अनुभव – कुणाल सपकाळे

अनुभव जवळपास १०-१२ वर्षांपूर्वीचा आहे. जो माझ्या वडिलांसोबत घडला होता. ते पेशाने एक ट्रक ड्रायव्हर आहेत. त्या काळी ते ड्रायव्हर म्हणून नवीनच होते. आता ट्रक ड्रायव्हर म्हंटले की रात्री अपरात्री चा प्रवास आलाच. ते एकदा असेच समान पोहोचवायला ट्रीप वर गेले होते. एका मोठ्या शेतकऱ्याच्या शेतातून केळी ची बाग उतरविण्याचे काम होते. तसे ते एकटेच गेले होते आणि तिथले मजूर त्यांच्या मदतीला येणार होते. काम आटो पायला बराच वेळ लागणार होता. शेत देखील गावापासून दूर जंगल पट्टीच्या भागात होते. रस्ता चांगला असल्याने ट्रक शेता पर्यंत सहज गेला. दिवसभर काम सुरू होते आणि हळु हळू अंधार पडायला सुरुवात झाली. सगळे मजूर आणलेल्या ट्रॅक्टर ने निघून गेले. माझे वडील देखील जायची तयारी करू लागले. ट्रक ला ताडपत्री बांधून त्यांच्या मागोमाग निघाले. पण ट्रॅक्टर मधून च वळून दुसऱ्या रस्त्याला लागले जिथून ट्रक जाऊ शकत नव्हता. रस्त्याच्या दुतर्फा केळीच्या हिरव्यागार बागा होत्या. त्यामुळे परिसरात गारवा जाणवत होता. वडिलांनी ट्रॅक मधला रेडिओ सुरू केला तसे एक जुने गाणे ऐकू येऊ लागले. तेच गुणगुणत ते ट्रक चालवत होते. वेग अगदीच कमी होता. 

तितक्यात वातावरणात वेगळीच शांतता पसरली. तसे बाजूच्या शेतातून त्यांना कसलीशी सळसळ जाणवली. जसे एखादे जनावर असावे. त्यांनी ट्रक चा वेग अगदी कमी केला. कारण धावत ते वाटेत आले तर चाका खाली येईल आणि आपल्याला काही करता नाही येणार. तितक्यात डोळ्यांचे पाते लवते ना लवते एक उंच धिप्पाड शरीर यष्टीचा माणूस त्या शेतातून बाहेर आला आणि ट्रक लाईट त्याच्यावर पडला. खर तर तो माणूस नव्हता ते काही तरी भयानक च होत. कारण त्याला मुंडकं च नव्हतं. त्याच धड फक्त जोरात इथून तिथे धावत होत. वडील किती ही घाबरले असले तरीही त्यांनी स्वतःवरच नियंत्रण गमावलं नाही. देवाचे नाव घेत त्यांनी ट्रक चा वेग वाढवला आणि कसे बसे त्याच्या अगदी बाजूने ट्रक जोरात पुढे नेला. त्यांच्या हृदयाचे ठोके वाढले होते. थरथरत्या नजरेने त्यांनी मागे पाहिले असता ते जे काही होत ते विचित्र आवाज करत ट्रक च्या मागे धावत सुटल होत. त्यांनी देवाचा धावा सुरू केला आणि ट्रक चा वेग अजुन वाढवला. पण काही वेळानंतर ते धड अंधारात कुठे तरी नाहीस झालं. बहुतेक त्याची हद्द संपली असावी. ते काही मिनिटात मुख्य रस्त्याला लागले आणि सुटकेचा निःश्वास सोडला.

Leave a Reply