मी राहायला नवी मुंबईत आहे आणि तिथेच नोकरी ही करतो. माझे गाव तसे कोकणातले. त्या दिवशी नेहमी प्रमाणे सकाळी ८ ला जॉब ला जायला निघालो. दुपार ची वेळ होती. मला गावातून फोन आला. भावाचे लग्न ठरले होते आणि तारीख ही जवळ आली होती. त्या बद्दल च सांगायला फोन आला असावा असे समजून फोन उचलला.. ” अरे प्रदीप तुझ्या दडच लग्न जवळ आलंय, पाहुण्यासार खे एक दिवस आधी येणार आहेस का..? सगळे तुझी वाट बघत आहेत.. कधी निघतोय..? ” मी पटकन म्हणालो ” आजच निघतोय.. रात्रीच्या ट्रेन ला बसतोय..” इतकं बोलून मी फोन ठेऊन दिला. खर तर मी आधीच सुट्टी साठी अर्ज केला होता आणि तो आज मंजूर होणार होता. आणि ठरल्या प्रमाणे झाले. संध्याकाळी घाईतच घरी यायला निघालो. घरी येऊन लगेच निघायची तयारी केली आणि घणसोली स्तेशनात आलो. मला एक सवय आहे. कुठे लांबचा प्रवास असेल तर मी वाईन सोबत घेतो. त्यामुळे जाता जाता वाइन शॉप मध्ये वळून वैन घेतली. आणि घाई करतच ठाणे स्टेशनात पोहोचलो. अगदी वेळेत पोहोचलो कारण ट्रेन यायला अवघी ८-१० मिनिट बाकी होती. तसे माझे रिझर्व्हेशन आधीच झाले होते त्यामुळे काही चिंता नव्हती. ७-८ थांबलो असेन प्लॅटफॉर्म वर आणि तितक्यात ट्रेन आली. माझा सीट नंबर ४८ होता मला आज ही लक्षात आहे. सीट शोधून निवांत बसलो आणि समान पायाखाली सरकवले म्हणजे बॅग पायाला लागेल अशीच ठेवली. 

गाडी सुटली. मी तसाच शांत बसून होतो. मन लागत नव्हत. रात्री चे ११ वाजले होते. ट्रेन ने पनवेल स्टेशन क्रॉस केलं होत. मी सीट वरून उठलो आणि सहज म्हणून दरवाज्यात जाऊन बसलो. बाहेर थंडगार वारा सुटला होता जो ट्रेनच्या वेगामुळे अजुन च जाणवत होता. बराच वेळ मी तिथेच उभा होता कारण बर वाटत होत. ट्रेन मध्ये जास्त गर्दी नव्हती आणि जे काही लोक होते ते एव्हाना झोपून गेले होते. मी वेळ पाहिली तर रात्रीचा दीड वाजला होता. काही वेळा नंतर ट्रेन एका सामसूम जागेवर येऊन थांबली आणि क्रॉसिंग सुरू झाले. समोरून जलद ट्रेन पास होणार होती. जी यायला अजून काही मिनिट शिल्लक होती असे वाटले. कारण त्या शांत वातावरणात कसलाही आवाज येत नव्हता. अश्या वेळी ट्रेन जरी बरीच लांब असली तरी तिचा आवाज ऐकू येतो. मी बाहेरचा परिसर न्याहाळत होतो. दूर दूर पर्यंत कोणतीही वस्ती नजरेस पडत नव्हती. वातावरण अगदी शांत होत. तितक्यात अचानक मला रेल्वे ट्रॅक वरून लहान दगडांचा आवाज आला, जसे कोणी त्यावरून धावत आहे. मी झटकन नजर वळवली तर एक बाई बाजूच्या ट्रॅक वरून धावत पुढे जात होती. बहुतेक समोरून येणाऱ्या ट्रेन खाली येऊन ती जीव देणार होती. आजूबाजूच्या डब्यात डोकावून पाहिले पण दरवाज्यात कोणीही नव्हत कारण बहुतेक लोक अगदी गाढ झोपेत होते. शेवटी जास्त विचार न करता तिला वाचवायला म्हणून मी ट्रॅक वर उडी घेतली आणि तिला वाचवायला म्हणून तिच्या मागे गेलो. 

पण मला एक गोष्ट लक्षात यायला वेळ लागला नाही की माझ्या धावण्या च्या वेगापेक्षा ती अती प्रचंड वेगात पळत होती. एके क्षणी तर मला वाटलं की ही नक्की बाईचं आहे ना.. की अजुन काही.. तितक्यात समोरून ट्रेन चा हॉर्न ऐकू आला. ती बाई आणि मी ज्या ट्रॅक वर होतो त्याच ट्रॅक वर भरदाव वेगात एक ट्रेन येत होती. मी ओरडू लागलो आणि तिला भानावर आणायचा, वाचवायचा प्रयत्न करू लागलो. एव्हाना ट्रेन मधले काही लोक उठून बाहेर पाहत होते की हा काय प्रकार चालू आहे. ती ट्रेन तिच्या अगदी जवळ आली तरीही ती बाजूला होत नव्हती. मी मात्र तिला वाचवण्याचा अट्टाहास सोडून बाजूला झालो. ट्रेन जोरात तिला उडवले आणि भरधाव वेगात बाजूने निघूनही गेली. माझ्या ट्रेन मधले सगळे लोक हा प्रकार पाहत होते. मी मात्र धाप लागल्यामुळे तसाच वाकून उभा होतो. तितक्यात एक रेल्वे गार्ड माझ्याकडे धावत आला. बहुतेक माझ्याच ट्रेन मध्ये मागे बसला होता. तो जवळ येऊन बोलू लागला ” अरे वेडा आहेस का तु.. ओरडत त्या ट्रेन च्या दिशेने का धावत गेला होतास..? जीव द्यायचा विचार करत होतास का..?  ” त्यावर मी त्याला म्हणालो की ” मी एका बाईला वाचवायला तिच्या मागे धावत होतो. ” तसे तो माझ्याकडे आश्चर्याने पाहू लागला आणि बोलला ” तू खरंच एका बाई ला पाहिले..? ” मी होकारार्थी मान डोलावली तसे तो पुढे सांगू लागला ” अरे ती बाई नव्हती.. ती जखीण होती.. या भागात तिचा वास आहे.. ती सगळ्यांना दिसत नाही फक्त काही लोक तिला पाहू शकतात.. आज अमावस्या आहे.. ” 

त्याचे बोलणे ऐकून मला काही सुचत नव्हतं. सुन्न होऊन मी पुन्हा ट्रेन मध्ये माझ्या सीट वर जाऊन बसलो. ट्रेन सुरु झाली.देवाच्या कृपेने मी वाचलो होतो नाही तर त्या ट्रेन खाली आलोच असतो. माझ्या मनात असंख्य विचार होते. दुसऱ्या दिवशी सकाळी सुखरूप गावी पोहोचलो. 

Leave a Reply