अस म्हणतात की सहा वर्षा खालील मुलाचे जर काही कारणास्तव निधन झाले तर त्याला दफन केले जाते कारण अशी मान्यता आहे कि, लहान मुलांना त्यांच्या शरीराशी मोह नसतो, त्यांच्या तीव्र इच्छा नसतात. पण काही वेळेला लहान मुले लवकर समजूतदार होतात आणि त्यांचा काही इच्छा निर्माण होतात, यामध्ये त्यांची मुंज झाली नसेल आणि त्यांची इच्छा पूर्ण झाली नसेल तर त्यांच्या मृत्यू नंतर त्यांची आत्मा मुंजा या प्रकारात मोडली जाते. मुंजा प्रकार प्रचंड शक्तिशाली असतो असं म्हणतात. तांत्रिक विधी करणारे साधक सांगतात कि मुंजा मंदिरा मध्ये जाऊन ही एखाद्याला झपाटू शकतो, कोणतेही मंत्र उच्चारू शकतो. कारण त्याच्या मध्ये प्रचंड शक्ती असते. एकदा झपाटले की तो मृत्यू पर्यंत पाठ सोडत नाही. कधी कधी त्याची बाधा अगदी पुढच्या पिढी ला ही होते. मुंज्या पासून सुटका मिळवण्यासाठी खूपच कमी तांत्रिक विधी आहेत असे काही जाणकार लोक सांगतात. तर प्रसंग माझ्या मामी च्या आई सोबत घडला होता जेव्हा ती गरोदर होती. तेव्हा जे घडलं ते अगदीच अकल्पनीय होत..
मुंजा.. प्रचलित समजानुसार, भुताचा एक प्रकार. एखाद्या मुलाचा उपनयनापूर्वी मृत्यू झाल्यास म्हणजे त्याची मुंज करण्याची इच्छा अपूर्ण राहिल्यामुळे तो ‘मुंजा’ होतो. मुंजा पिंपळावर राहतो असा समज आहे. अस म्हणतात की सहा वर्षा खालील मुलाचे जर काही कारणास्तव निधन झाले तर त्याला दफन केले जाते कारण अशी मान्यता आहे कि, लहान मुलांना त्यांच्या शरीराशी मोह नसतो, त्यांच्या तीव्र इच्छा नसतात. पण काही वेळेला लहान मुले लवकर समजूतदार होतात आणि त्यांचा काही इच्छा निर्माण होतात, यामध्ये त्यांची मुंज झाली नसेल आणि त्यांची इच्छा पूर्ण झाली नसेल तर त्यांच्या मृत्यू नंतर त्यांची आत्मा मुंजा या प्रकारात मोडली जाते. मुंजा प्रकार प्रचंड शक्तिशाली असतो असं म्हणतात.
कथा आणि तांत्रिक विधी करणारे साधक सांगतात कि मुंजा मंदिरा मध्ये जाऊन ही एखाद्याला झपाटू शकतो, कोणतेही मंत्र उचरू शकतो. कारण त्यांच्या मध्ये प्रचंड शक्ती असते. असे म्हटले जाते की एखाद्या पीडितेने त्याच्या निवासस्थानाला त्रास देण्याचा किंवा अपमान करण्याचा प्रयत्न केला तर मुंजा ला राग येऊ शकतो. मुंजा विशेषत: मुली आणि महिलांना त्रास देतो, अपमानाचा संतापाने बदला घेतो. एकदा झपाटले की तो मृत्यू पर्यंत पाठ सोडत नाही. कधी कधी त्याची बाधा अगदी पुढच्या पिढी ला ही होते. त्याचा राग टाळण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे मुंजाचे लक्ष वेधून घेणारी कोणतीही क्रिया टाळणे. गावकरी पिंपळाच्या झाडाभोवती चबुतरा (किंवा पार ) बांधायचे आणि त्याच्या भोवती पवित्र धागा बांधायचे. अस म्हणतात की गरोदर बायानी नदी किंवा तलावाकडे जाऊ नये, खासकरून मध्यान्ह सुरू असतो तेव्हा..
मुंजा पासून सुटका मिळवणे खूप अवघड असते, मुंज्या पासून सुटका मिळवण्यासाठी खूपच कमी तांत्रिक विधी आहेत असे काही जाणकार लोक सांगतात. हेच दर्शविणारा हा एक अविस्मरणीय भयाण अनुभव.. पण कथेला सुरुवात करण्या आधी महत्त्वाचे.. जर तुम्ही आपल्या चॅनल वर नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा म्हणजे तुम्हाला पुढील येणाऱ्या व्हिडिओज चे नोटी फिकेशन लगेच मिळेल.. तर चला मग टी के च्या अविस्मरणीय भयाण जगात.. हा अनुभव आपल्या चॅनल च्या एका सबस्क्राईब र ने पाठवला असून त्यांनी त्यांचे नाव गुपित ठेवण्याची विनंती केली आहे. घटना बरीच जुनी आहे.. कदाचित ८० किंवा ९० च्या दशकातील. जी माझ्या मामी च्या आई सोबत घडली होती. तेव्हा माझी मामी लहान होती आणि तिची आई दुसऱ्यांदा गरोदर होती. माझी मामी तिच्या आई ला कामात नेहमी मदत करायची.
रोज गावातील तलावावर कपडे धुवायला जायची त्यामुळे तिच्या आई ला तेव्हढे काम कमी व्हायचे. नऊवा महिना लागणार होता. मामी ची परीक्षा ही जवळ आली होती. त्या दिवशी ती शाळेत लवकर गेली आणि तिला कपडे धुवायला जाता आले नाही. म्हणून मग मामी ची आई गावातल्या तलावावर कपडे धुवायला गेल्या. दुपारची वेळ होती. सूर्य अगदी डोक्यावर होता. अश्या वेळी त्या तलावावर गावातले कोणीही यायचे नाही. त्यांनी घरी सुद्धा काहीच सांगितले नाही. गरोदर अवस्थेत त्या तळपत्या उन्हात त्यांनी सगळे कपडे धुतले. थोडी घेरी येऊ लागली म्हणून जाताना जवळच्या एका पिंपळाच्या झाडाखाली त्या काही वेळ बसल्या. कदाचित खूप थकायला झालं असेल म्हणून त्यांना काही क्षण डोळा लागला. बऱ्याच वेळा नंतर जाग आली तसे अंग जड भासू लागले. थकव्यामुळे तसे वाटत असावे असा विचार करून त्या घरी आल्या.
पण घरी आल्यावर अचानक अतिशय विचित्र वागू लागल्या. त्यांचे संपूर्ण हाव भाव, वागणे, बोलणे सगळेच पार बदलून गेले. जेवायला बसल्या तर जेवणाचे ताट ही भिरकावून दिले. स्वतःला मारून घेऊन इजा पोहोचवू लागल्या. विभत्स आवाजात हसू लागल्या. घरातले सगळेच हा प्रकार पाहून बुचकळ्यात पडले. गरोदर असल्यामुळे प्रत्येक हालचाल , कृती येणाऱ्या बाळासाठी धोकादायक होती. घरातल्यांनी तिला पकडुन ठेवलं होत पण त्या त्यांना ही जुमानत नव्हत्या. मग शेजारचे वैगरे असे जवळपास ७-८ त्यांना पकडून होते आणि कसे बसे आटोक्यात आणले. एव्हाना हा प्रकार सगळ्यांना कळून चुकला होता की त्यांना बाहेरची बाधा झाली आहे. एका मांत्रिकाला बोलावण्यात आले. त्या मांत्रिकाने त्यांना पाहता क्षणीच म्हंटले की यांना मुंजा ने झपाटलय आणि तो सहजा सहजी यांना सोडणार नाही. कारण त्याला आता नवीन शरीर हवंय.
पण मी सगळे उपाय करून पाहीन. असे म्हणून त्यांनी मंत्र उच्चारण सुरू केलं. तसे हळु हळू त्यांच्या अंगातील मुंजा उग्र होऊ लागला. त्यांना जोरात खाली जमिनीवर आपटले तसे त्यांना प्रसूती कळा सुरू झाल्या. त्या मांत्रिकाने कसे बसे त्या मुंजा ला काही वेळा साठी शांत केले. घरातल्या स्त्रियांनी पटकन त्यांना आत नेले आणि तिथेच घरात त्यांची प्रसूती झाली. त्यांनी एका गोंडस मिळाला जन्म दिला. पण एक अतिशय वाईट घटना घडली. बाळाला जन्म देत असताना मामीच्या आईनी जीव सोडला. पूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. सगळ्यांना वाटलं की त्या मुंज्याने त्यांचा बळी घेतला पण हे सगळं इतक्यावरच थांबणार नव्हत. कारण तो मुंजा अजुन त्यांची पाठ सोडणार नव्हता. त्यांचं दिवस कार्य झालं. नंतर काही दिवसांनी बाळाचं बारस करण्यात आलं. बाळाचं नाव राजेश ठेवलं गेलं.
काही दिवस उलटले. मामी च्या वडिलांनी दुसरे लग्न केले. कारण किती ही झाले तरी दोन मुले, त्यांचा सांभाळ आणि किती ही म्हंटले तरी आयुष्यात सोबती हा लागतोच. राजेश जस जसा मोठा होत होता तस तसे त्याच्या वागण्यात बदल होत होता. चांगल्यासाठी नाही तर वाईटाच्या दिशेने. इतर मुलांच्या तुलनेत त्याचे वागणे खूप च वेगळे होते. कारण तो वेडसर वागू लागला होता. त्याच्या या अश्या वागण्यामुळे त्याला मानसिक रोग तंद्यांकडे नेण्यात आले. त्याची तपासणी झाली. अगदीच साधारण मानसिक आजार जसे विसरभोळे पणा, द्विधा मनस्थिती, फोबिया, इत्यादी सांगण्यात आले. पण त्याचे मूळ कारण काही वेगळेच होते. जसजसे वय वाढत होते तसतसे त्याचा वेडसर पणा वाढू लागला. त्या मुळेच राजेश कधीच शाळेत जाऊ शकला नाही. घरी कोणतेही सण, उत्सव, धार्मिक कार्यक्रम, मंगल कार्य व्हायचे तेव्हाच राजेश च्या वागण्यात लक्षणीय बदल व्हायचा. तो अगदी वेड्या सारखे वागायचा. अश्याच एके दिवशी घरी पूजा होती.
राजेश नेहमी प्रमाणे वेड्या सारखे करू लागला. फरक फक्त इतकाच होता की त्या दिवशी कोणालाच जुमानत नव्हता. आदळ आपट करू लागला, ओरडू लागला. तेव्हा डॉक्टरांना बोलावण्यात आले. त्याच्यावर उपचार करण्यात आले पण त्याचा काहीच फरक पडला नाही. त्यावेळी पूजा करायला आलेल्या भटजी ने एका बाहेरचे बघणाऱ्या व्यक्ती चे नाव सुचवले. त्यांना बहुतेक कळले होते की हा प्रकार वेगळा दिसतोय. मग त्या बाहेरचे बघणाऱ्या माणसाला बोलावण्यात आले. काही वेळानंतर तो व्यक्ती आला. घरात पाय ठेवल्या ठेवल्या त्याने राजेश कडे पाहिले आणि म्हणाला “ या मुंज्या ने झपाटलेय आणि तो याला कधीच सोडणार नाही. तो मुंजा याला संपवून टाकेल, जीव घेईल आणि मग च त्याला सोडेल.
त्या व्यक्तीचा शब्द ना शब्द खरा ठरला. राजेश शेवटच्या श्वासापर्यंत असाच वेड्या सारखा वागत राहिला. तो मरण पावला. राजेश च्या मृत्यू नंतर मुंज्या ने त्याच शरीर सोडलं पण ते घर नाही. कालांतराने माझ्या मामीच्या दुसऱ्या आई ला ४ वर्षात दोन मुलं झाली. ती दोघं ही मोठी झाल्यावर त्यांची लग्न झाली पण या सगळ्या काळात ती मुंज्या आपले अस्तित्व दाखवत राहिला. घरात रात्री अपरात्री दिसायचा. विशेष म्हणजे तो मामी च्या दोन्ही भावजयी ना तो दिसत होता. जेव्हा मांत्रिकाला या बद्दल विचारले तेव्हा तो मांत्रिक म्हणाला की या दोघी सूनबाईंना दोघेही भाऊ जिथे काम करतात तिथे पाठवून द्या. त्या मुंजा ला आता नवीन शरीर हवंय म्हणून या दोघींपैकी कोणीतरी एक गरोदर होण्याची वाट बघत आहे तो. आणि अजून एक महत्वाचे म्हणजे राजेश च पिंड दान करून घ्या. घरच्यांनी सांगितल्या प्रमाणे उपाय केला. त्या दोन्ही सूनबाईंना दोन्ही भावांसोबत पाठवून दिले आणि राजेश च व त्या मुंजा च पिंड दान करण्यात आलं. राजेश चे कपड्यांपासून त्याच्या फोटो पर्यंत सर्व वस्तू त्याच्या सगळ्या आठवणी नदीत वाहून देण्यात आल्या. त्या मुंज्या ने तब्बल दोन पिढ्यांना त्रास दिला. पण भगवंताची कृपा हे सगळे कुठे तरी येऊन कायमचे थांबले. आता या काळात संपूर्ण कुटुंबाला त्या मुंजा चा काहीच त्रास नाहीये..