माझं गाव गूढ कथांसाठी अगदी आजही प्रसिद्ध आहे. तश्या सांगायला खूप काही गोष्टी आहेत पण एक अख्यायिका आहे ती एका गर्भवती बाईची. मला नेमका काळ माहित नाही पण कदाचित 1960-70 च्या दशकापासून ही गोष्ट सांगितली जाते असे माझ्या आजोबांनी सांगितले होते. गावातल्या विलासभाऊची सून रमाबाई गर्भवती असताना तिचा पती अचानक एका भीषण अपघातात मरण पावला. पतीच्या अकस्मात मृत्यूने ती पूर्णपणे हादरली आणि मानसिक संतुलन गमावून बसली. शेवटी, गर्भारपणातच रमाबाईचंही निधन झालं. तेव्हा पासून असं म्हटलं जातं कि ती अगदी आजही गावात दिसते. मी आणि माझे इतर मित्र ही या सगळ्या गोष्टी भाकडकथा मानायचो. पण मला हे ही माहित होत कि विषाची परीक्षा घ्यायची नसते.

आश्याच एके दिवशी विषय निघाला आणि माझ्या मित्रानी या गोष्टी कितपत खऱ्या आहेत ते शोधून काढायचे ठरवले. मी मात्र त्यांना सरळ नकार कळवला आणि सांगितले कि या गोष्टी उकरून काढण्यात मला काडीचा ही रस नाही. पण ते त्यांच्या मतांवार ठाम राहिले. त्यांनी रात्र निवडली ती अमावस्येची. रात्री 12 नंतर ते सगळे गावातल्या सामसूम रस्त्यांवर फिरू लागले. पण संपूर्ण रात्र जागूनही त्यांना काहीच जाणवले नाही. त्यांनी मला येउन सांगितले कि असे काही नाहीये, आपण इतके वर्ष ऐकत आलेल्या गोष्टी फक्त दंतकथा आहेत. मी ही तो विषय नंतर सोडून दिला. काही महिने उलटले आणि मला ही या गोष्टीचा विसर पडला. 

एके दिवशी आम्ही सगळे मित्र वडाच्या पारावर रात्री गप्पा करत बसलो होतो. अकरा साडे अकरा झाले असावेत. तितक्यात आमचा केतन नावाचा एक मित्र धावत आला आणि जवळ जवळ कोसळलाच. त्याला धाप लागली होती आणि त्याच्या तोंडातून शब्दच फुटत नव्हते. आम्ही त्याला शांत करत विचारू लागलो कि काय झाले. पण तो इतका घाबरला होता कि तो काय बोलतोय तेच आम्हाला कळतं नव्हते. त्याच्या बोलण्यात आमच्या एका मित्राचे नाव आले तसे मी त्याला विचारले “ अमित च नाव घेतलंस तू.. त्याला काही झालय कां..?” त्यावर तो हो म्हणत रडू लागला. मी त्याला शांत केल आणि म्हणालो कि तू जिथे होतास तिथे आम्हाला घेऊन चल. तसे त्याने हो म्हंटले आणि आम्ही चालायला सुरुवात केली. बऱ्याच वेळेच्या पायपिटी नंतर आम्ही गावाच्या शेजारी असलेल्या ओढ्याच्या पुलावर येउन पोहोचलो.

त्या मित्राने एके दिशाला इशारा करून आम्हाला तिथे पाहायला सांगितले. आणि मला जाणवले कि तिथे दोन व्यक्ती आहेत. मी नीट निरखून पाहिले तेव्हा कळले कि एक बाई मांडी घालून बसली आहे आणि तिच्या समोर आमचा मित्र अमित बेशुद्धा अवस्थेत पडला आहे. आम्ही कसलाही विचार न करता ओरडतच त्याच्या दिशेने त्याला वाचवायला धावत सुटलो. पण तिथपर्यंत जाण्यासाठी आम्हाला ओढा ओलांडून, काही झाडी झुडुपातून जायचं होत. आम्ही सगळेच जोरात धावत सुटलो. जेव्हा तिथे येउन पोहोचलो तेव्हा तिथे फक्त अमित होता दुसरं कोणीही नाही. आम्ही त्याला उचलून त्याच्या घरी घेऊन गेलो. काही वेळानंतर तो शुद्धीवर आला आणि त्याने जे आम्हाला सांगितले ते ऐकून आम्ही अगदी सुन्न च झालो.

तो म्हणाला कि मी आणि केतन ओढ्यावरून चालत येत असताना मला कोणाच्या तरी रडण्याचा आवाज ऐकू आला. मी केतन ला म्हणालो कि मी खाली उतरून बघतो कुठून आवाज येतोय. मी खाली येउन पाहिले तर एक गरोदर बाई तिथे झाडीत उभी राहून हमसून रडत होती. मी तिला विचारले कि काय झाले, तुम्ही कां रडताय.. तुम्हाला काही मदत हवी आहे कां..? तिने बोलायला तोंड उघडले आणि बोलण्या ऐवजी एक वेगळाच आवाज करू लागली. आणि त्या नंतर च मला काही आठवत नाही. डोळे उघडले ते थेट इथे घरात. आम्हाला कळून चुकले होते कि अमित सोबत नक्की काय झालं होत. 

Leave a Reply