लेखक – स्वप्नील मांडे

राहुल : पंकज, ऊठ यार! 9 wajat आलेत सकाळचे…. निघायचे आहे ना? उशीर झाला तर वसिम चिडेल आपल्यावर… आणि लग्न कुठल्या तरी मळ्यात आहे म्हणे… आडवळणी… सापडायला ही उशीर लागु शकतो… ऊठ बर….

पंकज आणि मी roommates आहोत.
आमच्या मित्राच्या (वसिम च्या) लग्नाला निघायच होत आम्हाला..त्याचीच तयारी चालु होती… पंकजला उठवून सगळ आवरायला 10 वाजले. लग्न संध्याकाळच जवळपास 7 च असेल.. उन्हाळा सुरू झाला होता… ऊन तापत होत.. आम्ही निघालो..

औरंगाबाद ते कन्नड असा साधारणतः 2-3 तास, आणि त्यापुढे घाटाच्या दिशेने अर्धा तास काळी पिवळी टॅक्सी… असा एकंदरीत प्रवास होता..

आम्ही टॅक्सी मध्ये बसून गावाकडे निघालो.. गाव तसं लहानच पण एक वेगळीच शांतता होती तिथे… भयाण शांतता… उन्हाच्या झळा जाणवू लागल्या होत्या,त्यात तर वातावरण अजूनच भकास वाटत होतं.

दुपारचे 3 वाजत आले होते आणि आम्ही लग्नाच्या ठिकाणी पोचलो… मित्राला भेटलो… गप्पा गोष्टी झाल्या.. लग्नाच्या शुभेछा दिल्या, थोडा वेळ तिथे काढून आम्ही वसिम चा निरोप घ्यायचे ठरवले…

पंकज ने वसिम ला हाक मारून खुणावले ‘ वसिम, चल निघतो यार..

वसिम हसतच म्हणाला ‘ जेवलात ना दोघे ?

तेवढ्यात राहुल म्हणाला ‘ अरे उशीर झालाय 7 वाजले आहेत़ , जेवत बसलो तर आणखी उशीर होईल.

वसिम जरा रागातच म्हणाला ‘ अस कस? जेवल्याशिवाय जाताच येणार नाही…

वसिमने हट्ट धरला आणि त्याच्या एका भावाला हाक मारली.
आम्हाला जेवल्याशिवाय न जाऊ देण्याची ताकीद देऊन त्याने आम्हाला परवानगी दिली..

आम्ही त्याच्या भावाला जेवण बांधुन दे आम्ही वाटेत खाऊन घेऊ अस म्हणुन जेवण पार्सल घेतलं आणि आम्ही परतीच्या प्रवासाला लागलो..

8 वाजत आले होते आणि आम्हाला एकही वाहन मिळत नव्हते… म्हणुन वेळ न दवडता आम्ही पायी चालून मळा ते गाव अस अंतर पार करायचे ठरवल. कारण बस आम्हाला गावातूनच मिळणार होती..

आम्ही निघालो… अंधार आणखीनच गडद होऊ लागला होता, रातकिड्यांची किर्र ऐकू येत होती.

भयाण शांततेत एखादी वार्‍याची झुळूक ज्वारीच्या पिकातून गेल्यावर झालेली पिकाची हालचाल अंगावर काटा उभा करीत होती. त्यात आता भूकही लागली होती.

तितक्यात पंकज अगदी मनातले बोलला ‘ यार थोड खाऊन घेऊया, फार भूक लागलीये.

अरे गाव जवळच आलय, एकदा का बस मध्ये बसलो की मग खाऊ ना.. आणि इथे आडवाटेला कशाला थांबायच?
निघूयात इथून, मला भिती वाटतेय. चल लवकर.

पंकज हसऱ्या स्वरात म्हणाला ‘काय राव? फार भितोस तू… काही नाही होत, मी आहे ना, चल खाऊन घेऊ थोड.

ते बघ! तिकडे ओट्यावर बसू.. ये.

पंकजच्या हट्टासमोर माझ काही चालल नाही आणि आम्ही त्या ओट्यावर बसलो. जेवणाच साहित्य बाहेर काढल. जेवणात मटण होत. आम्ही पोटभर जेवलो आणि चालून थकल्याने आम्हाला थोडी सुस्ती आली आणि आमचा डोळा लागला..

डोळा उघडून शुद्धीत येत होतो तेव्हा मला माझ्या गालावर कुणी तरी तळहात मारून मला जाग करण्याचा प्रयत्न करत होत अस जाणवल.

तो माणूस आमच्या तोंडावर पाण्याचा शिडकाव करत होता. मी शुद्धीवर आलो आणि त्यानंतर मी जे पाहिल ते पाहून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. आम्ही highway वर होतो..एक माणूस त्याची कार रस्त्याच्या कडेला थांबवून आम्हाला मदत करत होता. पंकज रक्ताने पूर्ण माखला होता.. कुणी तरी त्याला तीक्ष्ण नखाणे ओरबाडून टाकलय अस वाटत होतं. तो माणूस त्याच्याही तोंडावर पाण्याचा शिडकाव करून त्याला शुद्धीवर आणत होता.. कसली तरी उदी त्याने त्याच्या माथ्यावर लावली. ते पाहून माझाही हात नकळत माझ्या कपाळाकडे गेला.. माझ्याही कपाळाला ती उदी होती. तेवढ्यात माझ्या गळ्या जवळून वेदनेची एक तीव्र कळ उठली. मी त्या माणसाच्या कार च्या आरशात पाहिले आणि मी दचकलो.. हो स्वतःलाच पाहून. कारण माझाही चेहरा जखमांनी भरला होता. काय चाललंय काहीच कळत नव्हतं. मी खूप घाबरून त्या माणसाला विचारले

मी : आम्ही इथे कसे? तुम्ही कोण? आम्हाला एवढ्या जखमा कश्या झाल्या?

तो माणूस शांतपणे म्हणाला,

‘मी रस्त्याने जात असताना अचानक तुम्ही दोघे माझ्या गाडीसमोर आलात. माझा गाडीवरचा ताबा सुटून गाडी रस्त्याच्या कडेला थांबली, मी गाडीतून उतरून तुम्हाला खडसावनार, तेवढ्यात माझी नजर तुमच्या चेहर्‍यावर गेली. तुम्ही दोघे अर्धमेल्या अवस्थेत होता, चेहरा ओरबाडून निघाला होता. मी तुम्हाला शुद्धीत आणण्याचा प्रयत्न करत होतो पण तुम्ही काही केल्या शुद्धीत येत नव्हता. अचानक तुमचे डोळे पांढरे झाले.. तुमच्या हाताची घट्ट पकड मला माझ्या गळ्यावर जाणवली आणि हा प्रकार काही तरी वेगळा आहे हे कळून चुकलं. मी कसे बसे स्वतःला सोडवून लगेच माझ्या कार मध्ये असलेली साई बाबाची उदी तुमच्या कपाळावर लावली आणि तुमच्या तोंडावर पाणी मारून तुम्हाला कसे बसे शुद्धीत आणले.

पण तुम्हाला या जखमा कशा झाल्या? तुम्ही कुठून आलात?

आम्ही त्याला झाला प्रकार सांगितला आणि आम्ही त्याच्याच गाडीतून लिफ्ट घेऊन औरंगाबाद गाठलं.

घडला प्रकार आम्ही वसिमला ही सांगितला. हे ऐकून तो थोडा विचारात पडला आणि बोलता बोलता अचानक निःशब्द झाला.. तो प्रचंड घाबरला होता. त्याने मला दबलेल्या स्वरात विचारले

मला सांग, ज्या ओट्यावर तुम्ही जेवलात त्याच्या बाजूला एक मोठ चिंचेच झाड होतं?

मी थोड आठवण्याचा प्रयत्न केला आणि म्हटल,

“हो! होत एक भल मोठ चिंचेच झाड. का रे?”

वसिम शांत झाला. कदाचित त्याला या सगळया प्रकाराच कारण कळल असाव. मी त्याला पुन्हा विचारला, सांग ना! का विचारलं तू झाडाबद्दल?

तो म्हणाला, तुम्ही ज्यावर जेवायला बसला होता तो ओटा नव्हता…

मी : म्हणजे? मग काय होत ते?

वसिम : थडगं…………

Leave a Reply