लेखिका – स्नेहा बस्तोडकर वाणी
खूप सुंदर दिसायच्या तुमच्या पहिल्या पत्नी” भिंतीवर च्या फोटो समोर पाहत हात जोडून उभी असलेली राधिका म्हणाली.
“फक्त दिसायलाच नाही मनानी ही तितकीच सुंदर होती माझी सखी” फोटो वरचा हार नीट करत आकाश म्हणाला. “तिने वचन घेतले होता माझ्या कडून की मी तिच्या पश्चात पुन्हा लग्न करायचं, आयुष्य पुन्हा नव्यानं सुरू करायचं. एकटं नाही राहायचं.”
“त्या वारल्या कश्या?”
“काळच वाईट होता राधिका. सोड आता त्या वाईट आठवणी नको… अग तुझ्या हाताला ही जखम कसली?”
“अहो काही नाही ती एक बांगडी फुटून लागली मघाशी”
“काळजी घे जरा”
राधिका चा नवा संसार सुरू झाला. आकाश च हे दुसर लग्न.. तो राधिका ला अतिशय सुखात ठेवायचा. पण का कोण जाणे राधिका ला मनातून एक वेगळीच अस्वस्थता वाटायची. आकाश रोज ऑफिस ला गेल्या नंतर घरात ती एकटीच असायची. आणि त्या घरात तिला सतत कोणाचे तरी अस्तित्व जाणवायचे. हे विचार मनातून काढण्या साठी स्वतःला वेग वेगळ्या गोष्टींमध्ये मध्ये गुंतवून घेण्याचा खूप प्रयत्न करायची पण यश काही मिळत नव्हते. त्या अनोळखी अस्तित्वाची जाणीव तिला दररोज व्हायची जेव्हा कधी ती घरी एकटी असायची.
“जेवण खूप छान झालंय” आकाश नी बोटं चाटत म्हटलं. राधिका ची त्यावर काही च प्रतिक्रिया नव्हती.
“अग काय झालं? तुला सांगतोय. लक्ष कुठे आहे”
“नाही काही नाही. अहो मी काय म्हणते, तुमच्या पहिल्या पत्नीचे मरणोपरांत सगळे विधी नीट झाले होते ना?”
“काय?? हे कुठून आला मध्येच?”
“नाही सहज विचारलं”
“आणि असा प्रश्न सहज का बर पडला?”
“बघा तुम्ही काही गैरसमज करून घेऊ नका, पण मला अस वाटतंय की त्यांच्या आत्म्याला मुक्ती मिळाली नाहीये…”
“काहीतरी वेड्या सारखे बडबडू नकोस” आकाश राधिकाचे बोलणे तोडतच टेबल वरून उठत म्हणाला.
राधिका ने त्याचा हात धरून त्याला पुन्हा टेबल वर बसायला म्हणून खुणावले. ” माझी पूर्ण गोष्ट ऐकून तरी घ्या. मला नेहमी त्यांचा इथे ह्या घरात असण्याचा भास होतो. त्यांचा जीव अजून ही तुमच्यात गुंतला आहे.”
“वाह बरच आहे मग. तुला घरात एकटे नाही वाटणार. छान सोबत होईल”
“अहो गंमत करण्याचा विषय नाही आहे हा”
“मग गंमत नको करू तर काय करू. तू जे बोलते आहेस त्याचा जरा स्वतः ही विचार कर.”
“अहो मी खरंच सांगतेय मला खरंच .. “
“हे बघ हे सगळं तुझ्या डोक्यातून काढून टाक आणि हा विषय इथेच संपव. हे आत्मा वगैरे अस काही नसतं. आणि अस काही असल तर सखीचे आशीर्वाद च असतील आपल्या सोबत.” एवढं म्हणून आकाश आपले रिकामे ताट उचलून निघून गेला.
पण आकाश जे म्हणाला होता की तिचे फक्त आशीर्वाद असतील आपल्या सोबत.. हे मात्र तिला काही रुचले माझी. कारण तिच्या सोबत घडणाऱ्या घटना त्याने नीट ऐकूनच घेतल्या नव्हत्या.
रात्री कसल्याशा आवाजाने रधिकाचे डोळे उघडले. तिने खोलीत एक नजर फिरवली पण काहीच दिसलं अथवा जाणवले नाही. तिने पाणी पिण्या साठी टेबल वरची बाटली उचलली पण ती रिकामी होती. ती उठून स्वयंपाक घरात गेली. इतक्यात हॉल मधून कसला तरी आवाज आला. तिने मागे वळून पाहिले आणि अंगावर सर्रकन काटा येऊन गेला. सोफ्यावर कोणी तरी बसले होते. लाईट तर बंद होता पण खिडकीतून येणाऱ्या बाहेरच्या स्ट्रीट लाईट च्याच मंद प्रकाशात तिला ते जाणवले.. तिने हिम्मत एकवटून आवाजातली अनामिक भीती लपवत विचारलं “कोण आहे तिथे?” पण समोरून काहीच प्रतिसाद आला नाही.
ती पेसेज लाईट लावण्यासाठी वळली आणि तितक्यात ती आकृती विजेच्या वेगाने झपकन तिच्या शरीरातुन आरपार गेली.
त्या प्रसंगाने तिला भोवळ आली आणि ती खाली कोसळली. डोळे उघडले तेव्हा ती बेड वर होती आणि आकाश तिच्या बाजूला बसला होता.
“अग काय झालं होतं. मी २-३ वेळा झोपेतून उठून पहिलं पण तू दिसली नाहीस. म्हणून तुला पाहायला आलो तर तू पेसेज मध्ये बेशुद्ध पडली होतीस. चक्कर वगैरे आली का?”
“अहो नाही. हॉल मध्ये मला काहीतरी दिसल. मी लाईट लावायला वळले आणि ते अचानक माझ्या शरीरातून आरपार झालं”
“तुझं झालं परत सुरु? झोपून जा काही नाही या घरात. काही तरी वाईट स्वप्न पडले असेल तुला”
“अहो स्वप्न असतं तर मी इथे बेडवर असते हॉलमध्ये का असते?”
“हे बघ हा तुझा सगळा भ्रम आहे. तुला जसं वाटते य तसं काहीही नाहीये आणि असत तर ते मलाही दिसलं असतं. आता झोप शांत पणे, जास्त विचार करू नकोस..”
पण इतकं सगळं झाल्यानंतर राधिकाला झोप कुठून येणार होती. ती तशीच बेड वर पडून राहिली.
दुसऱ्या दिवशी सकाळी आकाश चा जेवणाचा डबा तयार करत होती. रात्री झोप न झाल्याने तिला जेवण वैगरे करायला जरा उशीर च झाला होता. त्यामुळे तिची धावपळ सुरू होती. डबा तयार करून ती आकाश ला द्यायला हॉल मध्ये गेली तितक्यात तिच्या मागून कप बश्या फुटायचा जोरात आवाज आला. ती दचकून धावत स्वयंपाक घरात आली आणि पाहते तर काय.. स्टँड मध्ये धूवून ठेवलेल्या बश्या आपोआप खाली पडून चुरा झाल्या होत्या.
पण त्याहून धक्का दायक गोष्टीवर तिची नजर स्थिरावली होती. तिच्या अगदी जवळ जमिनीवर चाकू उभा टेकला होता. जर त्या कप बश्या फुटण्याच्या आवाजावर तिनी मागे पाहिल नसतं तर डब्बा घेऊन पळताना तो चाकू तिच्या पायात घुसलाच असता.. पण तो चाकू असा आपोआप उभा कसा राहिला ते तुला कळत नव्हतं. तिला तिच्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. एवढ्यात तो सगळा आवाज ऐकूनच आकाश पळत तिच्याजवळ आला आणि राधिका तो चाकू त्याला दाखवेल एवढ्यात तो चाकू जमिनीवर आडवा पडला..
हा एक प्रसंग राधिका ला बरेच संकेत देऊन गेला. ती अदृश्य शक्ती नक्की आकाश ची पहिली बायको सखी होती की अजुन कोणी ते माहीत नाही पण तिला राधिका च तिथे असणं नकोस झालं होत. तिचा उद्देश तिला इजा पोहोचवण्याचा, कदाचित तिला संपवण्याचा होता. पण या सगळ्या गोष्टी ती शक्ती आकाश च्याच नकळत करत होती. तिच्या मनात नको नको ते विचार येतो होते. कदाचित सखीच असेल ही..? ती गेल्या नंतर ही आकाश चे तिच्यावर तितकेच प्रेम आहे आणि कदाचित ते प्रेम माझ्यावर तिला वाटून द्यायचं नव्हत..
“अग काय आहे हे सगळं. तुला कुठे लागला तर नाही ना”
“नाही अहो मांजर ओट्या वरून पाळली आणि ही सगळं नासधूस केली” ह्या वेळेस राधिकाने आकाश ला मुद्दामून खोटं सांगितले कारण त्याला ते पटणार च नव्हत.
संध्याकाळी आकाश ची ऑफिस मधून घरी यायची वेळ झाली होती. राधिका टेरेस वर या सगळ्यातून बाहेर कसे पडायचे, आपली सुटका कशी करून घ्यायची याचा विचार करत फेऱ्या मारत होती. हळू हळू अंधार पडू लागला होता. एवढ्यात राधिका ला अगदी काना जवळ घड्याळाच्या ठोक्यांचा आवाज आला आणि तिने दचकून मागे वळून पाहिलं.
टेरेस च्या एका कोपऱ्यातून कसलीशी हालचाल जाणवली. ती त्या अंधाऱ्या कोपऱ्यात निरखून पाहू लागली. तिथे एक काळपट आकृती आकार घेत होती. ती प्रचंड घाबरली आणि कशी बशी धावत, धडपडत खाली आली. आणि आपल्या बेडरूम मध्ये जाऊन बाथरूम मध्ये स्वतःला लॉक करून घेतले.. पण काही वेळ होत नाही तोच दरवाज्यावर थापा पडू लागल्या. आणि ती आवाज प्रत्येक क्षणाला वाढत चालला होता. पुन्हा तोच घड्याळाच्या ठोक्यांचा आवाज तिच्या कानात घुमू लागला जो तिला आता असह्य होऊ लागला.
तिने आपल्या कानांवर हात घट्ट दाबून घेतले पण तो आवाज वाढतच चालला होता. तितक्यात तिची नजर समोर बेसिन वरच्या आरश्यात गेली आणि तिच्या काळजाचा ठोकाच चुकला. तिच्या मागे तीच आकृती उभी होती. अगदी तिच्या जवळ.. त्या आकृतीला काही आकार नव्हता पण तरीही एक क्रूर हास्य जाणवत होत. बघता बघता त्या आकृतीने राधिकाच्या मानेला विळखा घाला यला सुरुवात केली तशी राधिका जोरात किंचाळत बाथरूम मधून बाहेर पळाली. पळता पळता जोरात ठेच लागून जमिनीवर आदळली आणि तिची नजर बेड खालच्या एका पेटीवर गेली.
“ह्यात सखी च काही समान आहे. तिच्या काही आठवणी” राधिकाला आकाश चे शब्द आठवले.
तिने रागाच्या भरात ती पेटी खेचून बाहेर काढली. तिने पटापट त्या पेटितल्या वस्तू काढून पाहायला सुरुवात केली.. त्यात काही जुन्या वस्तू होत्या. सखी च्या लग्नाचा शालू, तिची डायरी, एक सोनेरी रंगाच घड्याळ, आणि इतर काही वस्तू.. तिने पुन्हा सगळ्या वस्तू पेटीत भरल्या आणि पेटी बंद केली. तिच्या मनात काहीतरी वेगळेच चालले होते. ती पेटी घेऊन ती घराच्या मागे गेली आणि त्या सगळ्या वस्तू जाळून टाकल्या. पण तिने कल्पना ही केली नसेल अशी विचित्र गोष्ट घडू लागली. जसे त्या वस्तू नी पेट घेतला तसे त्यातून किंचाळण्याचे आवाज येऊ लागले. ती तसेच त्या पेटत्या झ्वळेकडे बघत राहिली. त्या दिवसा नंतर तिच आयुष्य आणि संसार पुन्हा सुरळीत सुरू झाला. ते वाईट भास, ती काळी सावळी आणि सखी च अस्तित्व सगळच संपल. वर्षभराने त्यांच्या घरात एक गोंडस बाळ जन्माला आल. पण पुढे राधिकाच्या वाट्याला काही तरी वेगळच वाढून ठेवलं होत.
“राधिका डब्बा दे पटकन मला उशीर होतोय”
” अहो तिथेच ठेवलंय टेबल वर. प्लीज तुम्हीच घ्या मी बाळा ला नाश्ता भरवते य.”
” हो घेतला. चल बाय”
ते बाळ जवळपास दोन अडीच वर्षांचे झाले होते. आणि नुकताच बोलायला लागले होते.
राधिका ने टेबल वरची पाण्याची बाटली उचलली पण झाकण नीट लावलेल नसल्याने ती खाली पडून पाणी सांडल. “काय हे.” राधिका संतापून म्हणाली “इतकी वर्ष झाली लग्नाला तरी अजून ह्यांच्या ह्या सवई काही जात नाही. पाणी प्यायल्यावर बाटली ला झाकण लावणे काय इतका अवघड आहे. हे ऑफिस ला निघून जाणार आणि मी मागून हे सगळं अवरत बसायच”
“ही सवय खूप जुनी आहे. मी ही हेच सर्व करत बसायचे ते ऑफिस ला गेल्यावर” तिने झटकन मागे वळून पाहिले. त्या बाळाच्या तोंडून हे वाक्य ऐकून राधिका ला विजेचा तीव्र झटका लागल्या सारखे च झाले. ती जागीच स्तब्ध झाली. इतक्या वर्षात ती जे विसरून गेली होती ती वाईट सावली, सखी, तिच्या इतक्या श्या बाळाच्या शरीरात…. शेकडो प्रश्न तिच्या मनात काहूर माजवत होते आणि इतक्यात ती भोवळ येऊन खाली पडली.
“राधिका, घाबरु नकोस. मी तुला किव्हा तुझ्या कुटुंबाला काही हानी नाही पोहचवणार” एक हलकासा आवाज तिच्या कानावर पडला. तिने डोळे उघडण्या चा प्रयत्न केला पण डोळे दिपून जातील इतका प्रखर प्रकाश तिच्या समोर होता.
“मी कायम तुमच चांगलच इच्छिलय. तुला खरंच वाटल होत. माझ्या आत्म्याला मुक्ती नव्हतीच मिळाली. पण ते माझ्या नवऱ्याचा काळजी पोटी. आणि मग तू आलीस आणि तीच काळजी तुझ्या ही बद्दल वाटू लागली. माझ अस्तित्व ह्या घरात तुमचा रक्षण करण्यासाठीच होत त्या वाईट आत्म्या पासून ज्याने माझा जीव घेतला. त्या आत्म्याने तुझा ही घात करण्याचा खूप प्रयत्न केला पण मी प्रत्येक वेळेस माझ्या परीने तुला सावध करत आले. तुला आठवतंय जेव्हा तू माझ्या पेटी मधल समान बाहेर काढल तेव्हा त्यात एक सुंदर घड्याळ होत सोनेरी रंगाच. ते माझ नव्हत. मला ते रस्त्यात सापडल होत. मला ते खूप आवडल आणि मी कसला ही विचार न करता ते उचलून घरी आणलं आणि माझ्या संसाराला नजर लागली. ती अतृप्त आत्मा त्या घड्याळ सोबत ह्या घरात आली. मी जिवंत असताना माझ्यात एवढी शक्ती नव्हती त्या मुळे मी त्या शक्ती ला बळी गेले. पण ज्या वेळेस तू माझ्या सामाना सोबत ते घड्याळ जाळून टाकलस तेव्हा ती शक्ती कायम ची संपली आणि सोबत मला ही मुक्ती मिळाली.
देवांंने मला तुमच्या सोबत माझे आयुष्य नव्यानी सुरू करायची ही संधी दिली आणि मी तुझ्या पोटी पुन्हा जन्म घेतला. पण तू काळजी नको करुस. तुझं बाळ अजून खूप लहान आहे. काही वर्षात माझ्या ह्या सगळ्या जुन्या आठवणी कायम साठी पुसल्या जातील आणि मी फक्त तुमच्या दोघांची मुलगी असेन. माझ्या नवऱ्याच्या आयुष्यात येऊन त्याला आधार देण्या बद्दल त्याला मना पासून आपलस करण्या बद्दल मी कायम तुझी आभारी राहीन. तुझी ही सखी बनून राहीन”
तो डोळे दिपवणा रा प्रकाश हळू हळू कमी होत गेला आणि राधिका चे डोळे उघडले. ते बाळ ही तिच्या शेजारी बसून मिश्किल हसत होत. राधिका ने ही पटकन त्याला आपल्या मिठीत घेतला आणि म्हणाली ” थँक यू सखी”