मी नाशिक ला राहतो. खूप वर्षांपूर्वीचा हा अनुभव आहे जेव्हा मी शाळेत होतो. साधारण 1984-85 ची घटना असेल.
आम्ही एक कॉलोनी मध्ये राहायचो. तिथे 4-5 घरे होती. घरा समोर एक चाळ होती. तिथल्या मालकाने काही खोल्या भाड्यावर दिल्या होत्या पण तिथे बरेच भाडेकरू रूम घेत आणि काही दिवसात सोडून निघून ही जात. त्यातली एका भाडेकरू ची रूम नेहमी बंद असायची. विचारपूस केल्यावर कळले की तो फक्त रात्रीच येत असे. तो जो कोणी भाडेकरू होता तो गेले काही दिवस तिथे फिरकला ही नव्ह्ता.
चाळ मालकाने त्याची बरेच दिवस वाट पाहिली पण तो काही आला नाही.
शेवटी त्यांनी खोलीचे कुलूप तोडायचे ठरवले जेणेकरून ती खोली दुसऱ्या कोणा व्यक्तीला भाड्यावर देता येईल. दुसऱ्या दिवशी खोलीचे कुलूप तोडले आणि आत ज्या गोष्टी सापडल्या त्या पाहून सगळेच बुचकळ्यात पडले.
त्या बंद खोलीतून बऱ्याच विचित्र गोष्टी निघाल्या. एक मोठी लाकडी पेटी आणि त्यात विचित्र प्रकारचे कपडे, पुतळे आणि लहान बाहुल्या. मी स्वतः ती पेटी पहिली होती. पुढचे काही दिवस याबाबत बरीच चर्चा रंगली. त्या खोली बाजूला राहणाऱ्या इतर भाडेकऱ्यांकडून कळले की रात्री अपरात्री बायकांच्या नाचण्याचा आणि गाण्याचा आवाज येत असे. पण रात्री किंवा सकाळी कोणी ही बाई येताना किंवा जाताना दिसत नसे. काही लोक म्हणायचे की तो भाडेकरू साधा माणूस नसून एक मांत्रिक होता आणि तो रात्री तंत्र मंत्र करून त्या बहुल्यांना जिवंत करत असे.