असं म्हणतात कि काही गोष्टी अनुभवल्या शिवाय आपल्याला त्याच अस्तित्व कळत नाही. पण एकदा आपण त्या प्रसंगातून गेलो कि त्याच गांभीर्य कळतं. असाच हा एक भयाण अनुभव..

अनुभव – सुयश गुरव

मी रायगड जिल्ह्यातल्या अलिबाग तालुक्याचा रहिवासी आहे. हा अनुभव माझ्यासोबत एक वर्षांपूर्वी घडला होता. तेव्हा थंडीचे दिवस होते आणि त्याकाळी मी अलिबाग मधल्या एका हॉटेलमध्ये शेफ म्हणून कामाला होतो. माझे घर हॉटेल पासून साधारण सहा किलोमीटरवर होते. त्यामुळे कधी कामावर उशीर झाला तर मी हॉटेलच्या स्टाफ रूम मध्ये राहायचो. हॉटेलचे स्टाफ रूम म्हणजे एक बंगला होता जिथे खालच्या फ्लोअर वर मालक व त्यांचे कुटुंब राहायचे आणि पहिल्या फ्लोअरवर स्टाफ राहायचा. तो बंगला म्हणजे दोन बीएचके अपार्टमेंट होतं म्हणजे जवळपास सहा खोल्या जिथे साधारण 15 कर्मचारी राहायचे. हे अपार्टमेंट हॉटेल मालकांनी नुकतेच भाड्यावर घेतले होते आणि ते त्यांना अगदी कमी किमतीत म्हणजे महिना सात हजार इतक्या कमी किमतीत भाड्यावर मिळाले होते.

मला सुरुवातीला माहित नव्हतं पण नंतर कळाले लिस्ट ऑफ रूम मध्ये राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना रात्रीचे भयानक अनुभव येतात. असं वाटायचं की कोणीतरी त्यांच्या अंगावर बसले व गळा दाबतोय. मी या सगळ्या गोष्टींवर विश्वास ठेवायचं नाही पण हद्द तेव्हा झाली जेव्हा हे प्रकरण शिगेला पोहोचलं एके रात्री विक्रम नावाचा एक नेपाळी शेफ अचानक झोपेतून ओरडत उठला. त्याच्या आवाजाने सगळे जागे झाले आणि काय झाले हे त्याला विचारू लागले तो वेदनेने ओरडत होता जेव्हा पाहिले तेव्हा कळले की त्याच्या अंगावर नखाने ओरबाडल्याच्या खुणा आहेत जा मी सुद्धा प्रत्यक्ष बघितल्या होत्या त्यानंतर मात्र सगळ्यांनी थोडी विचारपूस केली तेव्हा शेजारी राहणाऱ्या लोकांकडून कळले की काही वर्षांपूर्वी या रूम मध्ये पाच जणांचे एक कुटुंब राहायचे. एक जोडपं त्यांचा लहान मुलगा आणि त्या व्यक्तीचे आई-वडील म्हणजे आजी आजोबा. 

एके दिवस त्या लहान मुलाच्या आईने काही कारणांमुळे आत्महत्या केली. त्यानंतर ते कुटुंब घर सोडून निघून गेलं. बरेच महिने हा बंगला बंद होता कारण इथे कोणी राहायला धजावत नव्हतं आणि कदाचित म्हणूनच इतकं मोठं घर फक्त सात महिना भाड्यावर मिळालं होतं. आम्हाला ही माहिती कळल्यावर आम्ही हॉटेल मालकाकडे तक्रारी केल्या पण त्याने काहीच फरक पडला नाही. सारख्या तक्रारी करून सुद्धा रूम काही बदलण्यात आली नाही. या सगळ्या गोष्टी कळल्यावर मात्र मी त्या गेस्ट रूममध्ये राहण्याचे आवर्जून टाळायचो. त्यादिवशी हॉटेलमध्ये इव्हेंट होता आणि तू खूप उशिरापर्यंत चालणार होता त्यामुळे मला निघायला उशीर झाला सगळी आटोपेपर्यंत रात्रीचे अडीच वाजलेले मी विचार केला कि एवढ्या रात्री घरी जाण्यापेक्षा आजची रात्र स्टाफ रूम मध्येच काढू. तसेही मी एकटा नव्हतो माझ्यासोबत हॉटेल वरचा स्टाफ ही होता.

चार-पाच तास झोप काढून पहाटेच घरी जाऊ असा मी विचार केला तसेही मी दोन दिवसांची सुट्टी घेतली होती. सगळे काम आटोपल्यावर मी स्टाफ सोबत बंगल्यावर गेलो. तिथे गेल्यावर थोडे फ्रेश झालो. आणि मग गप्पा गोष्टी करत करत माझा डोळा लागला. दिवसभराच्या थकव्यामुळे मला गाढ झोप लागली. डोळे उघडले ते थेट सकाळी साडेदहाला. वाटलं की घरी फोन करून कळवावे.  म्हणून फोन हातात घेतला तितक्यात मला समोरच्या बेडरूम मधून दरवाजा दोनदा नॉक करण्याचा आवाज आला. मी उठून पाहायला गेलो तर दिसले की बेडरूमच्या दरवाजाला बाहेरून कडी आहे. तरीसुद्धा मी कडी उघडून आत पाहिले तर आत कोणीच नव्हते. मी विचार केला की कदाचित घराच्या बाहेरून एखादा आवाज आला असेल आणि मला भास झाला असेल. मी परत येऊन हॉलमध्ये बसलो. तसे पुन्हा एकदा दरवाजा दोनदा नॉक करण्याचा आवाज आला. मी विचार केला की त्या रूममध्ये राहणारा सलीम किंवा अजय नक्कीच माझी मस्ती करत असणार. 

मी पुन्हा रागात तिथे गेलो आणि दरवाजा उघडून दरवाज्याच्या मागे कोणी लपले आहे का ते पाहू लागलो. पण त्या रूम मध्ये कोणीही नव्हते. तरी सुद्धा मी ती खोली संपूर्ण पाहिली. रूम मध्ये असलेल्या बाथरूम मध्ये ही जाऊन पाहिलं. पण कोणीही नव्हतं. थोडा का होईना पण मी आतून घाबरलो होतो. झपा झप पावलं टाकत मी त्या रूम मधून बाहेर आलो आणि पुन्हा रूम ला कधी लावून घेतली. कडी लावल्या लावल्या आतून पुन्हा तसाच दरवाजा वाजवण्याचा आवाज आला. मी काही पावलं मागे सरकलो. आणि भीती ची एक लहर सर्वांगातून धावून गेली. मला काय जाणवले माझे मलाच माहित. पण भीती रागात बदलली आणि मी दरवाजा उघडून जोरात चिडून बोललो. कोण आहे.. का त्रास देतय.. पण काहीच प्रतिसाद आला नाही. जाताना मी चार पाच शिव्याही हासडल्या आणि मग दरवाजा बंद करून माझे सामान घेतले आणि तिथून बाहेर पडलो.

सुट्टीचा दिवस होता. म्हणून मी रात्री बाहेर जाणार होतो आणि मग तिथूनच खाऊन उशिरा घरी परतणार होतो. ठरल्या प्रमाणे रात्री उशिरा घरी आलो. झोपायची तयारी केली आणि माझा डोळा लागला. आदल्या दिवशी नीट झोप झाल्यामुळे मला झोप लागली खरी पण ती सावध होती रात्री अचानक मला जाग आली. वेळ पाहिली तर तीन वाजून वीस मिनिटे झाली होती मला थोडं अस्वस्थ वाटत होतं मी झोपताना माझ्या खोलीत लहान बल्ब लावून झोपतो. मी माझ्या खोलीचे निरीक्षण करू लागलो. एका कुशीवर असल्यामुळे फक्त नजरेने खोली न्याहाळू लागलो. सिलिंग वर ब्लबमुळे पडणारी फॅन ची फिरती सावली, फिरणाऱ्या फॅन चा आवाज. समोरच्या भिंतीवर लावलेली तुपॅक रापर ची फोटो फ्रेम. सगळं काही मला स्पष्ट दिसत होतं. त्याच भिंतीजवळ एक कपाट होतं ज्याला आरसा होता.

त्या आरशात माझं लक्ष गेलं आणि जाणवलं मागे कोणीतरी उभ आहे. मी निरखून पाहण्याचा प्रयत्न केला तर दिसलं की मागे 30-35 वर्षांची बाई नाईट सूट घालून उभी आहे. दिसायला एकदम सावळी आणि सामान्य. हे सगळं पाहत असताना माझ्या मनात भीतीचा अजिबात मागमूस ही नव्हता. त्यामुळे माझ्या मनात वेगवेगळे प्रश्न उभे राहिले. मी घराचा दरवाजा तर नाही ना उघडा ठेवला? कोण आलाय माझ्या घरात? या बाईला तर आधी कुठे बघितलेलं नाही. मी उठून पाहायचा प्रयत्न केला तर मला जाणवलं की मला हालचालच करता येत नाहीये. माझे डोळे सोडून शरीराचा कुठलाच अवयव कार्यरत नव्हता.. ती बाई माझ्या मागून बेड ला वळसा घालत माझ्या समोर येऊन उभी राहिली. तिच्या चेहऱ्यावर एक विचित्र हास्य होत. ते हास्य नकळत मला आकर्षित करू लागलं. तीच माझ्या दिशेने पडणार प्रत्येक पाऊल माझ्या मनात धडकी भरवत होत.

ती हळू हळू करत माझ्या बेड वर आली, माझे दोन्ही हात पकडले आणि माझ्या शरीरावर बसली. ती माझ्या अगदी जवळ आली आणि आमचे श्वास एकत्र होऊ लागले. तिने मला चुंबन घेतले. मी पूर्णपणे समोहित झालो. तसाही माझा माझ्या शरीरावर ताबा नव्हताच मुळी. तिच्या हातांचा माझ्या हातावर होत असलेला स्पर्श, तिच्या छातीचा माझ्या अंगावर पडणारा दबाव व तिच्या ओठांचा थंडगार स्पर्श सिद्ध करत होता कि हा माझा भास नाही. जणू मोहिनी टाकल्यासारखा मी नकळतपणे तिला साथ देऊ लागलो होतो. तितक्यात तिने एक हात माझ्या हातावरवून काढला आणि माझ्या अंगावरून फिरवला. तितक्यात विजेता सारखी तीव्र लहर माझ्या सर्वांगात पसरली आणि मला वाटल कि हे मी काय करतोय..? मी ओरडायचा प्रयत्न करू लागलो, हात पाय हालवून तिच्या तवाडीतून सुटण्याचा प्रयत्न करू लागलो पण काही केल्या मला ते शक्य होत नव्हतं. 

शेवटी मी मनात हनुमानाच दोनदा नाव घेतल आणि मला माझं शरीर तिच्या पासून वेगळं झाल्या सारखं भासू लागलं. तसे जाणव ताच मी पून्हा एकदा नाव घेतलं आणि तिला जोरात माझ्या पासून दूर ढकलल. ती त्या धक्क्याच्या प्रभावामुळे दूर लोटली गेली पण समोरच्या भिंतीवर आपटण्या ऐवजी हवेतच विरून गेली. मी उठून बसलो. मला धाप लागली होती जणू मी बराच वेळ धावत आलोय. ती रात्र मी तशीच जागून काढली. दुसऱ्या दिवशी मी हे प्रकरण माझ्या एका मित्राच्या ओळखीच्या एका सिद्ध माणसाला सांगितल. त्यांनी मला कॉल वर सांगितले की ती शक्ती माझा मागे त्या रूम वरून आकर्षित होऊन आली होती.. जर मी तिला साथ दिली असती तर तिने मला तिच्या सोबत तिच्या विश्वात नेलं असत.. मारुतीरायाच्या कृपेने मी वाचलो. त्याने सांगितले कि मी तुझ्या नावाने देवीला साकडं घातलं आहे, तू काळजी करू नकोस. ती पुन्हा तुझ्या मागे येणार नाही पण तुला तुझ्या कुलदैव तेचे दर्शन घेऊन यावे लागेल. त्यांनी सांगितल्या प्रमाणे मी लगेच वेळ काढून कुलदैवतेचे दर्शन करायला गेलो..

Leave a Reply