अनुभव क्रमांक – १
मंगेश शिंदे
हा अनुभव आपल्या चॅनल चे सबस्क्राईबर मंगेश शिंदे यांनी पाठवला आहे. मी आणि माझे आई बाबा आम्ही नेहमी उन्हाळा च्या सुट्टी मध्ये गावी जातो. सुट्टीत अगदी धमाल करतो. आजी नेहमी आम्हाला वेगवेगळ्या गोष्टी सांगते.. माझ्या गावापासून पुढच्या गावाला जोडणारा एक कच्चा रस्ता आहे. तिथे टाकीचा इरा म्हणून एक ठिकाण आहे. असे म्हणतात की तिथे भुताचे वास्तव्य आहे आणि तिथून जाणाऱ्या लोकांना अनेकदा याचा प्रत्यय आलाय.
आजीला ला ही काही वर्षांपूर्वी त्या ठिकाण हून जाताना असाच एक भयानक अनुभव आला होता. त्या काळी गावात दुकान नव्हती. समान आणायला किंवा दळण आणायला दुसऱ्या गावी जायला लागतं असे. तेव्हा वाहनही नव्हती त्यामुळे चालत जाण्या व्यतिरिक्त दुसरा काही पर्याय उपलब्ध नव्हता. पावसाळ्याचे दिवस होते. अगदी मुसळधार पाऊस पडत होता. डोंगर आणि आजूबाजूचा परिसर अगदी हिरवागार झाला होता.
टाकीचा इरा सुद्धा पाण्याने भरला होता. माझी आजी दुसऱ्या गावात दळणासाठी गेली होती. पण येताना बराच उशीर झाला. अश्या वेळी आजीला यायला कधी उशीर झाला तर आजोबा नेहमी तिला घ्यायला जात असतं. पण नेमके त्या दिवशी काही कामानिमित्त त्यांना जाता आले नाही. कंबरेवर दळणाचा डबा आणि एका हातात छत्री घेऊन आजी वाटेला लागली. पोरांच्या काळजीपोटी तिने झपाझप पावले टाकायला सुरुवात केली.
काही वेळात टाकीचा इरा जवळ येऊन पोहोचली तसे हळू हळू तिच्या काळजात भीती दाटू लागली. नको ते भास होऊ लागले. तिने चालण्याचा वेग अजुन वाढवला तसे तिला मागून आवाज ऐकू आला “काय ग.. एकटीच.. कोणी न्यायला आल नाही का?”. तो अमानवीय आवाज ऐकुन तिचे काळीज भीतीने धडधडू लागले. तिने हळूच छत्री बाजूला करून तिरक्या नजरेने मागे खाली पाहिले. पाण्यात पडणाऱ्या प्रतीबी बात एक आकृती दिसली. तिला घाबरून चालणार नव्हते.
तिने त्या आवाजाला प्रतिउत्तर न देता झपाझप पावले टाकत पुढे जायला सुरुवात केली. रस्त्याच्या बांधावरून चालताना तिला ती आकृती सतत जाणवत होती. कधी डाव्या बाजूला तर कधी उजव्या बाजूला. त्या आकृती चा पाठलाग चालूच होता. इतक्या पावसात ही तिला अक्षरशः घाम फुटला होता. जवळपास १५ मिनिट तिचा पाठलाग होत राहिला आणि नंतर एका क्षणाला ती अमानवीय चाहूल जाणवणे बंद झाले. तशी ती थांबली आणि मागे वळून पाहणार तोच तिला पुन्हा तो आवाज ऐकू आला “जा आता.. वाचलीस मागे वळून बघितले नाहीस”
भीतीने आजीला रडू कोसळले पण तितक्यात समोर आजोबा दिसले. ते तिला घ्यायला येत च होते. काही वेळातच ते दोघे घरी पोहोचले. असाच अनुभव गावातल्या बऱ्याच जणांना आलाय. आगदी आजही अमावास्येला त्या रस्त्यावरून रात्री अपरात्री लोक जाणे टाळतात.
अनुभव क्रमांक – २
गौरव पवार
हा अनुभव आपल्या चॅनल चे सबस्क्राईब र गौरव पवार यांनी पाठवला आहे.
अनुभव माझ्या आजोबांचा आहे जेव्हा ते ३५-४० वर्षांचे असावेत. म्हणजे साधारण १९७५-१९८० चा काळ. त्यावेळी आम्ही एका गावात वास्तव्यास होतो. गाव हवे तसे विकसित नव्हते. गावातले रस्ते म्हणजे जणू पायवाट च होती. एक सायकल किंवा एक व्यक्ती जाऊ शकेल इतकाच रस्ता. त्या रात्री गावातल्या एका मोठ्या व्यक्तीने त्यांना दारू आणायला सांगितली. बहुतेक पिण्याचा कार्यक्रम वेळेवरच ठरला असावा.
रात्र बरीच झाली होती तरीही ते तयार झाले. गावातल्या जुन्या स्मशानभूमी जवळ च दारूचा गुत्ता होता. सायकल असल्यामुळे ते काही वेळातच तिथे पोहोचले. पण तिथे पोहोचल्यावर कळले की सगळा स्टॉक संपला आहे. त्यांनी दुकानदाराला विचारपूस केल्यावर तो म्हणाला “अभी इस वक्त दारू एक ही जगह पर मिलेगी, अपने पुरानी वाली मंडी मे”. तसे ठीक आहे म्हणत ते जायला निघाले. त्यांना अडवतच तो दुकानदार पुढे म्हणाला “अरे भाई, पागल हो गये हो क्या? आज अमावस की रात है मत जाओ”.
पण ते ऐकणाच्या मनस्थितीत नव्हते, त्यांना काहीही करून दिलेले काम पूर्ण करायचे होते. म्हणून ते जुन्या मंडईत जायला निघाले. तिथे पोहोचेपर्यंत बराच उशीर झाला. पार्सल घेऊन ते घरी यायला निघाले. गावाच्या वेशीबाहेर रस्त्याला थोडे चढण आहे. त्या चढणीला लागताच त्यांना समोर एक बाई उभी दिसली. केसात गजरा वैगरे माळला होता. त्यांना प्रश्न पडला की इतक्या निर्मनुष्य रस्त्यावर ही एकटी बाई ते ही इतक्या रात्री काय करतेय. त्यांना वाटले की कोणी तरी गावातली बाई असावी म्हणून ते विचारपूस करायला तिच्या दिशेने जाऊ लागले.
पण तितक्यात विचित्र गोष्ट घडू लागली. त्यांनी सायकल चे पाय डल मारायला सुरुवात केली आणि सायकल त्या दिशेने जाऊ लागली. पण ते त्या बाई पर्यंत पोहोचतच नव्हते. काय घडतंय त्यांना कळत नव्हते. अगदी हाकेच्या अंतरावर उभी असलेल्या बाई जवळ तब्बल ४-५ मिनिट पाय डल मारूनही ते पोहोचले नव्हते. त्यांना कळून चुकले की हा काही तरी वेगळाच प्रकार आहे. त्याच वाटेवर एक मंदिर आहे तिथे त्यांनी सायकल वळवली आणि पुन्हा त्या बाई कडे पाहिले. त्या निर्मनुष्य रस्त्यावर ते फक्त एकटेच होते.
ते गावाच्या रस्त्याकडे वळले आणि सुसाट वेगाने सायकल पळवायला सुरुवात केली. तसा मागून एक कर्णकर्कश आवाज ऐकू आला “आज वाचलास”. दुसऱ्या दिवशी त्यांना भरपूर ताप भरला होता. देवाच्या कृपेने ते सुखरूप घरी पोहोचू शकले.
अगदी आजही तो रस्ता विकसित नाही. रस्त्यावर दिव्याचे खांब नाहीत आणि वर्दळ ही नाही. त्यामुळे आजही गावाला जाताना त्या रस्त्याने रात्री अपरात्री जाणे मी आवर्जून टाळतो.