हा अनुभव माझ्या मामे बहिणीच्या मुला च्या बाबतीत म्हणजे अगदी जवळील अशा माझ्या दीड वर्षाच्या भाच्या सोबत घडलेला आहे. ते ही पितृ पक्ष सुरू झाला त्याच दिवशी. त्या दिवशी त्याच्या पणजीचे पाडवे होते. वयाने लहान असल्याने घरात आलेल्या पाहुण्यांमुळे तो थोडा असवस्थ झाला होता आणि त्यात थोडा सर्दी तापाने ही हैराण होता. साहजिक आहे की लहान मूल जास्त अनोळखी माणसं बघून तशीच प्रतिक्रिया देतात. त्याला थोड बर वाटाव म्हणून सगळ आवरून झाल्या वर संध्याकाळी त्याची आई त्याला घराजवळील गार्डन मध्ये खेळायला घेऊन गेली. गार्डन मधून घरी आल्यानंतर थोड्या वेळानी तो खूप वेगळाच रडू लागला. त्याच रडण अजिबात साधारण लहान बाळा सारखं नव्हत. 

पूर्ण रात्र तो झोपला नाही. रडण अजिबात थांबल नव्हत. सकाळी ५ च्या सुमारास त्याच्या आई ने फोन करून सांगितलं की पूर्ण रात्र रडून काढली आहे त्याने. आता बाहेर नेले तर सारखं गार्डन कडे बोट दाखवत आहे त्याला तिकडे जायचं आहे . घरात आणल की पुन्हा रडायला लागतो. तेव्हा तिला आठवण करून दिली की ती गावी आली होती तेव्हा तीला तुळजापूर च्या आईच्या पाया जवळील अंगाऱ्याची पुडी दिली होती. पण तीने ती पुडी कुठे ठेवाली हे ही त्या वेळी आठवत नव्हत कारण बाळाला होत असलेल्या त्रास मुळे ती काही विचार करण्याच्या मनस्थिती मधे नव्हते. थोड्या वेळाने ती शांत होऊन अंगारा शोधू लागली आणि मिळाल्या वर बाहेर जाऊन बाळाच्या कपाळाला लावला आणि बाळाला घरात घेऊन आली. बाळ सकाळी ८ च्या सुमारास झोपी गेलं. झोप झाल्यानंतर उठून तो न रडता खेळू लागला. घरातील इतर सदस्य ही निवांत झाले की आता काही त्रास नाही. पण पुढे नियतीने अजून काय मांडले आहे याची त्यांना कल्पना नव्हती. दिवसभर अगदी छान खेळला पण जशी रात्र झाली तसा तो पुन्हा रडू लागला. त्याच असं विभत्स रडणं या आधी कोणीच पाहिलं नव्हतं. 

बाहेर घेऊन गेल्यावर पुन्हा गार्डन च्या दिशेने बोटं दाखवू लागला. यावर कितपत विश्वास ठेवायचा ते माहित नाही पण अस म्हणतात की जो पर्यंत बाळाचा टाळू भरत नाही तोपर्यंत त्यांचा संपर्क दुसऱ्या जगातील शक्तिबरोबर असतो. बाळाला त्या अमानवीय शक्ती दिसत असतात. कधी कधी अचानक ते कोपऱ्यात बघून हसतात, कधी रडतात तर कधी दचकतात. त्याचे रडणे थांबत नाही म्हंटल्यावर त्याच्या आई ने देवीचा अंगारा लावला आणि तो झोपी गेला. पण रोज असं होत राहिलं तर त्याला त्रास होईल आणि त्याच्या तब्येतीवर परिणाम होईल असे तिला वाटले. यावर कायमचा उपाय शोधायला हवा नाही तर बाळाला रोज त्रास होईल. ताई ने पुन्हा रात्री फोन केला आणि घडलेला प्रकार आम्हाला सांगितला. 

रात्री आम्ही आमच्या ओळखी चे एक गुरुजी आहेत त्यांना फोन करून सगळ्या प्रकाराची कल्पना दिली. ते म्हणाले की बाळाला त्रास होतोय कारण त्याला ती अमानवीय शक्ती दिसत आहे आणि घाबरवत आहे. म्हणून तो खूप रडतोय. शक्यतो लहान मुलांना रात्री अपरात्री बाहेर फिरायला नेऊ नये, शक्यतो अमावस्या असेल तेव्हा. आणि आता तर पितृपक्ष सुरु आहे. हा काळ काय असतो हे तुम्हाला वेगळे सांगायला नको. गार्डन मध्ये गेला तेव्हा तो आधीच घरातून एका नकारात्मक अशा वातावरणातून बाहेर पडला होता आणि तो आजारी ही होता त्यामुळे त्या अमानवीय ताकदीला आपल्या इच्छा पूर्ण करून घेण्यासाठी अगदी सोप आणि कमकुवत अस सावज भेटल. तो गार्डन कडे बोट दाखवत आहे कारण त्याला तिकडे काहीतरी दिसतय जे त्याला आपल्याकडे बोलवत आहे. आपल्याला ते दृष्टीस पडत नाही याचा अर्थ असा नाही कि ते तिथे नाहीये. समस्या तर समजली आता उपाय करण्याची वेळ आली होती.

बाळ रात्री शांत जरी झोपलेलं असल तरी उद्या पुन्हा रात्र झाल्यावर ठराविक वेळी रडायला लागणार होतं. या साठी गुरुजींनी उपाय सांगितला की बाळाच्या आई ला आता बाळावरून नारळ उतरवून त्या गार्डन मध्ये ठेऊन यावा लागेल आणि बोलायला लागेल की हा नारळ स्वीकार करा आणि माझ्या बाळाला त्रास देणं बंद करा. तसे केल्यावर घरातील पुरुषाला तो नारळ तिठा (म्हणजे जिथे तीन रस्ते एकत्र येतात तिथे ठेऊन फोडवा लागेल. येताना मागे न पाहता सरळ घराकडे यावे आणि घरात आत शिरण्या आधी हात पाय धुतल्याशिवाय आत पाय ठेऊ नये. हे सगळ करून झाल्या नंतर देखील बाळाला जास्त बाहेर घेऊन जाऊ नका निदान पितृ पक्ष संपेपर्यंत तरी त्याची जास्त काळजी घ्या. त्यांनी सांगितल्याप्रमाणे उपाय करायला घेतला तेव्हा रात्रीचे 2 वाजले होते. पण त्यांना वेळेची पर्वा नव्हती तर बाळाची जास्त काळजी होती.

एक नारळ घेऊन तो बाळावरून उतरविण्यात आला आणि आई ने तो गार्डन मध्ये नेऊन ठेवला. गुरुजींनी सांगितल्या प्रमाणे ती बोलली. मग बाळाच्या वडिलांनी तो नारळ तिठ्यावर नेऊन फोडला. घरी परतत असताना ते खूप अस्वस्थ झाले होते कारण सतत कानात कोणतरी बोलत आहे अस त्यांना जाणवत होत. घरी आल्यावर त्यांना देवीचा अंगारा लावला आणि त्यांचं ही मन शांत झालं. त्या दिवसा नंतर बाळाला अजून तरी त्या प्रकारचा त्रास झाला नाही .हे दोन्ही अनुभव माझ्या खूप जवळच्या व्यक्तीच्या सोबत घडलेले आहेत ते ही पितृपक्षातील.. या काळापासून ते नवरात्र संपेपर्यंत आपल्या बाळांची घरातल्या लहान मुलांची जरा जास्त काळजी घ्या. निदान नवरात्र संपेपर्यंत या साठी.. कारण असं म्हणतात कि तेव्हा आपले देव बांधलेले असतात.

Leave a Reply