लेखिका – स्नेहा बस्तोडकर वाणी

“व्यवस्थित पोहोचलात ना” राजश्री म्हणाली. “हो पोचलो व्यवस्थित पण हायवेवर भयंकर ट्राफिक जाम असतो त्याने जास्तीत थकायला झालं” सुरेश म्हणाले “आता बाहेर जाऊन एक छान चहा पिऊन येतो म्हणजे बरं वाटेल””हा अख्खा आठवडा तुम्हाला बाहेरूनच खाऊन काम चालवावे लागणार आहे तरी मी म्हणत होते काहीतरी करा आणि एक आठवडा बदली अजून लांबवून घ्या. म्हणजे सगळ्यांना एकत्र जाता आलं असतं आता ह्या वयाला नाही झेपत हे सगळं आम्ही दोघी सगळं सामान घेऊन कसं काय येऊ आता” “अगं ते शक्य नव्हतं इथल्या ब्रांच मधल्या माझ्या आधीच्या मॅनेजर चा शुक्रवारी शेवटचा दिवस होता मला आज काहीही करून जॉईन करावच लागणार आहे आणि असंही नेत्रा ची परीक्षा आटोपली की तुम्ही दोघी या शुक्रवारी. आणि ही आता शेवटची बदली आहे दोन वर्षे उरली आहेत पुढे रिटायरमेंट आणि सामानाचा म्हणशील तर मूवर्स एन्ड पेकर्स ना बुक केलं आहे तू काळजी नको करू””हो ठीक आहे. बरं अहो मी काय म्हणते खालच्या काकूंना एकदा भेटून या””हो भेटावे लागेल अंगणातल्या चिंचेच्या झाडाच्या फांद्या आपल्या हॉलच्या खिडकीतून आत येतात आहेत काकूंना विचारून कोणी माणूस बोलवून त्या कापवून घेतो””ठीक आहे चला आता ठेवते संध्याकाळच्या स्वयंपाकाला लागते तुम्हाला डबा दिलाच आहे तो नंतर खाऊन घ्या आणि काळजी घ्या स्वतःची”
पाहता पाहता अख्खा आठवडा संपला आणि राजश्री आणि नेत्रा सर्वे सामान घेऊन मोवर्स अंड पॅकर्स सोबत मुंबई हून पुण्याला पोहोचल्या”अहो दादा जरा सांभाळून त्यात टीव्ही आहे व्यवस्थित न्या””अहो ताई आमचं रोजचं काम आहे आम्ही करू नीट”
“राजश्री त्यांना करू द्या त्यांचा काम तुम्ही बसा दोघी जरा निवांत””अहो तुम्हाला बरं नाही आहे का असे का वाटताय””हो जरा दोन दिवसांपासून पोट बरं नाही आहे”
“हे तर होणारच होतं बाहेरचं खाऊन पोट बीघडायचंच. औषध आणली का.”
“नाही ग अख्ख्या आठवड्यात वेळच नाही झाला आता जातो”
“ठीक आहे तोपर्यंत मी खालच्या काकूंना भेटून येते”
“नको सोड नको जाऊस त्या जरा विचित्रच वाटतात मीही गेलो होतो पण त्या काही बोलत नाही नुसतं पहातच राहतात त्या झाडाच्या फांद्या कापलेल्या त्यांना आवडल्या नाही आहे बहुतेक.”
रात्री जेवायला सगळे सोबतच बसले होते राजश्री ने विचारलं “काय म्हणाले डॉक्टर”
“काही टेस्ट करायला सांगितल्या त्या करूनच आलो रिपोर्ट उद्या येतील”
पहाटे राजश्री तिच्या अंगणात होती. अचानक तिला कसला आवाज आला.तिने मागे फिरून पाहील. मधुकर आणि नेत्रा दोघेही त्या चिंचेच्या झाडाखाली उभे होते. तिची नजर झाडाच्या दुसऱ्या बाजूला गेली तिथे एक काळी आकृती उभी होती. ते झाडावर ुर्‍हाडीने वार करत होते. राजश्री ने हाक मारून मधुकर आणि नेत्राला सावध करण्याचा खूप प्रयत्न केला पण ते दोघेही तिथेच उभे राहिले आणि तिच्या डोळ्यादेखत ते झाड त्यांच्यावर तुटून कोसळू लागलं आणि अचानक तिचे डोळे उघडले.”अगं आई बरी आहेस ना. एवढा घाम का फुटलाय””काही नाही” राजश्री घाम पुसत म्हणाली”बरं मी मॉर्निंग वॉकला जाते आहे””ठीक आहे पण जास्ती लांब नको जाऊ नवीन जागा आहे ना””हो आई चल जाते मी””अगं जाते नाही येते म्हणावं” नेत्रा नुसती मान डोलावत निघून गेलीतासाभराने वॉक करून परत आली तर खाली गेट जवळ मोठमोठ्याने राजश्री आणी सुरेश चा भांडायचा आवाज येत होता. ती पटापट पळत वर गेली आणि जे डोळ्यासमोर दिसलं त्यावर तिचा विश्वासच नव्हता बसत. तिचे शांत स्वभावाचे आई वडील अगदी कुत्र्या मांजरासारखे भांडत होते. तिने मध्ये पडत दोघांना थांबवले. आणि दोघेही काही न घडल्यासारखे पुन्हा आपापल्या कामाला लागले.रात्री पुन्हा जेवणाच्या टेबलवर सगळे एकत्र बसले होते. सुरेश म्हणाले”राजश्री मला माफ कर सकाळी मी उगाचच भांडलो काय माहित हल्ली खूप चिडचिड होते””मलाही माफ करा मीही नको ते बोलले तुम्हाला. अहो रिपोर्ट आले का तुमचे? डॉक्टर कडे जाऊन आलात का पुन्हा?””हो गेलो होतो किडनी वर सूज आहे म्हणाले””हे काय आता आणि कशामुळे” राजश्री जरा काळजीतच म्हणाली”त्यांनी काही औषध दिली आहे आठवडाभर घ्यायचे सांगितले आहेत काही फरक नाही पडला तर पुढे अजून टेस्ट. काळजी नको करू होईल बरं. बरं मला सांग सगळ सामान पाहून घेतलाय ना सगळं नीट आलाय ना.””अहो आपल्या देव्हारातली गणपतीची मूर्ती नाही सापडत आहे””सामानात नीट भरली होतीस ना””हो अहो काय माहित सामान शिफ्ट करताना त्यांच्या ट्रक मध्ये तर नाही राहिली ना.”तसं असेल तर त्यांना सापडल्यावर ते देतीलच परत तरी मी गोष्ट करून ठेवतो”
पण त्यांना कुठे माहिती होतं ही त्यांच्यावरच्या संकटांची ही फक्त सुरुवात होती पुढे नियतीने त्यांच्या वाटेला काय मांडून ठेवले होते त्याची त्यांना कल्पनाही नव्हती.

सकाळी सुरेश आणि राजश्री डायनिंग टेबलवर चहा नाश्ता करत बसले होते. एवढ्यात नेत्रा मॉर्निंग वॉक वरून पळत पळत घरात आली “आई बाबा ह्या खिडकीत बघितलं का तुम्ही चिंचेच्या फांद्या पुन्हा आत मध्ये आले आहेत.””अगं असं कसं होईल अजून तीन चार दिवस झाले आहेत मला ते फांद्या कापवून””तुम्ही चला बाबा तिथे पाहून घ्या माझं खालूनच लक्ष गेलं. हे नॉर्मल आहे का झाडाच्या फांद्या इतक्या पटकन वाढतात का””अहो माझा ऐकाल का मला हे सगळं काही बरोबर वाटत नाही आहे इथे आलो आहोत तेव्हापासून काहीच चांगलं घडत नाही आहे””अगं अजून दोन तीनच दिवस झाले आहे तुम्हाला इथे येऊन. इतक्यातच उगीच काही ही निष्कर्षावर येऊ नको””अहो पण घरातले देव नाही सापडणं, तुमचा आजारपण आणि ते स्वप्न…””कुठल स्वप्न?””नाही काही नाही. तुमची सकाळची औषधे घेतली का?” राजश्री विषय पालटत म्हणाली.”हो घेतली. आज ऑफिसला नाही जात पण जरा बरं नाही वाटत आहे. आणि घरीच आहे तर त्या झाड कापणार्याला ही परत बोलावून घेतो”रात्री राजश्री दिवसभराच्या सगळ्या घटना आठवत निवांत बेडवर पडली होती खिडकी बाहेरून चिंचेच्या झाडा मागून स्ट्रीट लाईट चा हलका प्रकाश येत होता. तिच सहज लक्ष त्या झाडाच्या वाऱ्यावर झुलणाऱ्या पानांवर गेलं पण तिथे त्या पान शिवाय ही काही वेगळीच हालचाल जाणवत होती. तिने अजून निर्खून पाहण्याचा प्रयत्न केला. एखादी मांजर झाडावर दुबकून बसली असेल असे भासत होते. पण बघता बघता त्याचा आकार वाढू लागला. एखाद्या माकडासारखी आकृती वाटत होती पण काही क्षणातच ती आकृती अजून स्पष्ट होऊ लागली. ती मनुष्य आकृती होती. त्याने अलगद हात वर उचलून राजेश्री ला स्वतःजवळ बोलावण्याचा इशारा करायची सुरुवात केली. त्याचा चेहरा स्पष्ट पाहण्यासाठी राजश्री उठून खिडकीजवळ गेली आणि त्या दिशेनं मोबाईलचा टोर्च लाइट मारू लागली. त्याच्या चेहऱ्यावर प्रकाश पडताच राजश्री च्या तोंडून काळीज पिळवटून टाकणारी किंकाळी बाहेर पडली तो सुरेश चा चेहरा होता संपूर्ण रक्ताने माखलेला लालबुंद डोळे ठीक ठिकाणी जखमा होत्या. ते दृश्य पाहून तिचं किंचाळणं सुरूच होतं. तेवढ्यात मागून सुरेशने उठून तिला सावरलं. सुरेश ला पाहून तिला जरा हायसं वाटलं पण तिच्या तोंडून भीतीने काही शब्दच फुटत नव्हते.उरलेली रात्र त्यांनी कशीबशी घालवली. पहाटे उठून सुरेश दूध आणायला बाहेर पडले. अंगणातून बाहेर पडले होते एवढ्यात बाजूला राहणाऱ्या जोशी काकांनी त्यांना अडवले “काय म्हणता सुरेश राव तब्येत पाणी बर आहे ना” सुरेश त्यांना मान डोलावून एक स्माईल देऊन पुढे निघाले.”अहो थांबा” काकांनी पुन्हा अडवले “तुमच्याशी जरा बोलायचं आहे. तुम्ही इथे राहिला आलात तेव्हापासून बोलू बोलू म्हणत होतो पण योग्य आहे की नाही ते कळलं नाही. पण काल रात्री तुमच्याकडून जोरात किंचाळण्याचा आवाज रात्री आला मग आज रहावलं नाही म्हणून सांगतो. ह्या घरात भाड्याने येऊन राहणारे लोक जास्ती काळ टिकत नाहीत. काहीना काही वाईट घटना घडतच राहतात. काही वर्षांआधी ह्या घरात खाली राहणाऱ्या काकू, काका आणि त्यांचा तरुण मुलगा राहायचे. मग अचानक एक दिवशी आजारपणाने त्यांचा तरुण मुलगा वारला पाठोपाठ काका वारले त्यामुळे त्या दोघांच्या अंत्यविधी काही योग्य रीतीने झाल्या नाही. पण त्या घटनेनंतर काकू एकट्याच राहिल्याने ते त्या चिंचेच्या झाडाची खूपच काळजी घेऊ लागल्या कधी कधी तर त्या काकू झाडा सोबत बोलतानाही दिसल्या आहेत.इथे काही लोक म्हणतात की त्यांनी त्यांच्या मुलाच्या असथ्या त्या चिंचेच्या झाडाखाली मातीमध्ये दाटल्या आहेत. आता हे कितपत खरं किंवा खोटं ते माहीत नाही पण त्यानंतर त्यांनी वरचा मजला भाड्याने द्यायचा सुरू केला आणि सगळ्याच भाडेकरूंना काही न काही वाईट अनुभव येत राहतात ईथे.”————————————————————–जोशी काकांच्या सांगितलेल्या वस्तूंचा विचार करत करत सुरेश दूध आणि पेपर घेऊन घरी आले. ह्या वस्तूंवर विश्वास ठेवायचा की नाही हे त्यांना समजत नव्हतं. ते असेच सुन्न मनाने येऊन डायनिंग टेबलवर बसले.”अहो” राजश्री टेबलवर सुरेश चा फोन ठेवत म्हणाली “तुमच्या जुन्या ब्रांच मधल्या मित्राचा, म्हणजे शिरीष दादांचा कॉल आला होता तुमच्या मोबाईलवर. तुम्हाला कॉल बॅक करायला सांगितले”
सुरेश नी पटकन फोन उचलून शिरीष दादांना कॉल लावला”अरे काय सुरेश पुण्याला गेलास तर आम्हाला विसरलास वाटतं””अरे नाही असं नाही इथल्या व्यापां मध्ये जरा गुंतलो होतो. तू सांग काय म्हणतोस””मी काय म्हणणार. आईच कालपासून तुझी खुप आठवण काढते आहे धर तिच्याशीच बोल. घे आई सुरेश चा फोन आहे” शिरीष दादा त्यांच्या आईजवळ फोन देत म्हणाले”कसा आहेस बाळ. तब्येत कशी आहे औषधे वेळेवर घेतोय ना””हो काकू घेतो आहे…. औषध? तुम्हाला कसं कळलं””तुला काय वाटलं तू मला सांगितलं नाही तर मला समजणार नाही?””अरे हो काकू विसरलोच होतो””पण नुसता एवढच नाही अजूनही खूप काही समजलं आहे. काल स्वामी आले होते स्वप्नात. तुझ्या कुटुंबावर खूप भयानक संकट ओढावले आहे. तुम्ही तिथून लवकरच बाहेर पडायची गरज आहे””कुठून काकू?”एवढा म्हणतात सुरेश न राजश्री ला जवळ बोलावून फोन स्पीकरवर केला”ज्या घरात राहतात आहात ती वास्तू चांगली नाही आहे. तिथे अंगणात एक झाड आहे. त्यावर काही काळ्या सावल्यांचा वास आहे. तुमच्या सोबत ज्या वाईट वस्तु घडतात आहेत, किंवा जे वाईट अनुभव येतात आहेत त्याला तेच कारण आहे. तुमच्याकडून ही नकळत देवाचा काही अपराध झाला आहे.””म्हणजे?””म्हणजे मी सांगेन तेवढं नीट ऐका आणि तसंच करा. आज गुरुवार आहे जवळच्या दत्ताच्या देवळात तिघेजण जाऊन अंगारा घेऊन या तो रोज लावत राहा आणि लवकरच दुसरी जागा शोधा ह्या शनिवारच्या आधी त्या घराबाहेर पडा. काहीतरी अभद्र घडण्याचे संकेत येत आहेत मला. सांगितलं तेवढं नीट करा आणि देवाचा धावा करत राहा. काळजी घ्या”
त्यांनीही जास्ती वेळ न दवडता लगेच गाडी काढली आणि जवळच्या दत्त मंदिरात जाऊन अंगारा आणला. गाडीतून परत घरी येताना सगळे गप्प होते. इतक सगळं काही घडत होतं आणि तेही विश्वास ठेवण्याच्या पलीकडले.”अहो”राजश्री गाडीतली शांतता भंग करत म्हणाली”आता दोन दिवसात नवी जागा कुठून मिळवायची””तू काळजी नको करू मी बघतो काही. क्वार्टर्समध्ये काही जागा रिकामी आहे का त्याची तपास करतो. आत्ताच फोन लावतो थांब””अहो नको चालू गाडीत…” राजश्री च एवढं वाक्य पूर्ण व्हायच्या आतच समोरून दुसऱ्या गाडीने येऊन यांच्या गाडीला जोरात टक्कर मारली. तिघांनाही सीट बेल्ट लावले असल्याकारणाने काही मोठे नुकसान नाही झाले. तिघांनाही जोरात धक्का बसल्यामुळे जरा जरा खरचटलं. गाडीचे मात्र बरंच नुकसान झालं. टो ट्रक बोलवून गाडी रिपेअर ला पाठवली आणि रस्त्यावर ऍक्सीडेन्ट झाल्यामुळे पोलिसांच्या कार्यवाहीत अडकले ते वेगळं. गाडीची अवस्था खराब झाल्याने त्यांना इथे तिथे फिरून भाड्यावर दुसऱ्या जागा शोधणं अजूनच अवघड झाला. पण क्वार्टर्समध्ये जागा मिळाली. त्यांनी लगेच दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी मोवर्स अंड पॅकर्स ना बोलवलं शिफ्टिंग करायला. पण आजची काळ रात्र कशीबशी घालवायची होती. रात्री जेवायलाच बसले होते एवढ्यात डोअरबेल वाजली. नेत्राने दार उघडलं तर खालचा काकू होत्या. हातातलं भांडण नेत्राला देत त्या म्हणाल्या “खीर केली होती, म्हटलं तुम्हालाही द्यावी माझ्या मुलाची खूप आवडीची होती. आज त्याच श्राद्ध आहे त्यासाठी केली होती तिघेजण खाऊन घ्या.”एवढ म्हणून एक मार्मिक हास्य करत त्या निघून गेल्या. नेत्राने आत येऊन आई बाबांना सगळं सांगितलं.”फेकून दे ती खीर”राजश्री रागवत म्हणाली”अगं हळू बोल त्यांना ऐकू येईल खाली. किचन मध्ये ठेव ते भांड उद्या गाय कुत्र्याला खाऊ घालू”रात्री पाणी प्यायला राजश्री उठली आणि बेडरूम मधून डायनिंग टेबल पर्यंत आली. बाहेरून येणाऱ्या स्ट्रीट लाईट च्या प्रकाशात डोळ्यासमोर च दृश्य पाहून तिच्या काळजात धस्स झालं. ते खिरीच भांड डायनिंग टेबल वर होतं आणि खिडकीतून चिंचेच्या झाडाच्या फांद्या आत येऊन त्या खिरीच्या भांड्यात जात होत्या. तिने पटकन जाऊन रूमचा लाईट लावला. रूममध्ये उजेड होताच दृष्टीआड असलेलेही स्पष्ट दिसले. झाडाची दुसरी एक फांदी खिडकीतून आत येऊन नेत्राच्या गळ्याचा घट्ट वेळखा घेऊन होती आणि नेत्रा जमिनीवर तडफडत होती. राजेश्री ने जोर जोरात ओरडून सुरेश का बोलावले आणि पटकन जाऊन नेत्राच्या गळफास सोडवू लागले. सुरेश नेही पटकन येऊन डोळ्या समोरचं दृश्य पाहता हातोडी घेऊन त्या फांदीवर वार करायचे सुरू केले आणि ती फांदी तोडून टाकले. उरलेली रात्र ते तिघेही जण एकत्र बसूनच राहिले देवाचं नाव घेत. पहाटे लवकरच मोवर्स अंड पॅकर्स ची माणसं आले आणि पटापट सारे सामान पॅक करून ट्रक मध्ये भरले.”सर एकदा एक नजर मारून घ्या सगळ्या सामानावर आणि घरातही पाहून घ्या कुठे काही राहिले तर नाही आहे ना तुमचे म्हणजे आम्ही ट्रक सुरू करू””अहो माळे खास पाहून घ्या अजून येऊन एकच आठवडा झाला आहे त्यामुळे काही सामान माळ्यावर तसेच पडले होते”सुरेशने घरात जाऊन सगळे कानेकोपरे निरखून घेतले. मग किचन च्या प्लॅटफॉर्मवर चढून किचनच्या माळ्यावर एक नजर फिरवली. माळ्याच्या एका कोन्यात त्याला काही चमकणार दिसल. मोबाईलचा टॉर्च मारला तेव्हा धक्काच बसला त्यांच्या देवघरातली गणपतीची मूर्ती तिथे माळ्यावर धुळीत पडली होती सामान इथे आणलं तेव्हा काही पेट्या न बघता कामगारांनी माळ्यावर अशाच उडवून दिल्या होत्या बहुतेक त्यातूनच ही मूर्ती बाहेर पडली असावी. आता सुरेश च्या लक्षात आलं की देवाचा काय अपराध घडला होता त्यांच्या हातून. त्याने पटकन ती मूर्ती खाली काढली आणि देवाची क्षमा मागितली.मूर्ती स्वतःजवळ घेऊन दाराला लोक लावून चावी खालती काकूंना दिली.”इतक्या लवकर निघाला तुम्ही? तुम्ही इथे राहत होतात तर बरे वाटत होते आमचे एकटेपण दूर झाले होते” काकू म्हणाल्या”आमचे?”सुरेश ने विचारले”तुम्ही तर एकट्याच राहतात ना काकू ईथे”काकूंनी पुन्हा एक मार्मिक हास्य करत त्या चिंचेच्या झाडा समोर पाहिले.सुरेश ही पुढे काही न बोलता गणपतीची मूर्ती घेऊन बोलावलेल्या टॅक्सीत बसला. “अहो ही मूर्ती कुठून सापडली?””देव जरा रुसले होते आपल्यावर. पण आता देवांचा असा काही अपराध होऊ नाही देणार मी आपल्याकडून. आता हे घर सोडतो आहोत तिथूनच त्यांनी आपल्याला माफ करून आपल्याला आशीर्वाद दिला आहे असे समज”

Leave a Reply