अनुभव क्रमांक १ –
रस्त्या वरच्या कुत्र्यांच्या विचित्र ओरडण्याने माझी एकाग्रता भंग झाली. भिंतीवरच्या घडाळ्या कडे नजर फिरवली आणि काळजाचा ठोकाच चुकला. प्ले स्टेशन वर खेळता खेळता रात्री चे 2 वाजले होते. “उद्या ट्युशन बुडणार आणि पर्वा च सबमिशन ही बिघडणार. असाईनमेंट पूर्ण करायला उद्या ही पुरेसा वेळ नाही मिळणार” बस हाच विचार करत रूम चे लाईट बंद करून बेड वर पडलो. आधीच थकलेलो होतो त्या मुळे डोळा लागायला जास्ती वेळ लागला नाही. जरा अस्वस्थच झोप लागली.
थोड्याच वेळात पुन्हा डोळे उघडले आणि वेळ पहिली तर 3.06 झाले होते. वाटलं, उगीच पडून राहण्या पेक्षा उठून असाईनमेंट पूर्ण करतो. बेड वरून उठण्यासाठी कुस पालटायला गेलो पण माझ्या लक्ष्यात आले की मला हलता येत नव्हते. रूम च्या दाराच्या दिशेनी पाहायला नुसती मान ही हलवायला गेलो तरी ते ही करता येत नव्हते. मी खूपच घाबरलो होतो. हे काय होतय माझ्या सोबत. इतक्यात मला बाथरूमच्या दारा जवळ कसलीशी हाल चाल जाणवली. डोळे हे तितके मात्र हलवता येत होते. त्या दिशेनी नजर फिरवली पण तिथे काहीच नव्हत.
इतक्यात टीव्ही च्या खाली काहीतरी असल्याचा भास झाला. तसे काळजात धस्स झाले. मी पटकन तिथे डोळे फिरवले आणि तिथले दृश्य पाहून माझे डोकेच सुन्न झाले. एक काळी आकृती त्या कोपऱ्यात जमिनी वर होती आणि आपल्या लाल भडक डोळ्यांनी मला एक टक पाहत होती. मी सारी शक्ती लावून ओरडायचा प्रयत्न केला पण माझ्या तोंडातून काहीच आवाज फुटत नव्हता. मी भीतीने काही क्षण डोळे मिटून घेतले. पण काही वेळानंतर पुन्हा न राहवून मी डोळे उघडले. ह्या वेळेस ती आकृती तिथे नव्हती. मला जरा हाईस वाटल. मी भराभर रूम मध्ये जेवढी नजर फिरू शकेल तेवढी फिरवून खात्री करून घेतली की ती आकृती अजुन कुठे तर नाही आहे ना. मी सुटकेचा निःश्वास सोडून वर पंख्या जवळ नजर केली आणि विजेचा तीव्र झटका लागावा तसा मी हादरलो.
ती आकृती पंख्या वरून उलट लटकून मला पाहत होती. तिचा जबडा उघडून ती हळू हळू माझ्या दिशेनी खाली सरकत होती. ती आकृती माझ्या तोंडाच्या अगदी जवळ येणार तेवढ्यात मी जिवाच्या आकांताने ओरडलो आणि डोळे घट्ट मिटून घेतले. पण ह्या वेळेस माझ्या घश्यातून आवाज फुटला आणि आई बाबा माझी आरोळी ऐकून पळत माझ्या जवळ आले. रूम चे लाईट लावले. त्यांनी मला विचारले की काय झाले होते. मला आता हलता येऊ लागले होते त्या मुळे मी पूर्ण रूम मध्ये त्या आकृती ला शोधले. आई बाबांना सर्व सांगितले. पण त्यांचे असे मत होत की हे माझं स्वप्न होत. पण स्वप्न आणि सत्य ह्यातला फरक आपला आपल्याला बरोबर जाणवतो.
त्या घटने नंतर कित्येक दिवस माझा मंन अस्वस्थ होत. मनात सतत चलबिचल सुरु होती की त्या रात्री खर काय घडलं होतं. एक वाईट स्वप्नं की एक हद्रवून टाकणार सत्य? मी त्याचे मूळ गाठायचे ठरवले आणि इंटरनेट वर इतर लोकांना अश्या आलेल्या अनुभवांचा अभ्यास केला. Sleep Paralysis. आपल शरीर आणि मन पूर्त थकलेल, अस्वस्थ किंव्हा स्ट्रेस मध्ये असताना जेव्हा आपण झोपतो तेव्हा हे असे अनुभव येतात. प्रत्यक्षात नसलेल्या वस्तू मन आपल्या डोळ्यां समोर उभ करत. किती ही प्रयत्न केला तरी कुठलं ही अंग हलवता येत नाही. आपला सक्रिय मेंदू शरीराला कुठले ही आदेश देण्याचा अवस्थेत नसतो. पण आपलं मन त्या काही क्षणान साठी जास्ती सक्रिय असतं.
अनुभव क्रमांक 2
हा अनुभव आपल्या चॅनल च्या एका सबस्क्राईबर ने पाठवला आहे असून त्यांची त्यांचे नाव गुपित ठेवण्याची विनंती केली आहे
मी भारता बाहेर एमबीबीएस चं शिक्षण घेतले. माझ्या एका मित्रा सोबत एका रेंटेड अपार्टमेंट मध्ये मी रहायचो.. आमच जेवण वगैरे आम्हीच आळी पाळी ने बनवायचो. एकदा रात्री आम्हा दोघांमध्ये जरा वाद झाला त्या मुळे आम्ही दोघेही आप आपल्या रूम मध्ये बसून राहिलो. कोणीही जेवण बनवायला उशिरा पर्यंत उठलच नाही. पण मित्रांमधला राग काही फार काळ टिकत नाही त्या मुळे थोड्या वेळात आम्ही पुन्हा नॉर्मल झालो. पण तो पर्यंत जेवणाची वेळ उलटून गेली होती. रात्री चे 2.30 वाजले होते आणि भूक ही पुष्कळ लागली होती.
“दादा आता काय करायचं?” मित्रांनी विचारल.
“चल बाहेर जाऊन एकध्या मील पॉइंट वर काही खाऊन येऊ” अस म्हणून आम्ही निघालो.
आता ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी सांगतो की आपल्या इथे रात्री अप रात्री हॉटेल्स वैगरे बंद असतात पण परदेशात तसे नसते. तिथे हॉटेल्स अगदी २४ तास चालू असतात.
आम्ही बाहेर मिल पॉइंट वर जाऊन पोट भरून सगळे खाल्ले. मला फार काही भूक उरली नव्हती त्या मुळे मी माझ उरलेला जेवण मित्राला पार्सल करून घ्यायला सांगितल. खाऊन झाल्यावर आम्ही पुन्हा चालत घरी जायला निघालो.
एव्हाना रात्री चे 3.22 झाले होते. वाटेत एक मोठे गार्डन लागते. आम्ही त्याच्याच बाजूंनी चालत होतो. माझा मित्र माझ्यापासून काही पावले मागे चालत होता. इतक्यात मला माझ्या उजव्या बाजूने कसलासा आवाज आला. मी जास्ती लक्ष नाही दिल. तेवढ्यात तोच आवाज माझा डाव्या बाजूने येऊ लागला. डाव्या बाजूला गार्डन असल्यामुळे मला वाटले की एखादं जोडपं असेल. पण वास्तविक त्या पार्क मध्ये कोणीही नव्हत.
पुढच्या काही क्षणात तो आवाज माझ्या उजव्या बाजूच्या उंच झाडावरून येऊ लागला. त्या बाजूला मान फिरवून पाहू लागलो की काही दिसताय का तितक्यात तो आवाज डाव्या बाजूच्या झाडावरून येऊ लागला. आता मी पुरता घाबरलो होतो. मी मागे फिरून माझ्या मित्राला काही सांगणार इतक्यात तोच पटकन म्हणाला ” दादा पाठी मागे फिरू नकोस, आणि चालण्याचा वेग वाढव. तुला जे आवाज येतायत ते माझ्या अगदी पाठून येतायत.” मी पुढे एक ही शब्द न बोलता भराभर पाय टाकू लागलो.
देवा चा धावा करत एकदाचे घरी पोहचलो. घरात पाय ठेवल्या बरोबर मी मित्राला सांगितला “ते जे आपण सोबत आणलाय ते तडक खिडकी च्या बाहेर फेकून दे”. त्यांनी ही क्षणाचाही विलंब न करता ते पार्सल खिडकी बाहेर भिरकावले. त्याच्या ठीक 1-2 मिनिट नंतर आमच्या फ्लोअर च्याच वर विजेचे मिटर होते त्यात भडका उडाला आणि त्या मिटर ने अचानक पेट घेतला.. तिथे लोकांची धावपळ सुरू झाली. पण आम्ही दोघे गपचुप
ते सारे बघत होतो. मी मात्र मनातल्या मनात आई तुळजा भवानी चे आभार मानू लागलो कारण या विचित्र प्रकारापासून आम्ही सुखरुप बाहेर पडलो होतो.