अनुभव – सूरज

प्रसंग आहे २०१३ सालचा. माझे गाव कोकणात आहे. मी ने महिन्यात संपूर्ण कुटुंबासोबत गावी गेलो होतो. म्हणजे मी, माझे आई वडील आणि माझा भाऊ आणि बहीण असे सर्व. आमच्या वाडीत पूजा होती. त्यामुळे आमचे इतरही बरेच नातेवाईक आले होते. बऱ्याच काळानंतर भावंडं भेटल्यामुळे खूप मजा केली. २ दिवस सगळे कार्य सुरू होत. सर्व घर भरलं होत. मे महिना असल्यामुळे साहजिक च आंब्याचा सिझन सुरू होता. बागेत राखण करण्यासाठी माझे आजोबा जात असत. पण घरात पूजा कार्य असल्यामुळे ते ही घरीच थांबले होते. सगळे कार्य सुरळीत पार पडले. काही दिवसांनंतर मी, आई, माझी काकी आणि आजोबा असे चौघे जण आंबे काढण्यासाठी बागेत गेलो. तर तिथे गेल्यावर समजले की कोणी तरी आंबे चोरी केलेत. कारण अगदी आठवड्या भरा पूर्वी खूप आंबे आले होते आणि आता ते दिसत नव्हते.

आमची बाग घरापासून खूप लांब आहे. आजोबांनी हे सगळे पाहिले आणि ते खूप चिडले. नंतर त्यांना वाटले की कदाचित आंबे काढून बाजूच्या बागेत ठेवले असतील. म्हणून ते पटकन जाऊन पाहू लागले तसे त्यांना तिथे काही आंब्याच्या पेट्या भरलेल्या दिसल्या. ती बाग कासार काका म्हणून एक गृहस्थ होते त्यांची होती. तिथे पडलेला एक साधा आंबा ही कोणी उचलत नसे कारण त्याला कारण ही तसेच होते. त्यांना वाटले की या सगळ्या पेट्या आमच्याच आहेत. त्यांनी माझ्या आई व काकी ला सांगितले की या पेट्या उचला आणि आपल्या घरी घेऊन चला. आणि इथून सुरू झाला तो विचित्र खेळ. आम्ही जश्या त्या पेट्या उचलल्या तसे आमच्या मागून हाक ऐकू आली. एका विचित्र आवाजात.. “ ए.. थांबा.. जाऊ नका.. “ आणि सगळ्यात भयानक गोष्ट म्हणजे ती हाक कधी लांबून यायची तर कधी एकदम जवळून.. 

त्यात मी सगळ्यांच्या मागे चालत होतो. तो आवाज मला असह्य होऊ लागला आणि जे करायला नव्हते पाहिजे तेच मी केले. मी घाबरून मागे पाहिलं. मागे तर कोणी दिसले नाही पण माझे आजोबा माझ्या कडे पाहून जोरात ओरडले “थांबू नकोस.. चल लवकर.. “ झपाझप पावले टाकत आम्ही घरी पोहोचलो. पोहोचून अवघी काही मिनिट झाली असतील..  तितक्यात काका धावतच घरी आला आणि बोलला की आमच्या दुसऱ्या बागेतील आंबे, नारळ, केली आणि आजी ने लावलेल्या भाज्या कोणी तरी खाऊन टाकल्या आहेत. आमचे खूप नुकसान झाले होते.

आजी आणि काका काही तरी बोलू लागले आणि मी त्यांचे बोलणे ऐकू लागलो. पण तितक्यात आजोबा म्हणाले की बाळा तू बाहेर खेळायला जा, आम्ही बघतो काय करायचे ते. मी घराच्या बाहेर गेलो तर खरे पण तिथेच उभे राहून ऐकू लागलो की आजी , आजोबा , काका वैगरे नक्की काय बोलत आहेत. त्या बाजूच्या बागेत त्या माणसाने वश केलेलं बायंगी नावाचं भूत बांधून ठेवलं होत. जे त्यांच्या बागेच्या राखण करायला ठेवलं होत. याच कारणामुळे तिथे पडलेला साधा एक आंबा ही कोणी उचलून नेत नसे. कारण तास कोणी केलं ते मागे लागत आणि तर देत. त्यानेच दुसऱ्या बागेचे नुकसान केले होते असे काका सांगत होता. त्या कासार काकांची माफी मागून आम्ही सगळे आंबे परत केले तेव्हा ते सगळे प्रकार थांबले. आज ही कधी तो प्रसंग आठवला की भीती ने अक्षरशः घाम फुटतो..

Leave a Reply