अनुभव – सुदेश खरात

“ये आवरल का रे सागर आपल्याला जायचयं ना आज जत्रेला”मी म्हणालो.. हा आवरला फक्त आता जनावरांना चार टाकतो आणि एवढ दूध डेरीत टाकून आलो मग जाऊ आपण सागर म्हणाला आणि सायकल वर टांग मारून दूध घालायला गावात गेला. सागर खूप हौशी मुलगा कोणी येता जाता रस्त्याला दिसला की त्याच्यासोबत बोलत बसायचा. दूध डेरीत टाकून सागर घराकडे वळाला. रस्त्यात त्याला काही ओळखीची माणसे भेटली तसे त्यांच्या सोबत बराच वेळ बोलत बसला. आता संध्याकाळचे 7 वाजले होते. उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे अजून थोडा उजेड होता. मी सागरची घरी बराच वेळ वाट बघितली. शेवटी पावणे आठ ला तो घरी आला. खंडोबाची जत्रा होती , जत्रा जास्त मोठी नव्हती शेजारच्या वस्ती वर जेवणाचा कार्यक्रम होता,आमच्या वस्ती पासून ती वस्ती साधारण 3 किलोमीटर अंतरावर होती जाण्यासाठी फक्त पायवाट असल्याने आम्ही सायकल न घेता पायीच निघालो. आत्ता अंधार पडला होता आणि त्यात सागर मला त्या रस्त्यावर घडलेला प्रसंग सांगु लागला..

तुला माहितीये का.. इथे आपल्या गावातल्या बबन चा खून झाला होता , बबन हा गुन्हेगार होता. त्याच्यावर चोरीचे गुन्हे होते, तो किरकोळ चोऱ्या करायचा. पण एके दिवशी त्याने आमदाराच्या घरात सोन्याच्या दागिन्यांची चोरी केली आणि आपल्या गावात ह्याच रस्त्याच्या बाजूला जमिनीत एका मडक्यात पुरली. जेव्हा ही गोष्ट आमदाराला कळली तेव्हा तो गावात आला. बबन ने जिथे ते सोन्याने भरलेले मडके पुरले होते, त्याच ठिकाणी बबन ला जिवंत पुरल. बबन बराच वेळ तडफडत होता पण कोणत्याच गावकऱ्याची हिम्मत नाही झाली त्याला बाहेर काढायची. शेवटी त्याने जीव सोडला. त्यानंतर गावात विचित्र घटना घडायला लागल्या. रात्री 12 वाजल्यानंतर इथल्या आसपास राहणाऱ्या लोकांना गुरगुरल्याचा आणि कोणीतरी जमीन उकरत असल्याचा आवाज येऊ लागला, पण बाहेर कोणी दिसत नसे. एकदा गावातला भीमा पहिलवान रात्रीचा इथून जाताना त्याला मागून एक आवाज आला “ए भीमा माझं सोन कुठं आहे तसा भीमाला घाम फुटला आणि काहीही न बोलता तो पुढे चालू लागला तेवढ्यात त्याला सोन्याने भरलेलं एक मडकं दिसला भीमा ते उचलणार तेवढ्यात त्याने भयंकर असे बघितले आणि जोरात पळू लागला घरी येतां येता त्याला खूप दम लागला आणि अंगणातच बेशुध्द पडला,जेव्हा तो शुद्धीवर आला तेव्हा त्याने सांगितले त्या मडक्यात त्याने बगीतले तेव्हा त्यात त्याचेच मुंडके होते..

काही दिवसांनी त्याचे मुंडके एका मडक्यात सापडले आणि धड त्याच शेतात, म्हणून आता ह्या वाटेने रात्री कोणीच येत नाही सागरच्या ह्या बोलण्यावरून माझं काळीज बाहेर यायचं बाकी होत,मी म्हणालो अरे तूला सगळं माहीत असून पण मला ह्या वाटेने आणल, तेव्हा सागर म्हणाला अरे घाबरू नको रे तो बारा वाजल्यानंतर येतो आपण लवकर जेवण करून निघू,सागर हे फक्त ऐकून होता आणि विनोदी स्वभाव असल्यामुळे तो गमतीत बोलायचं मला वाटत होतं कधी आम्ही एकदाच इथून निघून जाईल, उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे आजूबाजूला शेतात काहीच नव्हतं कडुलिंबाची आणि येड्या बाभळीची झाड तेवढी होती ,चंद्राच्या प्रकाशात ती अक्राळ विक्राळ दिसत होती मधेच कोणीतरी झाडावरून आपल्याला बघतय असा भास व्हायचा तर खुरट्या झाडांची जेव्हा पायाला टक्कर व्हायची तेव्हा अस वाटायचं की कोणी आपल्या पायाला पकडतय,चालत चालत मला सागरने ती जागाही दाखवली जिथे बबनला पुरला होता,मी तिकडे न बघताच सागरला होकार दिला मी जीव मुठीत घेऊन चालू लागलो ,बराच वेळ चालल्यानंतर आम्हाला लाईट आणि साऊंड चा आवाज आला तेव्हा माझा जीव भांड्यात पडला आणि आम्हाला काही गावातली पोर भेटली.

आम्ही त्यांच्यासोबत गप्पा करून जेवायला बसलो, जेवायला मालच्या आणि हरभऱ्याच्या घुगऱ्या होत्या ,जेवण झाल्यावर गावातली पोर त्यांच्या गाड्यांवर निघून गेली मी अजून कोणी आमच्या वस्ती वर सोबत जाण्यासाठी आहे का म्हणून बघू लागलो तर तिथं फक्त आता तिथलीच घरातली मंडळी होती,घडल्याकडे बघितले तर 11.30 वाजले होते मला सागरचे बोलणे आठवले की 12 वाजे पर्यंत आपण घरी पोहोचलो पाहिजे नाहीतर आज आपला काही खर नाही,मी सागरला शोधायला इकडे तिकडे फिरू लागलो पण सागर काही दिसत नव्हता मला वाटलं की सागर पान निघून गेला वाटत आपल्याला एकटा सोडून मी खूप घाबरलो तेवढ्यात कोणीतरी माझ्या खांद्यावर हात ठेवला मी मागे बघितले तर तो सागर होता मला सागरला बघून जरा हायस वाटलं सागर लहानपणापासून गावात राहणारा असल्यामुळे त्याला तिथला परिसर ओळखीचा होता आणि त्याला भीती पण वाटत नव्हती तो एकदम बिनधास्त राहायचा,सागर म्हणाला घाबरला की काय तुला कस सोडून जाईल मी एकट्याला मी त्याला म्हणालो बर चल बाबा आता खूप उशीर झाला,तेवढ्यात सागरने टाइम बघितला आणि त्याचा चेहरा गंभीर झाला पण लगेच विषय बदलून त्याने मला लवकर चालायला सांगितले.

आम्ही झपाझप पावल टाकत घराच्या दिशेने निघालो वाऱ्याने आता चांगलाच वेग धरला होता,दोघांच्या तोंडातून एकही शब्द निघत नव्हता ,सागरने काहीही न बोलता माझा हात घट्ट धरला होता मे कधी पायवाट तर कधी नांगरलेल्या शेतात धडपडत चालत होतो पण माझी हिम्मत नव्हती होत तोंडातून आवाज काढायची,एवढ्यात आम्हला कोण तरी जोरजोरात माती उकरतोय असा आवाज बाजूच्या गवतातून आला सागरने माझा कडे बघत म्हणाला काहीही झालं तरी हाकेला उत्तर द्यायचं नाही मी हम्म एवढंच बोललो, तेवढ्यात आम्हाला आवाज आला, सागर मालच्या आहे काय पिशवीत मला पण दे खायला,माझं हृदय जोरजोरात धडधडू लागला आता सागरची पण चांगलीच फाटली होती तो ही घामाने ओला झाला आम्ही ढेकलातून एकमेजनच हात घट्ट पकडून धडपडत चालत होतो इतक्यात मला एक मडक दिसला मागून आवाज आला मडक्यातला तुम्हांला घ्या आणि मला ती पिशवी द्या मी आता सागरकडे बघून त्याला खुणावले तू का आणले हे पार्सल सागरला जेव्हा मी तिथे शोधत होतो तेव्हा हा गडी पार्सल आणायला गेला होता मला सागरावर राग ही येत होता पण मी काहीच बोलू शकत नव्हतो,नसता आलो ह्याच्याबरोबर तर बर झाल असत आता बरे फसलो.

त्या मडक्याकडे माझं परत लक्ष गेलं ते आमच्या पुढे पुढे येत होतं मी त्याच्याकडे संमोहित झालो आणि मी ते मडके उचलणार तेवढ्यात सागरने पिशवीतील अंगारा माझ्या डोक्याला लावला आणि मी भानावर आलो तसा मी आणि सागर परत जोरात चालू लागलो मागून भयानक किंचालण्याचा आवाज येत होता थोडे पुढे आलो परत एक बाईचा आवाज माझ्या नावाने येऊ लागला आम्ही काहीच प्रतिसाद ना देता घराच्या दिशेने चालू लागलो आमच्या पायाला जखम झाली होती तरी आम्ही आता ना थांबण्याचा निर्णय घेतला आणि घराजवळ आलो तेवढ्यात मला समोर माझी काकी उभी दिसली ,काय रे बाळा किती वेळचा आवाज देतवय मे तुम्हाला ओ का नाही दिली,मे मनातल्या मनात मनात म्हणालो मालच्या सोबत दिलेल्या अंगाऱ्यामुळे वाचलो, आम्ही एकमेकांकडे बघितले आणि सुटकेचा निश्वास टाकला.

Leave a Reply