लेखक – विनायक शेरेकर

खूप प्रयत्नानी यश ला कावेरी बिल्डिंग मध्ये तिसऱ्या माळ्यावर रूम मिळाली. मुंबईत इतक्या स्वस्तात आणी कायदेशीर जागा कशी मिळाली ह्याचे आश्चर्य त्याला वाटत होतं. त्या बिल्डिंग मध्ये राहायला आलेला तो पहिलाच रहिवासी होता. पण आपले नशीब चांगले असे समजून खूष होता. तो एका खासगी कंपनी मध्ये कामाला होता.. नवीन घरी येताच साफ सफाई चे काम सुरु केले. तसे २ दिवस त्याने सुट्टी घेतली होती. 1 वाजून गेला होता. 4-5 तास कामच सुरु होते. तेव्हा यश ला बॉस चा फोन आला “यश सुट्टीवर आहेस ठीक आहे पण पाच वाजले तरी तू रिपोर्ट नाही पाठवलास????” ऐकून यश थक्क झाला. त्याने भिंतीवरील घड्याळ पहिल.. घड्याळ 1 वाजून 5 मिनिट वेळ दाखवत होत. मोबाईल हातात घेतला तर तो ही रिस्टार्ट होऊन चालू होऊ लागला, आणि वेळ ही 1.5. त्याला आश्चर्य वाटले.. रिपोर्ट पाठवतो असे सांगून त्याने फोन ठेवला.

… दुसऱ्या दिवशी दुपारी 12.30 ला यशने घड्याळाचे नवीन सेल आणले, त्याला वाटले घड्याळाचे सेल संपले असावेत… त्याने शिफ्टिंग च्या कामासाठी घेतलेली सुट्टी संपली नव्हती. घरी येताच थोडंसं खाऊन घेतलं आणि त्याला डुलकी लागली. काही वेळ उलटला असेल. कसल्या तरी आवाजाने जाग आली तेव्हा त्याची नजर भिंतीवरील घड्याळाकडे गेली. आणी त्याला भितियुक्त नवल वाटले की पुन्हा घड्याळ 1.05 ही वेळ दाखवत होतं. त्याने झटकन मोबाईल पहिला तर तो ही रिस्टार्ट होऊन पुन्हा 1.05 ही वेळ दाखवायला लागला. एकदा घडले तर योगायोग समजू शकतो पण हे दुसऱ्यांदा घडले होते. त्यामुळे थोडी का होईना पण मनात भीती निर्माण होऊ लागली होती. कारण ती जागा त्याच्यासाठी नवीन होती. 

ऑफिस मध्ये अनिकेत नावाचा त्याचा एक खास मित्र होता.. न राहवून यश ने त्याला थोडंसं घाबरतच हे सर्व सांगितले.. अनिकेत ने त्याला उडवून लावले आणि म्हणाला, “अरे यश, एक तर तुझा मोबाईल खराब असेल नाहीतर घड्याळ तरी. एक काम करू आज मंथ एंड आहे, उशीर होईल. काम आटोपल्या नंतर आज रात्री तुझ्या घरी जाऊ, मला ही पाहायचं आहे हे काय घडतंय ते”. अनिकेत आपल्याला मदत करतोय हे ऐकताच यश ला थोडा धीर आला. ऑफिस मध्ये कामात असताना दुपारी यश ला मेसेज आला. तो मेसेज कंपनी चा होता. “Salary credited”… यश तसाच धावत अनिकेत च्या डेस्क वर गेला.. एरवी salary संध्याकाळ शिवाय येतं नसायची. पण अचानक दुपारी सॅलरी क्रेडिट झाली हे पाहून त्याला आश्चर्य वाटले. अनिकेत ला तो मोबाईल दाखवत ओरडूनच बोलला, “भावा time चेक कर..”

अनिकेत ने पहिले तो ही हैराण झाला… बरोबर 1:05 ला msg आला होता. “तुझी आली का सॅलरी?” यश अनिकेत ला म्हणाला..

.” नाही रे ” अनिकेत ने थोडं अचंबित होऊन उत्तर दिले…

त्यावर यश पुढे बोलला “मीं म्हणालो होतो ना हे काहीतरी आहे, ही वेळ सतत मला काही तरी खुणावतेय”…. 

“आता हा विषय नकॊ रात्री तुझ्या घरी जाऊन पाहू”. .. अनिकेत शांत पणे म्हणाला. 

संध्याकाळी नेहमी प्रमाणे सर्वाना *salary credited* असा मेसेज आला.. अनिकेतला उत्सुकता लागली होती की नक्की काय चालू आहे.. त्यांना काम आटोपून निघायला रात्री १० वाजले. ऑफिस मधून निघाल्यावर यश आणी अनिकेत ने 4 बियर आणी जेवण पार्सल घेतले. दोघे ही यश च्या घरी आले. 

यश ने दरवाज्याजवळ येताच अनिकेत ला खुणावू न सांगितले ” आता फक्त घड्याळ बघ.” आणि असे म्हणतच त्याने दरवाजा उघडला.

अनिकेत ने भिंतीवरचे घड्याळ पाहिले तर चकित होऊन पाहतच राहिला… घड्याळात नेमके 1.05 वाजले होते. तेवढ्यात यश चा मोबाईल restart झाला आणी टाइम update झाला.. 1.05.. 

ते पाहुन अनिकेत ला स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसेना… तो घाबरत म्हणाला, ” यश हे काय चालू आहे”…

 “मला माहिती असते तर तुला बोलावले असते का?” यश म्हणाला… 

तितक्यात अनिकेत ने सावध होऊन पटकन स्वतःचा मोबाईल पहिला.. त्याच्या mobile वर barobar रात्रीचे 11 वाजले होते… अनिकेत ने beer फोडत यश ला गंभीर पणे विचारले, ” यश, इथे आल्यापासून तुला कधी कसला भास, आवाज असे जाणवलंय का???.. 

यश ने नकारार्थी मान डोलावली…

” तुला या आधी गावी असताना कधी असे भास किंवा negative energy वगैरे जाणवलीय का?” 

यश म्हणाला, “हो गावी असताना किंवा काही ठिकाणी एकांतात असल्यावर जाणवते असे.. पण मी भास समजून दुर्लक्ष करत आलो.. पण मला कळालं नाही हा आकडा मलाच का दिसतो.. तुला का नाही?? “… 

अनिकेत ने उत्तर दिले, “कदाचित तुझा मनुष्यगण आहे.. हे आकडे तुला काहीतरी सुचवतायत “..

यश ने पुन्हा मोबाईल पहिला वेळ तीच होती 1.05. वारंवार रिस्टार्ट होऊन तीच वेळ mobile वर येतं होती..दोघे ही जेवायला बसले.. 

अनिकेत च्या डोक्यात काही तरी चालू होते. काही वेळ विचार करून तो म्हणाला, “यश, एक काम करू.. रात्री बरोब्बर 1.05 ला आपण प्रयत्न करू जाणून घ्यायचा की काही होतय का… मी १० मिनिट आधीच अलार्म लाऊन ठेवतोय..

दिवस भराच्या कामामुळे दोघानाही थकवा आला होता. त्यामुळे अर्ध्या तासातच दोघांना झोप लागली..

……. बरोब्बर 1 वाजता अनिकेतचा अलार्म वाजला. अनिकेत ने यश ला जागे केले.. 

“यश, मीं शांत बसतो. १ वाजलाय. ५ मिनिट बाकी आहेत. तू फक्त जाणून घ्यायचा प्रयत्न कर की काही तुला जाणवतंय का… कारण मला मनुष्य गण नसल्यामुळे ते जाणवणार नाही..”

यश तयार झाला.. त्याने घरी बाथरूम पासून बाल्कनी सगळीकडे पाहिले.. पण काही जाणवले नाही… तब्बल २ वाजे पर्यंत यश प्रयत्न करत राहिला पण त्याला ना काही जाणवले ना काही दिसले.. शेवटी कंटाळून ते दोघे झोपी गेले…

काही दिवस यश ऑफिस ला असताना दर रोज 1:05 pm ला काही होतय का हे निरीक्षण करत होता. पण त्याला खास असे काही जाणवत नव्हते. काही दिवसांनी यश ला वाटले की घरी वर्तमानपत्र चालू करूया तितका विरंगुळा होईल कारण सारखा मोबाईल aani ते 1:05 पाहून तो कंटाळला होता.. त्याने वॉचमन कडून पेपरवाल्या मुलाचा नंबर घेऊन घरी वर्तनामान पत्र चालू केले.. दिवस असेच पुढे सरकत होते.. घरी सतत ते 1.05 मोबाईल रिस्टार्ट होऊन तो टाइम दाखविणे चालू होते… यश ही आता कंटाळून गेला होता कारण कशाचा थांगपत्ता लागत नव्हता… महिना उलटला आणि पेपर वाला आपले बिल घ्यायला जेव्हा आला तेव्हा यशने त्याला अतिरिक्त काही पैसे टीप म्हणून दिले.. 

तेव्हा पेपरवाला मुलगा म्हणाला, “धन्यवाद साहेब.. ह्याला म्हणतात माणुसकी… नाहीतर काही काही जण बिल पण वेळेवर देत नाहीत..” 

यश म्हणाला, “म्हणजे??? अजून कोण इथे पेपर घेतं?? बिल्डिंग मध्ये मीच पहिला राहायला आलोय.. बाकी बुकिंग चालू आहॆ ना???..

पेपरवाला शांतपणे म्हणाला, “साहेब कुणाला सांगू नका, पण पहिल्या माळ्यावर 5 व्या रूम मध्ये एक मॅडम राहायच्या. आपल्या बिल्डर साहेबांच्या खास होत्या. Bill देताना कायम लेट करायच्या.”

यश च्या डोक्यात प्रकाश पडला 1.05 म्हणजे पहिल्या माळ्यावरचा पाचवा फ्लॅट. तस त्याने उत्सुकतेने विचारले, “कुठे गेल्या त्या मॅडम”???..

पेपरवाला म्हणाला, “माहित नाही, कारण फ्लॅट ला टाळे असते हल्ली”.

दुसऱ्या दिवशी यश ने सर्व प्रकार अनिकेतला सांगितला. 

अनिकेत म्हणाला, “काहीही करून 105 रूम मध्ये गेले पाहिजे तिथेच आपल्याला सर्व कळेल”… 

“आणी lock कसे उघडणार??” यश म्हणाला.. 

अनिकेत म्हणाला, “ते माझ्यावर सोड, आज रात्रीच आपण जाऊया, मी तुझ्याकडे राहायला येतो आज.” यश ने होकारार्थी मान डोलावली. संध्याकाळी अनिकेत ने हार्डवेअर च्या दुकानातून काही tools खरेदी केले.. रात्री अनिकेत आणी यश ठरल्याप्रमाणे 105 रूम कडे निघाले.

मनात भीती असली तरीही त्याची जागा आता उत्सुकतेने घेतली होती. अनिकेत ने काही साधनाच्या मदतीने कुलूप फोडले. आतमध्ये जाताच lights on करताना यश ला हलका विजेचा धक्का लागला.. Light तर चालू झाली नाही. यश म्हणाला वाटत काहीतरी lights चा problem आहॆ वाटत. मोबाईल टॉर्च च्या मदतीने दोघे जण शोधा शोध करू लागले.

. बऱ्याच वेळाने यश ला सोफ्याखाली कोपऱ्यात एक कागदाचा बोळा सापडला.. यश ने तो उघडला, आणी तो मजकूर वाचू लागला, ‘ मी पैशाच्या लोभपायी घरदार सोडून मोठी चूक केलीय. माझे असे कुणीच नाहीय. ज्या व्यक्तीवर प्रेम केले ते श्री अनिल सदावर्ते धोकेबाज निघाले. लग्नाचे आमिष देऊन त्याने माझी फसवणूक केली. मला हा फ्लॅट देऊन आता सांगतायत तू निघून जा म्हणून. मीं घरी गेले तर गावी मला कोण स्वीकारणार नाही. माझ्यामुळे कुटुंबाची बदनामी तर झालीच आहॆ. माझा जागून उपयोग नाही. मी आत्महत्या करत आहॆ.ज्याला कारणी भूत फक्त सदावर्ते असतील.’… 

अनिकेत आणी यश एकमेकांकडे पाहू लागले आणी अचानक वरून अश्रू चे थेंब त्या कागदावर पडू लागले.. यश आणी अनिकेत ने वर पहिले आणी दोघांची वाचाच बंद झाली. 28-30 वयाची एक तरुणी त्यांच्याकडे पाहत रडत होती… दोघे ही भीतीने थरथर कापू लागले. पण कसे तरी हिम्मत करून तिथून पळाले. जाताना दरवाजा बंद करायला ही ते विसरले… दोघे तिसऱ्या माळ्यावर आपल्या घरी आले. 

धाप टाकत च अनिकेत म्हणाला,” यश निघूया इथून लगेच नाहीतर ती आपल्याला मरून टाकेल” 

यश एक दीर्घ श्वास घेत म्हणाला, “नाही काळजी नकॊ करुस.. मला सर्व काळालंय आता. मारायचे असते तर कधीच मारले असते.. मी इतके दिवस इथे एकटा राहतोय कधी त्रास नाही झाला.. तिला तो बिल्डर सदावर्ते हवाय” “… 

त्यावर अनिकेत म्हणाला, “कोण सदावर्ते?” 

यश म्हणाला, त्यात लिहिलेलं जे नाव होतं ना ते, अनिल सदावर्ते.. तेच या बिल्डिंगचे बिल्डर आहॆत”. 

अनिकेत एव्हाना शांत झाला होता. तो थोडा विचार करत म्हणाला “आता आपण काय करायचे यश??” 

“उदया पाहू.. मला वेळ हवाय” यश ने गंभीरपणे उत्तर दिले….

दुसऱ्या दिवशी यश वर संशय घेतं वॉचमन म्हणाला, “काल तुम्ही रूम नंबर १०५ मध्ये गेलेलात??? कुलूप तुम्ही तोडले??” 

यश गंभीरपणे म्हणाला, ” तुला सगळे सत्य माहिती असून तू शांत राहिलास??? पोलिसाना काय ते उत्तर दे “..

वॉचमन हात जोडत घाबरत गयावया करत म्हणाला,” साहेब गरिबावर दया करा.. मुलांची शाळा घर सर्व करण्यात पैसे जातात.. त्यामुळे मी शांत बसलो. सदावर्ते साहेबांनी मला थोडे पैसे दिले गप्प बसायचे.. पण तुम्हाला कसे कळाले की हे मला माहिती असणार?. “… 

“साहजिक आहॆ.. “हि नवीन इमारत आहॆ त्यात मी सोडून अजून कोण इथे राहायला आले नाहीये. आणी तू इथे आधीपासून नोकरीला आहेस म्हटल्यावर तुला माहिती नाही असं होणारच नाही.”… 

वॉचमन हात जोडून म्हणाला साहेब काहीहि करा,” मला ह्यात ओढू नका”…

दिलासा देतं यश म्हणाला, “मग एक काम करावे लागेल… सदावर्तेना सांगा 105 नंबर रूम साठी एक मोठी पार्टी आली आहॆ, त्यांना तुम्हाला भेटायचंय.. असे सांगून उदया बोलवून घ्या “…

“ठीक आहॆ साहेब” वॉचमन म्हणाला.

नवीन पार्टी येतेय असे वॉचमन ने सांगितल्यावर दुसऱ्या दिवशी सदावर्ते लगेच तिथे आले.. वॉचमन ने त्यांना ती रूम उघडुन दिली आणि म्हणाला “साहेब ती पार्टी येतच आहे, तुम्ही आत थांबा मी लगेच त्यांना घेऊन येतो..” लाईट लावायला म्हणून जसा सदावर्तेनी स्विच ला हात लावला तसा विजेचा एक तीव्र झटका त्यांना लागला.. तो झटका इतका जबरदस्त होता क्षणात हृदयाचे ठोके थांबले. आणी मोठ्यानं हसण्याचा एक आवाज त्या बिल्डिंग मध्ये दुम दुमला… 

पोलीस तपासात विजेचा धक्का लागून मृत्यू म्हणून नोंद झाली.. 

दुसऱ्या दिवशी यश ऑफिस मधून घरी आला. घडाळ्यात नजर गेली तर ८ वाजले होते. प्रसन्न वाटत होत. तितक्यात मोबाईल वाजला तसे त्याने मोबाईल मध्ये ही वेळ पाहिली. ८ ची वेळ. त्याने फक्त एक स्मित हास्य केलं आणि बॅग खाली ठेवून सोफ्यावर निवांत बसला. 

Leave a Reply