आपण एखाद्या नवीन घरात, वास्तूत राहायला गेल्या नंतर त्याची आपल्याला नीट माहिती नसते. एखाद्या वास्तूत काय दडून राहू शकतं याची आपण कल्पनाही करू शकत नाही. असाच हा एक अविस्मरणीय अनुभव..
अनुभव -अपूर्वा बापट
घटना वर्ष २०१८ मधली आहे जी माझ्या पूजा नावाच्या एका मैत्रिणी सोबत घडली होती. ती आपल्या भावा सोबत कोलकत्याला शिफ्ट झाली होती. तिथेच एक २ बी एच के फ्लॅट रेंट वर घेऊन राहू लागली. तिची एक जवळची मैत्रीण ही तिच्या सोबत राहायची. त्या दोघी जणी तिथेच जॉब ला होत्या. आणि मैत्रिणीचा भाऊ जवळच्या कॉलेज मध्ये ग्रॅज्युएशन पूर्ण करत होता. २ बी एच के फ्लॅट असल्यामुळे एका खोलीत तिचा भाऊ आणि दुसऱ्या खोलीत त्या दोघी जणी झोपायच्या. सगळं काही सुरळीत चालू होत. काही दिवसांनी तिच्या मैत्रिणीला नाईट शिफ्ट मिळाली. त्यामुळे पूजा आणि तिचा भाऊ दोघच घरी असायचे. पूजा जॉब वरून घरी आल्यावर जेवण करायची. त्या दिवशी ही नेहमी प्रमाणे ती संध्याकाळी घरी आली. सगळी आवरा आवर करुन जेवण बनवायला घेतल. ठरलेल्या वेळेत जेवण झालं आणि दोघंही आप आपल्या रूम मध्ये झोपायला गेले. रोजच्या सवयीप्रमाणे प्रिया ने थोड्या वेळ मोबाईल वर इंटरनेट सर्फ करून मोबाईल चार्जिंग ला लावला आणि झोपून गेली. मध्य रात्र उलटून गेली असेल. तिला कसल्याश्या आवाजाने जाग आली. ती डोळे चोळत च उठली आणि आवाजाचा कानोसा घेऊ लागली.
पाणी वाहत असल्याचा आवाज येत होता. तिला काही उमजेनासे झाले. वाटले की बाथरूम मधला नळ सुरू राहिला असेल. ती बेड वरून खाली उतरली आणि तिच्या पायांना थंडगार पाण्याचा स्पर्श झाला. तिला कळून चुकले की नुसता नळ सुरू राहिला नाहीये तर संपूर्ण घरभर पाणी साचले आहे. ती रागा रागात च रूम मधून बाहेर आली. भावाकडून नळ सुरू राहिला असणार असा विचार करत ती त्याच्या रूम मध्ये गेली. पण तो अगदी गाढ झोपेत होता. त्याला असे झोपलेलं पाहून तिला जरा आश्चर्यच वाटलं कारण तो नेहमी गादी खाली टाकून झोपायचा. त्याच्या रूम मध्ये बेड नव्हता. आजही तो खालीच झोपला होता आणि त्याची गादी पाण्याने पूर्ण चिंब भिजली होती. तरीही त्याला जाग आली नव्हती. तिने त्याला खूप हाका मारल्या, हाताने हलवून जागे करण्याचा प्रयत्न केला पण तो काहीच प्रतिसाद देईना. इतका गाढ कसा काय झोपू शकतो हा असा मनात विचार करत त्याच्या नावाने ओरडुन त्याला उठवू लागली. पण तो काही जागचा हलेना. शेवटी जीव एकवटून अतिशय जोरात त्याला आवाज दिला तसा तो खाडकन जागा झाला. आणि उठल्या उठल्या तिला मिठी मारून रडूच लागला. प्रियाला काही कलेच ना की काय झालं.
तिने त्याला कसे बसे शांत केले. पण नंतर जे तो म्हणाला ते ऐकून तिच्या पायाखालची जमीनच सरकली. तो म्हणाला ” बर झालं तू इतक्या जोरात आवाज डोळस नाही तर त्याने मला मारूनच टाकले असते आज.. तो माझ्या अंगावर बसून होता आणि तो मला हलू च देत नव्हता. तू आज अगदी वेळेवर माझे नाव घेतले नसतेस तर मी भानावर च आलो नसतो. तो मला तुला मारायला सांगत होता. पण मी त्याचे ऐकत नव्हतो म्हणून त्याने मला जखडून ठेवले होते..” इतके बोलून तो ओक्साबोक्शी रडू लागला. प्रिया साठी हे सगळे खूप विचित्र आणि भयानक होते. तिने कसे बसे त्याला शांत केले. तिच्या मैत्रिणीला ही बोलवून घेतले आणि त्या रात्री पुरता तिने आपल्या भावाला तिच्या रूम मध्ये झोपायला सांगितले. ते पाणी घरात कुठून आले होते ते काहीच कळले नाही कारण बाथरूम किंवा बेसिन मधला कोणताच नळ चालू नव्हता. त्यांनी जेमतेम सगळ्या पाण्याचा निचरा केला, घर स्वच्छ केलं. दुसऱ्या दिवशी भाऊ खूप घाबरला होता. त्याला धीर देऊन समजावले. पुढच्या २-३ दिवसात घरात एक छोटीशी पूजा केली. पण हे सत्र इतक्यावरच थांबणार नव्हत. पूजा झाल्यावर अवघे काही दिवस उलटले असतील. प्रिया ला पुन्हा मध्य रात्री जाग येऊ लागली. काही कारण नसताना तिची झोपमोड व्हायची. कामाच्या ताणामुळे असेल असे तिला वाटायचे म्हणून ती दुर्लक्ष करून पुन्हा झोपून जायची.
पण त्या रात्री जे घडले ते विचित्र होते. तिला जाग आली पण फक्त डोळे उघडले, संपूर्ण शरीर जखडल्यासारखे झाले होते. शरीराच्या कोणत्याच अवयवाची तिला हालचाल करता येत नव्हती. जसे तिला कोणी तरी घट्ट पकडुन ठेवलंय पण कोण ते दिसत नाहीये. तिच्या फक्त डोळ्यांची हालचाल तेवढीच काय ती होत होती. तिला खूप ओरडायचे होते, आपल्या भावाला, मैत्रिणीला हाक मारायची होती पण तिच्या तोंडून एक शब्द ही बाहेर पडत नव्हता. हा प्रकार जवळपास १५ मिनिट चालू राहिला आणि एके क्षणी पूर्ण ताकद आलम प्रिया खाडकन बेडवर उठून बसली. संपूर्ण घामाने ओलीचिंब झाली होती. तिला कळलं नव्हत की नक्की आय झालं. स्लीप paralysis चा अनुभव की अजुन काही.. कारण तिने या आधी स्लीप paralysis बद्दल ऐकले होते. पण काही दिवसांपूर्वी अगदी असेच तिच्या भावासोबत घडले होते. तिला काही कळायला मार्ग नव्हता. तिने बाजूला आपल्या मैत्रिणीकडे पाहिले पण ती एकदम शांत झोपली होती. जणू काही घडलेच नाही. ती उठून भावाच्या रूम मध्ये त्याला पाहायला गेली. तर तो ही शांत पणे झोपला होता. घडणाऱ्या गोष्टी कदाचित साध्या नाहीत हे एव्हाना तिला कळून चुकले होते. हे प्रकार असेच वाढत गेले तर एखाद्याच्या जीवाला धोका होऊ शकतो असा विचार करून तिने तो फ्लॅट सोडायचा निर्णय घेतला. तिचे नशीब चांगले म्हणून प्रिया व तिच्या भावाला जास्त काही झाले नाही. कदाचित निर्णय तिने योग्य वेळी घेतला होता.