माझं संपूर्ण बालपण माझ्या गावात गेलं. आमचं गाव म्हणजे अगदी लहानस खेड होत. तूरळक लोकं आणि मोजकी घरं. त्यामुळे सगळं वातावरण अगदी शांत असायच. गावातल्या एका गोष्टी बद्दल मला खूप कुतूहल होत. ते म्हणजे आमच्या शेजारी असलेले बाळु काकांचे पडके घरं. अगदी लहानपणापासून मी त्या घराबद्दल ऐकत आले होते. बाळू काका गावातले प्रतिष्ठित व्यक्ती होते. पण एके दिवशी त्यांच्यासोबत त्यांच्या कुटुंबातील सगळेजण अचानक मरण पावले. मृत्यूचा कारण गावातल्या कोणालाच कळू शकलं नाही. आजूबाजूच्या इतर लोकांनी आमचं गाव सोडून दिलं. आमचं एकुलता एक घर आणि कुटुंब होतं जी अजूनही त्यांच्या शेजारी राहत होतं. गावात त्या घराबद्दल वेगवेगळ्या गोष्टी बोलल्या जायच्या. कोणी म्हणायचं की त्या घरावर करणी केली आहे. तर कोणी म्हणायचं की बाळू काकांना वेड लागलं होतं आणि त्यांनीच काहीतरी करून घरातल्या सगळ्यांना मारून टाकलं.

अगदी आजही  बाळू काका आणि त्यांच्या कुटुंबाचे आत्मे त्या घरात आणि आजूबाजूच्या परिसरात वावरतात. त्या दिवशी मी घरी एकटे होते. आई-बाबा आणि दादा दुसऱ्या गावी गेले होते. मुसळधार पाऊस सुरू होता. विजांचा कडकडाट होत होता. आमच्या भागात लाईटचा प्रॉब्लेम असल्यामुळे लाईट केव्हाच गेली होती. इन्वर्टर वगैरे हा प्रकार नव्हता तेव्हा. त्यामुळे मी मेणबत्ती लावून अभ्यासाला बसले होते. बाहेर होत असलेला विजांचा कडकडाट माझ्या मनात धडकी भरवत होता. बरीच रात्र झाली होती. मी झोपायची तयारी करू लागले आणि सगळे आवरायला घेतले. तितक्यात मला खिडकी बाहेर  कसली तरी चाहूल जाणवली. मी खिडकी जवळ चालत गेले आणि बाहेर डोकावून पाहू लागले. 

गडद अंधार आणि त्यात मुसळधार पाऊस त्यामुळे बाहेरचा परिसर नीट दिसत नव्हता. त्यात भरीस भर म्हणून गावातली लाईटही केली होती. मी खिडकी बंद करून आत जाणार तितक्यात एक वीज चमकली आणि समोरच्या घराच्या खिडकीत मला एक अस्पष्ट आकृती दिसली. आणि त्यासोबतच ढगांचा कडकडाट झाला. मी घाबरून दोन पावलं मागे सरकले. बऱ्याच वर्षांपासून बंद असलेल्या घरात कोणीतरी होत. जे बहुतेक मलाच पाहत होत. लहानपणापासून ऐकत आलेल्या गोष्टींमुळे मनात नको नको ते विचार येऊ लागले. ती आकृती म्हणजे बाळू काका किंवा त्यांच्या कुटुंबातील कोणाचीही असू शकेल. नुसत्या विचाराने अंगावर सरसरून काटा आला. मी झटकन  खिडकी लावून घेतली आणि आत खोलीत आले.. ती आकृती एखाद्या स्त्री सारखे भासत होती. भीतीने माझ्या पोटात गोळाच आला.

तितक्यात मला एक गोष्ट आठवली कि गावातील लोकं सांगायचे “ जेव्हा वीज कडाडते तेव्हा बाळु काकांच्या घरातल्या आत्म्याना मोकळीक मिळते आणि ते आपले अस्तित्व दाखवतात.” आजपर्यंत मी हे बोलणं नेहमीच उडवून लावलं होत पण आज मात्र मला त्याची खरी भीती वाटत होती. हा विचार सुरु असतानाच खिडकीवर एक थाप पडली आणि माझ्या अंगावर सररून काटा आला. मी सरळ पलंगावर येउन अंथरुणात घुसले. बाहेरची ती चाहूल कमी झाली असली तरी सुद्धा माझ्या मनातली भीती वाढत चालली होती. याच विचारात रात्री कधी तरी मला झोप लागली. जाग आली ती कसल्याश्या आवाजाने. कारण पाऊस वारा थांबला होता. लाईट अजूनही आली नव्हती. त्यामुळे खोलीत पंख्याचा ही आवाज नव्हता. होती ती भयाण जीवघेणी शांतता. आणि त्या शांततेत कोणाच्या पावलांचा आवाज येत होता. 

मी पलंगावर च उठून बसले आणि खिडकीच्या फटी मधून बाहेर काही दिसतंय का ते पाहू लागले. समोरून एक बाई सदृश्य आकृती तरंगत आली आणि माझ्या अंगणात शिरली. माझे काळीज भीती ने धड धडू लागले कारण मी घरात एकटे होते. मी धावत देवघरात गेले आणि तिथे च बसून राहिले. मला तिथे झोप कधी लागली कळलेच नाही. डोळे उघडले ते थेट सकाळी. आई बाबा घरी आले होते. त्यांच्या आवाजाने जाग आली. ते मला विचारू लागले कि तू इथे देवघरात का झोपली होतीस. त्यावर मी त्यांना रात्रीचा सगळा प्रसंग सांगितला. त्यांनी मला स्वप्न पडले असेल असे सांगून धीर दिला.

मी ही माझ्या मनाची समजूत काढली कि कदाचित मला स्वप्न पडले असेल किंवा भास झाला असेल. पण आमच्या गावातली लोकं आजही बोलतात कि बाळु काका आणि त्यांच्या कुटुंबियांचे आत्मे अजूनही त्या घरात बंदिस्त आहेत. ते नेहमी आपले अस्तित्व दाखवत राहतात. गावातील वृद्धाकडून कळले की, त्या घरात एक जुनी वस्तू आहे, जिच्या माध्यमातून आत्म्यांनी आपलं अस्तित्व टिकवून ठेवलं आहे. त्या वस्तूला हात लावल्यास, त्या आत्म्यांची सुटका होईल आणि त्यांना मुक्ती मिळेल.. पण हे करण्याचे धाडस आज पर्यंत कोणीही केल नाहीये. माहित नाही या रहस्याची गाठ कधी सुटेल कि हे रहस्य कधीच उलगडू शकणार नाही. 

Leave a Reply