लेखक – हृषिकेश इंगवले
निराली झोपली का आता? आई ने विचारल.
हो!! गेल्या दोन तासा पासून ती आराम करतेय. डॉक्टर स्नेहा च समोरून उत्तर आलं.
डॉक्टर काय होत आहे तीला, अशी का वागतेय ती गेल्या 3 दिवसापासून..
तिने 4 ते 5 वेळा केक बनवायच सामान आणल आहे, अशी का वागतेय ती.. आई ने आपली चिंता व्यक्त केली.
डॉक्टर स्नेहा ने आपला मोबाईल टेबलं वरून उचलून निरालीचे चॅट ओपन केले आणी तिच्या आईला दाखवले. हे बघा Mrs. सावंत..
त्यांनी पहिलं की निराली ने डॉक्टर स्नेहाला गेल्या तीन दिवसात कित्येकदा श्रीकांतच्या वाढदिवसा निम्मित केक बनवायचे मेसेज केले होते.
श्रीकांत.. हा कोण आहे आई ने Dr. स्नेहाला विचारले.
तिचा बॉयफ्रेंड.
हे ऐकून Mrs. सावंतला झटका लागला आणि राग अनावर झाला. कोण आहे हा श्रीकांत, त्याच्यामुळे होतोय का निरालीला इतका त्रास..
Dr. स्नेहा ने पाण्याचा ग्लास उचूलन Mrs. सावंत कडे दिला आणी म्हणाली “ त्या साठी तुम्हाला तिची दैनंदिनी (diary) वाचावी लागेल.
आई ने विचारलं “ दैनंदिनी?” कोणती दैनंदिनी? “
हो कॉलेजच्या अगदी पहिल्या वर्षापासून ती दैनंदिनी लिहत आहे. तिच्या जीवनात रोज घडणाऱ्या घडामोडी ती प्रत्यक दिवशी ह्यात लिहत आहे.
तुम्ही शेवटच्या 3 दिवसांची पाने वाचलीत तर दैनंदिनीचे वाचलात तर तुम्हाला निरालीचे अश्या वागण्याचे कारण कळेल.
Mrs. सावंत ने ती दैनंदिनी हातात घेऊन वाचायला लागली.
आज सकाळीच श्रीकांतचा कॉल आला. झोपेतच मी त्याचा कॉल उचलला.
हॅलो निराली.. लवकर तयार हो आज आपल्याला फिरायला जायच आहे! मी निघतोय घरून अर्ध्या तासात मी पोहचेल.
बोलून त्याने कॉल कट केला.
माझी तर झोपच उडाली कारण आज कित्येक दिवसाने श्रीकांतचा मला कॉल आलेला. ते ही फिरायला घेऊन जाणार आहे. मी लगेच तयार झाले आणि वाट पाहू लागले. आज परत उशीर झाला त्याला, येऊ दे त्याला आज दिवसभर रुसून राहीन, काही बोलणारच नाही.
तेवढ्यात त्याचा कॉल आला.
हॅलो निराली!! खाली ये मी आलो आहे.
Hm…ठीक आहे. आज दिवस भर बोलायचंच नाही हे मी ठरवले नाही.
मी जाणूनबुजून रागावलेला चेऱ्याने बाहेर गेले, जशी मी बाहेर आले. माझ्या नकळतच त्याने मला मिठीत घेतले.
अस अचानक मिठीत घेतल्यामुळे मी विसरूनच गेले की मला रागवायचं होत. शिट यार.. मला नीट रागवायलाच जमत नाही..
पण नाही निराली.. इतक्यालवकर राग शांत नाही करायचा आपल्याला.
त्याची मिठी सोडवत मी रागातच बोलले “ किती उशीर.. अर्ध्या तासात येणार होतास ना , १ तास होऊन गेला.. तुला माहित आहे ना मुलींना कधी थांबवून ठेवायचा नसत.. “
माझे बोलणे पूर्ण होत नाही तेवढ्यात त्याने एक गुलाबाच फूल माझ्या समोर धरले. आणि आता मात्र माझा राग कुठच्या कुठे निघून गेला.
“ यार हा असा कसा, कसं रागावू मी आता.. काय कारण काढू मी याच्यावर रागवायला.”
तितक्यात तो म्हणाला “ आज मी खास तुझ्यासाठी आलो आहे. एक सरप्राइज आहे तुझ्या साठी. चल पटकन गाडीत बस. “
सरप्राइज ! काय आहे सांग ना मला..
अग जर तुला सांगितलं तर मग सरप्राइज कसं राहणार..
त्याच्याशी बोलत बोलत मी गाडीत बसले. त्याने गाडी घराच्या दिशेने घेतली. घरी पोहोचे पर्यंत तो काहीच बोलला नाही. फक्त रोमँटिक जुनी गाणी लावली होती.. मला प्रश्न पडला की हा आज इतका शांत कसा. मी काही बोललो नाही. काही वेळात आम्ही दोघं ही त्याच्या घरी पोहोचलो. गाडी पार्क करून तो घराच्या दिशेने चालत गेला. मी त्याच्या मागेच होते. त्याने दार उघडले आणि मी घरात शिरले तसे..
सरप्राइज…..$$$$
आत मधून अनेकांचा आवाज आला. आत पाहिलं तर संपूर्ण रूम भरली होती. अर्थातच त्याचे मित्र मैत्रिणी होते. पुढे पाहिलं तर मधोमध एक टेबल होत आणि त्यावर एक केक ठेवलेला. त्यावर लिहिलं होत “ Happy Anniversary”
काय..?? शीट.. आज आमची anniversary आहे. हे कसे विसरले मी. आम्ही केक कट केला. श्रीकांत ने माझ्यासाठी इतकं सगळं केलं, बदल्यात याला काय देऊ या विचारात बराच वेळ निघून गेला. त्याच्या सगळे मित्र मैत्रिणी आप आपल्या घरी निघून गेले. आता आम्ही फक्त दोघं त्याच्या घरी होतो. किती दिवसांनी आम्हाला हा एकांत मिळाला होता. घरात कंटाळा आला म्हणून आम्ही त्याच्या टेरेस वर गेलो. हलका पाऊस पडून गेला होता त्यामुळे संपूर्ण परिसर ओला चिंब झाला होता. आभाळ नुकतेच मोकळे झाले होते त्यामुळे सूर्याची किरणे पडल्यामुळे वातावरण खूप छान वाटत होत.
“ आज अचानक अस सरप्राइज दिलास मला ते समजल..”
त्याने एक स्मितहास्य केलं आणि माझा हात हातात घेत म्हणाला “ तू आनंदी आहेस ना बस.. अजुन काय पाहिजे मला.. तुझ्या चेहऱ्यावरचा आनंद पाहण्यासाठी च तर इतका आटापिटा केला मी. मला एक वचन दे की तू मला कधीच सोडून जाणार नाही.”
मी त्याच्याकडे पाहत जरा रागातच बोलले.
तू सोडून जायचा विषय का काढतोस? मी तुला कधीच सोडणार नाहीये. आज चा दिवस इतका सुंदर आहे मला अस वाटतं की हा दिवस कधी संपूच नये. एक काम कर मला ना असच रोज सरप्राइज देत जा..
अग पण असे रोज रोज केले की मग त्या दिवसाची मजा उरेल का..?
हो ते ही आहेच म्हणा..
आमचं बोलणं सुरू होत आणि तितक्यात अचानक जोरात पाऊस सुरू झाला. आम्ही दोघं ही भानावर नव्हतो. काही वेळ आम्ही तसेच पावसात भिजत राहिलो. काही वेळानंतर खाली आलो तेव्हा पूर्ण चिंब भिजलो होतो. काही कळायच्या आत त्याने माझा हात धरला. त्याच्या अश्या कृतीने अंगावर शहारे आले. माझ्या काळजाची धड धड वाढली. आणि त्याच धुंदीत आम्ही एकत्र झालो. जेव्हा मला जाग आली तेव्हा श्रीकांत झोपला होता. त्याने मला इतकं स्पेशल फिल करून दिलं , त्याला काही द्यावं लागेल, त्याच्यासाठी काही तरी करावं लागेल. काय करू.. ?
अरे हो.. annivarsary च्या दुसऱ्या दिवशी श्रीकांत चा वाढदिवस असतो. त्याच्यासाठी मी उद्या केक बनवणार. एक काम करते स्नेहाला पण सांगते. ती माझी कॉलेज पासून ची मैत्रीण आहे आणि ती मला या प्लॅन मध्ये नक्कीच मदत करेल. पटकन फोन केला आणि तिला सगळा प्लॅन समजाऊन सांगितला. मी श्रीकांत च्या नकळतच बाहेर आले आणि माझ्या घरी पोहोचले. आल्यावर केक बनवायचे समान आणायला पुन्हा बाहेर पडले. उद्या श्रीकांत ला मी सरप्राइज देणार. इतका सुंदर दिवस होता हा म्हणून मी काही विसरायच्या आत लिहून ठेवला..
मिसेस सावंत यांनी पुढचे पान उलटले आणि पाहिली ओळ वाचून त्यांच्या हृदयाचा ठोकाच चुकला. त्या पाहतच राहिल्या. आज सकाळीच श्रीकांतचा कॉल आला. झोपेतच मी त्याचा कॉल उचलला. अहो हे काय ही ओळ पुन्हा कशी. या बद्दल तर तिने आधीच लिहिलं आहे ना. त्यांनी पुढची काही पाने चाळली आणि प्रत्येक पानावर ते एकच वाक्य.
डॉक्टर स्नेहा म्हणाली “ निराली माझी कॉलेज पासून ची मैत्रीण. ती मला सांगायची की माझे वडील नाहीत. आई ही कामात असते. मला घरी खूप एकटं वाटते, तू आहेस म्हणुन ठीक आहे. तू नसतीस तर मी पार एकटी पडले असते गं. तिला सुध्धा वाटायचं की तिच्या कडे सुद्धा असा एक जिवलग मित्र असावा ज्याच्याशी ती सगळ काही मनमोकळेपणाने बोलू शकेल. पण इंट्रोवर्ट असल्या कारणाने ते तिला जमलं नाही. कॉलेज संपलं आणि आम्ही दोघं ही आमच्या करियर च्या वाटेवर वेगळे झालो. पण तरीही फोन वर आमचं बोलण होत राहायचं. ती अजून कोणाशी बोलत नव्हती आणि तसे ही तिच्या आयुष्यात काही खास गोष्टी घडत नव्हत्या. आम्ही अधून मधून भेटलो सुद्धा. तेव्हा सगळ ठीक चालू होत. आणि त्याच दिवसात बहुतेक तिला ही पुस्तक वाचायची सवय झाली. आणि तिच्या पुस्तकातील एक पात्र म्हणजे श्रीकांत.
त्या पुस्तकातील ते पात्र तिला इतकं आवडू लागलं की ते पुस्तक तिने अनेकदा वाचलं. तो जसा वागायचा , त्याच्या गर्लफ्रेंड ला स्पेशल फिल करवायचा , तिचे नखरे सांभाळायचा ते तिला खूप आवडू लागले. तिला श्रीकांत सारखाच साथीदार हवा होता. हळु हळु ती श्रीकांत ला त्या पुस्तकातील काल्पनिक जगातून खऱ्या आयुष्यात आणू लागली. त्याच्याशी ती सगळ काही बोलू लागली. Hallucinations व्हायला लागले. आणि प्रत्येक दिवसागणिक ते वाढत गेले. बॉयफ्रेंड बद्दल घरी कस सांगणार म्हणून तिने तुम्हाला काहीच सांगितलं नाही. मीही माझ्या कामात इतके मग्न होते की माझे ही तिच्याशी बोलणे कमी झाले. आणि या सगळ्यात काल्पनिक जगातल्या श्रीकांत ने तिला सरप्राइज् दिले आणि तो आभास तिच्या मनावर इतक्या खोलवर रुतला गेला की गेल्या ३ दिवसांपासून हा एकच प्रसंग ती नव्याने अनुभवत आहे. ती एका लूप मध्ये अडकली आहे. ज्यातून तिचे बाहेर निघणे खूप कठीण आहे.
अचानक डॉक्टर स्नेहा च्या मोबाईल वर notification येत निरालीचा मेसेज. ती मेसेज ओपन करते आणि मिसेस सावंत यांना दाखवते. .
हॅलो स्नेहा👋
अरे मी तुला श्रीकांत बद्दल सांगितलं होता ना माझा बॉयफ्रेंड त्याचा वाढदिवस आहे उद्या तर मी cake बनवायचा प्लॅन केला आहे तू येशील ना माझी मदत करायला?