लेखिका – स्नेहा बसतोडकर वाणी

“चल पटकन, भराभर पाय चालव.जास्त वेळ नाहीये आपल्या कडे.” अस म्हणत विकी लायब्ररी कडे जाण्याच्या पायऱ्यांवरून पळत वर जाऊ लागला. मी ही त्यांनी सांगित्याप्रमाणे त्याच्या मागे जात होतो. खूप भारी वाटत होत. माझ्या सिनियर स् ना आज माझी गरज भासली होती. थोड्या शंका ही होत्या मनात की इतकं काय काम असेल की ह्यांना ह्यांच्या वर्गातले मित्र सोडून मला सोबत घ्यावंसं वाटल. पण तो सगळा विचार मी मनातून बाजूला सारत ह्या आनंदात होतो की हे काम झाल्या वर माझ्या वर्गातल्या इतर मुलानं मध्ये माझा भाव किती वाढेल. मला नेहमीच सगळे पिडत असतात. ठोंब्या, बावळ ट, ढ अश्या नावांनी हाका मारतात .मुली तर ढुंकूनही पाहत नाहित. आता हे सगळं बदलेल! ह्या विचारांमध्ये कधी लायब्ररी मधे येऊन पोहोचलो कळलंच नाही. मी आपला गुपचूप विकी च्या मागे मागे चालत होतो. 

शेवटी त्या मजल्यावर लायब्ररी च्या एका कोपऱ्यात जाऊन पोहोचलो. तिथे ते दोघे बसले होते. रॉकी आणी जस्टिन. संपूर्ण कॉलेज मधे ते दोघे कोणालाच नाही आवडायचे. कारण सगळ्यांचे रॅगिंग घेताना हे नेहमी पुढे दिसायचे. त्यांना तिथे पाहून माझ्या काळजाचा ठोकाच चुकला. हे माझं ही रॅगिंग घेणार की काय हा विचार करत माझी पाऊल तिथेच थांबली. विकी नी पटकन माझा हात खेचत मला पुढे ओढले आणि ते दोघे बसले होते त्या टेबल वर आम्ही ही बसलो. मला पाहून रॉकी विकी वर जरा रागावला “एखादा बावळट सा ज्युनिअर आण म्हटलं होत पण इतका बावळट? ” विकी वैतागत म्हणाला “मग काय कॉलेज मध्ये पोस्टर लावायचे होते का की सर्वात बावळट ज्युनिअर ची स्पर्धा आहे आपली नाव द्या?” दोन खुर्च्या सोडून बसलेल्या मुली ने मागे फिरून त्यांना हळू बोलायला खुणावले. लायब्ररी असून यांची बडबड चालू होती त्याला त्या तरी काय करणार. ते तिघे कुज बुज करत बोलू लागले. मला विषय माहीत नसल्याने माझे सगळच डोक्या वरून जात होते. म्हणून मी गपचुप बसून सगळे पाहत होतो. 

तेवढ्यात जस्टिन ने टेबल खाली लपवलेले पुस्तक बाहेर काढून टेबल वर ठेवले. ते पुस्तक खूप विचित्र वाटत होत. पळसाच्या पानांनी त्याचा cover शीवलं होत. अतिशय पुरातन काळातील असावे असे वाटत होतं. धुळी नी माखलेले. त्यातली पानं ही अगदी जीर्ण झाली होती. त्यांनी अलगद 10-12 पान पालटून ते एक पान उघडलं. त्यावर एक चौकोनी चिन्ह होते. पत्रिका किंवा कुंडली मध्ये असते ना तसे. त्याच्या आजूबाजूला काही चित्र वीचित्र आकृत्या रेखाटल्या होत्या. मी ते सार पाहून समजण्याच्या प्रयत्न करत होतो इतक्यात विकी नी माझ्या डोक्यावर टपली मारून म्हटल ” ओये काय बघतोय चल हात ठेव त्या चौकोनात.” जरा माझी भीती लपवत मी विचारले “हा सारा काय प्रकार आहे..?”. तर ते मला मुद्दामून म्हणाले “ह्या महान कार्यात तुला सहभागी होता आले हेच तुझं भाग्य समज. ह्या नंतर जगातले हवे ते सगळे मिळवू शकणार आहेस तू. ह्यात 4 जणांची गरज असते म्हणून तुला पकडुन आणलाय.आता सांगतोय ते कर नाहीतर…” पुन्हा मागच्या मुलींनी गप्प बसायला आम्हाला खुणावले. 

मी सांगितल्या प्रमाणे करू लागलो. त्या तिघांनी ही आपली बोट त्या चौकोनी चिन्हात ठेवली. मग ते मला म्हणाले त्या पुस्तकात बघून तुझे नाव सांग. मी म्हणालो सागर. नंतर त्यांनी ही आपली नाव म्हटली. जी मी पहिल्यांदाच ऐकली. विकी च खरं नाव होत विक्रम, जस्टिन च जयंत आणि रॉकी च रोहन. कॉलेज मध्ये इमेज बनवायला ही वेगळी नाव होती त्यांची. मग विकी ने त्यातली लिहलेले मंत्र वाचायला सुरुवात केली. मला तर काही समजतच नव्हत की हे engineering चे विद्यार्थी हे कसल्या फालतू गोष्टी करत आहेत. पण तितक्यात आमच्या टेबल वरची ट्यूब अचानक फुटली. त्यांनी दुर्लक्ष करत पुढे मंत्रोच्चार चालू ठेवला. माझे लक्ष खिडकी बाहेर गेलं तर हळू हळू ढग दाटू लागले होते. वातावरणात अचानक बदल जाणवू लागला होता. मला तर कळतच नव्हत काय झालं. सगळे मंत्र वाचून झाल्यावर ते तिघे जोरात ओरडले “हो..” मी घाबरून आजूबाजूला पाहू लागलो की आता librarian येऊन आम्हाला ओरडणार पण ती मॅडम जागे वरून हललीच नाही.

थोड्या वेळानी माझ्या लक्ष्यात आल, कोणीही कसलीच हालचाल करत नव्हते. सगळे अगदी स्थिर झाले होते. तेवढ्यात माझ्या बोटाला ओलसर पणा जाणवला. मी पाहिलं तर त्या पानावरच्या चौकोनात जिथे आम्ही आमची बोट ठेवली होती तिथे रक्त होत. मी पाहतच राहिलो आणि तितक्यात अजून एक थेंब रक्ताचा पडला. मी झटकन वर पाहिल आणि वरचं दृश्य पाहून मी भीतीने जोरात ओरडलो. छतावर एक भयानक लाल आकृती उलट लटकून आम्हाला पाहत होती. त्याच्या तोंडातून रक्ताचे थेंब ओघळत होते. मी कसलाही विचार ना करता तिथून धावत सुटलो. मनात एकच विचार येत होता “आता पुढे काय होईल. हा काय मूर्खपणा करून बसलोय मी”

अंथरुणातून सकाळी उठलो आणि विचार आला की काय भयानक स्वप्नं होत. आरश्यात स्वतःला पाहिलं आणि जरा हायस वाटलं. चला सगळं नीट आहे स्वप्नच होत. मी नेहमी प्रमाणे सगळं आटपून कॉलेजला जायला निघालो. तेवढ्यात आई ने मला थांबवल “काय रे काल काय झालं होतं रात्री? धावतच घरात शिरला स, सोफ्या वर बॅग टाकलीस आणि रूम च दार बंद केल ते आत्ता उघडतो आहेस.” आईचे शब्द ऐकून माझं हृदय जोर जोरात धड धडू लागलं होतं. म्हणजे ते सार स्वप्नं नव्हत.. आई च बोलणं सुरूच होत ते ऐकून मला अजुन घाम फुटू लागला. “तुझ्या मित्रांचे किती कॉल आले रात्री. कोण तर म्हणे रॉकी, कोण म्हणे विकी. हे कुठले मित्र” ..

“आई मी तुला नंतर समजावतो घरी येऊन आत्ता जाऊदे लेट होतंय”

मी कसा बसा घरातून बाहेर पडलो. मला त्या तिघांना भेटून घडलेल्या विचित्र घटनेचा जाब विचारायचा होता. 

हे सगळं काय करायला लावलं मला. धुंदीत आणि विचारानं मध्ये चालता चालता तीन वेळा माझा अपघात होता होता राहिला. दोन वेळा तर बस ने उडवले च असते असे वाटले. मनात विचार आला चला अजुन तरी नशीब साथ देत आहे. कॉलेज ला पोहचलो तर रॉकी आणि विकी समोरच उभे होते. मी धावतच त्यांच्या जवळ गेलो तर त्यांच्या चेहऱ्यावरचा रंगच उडालेला होता. मी काही विचारणार त्या आधीच त्यांनी माझी कॉलर धरली आणि विचारले “जस्टिन कुठे आहे”.

“मला नाही माहित. मी तर लगेच पळून गेलो होतो”

“पळून कधी गेलास? आम्हाला नाही कळलं?”

“ती भयानक आकृती छतावर पाहिली तेव्हाच पळालो होतो.”

ते दोघं अजुनच विचारात पडले तसे मी त्यांना म्हणालो “काय होत ते. काय चेटूक करत होता तुम्ही लोकं आणि मला ही करायला लावलं”

“अरे अे तुझं तोंड बंद कर. चेटूक म्हणे. जे केलेय ना त्याचा फायदा ही होणार आहे तुला. कुठल दुःख तुझ्या केसाला ही धक्का लावू शकणार नाही. जी इच्छा व्यक्त करशील ते मिळेल. बस गुड लकच गुड लक” 

मनात एकदा विचार आला कॉलेजला येताना 3 वेळा थोड्या साठी वाचलेल्या अपघताच याच्याशी काही घेण देण तर नाही?. हे दोघे खरं बोलतायत? पण हवं ते मिळवण्यासाठी ती भयानक रक्त बंबाळ आकृती आपल्या आस पास राहणार. नको असे गुड लक.

“पण हा जस्टिन कुठे गायब झालाय साला”

मी त्यांना म्हणालो की माझ्या क्लास चा टाईम झालाय आणि निघालो

लेक्चर संपल्या वर मी वॉश रूम ला गेलो. अजुन ही तेच सगळे विचार सुरू होते.”ते दोघे म्हणाले ते खरंच असेल का?  पण जस्टिन कुठे गेला असेल?” एवढ्यात कसल्यातरी आवाजाने माझे विचार थांबले. विचित्र आवाज होता. मी मागे फिरून पाहिलं तर डस्ट बीन मधून येत होता. मी पुढे जाऊन पाहणार तेवढ्यात ते अचानक हलू लागल. मी जागीच थांबलो. एखादी मांजर वगैरे घुसली असेल तर अंगावर यायची. पण ते काही जास्तीच हादरू लागलं. मला काही समजेल इतक्यातच ते आडव झालं आणि त्यातल्या वस्तू बाहेर पडल्या. जे डोळ्या समोर दिसलं ते पाहून माझा श्वासच कमी पडू लागला. त्या ड स्ट बिन मधून जस्टिन च डोकं, हाथ, पाय आणि धढ सगळ्यांचे तुकडे बाहेर पडून जमिनीवर विखुरले होते आणि झटपटत होते. मला काही समजण्या च्या आतच पुन्हा माझ्या मागचा बल्ब फुटला. जस्टिन च्या तुटून पडलेल्या शरीरात ही प्राण बाकी होता. तो अतिशय वेदने ने कळवळत मला म्हणाला “आपण चुकलो. जो मूर्खपणा आपण केला आहे त्याला सुधारा. काही मार्ग शोधा. त्या पुस्तकात..”

एवढं म्हणत वरून कसले थेंब माझ्या वर पडू लागले. मी घाबरत वर पाहिलं आणि माझ्या काळजात धस्स झालं. तीच रक्तान बरबटले ली विचित्र आकृती आमच्या वर होती. काही समजण्याआधीच त्या पिशाच्च ने ने झेप घेतली आणि जस्टिन च्या शरीराचा एक एक अवयव एखाद्या अधाशी प्राण्या सारखे खाऊ लागले.. मी आपला जीव वाचवून तिथून पळालो. संपूर्ण कॉलेज मध्ये विकी आणि रॉकी ला शोधू लागलो. तो भयानक प्रकार पाहून भीतीने धडकीच भरली होती. त्या दोघांना शोधून त्यांना हे सगळं सांगायचं होता. मी धावत त्यांच्या नेहमी च्या अड्ड्या वर गेलो तिथे रॉकी एकटाच बसला होता. मी त्याला सगळा प्रकार सांगितला आणि जस्टिन ने शब्द ही सांगितले. तसे ते मला वेड्यात काढतच म्हणाला “काय फालतू बोलतोय कॉलेज मध्ये ही लावून आला आहे का?” 

मी त्याला स्वतः सोबत त्या वॉश रूम मध्ये यायला सांगितलं. पण तीथे पोहोचलो तर काहीच नव्हत. ना ती डस्ट बिन ना जयंत च्या शरीराचे तुकडे ना ते असल्याचे कोणतेही पुरावे. रॉकी ला आता अगदी पक्के झाले की मी दारू वगैरे प्यायलो आहे आणि काहीही अभद्र बडबडतोय. “वीकी कुठे आहे?” मी त्याला विचारलं. 

तसे तो म्हणाला “तो ही साला मला टांग देऊन कुठेतरी गचकला वाटत” 

मी रॉकी ला समजावून सांगू लागलो “माझ्यावर प्लीज विश्वास ठेव. आपण मोठ्या प्रॉब्लेम मध्ये आहोत. जस्टिन ला नाही वाचवू शकणार पण जर विकी अजुन जिवंत आहे तर त्याला तरी वाचवू.”

तसे तो चिडून च म्हणाला “तुझं डोकं कामातून गेलंय. तुला आमच्यात घेतला तर तुझ्या डोक्यात हवा भरली आहे वाटत. थांब जस्टिन ला कॉल लावतो” अस म्हणत त्याने ने जस्टिन ला कॉल लावला. पण जस्टिन चा फोन आम्ही उभे होतो त्याच्या मागच्या बाजूने वाजू लागला. आम्ही दोघांनी ही एकाच वेळेस मागे वळून पाहिलं. मागे असलेल्या बेसिन मध्ये जस्टिन चा रक्ताने माखलेला फक्त पंजा होता आणि त्यात घट्ट पकडलेला मोबाईल. ते पाहून आम्ही तिथून पळतच बाहेर निघालो. आता रॉकी ला ही विश्वास बसला होता की आम्ही खरंच खूप मोठी चूक करून बसलो आहोत. अख्या कॉलेज मध्ये फिरून विकी ला शोधू लागलो. पण 15-20 मिनिटानंतर आमच्या लक्ष्यात आलं की कॉलेज च्या पीक अवर्स मध्ये जेव्हा कॉलेज संपूर्ण भरलेले असायचे त्या वेळेस ही कॉलेज मध्ये कोणीही नव्हत. सगळं सामसूम होत. एक वेगळीच जीव घेणे शांतता पसरली होती

आम्ही धडधडत्या हृदयाने सगळ्या कॉलेज मध्ये विकी ला शोधू लागलो. मदत मागण्यासाठी कोणीच राहिल नव्हत. प्रत्येक क्षणाला आई बाबांचा विचार मनात येत होता. त्यांना पुन्हा भेटू शकेन की नाही. जस्टिन च्या शरीराचे ते तुकडे, त्याच्या नजरेतील रडवून टाकणारे भाव, ते पुस्तक! ते पुस्तक! तिथून तर हे सार सुरु झाला होत. त्यात हे थांबवायचा उपाय ही असेल. मी झटकन त्याला म्हणालो “तुम्हाला ते पुस्तक कुठून मिळाल होत?”

“विकी घेऊन आला होता. त्याला ते लायब्ररी मधून मिळाल होतं. एका सीनिअर कडून कळलं होत अस म्हणाला होता. आम्हीच लालसे पोटी आंधळे झालो म्हणून हा मूर्खपणा केला आणि मृत्यू ओढून घेतला”

“ते पुस्तक आता कुठे आहे. जस्टिन म्हणाला होता त्या प्रमाणे त्यात काही उपाय ही असेल” मी म्हणालो.

“विकीच घेऊन गेला होता ते. त्यांनी लायब्ररी मध्येच ते पुन्हा लपवलं होता. पण त्यांनी जागा सांगितली होती तिथे पाहू शकतो. पण काही उपयोग होणार नाही कारण मला त्यात लिहिलेलं वाचता येणार नाही. ते फक्त विकीला च कळायचं”

“पाहू काही मार्ग निघेल.आधी पुस्तक मिळवू” एवढं म्हणून आम्ही लायब्ररी कडे जाऊ लागलो. एव्हाना संध्याकाळ होऊन गेली होती आणि अंधार पडायला सुरुवात झाली होती. ती निर्मनुष्य बिल्डिंग अशीही भयाण वाटत होती त्यात रात्री च्या अंधारात त्या बिल्डिंग च्या भिंती आम्हाला खायला उठतं होत्या. पण जीव वाचवण्या साठी आम्हाला आमच्या भीती वर मात करण्या पलीकडे काही पर्याय नव्हता. आम्ही मोबाईल च्या टॉर्च लाईट ने पायऱ्या चाचपडत पुढे जाऊ लागलो. 

तेवढ्यात रॉकी कश्यावरून तरी घसरून पडला. तसे मी ही टॉर्च लाईट खाली फिरवली आणि पुन्हा हृदयात दबलेल्या भीती च्या लाटांना उधाण आले. तिथे जमिनी वर रक्ताचे थारोळे साचले होते. त्यात मोठ्या पावलांचे निशाण होते. म्हणजेच ते नर पिशाच्च जवळच होते. कदाचित आम्हालाच शोधत होता. मी हात देत रॉकी ला उभा केले. आता त्याचे ही कपडे पुढून रक्ताने माखले होते. तेवढ्यात अचानक लाईट सूरू झाली. पण त्याचा आम्हाला आनंद होण्या ऐवजी एक अनामिक भीती वाटली. कारण आमच्या वर असलेल्या ट्यूब लाईट चा प्रकाश आमच्यावर पडत नव्हता. तो प्रकाश कसल्या तरी गोष्टीमुळे अडला जात होता. वर पाहण्याची हिम्मत नव्हती होत. आम्ही दोघांनी एकमेकांकडे पाहिलं आणि काही समजण्याच्या आत त्या नर पिशाच्च ने रॉकी च्या अंगावर झेप घेतली.

माझ्या शरीरात आता कसलाच त्राण उरला नव्हता. विजेचा तीव्र झटका लागल्यासारखा मी जागच्या जागीच स्तब्ध उभा होतो. मृत्यू ला एवढ्या जवळ पाहून जणू भीतीनेच जीव शरीरातून बाहेर निघून गेला होता. त्या नर पिशाच्च ला मी अगदी जवळून पाहत होतो. शरीरावरून त्वचा काढून टाकल्यावर जसे वाटेल तसे त्याचे शरीर रक्ताने बरबटले होते. डोळे अगदी लाल भडक. हाताचे पंजे अतिशय मोठे होते आणि नखं एखाद्या नर भक्षी जनावरा सारखी होती. रॉकी वेदनेने कळवळत होता. मदती साठी हाका मारत होता. त्याच्या हाका ऐकून मी पुन्हा भानावर आलो. मला काहीही करून त्याला वाचवायचे होते. मी काही करण्याच्या आत त्याने आपला जबडा उघडला आणि रॉकी च्यामारी खंद्यात रुतवला. पुढच्या क्षणी एका जोरदार झटक्याने रॉकी चा उजवा हात तोडला आणि खायला सुरुवात केली. 

रॉकी जिवाच्या आकांताने किंचाळला. मी कसला ही विचार नं करता शरीरात ली सगळी शक्ती एकवटून बाजूला असलेली खुर्ची उचलली आणि त्या नरपिशाच्च वर जोरात भिरकावली. तसे तो रॉकी ला सोडून बाजूला झाला पण त्याच्या जबड्यात रॉकी चा निखळलेला हात होता आणि तो खाण्यात तो मग्न झाला होता. मी क्षणाचाही विलंब न करता पटकन रॉकी ला खेचत लिफ्ट जवळ नेले. आम्ही लिफ्ट मध्ये शिरलोच होतो एवढ्यात ते पिशाच्च पुन्हा आले आणि रॉकी चा पाय धरुन बाहेर खेचू लागले. मी पटकन लिफ्ट चे बटन दाबले आणि रॉकी ला कसे बसे आत ओढले. पण त्याने एवढ्या ताकदीने त्याचा पाय ओढला की लिफ्ट च दार बंद होण्याच्या आधीच त्याचा पाय मुळातून उपटून बाहेर पडला. असंख्य वेदनेने आणि रक्तस्त्राव झाल्यामुळे रॉकी लिफ्ट च्या आतच बेशुद्ध पडला. मला काही समजण्याच्या पलीकडे सगळा प्रकार चालला होता.

कसे बसे उरलेल्या आयुष्याचे क्षण मोजत आम्ही लायब्ररी च्याच मजल्यावर पोहोचलो. मी रॉकीला खेचून बाहेर काढलं आणि तिथे ठेवलेल्या फिल्टर मधले पाणी घेऊन त्याचा तोंडावर शिंपडले. त्याला शुद्ध आली पण तो वेदनेने कळवळत रडत होता. मला त्याची अवस्था पाहवत नव्हती. पण ते पुस्तक शोधण्या पलीकडे काही पर्याय ही नव्हता. “तू प्लीज मला इथे सोडून जाऊ नकोस” रॉकी कण्हत म्हणाला. मी ही त्याला त्या अवस्थेत सोडणार नव्हतो. मी त्याचा डावा हात आपल्या उजव्या खांद्यावर ठेवला आणि त्याला कसे बसे करत त्या टेबल वर पोहोचलो जिथे आम्ही काल बसून त्या पुस्तकातून मंत्र वाचले होते. मी रॉकी ला तिथे बसवले आणि त्याचा पाय आत सरक वायला खाली वाकलो तर ते पुस्तक तिथेच पडल होत. नशिबावर विश्वासाचं नव्हता बसत. मी पटकन ते पुस्तक उचलून वर ठेवलं आणि त्याची पान हळू हळू पलटू लागलो.

त्यात त्या मंत्रान शिवाय काही चित्र आणि आकृत्या ही काढलेल्या होत्या. मी विकी ला पुन्हा एकदा कॉल लावला आणि रॉकी उरला सुरला त्राण एकटवून डाव्या हातानी ती पान पलटवून त्यातले चित्र समजण्याच्या प्रयत्न करू लागला. तिथली जीव घेणी शांतता विकी च्या फोन च्या रिंग नी भंग झाली. मी पटकन रिंग च्या आवाजाच्या दिशेने पळालो. तेवढ्यात दोन बुक शेल्फ च्या मधल्या जागेत रक्ताचा थारोळ दिसलं. मी तिथे पोहोचलो तर विकीचा देह निपचित होऊन तिथे पडला होता. त्याच्या जवळ जाणार इतक्यात रॉकी ची आर्त किंचाळी ऐकू आली आणि मी पुन्हा त्याचा जवळ पळत गेलो. तिथे पोहचलो तर ते पिशाच्च त्याच्या पाठीवर बसला होते. मी कसला ही विचार ना करता त्याच्यावर झेप घेऊन त्याला रॉकीच्या अंगावरून लांब ढकलले. त्यांनी माझ्या मानेत आपली नखं रोवली. मी ही वेदनेने कळवळू लागलो. 

त्या झटापटी मूळे माझे ही शरीर रक्ताने माखले होते. रॉकी च्या हाका मागून ऐकू येत होत्या “आपण चुकलो, आपला विश्वासघात झालाय, आपण आता नाही वाचणार” एवढ्यात त्या पिशाच्च ने माझ्या छातीचा एक मोठा चावा घेतला. मी कळवळत किंचाळत तिथे पडलो. शरीरात कसलाही त्राण उरला नव्हता. डोळे नुसते रॉकी जवळ फिरवले आणि त्याच्या मृत्यूचे दृश्य डोळ्या समोर पाहत तिथे च निपचित पडून राहिलो. त्याचे एक एक अवयव त्या पिशाच्च ला खाताना पाहण्या शिवाय दुसरा काही पर्याय नव्हता. रॉकी चे शब्द डोक्यात घुमत होते. आधी जस्टिन, मग विकी आणि आता रॉकी चा अंत माझ्या डोळ्यांसमोर होत होता.स्वतःचे ही असेच अंत होणार असा विचार करत माझ्या मृत्यू चे क्षण मोजत होतो.

एवढ्यात रॉकी ची शेवटची हाक ऐकू आली “मला वाचव मित्रा” बस.. त्या शब्दांसाठी सारा उरला सुरला जीव एकवटून मी उभा राहिलो आणि त्या पिशाच्च ला रॉकी वरून दूर ढकलले. ते पुन्हा उभ होण्याआधीच मी पूर्ण ताक दी निशी एक संपूर्ण बुक शेल्फ त्यांचावर पाडल. ते नर पिशाच्च तिथे काही वेळ तडफडत राहिल आणि मग शांत झाल. मी सुटकेचा निःश्वास सोडून रॉकी कडे फिरलो पण खूप उशीर झाला होता. शरीरात काही त्राण उरले नव्हते. मी भिंती ला धरत पुढे चालू लागलो. सकाळ झाली होती. कालच्या संपूर्ण दिवसात काही खाल्लं ही नव्हता त्यामुळे खूप भूक ही लागली होती. खूप रक्त स्त्राव झाल्याने चक्कर येत होती, छत आणि खालची जमीन सगळे एकच वाटत होत.. मला गरगरत होते. इतक्यात मला असा वाटला की कोणीतरी मला बोलावत य..

मी कसा बसा भिंतीला पकडत आवाजा च्या दिशेने सरकू लागलो. खूप भूक लागली होती म्हणून खूप चक्कर येत होती, त्यात काही समजत नव्हत. पण बस तो आवाज होता ज्याचा दिशेने मी जात होतो. पण आजू बाजूचे वातावरण पुन्हा त्या पहिल्या दिवसा सारखे होऊ लागले. पुन्हा ढग दाटून आले. पुन्हा ते पिशाच्च येणार की काय ह्या भीतीने माझी पाऊल अजुनच जड होऊ लागली. कसा बसा सरकत त्या अवाजा पर्यंत पोहचलो. किती काळ उलटला होता ते ही समजत नव्हत. पण जे डोळ्यां समोर होत ते समजण्या पलीकडच होत. इतक्या वेळ चालूनही मी पुन्हा लायब्ररी मध्येच होतो पण जमिनीवर नाही.. छतावर. खाली टेबलवर चार जण बसले होते, त्याच जीर्ण पुस्तकाच्या पानांवर आपली बोट ठेवून. 

मला काही समजेना स झाला होता. माझ्या जवळ लटकत असलेल्या ट्यूब लाईट च्या काचेत मी स्वतःच प्रतिबिंब पाहिले आणी विजेचा तीव्र झटकाच बसला. मी अगदी त्या पिशाच्च सारखाच दिसत होतो. मी रागाच्या भरात ती ट्यू ब फोडून टाकली आणि खाली बसलेल्या त्या चौघांनी वर पाहिलं. माझ्या रक्ताचे थेंब खाली पडत होते. आणि माझी नजर त्या एका चेहऱ्यावर अडकली. विकी! आणि रॉकी चे शब्द पुन्हा डोक्यात घुमू लागले. आपल्या सोबत विश्वासघात झाला आहे. म्हणजे काल लायब्ररी मध्ये रक्ताच्या थारोळ्यात विकी चे मृतदेह नव्हता. तो तिथे मृत असण्याचे नाटक करत होता. रॉकी ला बहुतेक ती चित्रं पाहून सगळा अर्थ आधीच लागला होता विकी च्या कारस्थनाचा. तो सगळ्यांना लालसेत फसवून स्वतः चे काळे हेतू साध्य करत होता. मी समजलो होतो की खरा बळी तर माझाच गेला होता. पण मी हतबल होऊन इतरांसारखे त्या नराधमाच्या तालावर नाचणार नाही. आता शेवटचा बळी जाणार माझ्या हातून तो त्याचाच..

तुम्हाला या कथेचा शेवट कळला नसेल तर या लिंक वर क्लिक करा..

Leave a Reply