अनुभव – आतिश सावंत

९ मे २०१८ ही तारीख मी कधीही विसरू शकणार नाही. अगदी आजही ही तारीख आठवली की माझ्या अंगावर सरसरून काटा येतो. माझा मामा, मामी, त्यांचा मुलगा वेदांत आणि मी आम्ही चौघ अहमदाबाद ला जायला निघालो होतो. सकाळी ८ च्याच सुमारास निघालो होतो कारण ९ ची गाडी पकडायची होती. वेळेवर निघाल्यावर गाडी मिळाली आणि साधारण १२.३० ला आम्ही पोहोचलो. स्टेशन वरून रिक्षा करून ठरवलेल्या जागी पोहोचलो आणि आम्ही संजय दादा ला फोन लावला. संजय दादा म्हणजे माझ्या मामी चा मोठा भाऊ. आम्ही लाडाने त्याला दादा म्हणतो. दादा पुढच्या काही मिनिटात आम्हाला घ्यायला आला आणि आम्ही तिथून त्या सोसायटीत गेलो. 

सोसायटी च्याच अलीकडे चार रस्ता होता. म्हणजे तिथे चार वेग वेगळ्या दिशेला जाणारे रस्ते एकत्र येत होते. हे सांगण्याचे विशेष कारण म्हणजे तिथे उतारे आणि नारळ वैगरे काढून ठेवले होते. दादा आम्हाला चालताना म्हणाला सुद्धा की इथे जरा नीट लक्ष देऊन चाला, पायखाली काही येऊ देऊ नका. मी हो म्हणालो आणि मला वाटलं की तो आमच्या काळजीपोटी बोलला असेल. आम्ही घरी पोहोचलो. वहिनीने आमचा छान पाहुणचार केला. दादा आम्हाला घरी सोडून लगेच मटण वैगरे आणायला बाहेर निघून गेला. दुपारी थोडे उशीराच म्हणजे ३ ला आम्ही जेवलो आणि थोड्या वेळ आराम केला. गप्पा वैगरे झाल्या. संध्याकाळी चहा नाश्ता करून आम्ही बाहेर बागेत फिरायला गेलो. माझ्यासाठी परिसर नवीनच होता. रात्री १० ला जेवण उरकून आम्ही गच्चीवर गेलो. 

खूप दिवसांनी असा निवांत वेळ मिळाला होता. आमच्या गप्पा, मजा मस्करी सुरू होती. बोलता बोलता भुताच्या गोष्टी सुरू झाल्या. तसे आजी एक गोष्ट सांगू लागली. आणि ती एक गोष्ट तिथलीच होती. साधारण १० वर्षांपासून तिथलं समोरच एक घर बंद होत. त्या घरात आग लागल्यामुळे त्या घरातील संपूर्ण कुटुंब जळून खाक झाला होत. असे म्हणतात की त्या घरातल्या बाईची आत्मा अजूनही तिथे वास करते आणि रात्री अपरात्री लोकांना दिसते. तेवढ्यात मी मध्येच म्हणालो “छे छे असे काही नसते भूत प्रेत सगळे मनाचे खेळ आहेत.” तेव्हा आजी मला म्हणाली की ज्या दिवशी तुला दिसेल ना तेव्हा कळेल आता समजणार नाही. मी आजीचे बोलणे हसण्या वरी नेले. पण पुढे काय वाढून ठेवलंय याची पुसटशी कल्पनाही मला नव्हती. 

सकाळी वहिनी बाजारात भाजी वैगरे गेली. ती दुपारी १ वाजता घरी आली. काही वस्तू खरेदी केल्या होत्या. थोडा खाऊ वैगरे ही आणला होता. घरी आल्यावर ती फ्रेश झाली आणि उन्हातून आल्यामुळे थोडा वेळ विश्रांती म्हणून सोफ्यावर बसली. काही वेळा नंतर जशी ती उठली तशी तिला अचानक चक्कर आली. तिचा तोल गेला आणि ती खाली पडली. चक्कर आली तरी ती शुद्धीत असायला हवी होती. पण खाली पडल्यावर आम्ही तिला उठवायचा प्रयत्न केल्यावर कळले की ती बेशुद्ध पडली आहे. वहिनीच्या तोंडावर पाणी शिंपडले तरी वहिनी काही डोळे उघडे ना.. घरातले सगळे जरा घाबरले. दादाने पटकन डॉक्टरांना बोलावले. डॉक्टरांनी काही गोळ्या आणि इंजेक्शन दिले. काही वेळानंतर वहिनी शुद्धीवर आली. 

मी तिला विचारले “वहिनी आता कसे वाटते य”..  तसे वहिनी ने एकदम रागात माझ्या कडे पाहिले आणि वेगळ्याच आवाजात म्हणाली “तुला काय करायचे आहे तू तुझे काम कर गपचूप”. सुरुवातीला मला वाटलं वहिनी मस्करी करत असेल म्हणून मी वहिनीला म्हणालो “काय वहिनी मस्करी करताय”.. तसे वहिनी एकदम जोरात रागाने ओरडून म्हणाली “तुला एकदा सांगितलं तर कळत नाय का जा इथून”. वहिनी तावातावा त पलंगावरन उठून दरवाजाच्या उंबरठ्यावर जाऊन बसली. मी एकदम विचारात पडलो म्हणून मी वहिनीच्या मुलाला त्यांच्या हातात दिले. पण कल्पना ही करवणार नाही असे दृश्य मी पाहिले. त्यांनी त्यांच्या मुलाला चक्क फेकून दिले आणि गुजराती बाईच्या आवाजात बोलली “आ मारो छोक्रो नथी एने लै जाओ नही तो हू एने मारी नाकीस”.. वहिनी फक्त एकच शब्द तोंडातून काढत होती. मला तर काय घडतंय हेच कळत नव्हते. 

वहिनी आत निघून गेली. मी दादा ला सांगायचे म्हणत होतो पण तो नेमका उशिरा घरी आला. मी पाणी आणण्यासाठी किचनमध्ये गेलो आणि बघतो तर काय वहिनीने हातात सूरी घेतली होती आणि स्वतःची नस कापाय चा प्रयत्न करत होती. तेवढ्यात मी जाऊन वहिनीला पकडले आणि तिच्या हातातून सूरी काढून घेतली. पण ती अगदी चव ता ळली. ओरडू आणि किंचाळू लागली. मी आणि दादांनी तिला कसे बसे सावरले आणि कसे तरी एका खोलीत बांधून झोपवले.. दुसऱ्या दिवशी सकाळी ती उठली आणि विचारू लागली की मला बांधून का ठेवलंय. तसे दादा ने तिला विचारले “तुला काल काय झाले होते ? अशी का वेड्यासारखी वागत होतीस”. तसे ती म्हणाली “काय बोलताय तुम्ही.. मला काहीही आठवत नाहीये”.

मला वाटलं की वहिनी खरे बोलत असेल म्हणून मी दादाला बोललो दादा जाऊ दे आता तो विषय काल जे झालं ते झालं. असे म्हणून दादानी पण विषय तिथेच थांबवला. सकाळी दादा देव पूजा करायला गेला आणि जसे देवाजवळ दिवा लावला तसे वहिनी अगदी जोरात किंचाळली आणि पुन्हा चिडून म्हणाली ” दिवा लावू नकोस कळत नाय का तुला”. आता मात्र दादा ला कळून चुकले की घडत असलेला प्रकार काही साधा सुधा नाही. तिच्यावर उपाय करण्यासाठी एकाला बोलावले पण त्याने सांगितलेला उपाय करूनही काही फरक पडला नाही. सगळे खूप चिंतेत होते. आता एक च मार्ग होता तो म्हणजे संकटमोच न हनुमान. आम्ही तिला हनुमानाच्या मंदिरात घेऊन गेलो. 

तिथे गेल्यावर ती खूप च बिथरली होती. खूप घाबरली होती आणि पाळायचा प्रयत्न करत होती. खरे तर वहिनी नाही पण तिच्यात जे काही होते ते घाबरले होते आणि असे वागत होते. पण आम्ही मात्र तिला धरून ठेवले होते. कसे बसे आम्ही तिला खेचत आणून मंदिराच्या गाभाऱ्यात आणले तशी ती एकदम शांत झाली आणि बेशुध्द पडली. थोड्या वेळाने तिला शुद्ध आली. दादाला घट्ट मिठी मारून जोर जोरात रडू लागली. आम्ही मारुतीच्या पाय पडून घरी गेलो. घरी गेल्यावर वहिनीला शांत पाने विचारले की तू रस्त्यात कुठे कशावर पाय दिला होतास का. तसे वहिनी म्हणाली की मी आणि माझी एक मैत्रीण आम्ही त्या चार रस्त्यावर खाण्या बद्दल बोलत होतो. बहुतेक तेव्हा काही तरी झाले असावे. असे म्हणतात की अश्या ठिकाणी जिथे उतारे काढून ठेवले जातात तिथे खाण्यापिण्याच्या वस्तू बद्दल कधीही चर्चा करायची नसते. जर कधी एखाद्या अतृप्त आत्म्याने असे ऐकले तर ते आपली पाठ सहजा सहजी कधीही सोडत नाहीत.

Leave a Reply