घटना साधारणतः १० वर्षा पूर्वीची आहे. मी दर वर्षी प्रमाणे या वर्षी हि मावशी च्या गावाला आलेलो. मला २ मावश्या आहेत आणि दोघीही त्याच गावात राहतात. एकीचे छोटे अपार्टमेंट होते. आणि त्या मध्ये फक्त ४ घरे होती. गच्ची वर एक मोठी खोली होती. त्या खोलीचा वापर तो स्टोअर रूम म्हणून करायची. तिथे एक संगणक की होता. गावात तेव्हा माझे काही जास्त मात्र नव्हते म्हणून मग मी त्या खोलीत जाऊन संगणकावर त्या रूम मध्ये १ कॉम्पुटर देखील होते. साधारणतः त्या रूम चा वापर आत्या स्टोअर रूम म्हणून करायची. आत्याच्या गावी माझे मित्र नसल्या मुळे मी दिवस भर कॉम्पुटर वर गेम्स खेळत बसायचो. संगणक एका टेबल वर होता आणि त्याच्या मागे एक मोठा आरसा होता. रोज रात्री जेवण झाले की मी वर गच्ची वर जायचो. त्या रात्री ही मी खोलीत गेलो, संगणक सुरू केला आणि मस्त गेम खेळत बसलो. खोलीचा दरवाजा उघडाच होता. तितक्यात मागून कसलीशी चाहूल जाणवली आणि नकळत मागच्या आरशात लक्ष गेलं. त्या आरशात मला एका बाईचा चेहरा दिसला. मी झटकन पुढे पाहिले कारण जर ती बाई आरश्यात दिसली म्हणजे ती माझ्या पुढे उभी असणार. पण माझ्या समोर कोणीही नव्हते.
तिचा चेहरा खूप विद्रूप होता. मला वाटले की एकटा असल्यामुळे मला भास झाला. नंतर जाणवले की कदाचित गच्चीवर वाळत टाकलेल्या कपड्यांचे प्रतिबिंब अंधारात तसे जाणवले असावे. म्हणून मी त्याकडे दुर्लक्ष केले. २ दिवस असेच उलटले. पुन्हा एके रात्री मला अगदी तसाच भास झाला. या वेळेस मात्र मी खरंच घाबरलो. कारण ती बाई मला बराच वेळ आरश्यात दिसत होती. मी हिम्मत करून तिला निरखून पाहत होतो. लाल रंगाची साडी, डोक्यावर पदर आणि डोळे.. डोळे नव्हतेच तिला.. डोळ्याच्या जागी फक्त रिकामी जागा होती. जणू त्यातून आरपार दिसेल. मी हे सगळे पाहत असतानाच त्या खोलीची खिडकी जोरजोरात वाजू लागली. जसे की बाहेरून कोणीतरी त्यावर हात मारत आहे. मी घाबरून काय घडतंय याचा विचार करत होतो तितक्यात दरवाजा जोरात आपटून बंद झाला. आणि पुढच्या क्षणी जोरात दणका दिल्या सारखा उघडला ही. हाच प्रकार २-३ वेळा घडला. मी लगेच संगणक बंद करून खोलीबाहेर पळालो. ह्या बाबतीत मी घरात कोणाला ही सांगितले नाही. कारण मला वाटलं की जर मी सांगितले तर मला पुन्हा संगणकावर गेम्स खेळायला मिळणार नाहीत. पुढचे २ दिवस त्या खोलीत जायची माझी हिम्मत झाली नाही. माऊशी ने विचारले तर मी तिला म्हणालो की मला खूप कंटाळा येतोय. पण खर कारण मला वाटणारी भीती होती.
काही दिवसानंतर मी त्या खोलीत जायचे ठरवले. आत गेलो आणि संगणक सुरू केला. मागचा आरसा मुद्दामून मी दुसऱ्या ठिकाणी ठेवला. म्हणजे त्याकडे लक्ष जाणार नाही. मी पुन्हा मस्त गेम्स खेळू लागलो. पण काही वेळ उलटत नाही तितक्यात मला मागे दरवाज्याजवळ कसला तरी आवाज आला. मी पाहिले आणि माझी बोबडीच वळली. कारण तिचं बाई दरवाज्याजवळ उभी होती. मी घाबरून ओरडणार तितक्यात खोलीतला लाईट अचानक बंद झाला. पण संगणक मात्र सुरू होता. मी तिथून पळून जायचा प्रयत्न करू लागलो पण ती बाई दरवाज्यात च उभी होती. लाल रंगाची साडी, हिरव्या बांगड्या आणि पाय.. आता मी तिला स्पष्ट पाहू शकत होतो. ती एक टक माझ्याकडेच पहात होती. चेहऱ्यावर कसलेही हावभाव नव्हते. मी घाबरून घामाने ओला चिंब झालो होतो. आणि तितक्यात माझ्या उजव्या कानात कोणी तरी कुजबुज ले “घाबरलास?”. तसा भीतीने अंगावर सर्रकन काटा येऊन गेला आणि मी दचकून तिथून दूर झालो. पण जाणार कुठे..? शेवटी मी डोळे बंद केले आणि दरवाजाच्या दिशेने जोरात धावत सुटलो आणि बाहेर आलो. बाहेर आल्यावर समजले की ती तिथेच उभी असताना ही मी तिच्या आरपार आलोय. ती मागे वळून माझ्याकडेच पाहत होती. तिची ती भेदक नजर पाहून माझ्या अंगातला त्राण च संपला.
आता मात्र मला राहवले नाही. मी खाली येऊन सगळा प्रकार सांगितला. माउशी म्हणाली की घाबरु नकोस. शांत हो.. भाऊ जेव्हा घरी येईल तेव्हा तो तुला सगळे सांगेल. ती असे का म्हणाली हे मात्र मला काही कळले नाही. मला भीती मुळेत कापर भरल होत. रात्री विजय भाऊ जेव्हा घरी आला तेव्हा त्याला सगळं सविस्तर सांगितले. तो माझ्या कडे पाहत म्हणाला. मला हे माहित होत. ती बाई जास्त त्रास नाही देत. मला हि असा अनुभव रात्री जेव्हा मी काम करायचो तेव्हा यायचा. ती बाई दरवाज्या कडे येऊन थांबायची आणि मी तिला शिव्या द्यायचो तरी ती तिथेच दिसायची आणि काही वेळा नंतर निघून जायची. मी त्याचे असे बोलणे ऐकून आश्चर्य चकित झालो आणि म्हणालो “अरे किती सहज बोलतोय तू.. कोण आहे ती बाई, आणि आपल्याला का दिसते..?, ती आपल्या गच्ची वर काय करते..? असं काय झालेलं जे ती अजून इकडेच आहे.? भावाने सांगितले कि तिला आपल्या वयाचा एकुलता एक मुलगा होता. आणि तिने आपल्या बाजूच्या गच्ची वरून आत्महत्या केलेली. तेव्हा पासून ती दिसते. बहुतेक तिच्या मुलाला शोधायला येते. भावाचे असे बोलणे ऐकून पुढे काय बोलावे तेच कळत नव्हते. मी तो विषय तिथेच संपवला आणि दुसऱ्याच दिवशी आपल्या घरी निघून आलो.