मी आज पर्यंत भूतां खेतांच्या बऱ्याच गोष्टी ऐकल्या होत्या. पण स्वतःच्या आयुष्यात अशा प्रकारची घटना घडेल, असं कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं. त्या रात्रीची आठवण अजूनही थरारून सोडते. त्या रात्री मी आणि माझा मित्र शशी, दोघंही एकमेकांशी फारसं बोलत नव्हतो. मनातल्या मनात आपण नक्की काय बघितलं याचा विचार करत होतो. घरी आलो तरी डोक्यात फक्त तोच भयानक प्रसंग घोळत होता.. आम्हाला त्या रस्त्यावर रात्री 2 वाजता एक बाई सदृश्य सावली दिसली होती, भयानक गोष्ट ही होती कि तीची उंची तब्बल 8 फूट होती. जे कल्पना शक्तीच्या पलीकडंच दृश्य होत. आम्ही जेव्हा गावात फिरायचो, तेव्हा लोकांमध्येसुद्धा या गोष्टीची चर्चा ऐकायला मिळायची.. “ती बाई पुन्हा दिसली का?” असं विचारणारे अनेक होते. खरं तर आई-बाबांनी सांगितलं होतं की त्या रस्त्यावर काहीतरी विचित्र घडत असतं, अशा ठिकाणी कधीच जाऊ नकोस, रात्रीच्या वेळी तर अजिबात नाही. पण उत्सुकतेपोटी करायला गेलो एक आणि झाले दुसरेच अशी गत झाली होती. मी आणि संग्रामत्यानंतर काही दिवस एकमेकांना भेटलो नाही. दोघेही घाबरलेले होतो, आणि त्या घटनेबद्दल चर्चा करायचीसुद्धा आमची हिंमत होत नव्हती. पण एका दिवशी आम्ही दोघं गावात फेरफटका मारत होतो, तेव्हा अचानक शशीने त्या घटनेचा विषय काढला.
“काय रे, त्या दिवशी आपण नक्की काय बघितलं?” संग्राम ने विचारलं.
मी काहीच उत्तर दिलं नाही, कारण मला खरंच काही समजत नव्हतं. ती बाई खरोखरच होती का? की आपल्याला भास झाला होता? संग्रामपुढे बोलू लागला, “मला असं वाटतंय की आपण तिथं काहीतरी भयंकर बघितलं. पण मला हे पण वाटतंय की जर आपण त्या गोष्टीचं सत्य शोधलं नाही, तर आपल्या मनावर कायमचं हे ओझं राहील.” मी त्याचं बोलणं ऐकून गोंधळलो होतो. पण त्याचं म्हणणं खरं होतं. आपण नेहमीच घाबरून पळून जाऊ शकत नाही. काहीतरी उकलणं गरजेचं होतं. शेवटी मी आणि संग्रामने ठरवलं की त्या गोष्टीचं सत्य शोधायचं. आम्ही गावातल्या काही वृद्ध माणसांकडे जाऊन विचारपूस करायचं ठरवलं. गावातल्या एका ज्येष्ठ व्यक्तीकडे आम्ही गेलो. त्यांचं नाव महादेव काका होतं. महादेव काका खूप अनुभवी आणि जाणकार माणूस होता. त्यांच्या जवळ गेलो तेव्हा ते शांतपणे झाडाखाली बसून काहीतरी वाचत होते. आम्ही त्यांचं लक्ष वेधून घेतलं आणि त्यांना विचारलं, “काका, ती बाई कोण आहे? आणि ती इथं कशी आली?”
महादेव काकांनी शांतपणे आमच्याकडे पाहिलं आणि मग म्हणाले, “ती बाई म्हणजे शांता. तिची गोष्ट फार दुःखद आहे. तिचं लग्न गावातल्या एका माणसाशी झालं होतं, पण तिच्या नवऱ्याने तिला फार त्रास दिला. एके दिवशी ती त्या रस्त्यावरून पळून जायला निघाली होती, पण तिथे अस काही तरी घडलं ज्यामुळे तिथेच त्या रस्त्यावर तिचं निधन झालं. तिच्या मृत्यूचं गूढ अजून उकललेलं नाही. पण तिचा आत्मा अजूनही मुक्त झालेला नाही, असं लोकांचं म्हणणं आहे.” हे ऐकून आम्ही थोडेसे विचारात पडलो. असं खरोखरच असू शकतं का? एका मृतात्म्याची कहाणी इतकी वर्षं तिथं रेंगाळत राहील? आम्ही काकांना विचारलं, “काका, आम्ही काही करू शकतो का? तिचा आत्मा मुक्त होण्यासाठी काही मार्ग आहे का?” महादेव काकांनी काही क्षण शांत राहून विचार केला आणि मग म्हणाले, “आत्म्याची मुक्तता करण्यासाठी प्रार्थना आणि शांतीची भावना गरजेची आहे.
तुम्ही त्या जागी जाऊन तिच्यासाठी प्रार्थना करा, तिला शांततेची विनंती करा. कदाचित तिला मुक्तता मिळू शकेल.” ही गोष्ट ऐकून आम्हाला थोडं धैर्य आलं कारण आम्ही चांगलं काम करण्याचं ठरवलं होत.. दुसऱ्याच दिवशी, आम्ही ठरवलं की त्या रस्त्यावर जाऊन प्रार्थना करायची. शशी आणि मी दोघेही तयारीला लागलो. रात्रीच्या वेळी त्या जागी परत जाणं फार धाडसाचं होतं, पण आमचं धैर्य वाढलेलं होतं. रात्री, आम्ही दोघेच गुपचूप त्या रस्त्यावर गेलो. आता तिथं परत जाणं किती भयंकर होतं, हे सांगायची गरज नव्हती. रस्ता पुन्हा शांत होता, धुक्यात लपलेला. आम्ही तिथं पोहोचलो आणि शांतेसाठी प्रार्थना करू लागलो. तिला शांती मिळावी, तिचा आत्मा मुक्त व्हावा, अशी प्रार्थना करत राहिलो. तितक्यात एक थंड हवेची झुळूक येउन अंगाला स्पर्शून गेली. पण त्या वातावरणात भीती वाटण्याऐवजी एक समाधान वाटल.
एक हलकीशी हुंकार ऐकू आली, जणू तिला शांतता मिळाल्यासारखं वाटत होतं. त्या रात्रीनंतर कधीच ती बाई त्या रस्त्यावर दिसली नाही. गावातल्या लोकांनाही आता तसले अनुभव आले नाहीत. आम्हाला वाटलं की आमची प्रार्थना काही प्रमाणात तिचा आत्मा मुक्त करण्यात यशस्वी झाली असावी. आता जेव्हा कधी त्या रस्त्याच्या जवळून जातो, तेव्हा त्या प्रसंगाची आठवण नक्कीच येते, पण आता ती भीती न राहता एक शांतीचा अनुभव देते. आम्हाला वाटतं की तिला अखेरची मुक्ती मिळाली असावी.