अनुभव – राजीव सावंत

मी नवी मुंबईत वास्तव्यास आहे. एका चार मजली बिल्डिंग मध्ये तळ मजल्यावर माझा फ्लॅट आहे. प्रसंग आहे १२ जून २०२३ चा. माझ्या आई चा वाढदिवस होता. त्यामुळे संध्याकाळी आम्ही घरातच छोट सेलिब्रेशन करायचं ठरवलं. केक आणि हॉटेल मधले जेवण ऑर्डर करून आई ला सर प्राइज् दिलं. आई आणि आम्ही सगळेच खूप खुश होतो. सगळे आटोपून झोपायला रात्री चे १२ वाजले. उन्हाळा सुरू असल्याने घरात खूप च उकडायचे, सहन व्हायचे नाही. म्हणून मग आम्ही घराचं दार अर्ध उघडं ठेऊन झोपायचो. त्या दिवशी ही नेहमी प्रमाणे घराचे दार अर्धे उघडे ठेवले आणि मी झोपी गेलो. रात्री साधारण २ वाजता मी वॉश रूम ला जायला उठलो. घरातले सगळे अगदी गाढ झोपले होते. वॉश रूम मधून बाहेर आल्यावर मी किचन मध्ये फ्रिज कडे गेलो कारण थोडा केक शिल्लक राहिला होता.

तो फ्रिज मधून काढला आणि खात खात दाराजवळ आलो. अर्ध्या उघड्या दाराजवळ उभा राहून मी सहज बाहेर पाहत होतो. माझ्या घराजवळच्या भिंती ला लागून खाली उतरण्यासाठी जिना आहे आणि तिथे एक जाड लोखंडी गेट आहे. तेवढ्यात दारासमोरून सर्रकन एक सावली वेगाने धावत गेली आणि त्या गेट चा जोरात आपटण्याचा आवाज आला. तो आवाज ही असाधारण होता कारण मी आजवर तो गेट इतक्या जोरात आपटण्याचा आवाज कधीच ऐकला नव्हता. धावत जाऊन गेट कडे गेलो पण तिथे कोणीही नव्हते. मला वाटलं की कोणी तरी घाईत खाली गेलं असेल म्हणून की बिल्डिंग च्या मन गेट जवळ गेलो म्हणजे तिथून मला दिसेल कोण जातंय ते. मी बाहेर च्या बाजूला पहिले तर रस्ता अगदी निर्मनुष्य. पण पण गेट चा आवाज.. 

शेवटी वाऱ्याने आपटला असेल असा विचार करत असताना माझे लक्ष बाजूच्या झाडावर गेलं. पण झाडाचं एकही पान हलत नव्हत. कारण तिथे अजिबात वारा वाहत नव्हता. आणि इतक्या रात्री उन्हाळ्याच्या दिवसात जोरात गेट आपटण्यासाठी हवा येणं ही शक्य नव्हत. एव्हाना खात्री पटली होती की हा प्रकार काही तरी वेगळा आहे. जसं भासतय त्याहून हे भयानक आहे. या गोष्टी ची जाणिव होताच मी धावत घरात शिरलो आणि दार बंद केलं. वेळ पाहिली तर सव्वा दोन झाले होते. घडलेला प्रसंग डोक्यातून जातच नव्हता. सव्वा दोन चे चार कधी वाजले कळलेच नाही. २ तास मी जागाच होतो. पण या वेळेत त्या गेट चा पुन्हा आवाज आला नाही. जर वाऱ्यामुळे गेट आपटला गेला होता तर पुन्हा निदान एकदा तरी तसे व्हायला पाहिजे होते. घडलेल्या प्रसंगावरून मला नेहमी असं वाटतं राहत की मी त्या रात्री जे काही अनुभवलं जे काही पाहिलं ते नक्कीच साधं नव्हत. कदाचित मी एका अमानवीय शक्ती चा अनुभव घेतला होता..

Leave a Reply