अनुभव क्रमांक – १ – कौस्तुभ सुर्वे

गोष्ट काही महिन्यापूर्वी ची आहे. मी आणि माझी मोठी बहीण साक्षी आम्ही दोघांनी सहज म्हणून लोणावळा ते रहिमतपूर असा लाँग ड्राईव्ह चा प्लॅन केला. खुप दिवसांपासुन आमचे लाँग ड्राईव्ह ला विचार होता आणि तो एकदाचा प्रत्यक्षात उतरवायचे नक्की झाले. प्रवास तसा बराच मोठा होता. म्हणजे साधारण ८-९ तासांची ड्राईव्ह. आम्ही रात्री जेवण करूनच निघणार होतो त्यामुळे आम्हाला खूप उशीर झाला. जरी आमचे सगळे ठरले असले तर आई मात्र आम्हाला लाँग ड्राईव्ह ला जाण्याच्या विरोधात होती. तिचे एकच म्हणणे होते की असे रात्री वैगरे ड्राईव्ह ला जायचे खूळ डोक्यातून काढून टाका. तिचा बाहेरच्या गोष्टींवर जास्त विश्वास होता. तसे ही तिची काळजी करणे साहजिक होते पा तरीही आम्ही हट्ट करून शेवटी आमचे खरे केले आणि प्रवासाला निघालो च.

आम्ही निघून काही तास झाले असतील. रात्री निघाल्यामुळे रस्त्यावर रहदारी ही अगदी तुरळक होती. तितक्यात मुसळधार पावसाला सुरुवात झाली. वातावरणात मस्त गारवा पसरला. तितक्यात मला रस्त्याकडे ला एक चहा ची टपरी दिसली तसे मी ताई ला म्हणालो की आपण जरा थोड्या वेळ हॉल्ट घेऊ. तसे आम्ही गाडी त्या टपरी च्याच थोडी अलीकडे पार्क केली. त्याला चहा आणि २ प्लेट भजी ची ऑर्डर दिली आणि तिथेच एका बाकावर छोट्याश्या शेड खाली बसलो. पावसाचा जोर अजूनही कमी झाला नव्हता. अश्या वातावरणात चहा आणि भजी म्हणजे एक पर्वणीच. मस्त गरम चहा चे घोट घेत आम्ही त्या मुसळधार पावसाचा आणि थंडगार वातावरणाचा आनंद घेत होतो. त्या टपरी वाल्या माणसाने आम्हाला सहज म्हणून विचारले “दादा इतक्या रात्री कुठून आलात आणि आता कुठे जाताय”. तसे मी त्यांना म्हणालो “लोणावळा ते रहिमतपूर असे लाँग ड्राईव्ह साठी निघालो आहोत. यावर तो टपरीवाला काही बोलला नाही. 

मी त्याच्याकडे पाहिले आणि मला जाणवले की याला काही तरी सांगायचे आहे. मी त्याला काही विचारणार इतक्यात तोच बोलू लागला “आज अमावस्या आहे आणि तुम्ही चुकीच्या वेळी आणि चुकीच्या ठिकाणी चालला आहात. पुढे एक घाट लागतो. ती जागा बरोबर नाही. जमत असेल तर आता अश्या वेळी त्या घाटातून प्रवास करणे टाळा..” माझ्या ताई ला अश्या गोष्टी अजिबात पटत नसत. म्हणून आम्ही त्या माणसाच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं आणि पुढच्या प्रवासाला निघालो. हळु हळु पाऊस ओसरू लागला होता. साधारण रात्रीचे दीड वाजले असावेत. आम्हाला हळु हळू पुढचा घाट दिसू लागला. रस्ता ही अगदी सामसूम झाला होता. बऱ्याच वेळा पासून आम्हाला एकही वाहन त्या मार्गावर दिसले नव्हते. आम्ही त्या घाटाच्या रस्त्याला लागलो. बहुतेक चढण असल्यामुळे गाडी जास्त लोड घेत होती. मी गियर कमी केले आणि गाडी चालवू लागलो. पण तरीही त्या घाटातून गाडी नीट जात नव्हती. 

काही वेळानंतर असे वाटू लागले की गाडी मागून कोणी तरी ओढत आहे. आता हा फक्त भास होता की अजुन काही ते मला ही कळत नव्हत. मी आणि ताई ने रिअर व्ह्यू मिरर मध्ये २-३ वेळा पाहिले पण मागे कोणीही दिसत नव्हते. घाटाचे चढण जरा जास्तच असल्यामुळे असे जाणवत असावे असा विचार करून आम्ही पुढे जात राहिलो. पण गाडी आता अगदी १५-२० किमी च्याच वेगाने जाऊ लागली. मला कळतच नव्हते की अचानक असे का होतय. तितक्यात आम्हाला एका लहान मुलीच्या रडण्याचा आवाज येऊ लागला. आम्हाला असे वाटले की ती मदतीसाठी कोणाला तरी बोलावते य. आम्ही गाडी थांबवली आणि खाली उतरलो. तो परिसर अगदी निर्मनुष्य होता. दूर दूर वर वस्ती चा मागमूस ही नव्हता. मी त्या आवाजाचा कानोसा घेऊ लागलो. पण कळत नव्हते की नक्की आवाज कोणत्या दिशेने येतोय. तेवढ्यात मला जाणवले की मागून माझ्या नावाने कोणी तरी हाक देतेय. मला कसले भान राहिले नाही आणि मी त्या आवाजाचा पाठलाग करत रस्ता सोडून आत जाऊ लागलो. 

तितक्यात ताई ने अडवून मला गाडीत बसायला सांगितले. तिथे घडत असलेल्या विचित्र गोष्टीची तिला आता चाहूल जाणवू लागली होती. क्षणाचाही विलंब न करता आम्ही तिथून गाडी काढली. पुढचे काही तास आम्ही कुठे ही थांबलो नाही. थेट माउशी च्याच घरी आल्यावरच थांबलो. आम्ही खूप घाबरलो असल्याने तिने गेल्या गेल्या आमची चौकशी करायला सुरुवात केली. तेव्हा सगळा प्रकार आम्ही तिला सांगितला. त्यावर ती म्हणाली की तिथे एका कुटुंबाचा अपघात झाला होता आणि तेव्हा ही अमावस्या होती. असे म्हणतात की तेव्हापासून ते तिथेच आहेत. जे कोणी तिथून त्या वेळेला प्रवास करतात किंवा त्यांच्या मदतीला थांबतात तेव्हा त्यांना असे विचित्र अनुभव येतात. काहींना लहान मुलीच्या रडण्याचा तर कधी वृद्ध माणसाच्या ओरडण्याचा आवाज येतो. मावशी चे बोलणे ऐकल्यावर आम्हाला कळून चुकले की की तेव्हा आमचे नशीब चांगले होते म्हणून आम्ही घा प्रकरणातून सुटलो. घरी आल्यावर आईने एक काळा दोरा हातात बांधला आणि आमच्या साठी प्रार्थना करू लागली. या भयानक प्रसंगामुळे आमचाही अश्या गोष्टींवर विश्वास बसला. तेव्हा पासून आम्ही असे रात्री अपरात्री लाँग ड्राईव्ह चा विचार कधीच केला नाही.

अनुभव क्रमांक – २

हा अनुभव आपल्या चॅनल चे सबस्क्राईब र अशोक म्हात्रे यांनी पाठवला आहे. 

साधारण २० वर्षांपूर्वी ची गोष्ट आहे. मी आणि माझा एक मित्र राजू आम्ही एका हळदी समारंभाच्या कार्यक्रमाला जाणार होतो. मुंबईहून साधारण ६.३० वाजता गावी जाण्यासाठी निघालो. पनवेल पेण पर्यंत आम्ही एसटीने प्रवास केला. नंतर पेण मध्ये उतरल्यानंतर आम्ही माझ्या भावाची बाईक घेतली. एव्हाना साडे अकरा होऊन गेले होते. आम्हाला एस्टी सोडून बाईक घेई पर्यंत बराच उशीर झाला होता. त्यामुळे आम्ही जरा घाईच करत होतो. बाईक घेऊन निघालो तेव्हा कळले की बाईक चा ब्रेक नीट लागत नाहीये. आता अश्या वेळी पुन्हा मागे फिरणे शक्य नव्हते. म्हणून मग तशीच बाईक चालवत आम्ही पुढे निघालो. मी ड्रायव्हर तसा नवीनच होतो. गाडीचा ब्रेक नीट लागत नाही म्हंटल्यावर मी गाडी अगदी हळु चालवत होतो. साधारण सव्वा बाराच्या सुमारास आम्ही जंगल पट्टीच्या रस्त्याला लागलो. तो रस्ता अतिशय अरुंद होता. 

रस्त्याचे स्ट्रीट लाईट असून नसल्यासारखे होते त्यामुळे अगदी गडद अंधार पसरला होता. आम्ही एकमेकांशी बोलतच जात होतो. खर तर ती रात्र तो परिसर आता आम्हाला अतिशय भयाण वाटू लागला कारण चोहोबाजूंनी मिट्ट अंधार आणि त्यात आमच्या बाईक च्याच हेड लाईट चा प्रकाश तितकाच काय तो वाट दाखवत होता. तितक्यात मला रस्त्याच्या मधोमध कोणी तरी चालत असल्याचे जाणवले. अंधार असल्यामुळे नीट से काही दिसत नव्हते. पण आमची गाडी जस जशी तिथे जवळ जाऊ लागली तसे दृश्य स्पष्ट होऊ लागले. एक अतिसामान्य उंची असलेला माणूस रस्त्याच्याच मधून चालत जात होता. हातात एक काठी होती. विचित्र गोष्ट म्हणजे त्याने कोणतीच वस्त्रे परिधान केली नव्हती. आणि त्याचे शरीर अतिशय किळसवाणे वाटत होते. अतिशय विद्रूप. त्याने आमच्याकडे पाहिले आणि त्याला पाहून राजू म्हणाला “दादा हे खूप भयाण आहे, इथून लवकर चल..”

बाईक चा ब्रेक आधीच कमी लागत असल्यामुळे मी वेग वाढविण्यासाठी घाबरत होतो. कारण रस्ता अनोळखी होता. इथून वेगात घेतलेली बाईक जर कंट्रोल करता आली नाही तर अपघात नक्कीच होणार होता. मी हॉर्न वाजवत राहिलो. एके क्षणी तो माणूस जागीच थांबला. मागे वळून आमच्याकडे पाहिले. मला वाटले की आता संपले सगळे. आपले काही खरे नाही. माझ्या नकळत बाईक चा वेग वाढला. तो माणूस आम्हाला क्रॉस करून नंतर रस्त्याच्या डाव्या बाजूला जाऊ लागला. तितक्यात राजू ने पाठीवर जोरात हात मारला आणि मला सावध करत म्हणाला “दादा गाडी सांभाळ पुढे गती रोधक आहे. पण ब्रेक लागणार नव्हता. तरीही मी जेमतेम गाडी कंट्रोल केली तरीही त्या गती रोधकवरून गाडी जोरात उडाली आणि खाली आपटली. कसे बसे सावरून मी तोल सांभाळला आणि आम्ही खाली पडता पडता वाचलो. नशीब जोरदार होते म्हणून आमचा अपघात होता होता राहिला. 

आम्ही मागे वळून पाहिले तर त्याची पाठ दिसली आणि तो अंधारात कुठेतरी नाहीसा झाला. राजू पटकन म्हणाला “दादा चल आता.. थांबू नकोस..” आम्ही थेट गावात येऊन पोहोचलो आणि मी वेळ पाहिली तर १.३० वाजला होता. रस्त्यात दिसलेला तो माणूसच होता की अजुन काही हे मला माहित नाही. पण तो अनुभवलेला भयानक क्षण मी कधीच विसरू शकणार नाही. हे सगळं सांगताना माझ्या अंगावर किती वेळा काटा येऊन गेला हे माझे मलाच माहीत. 

Leave a Reply