावाचा मित्र रोहन एका ऑर्केस्ट्रा बँड मध्ये होता. त्याचे वय साधारणतः 24 ते 25 असावे. त्याची कमाई त्यातूनच व्हायची. मे महिना होता लग्न सराईचा. मनोरी गावापासून काही अंतरावर मालवणी कोळीवाडा आहे. तिथे एक लग्न होत आणि त्या लग्नाची ऑर्डर रोहन च्या बँड ला मिळाली होती. 

त्या गावातल्या पद्धती नुसार लग्नाची वरात रात्री 10 नंतर निघते आणि पूर्ण गाव फिरते. आणि पूर्ण गाव फिरायचे म्हणजे 2 वाजतातच. तर या लग्नाची वरात ही गाव फिरून होई पर्यंत 2 वाजून गेले. रोहन चा बँड सगळे आटपून घरी जायला निघाले. कोळीवाडा ते मनोरी जायला साधारणतः 30 ते 45 मिनिटे लागतात.

बस मधून परतीचा प्रवास सुरु झाला. रोहन मागच्या विंडो सीट वर मित्रा सोबत बसला होता. विंडो मधून बाहेर डोकावत मंद वाऱ्याचा आस्वाद घेत होता. काही वेळा नंतर त्याला रस्त्याच्या कडेला एक विचित्र मानवी आकृती दिसली. केस मोकळे सोडलेली एक विचित्र बाई जी रोहन ला एक टक सतत पाहत होती. त्याला खूप विचित्र वाटलं म्हणून त्याने लगेच मित्राला खुणावून सांगितले पण मित्राला काहीच दिसले नाही. भास असावा म्हणून त्याने दुर्लक्ष केलं. काही वेळानंतर बस मनोरी गावात येऊन पोहोचली.

त्या रात्री घरी पोहोचायला 3 वाजून गेले होते. खूपच उशीर झाला होता. आणि मे महिन्याचा उकाडा असल्यामुळे त्याने टेरेस वर झोपायचे ठरवले. उशी, चादर आणि चटई घेऊन तो टेरेस वर झोपायला गेला.

दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा रोहन च्या आई वडिलांनी टेरेस वर येऊन पाहिले तेव्हा त्यांच्यावर दुःखाचा डोंगर च कोसळला. रोहन चा मृत्यू झाला होता. सगळ्यात विचित्र गोष्ट म्हणजे त्याची जीभ नव्हती. काय झालं कसं झालं हे कोणालाच काहीच समजत नव्हतं. रोहन चा खून झाला असावा या संशयाने पोलीस कंप्लॅन्ट करण्यात आली. पण पोलीस तपासणी नंतर ही काहीच निष्पन्न झाले नाही आणि केस बंद करण्यात आली. 

अस म्हणतात की मृत्यू नंतर दिवस कार्य होई पर्यंत त्या व्यक्तीचा आत्मा त्याच घरात घुटमळत राहतो आणि कार्य पूर्ण झाल्यावर मुक्त होतो. रोहन च्या बाराव्याला तो त्याच्या लहान भावाच्या अंगात आला होता. आणि त्याने जे सांगितले ते ऐकून संपूर्ण कुटुंब हादरून गेलं. तो म्हणाला की लग्नाच्या रात्री मी ज्या बाईला रस्त्यात पाहिलं होत तीच बाई मी झोपल्यावर टेरेस वर आली होती. ती माझ्या छातीवर बसून होती. मला उठता येत नव्हतं आणि भीतीने तोंडातून आवाज ही निघत नव्हता. तिने माझी जीभ खेचली, मी वेदनेने कळवळत होतो आणि नंतर माझा जीव घेतला’ आई बाबा माझे तुमच्यावर खूप प्रेम आहे. तुम्ही नेहमी खुश राहा’ 

This Post Has 2 Comments

  1. email

    Baapre !

Leave a Reply