लेखिका – स्नेहा बस्तोडकर वाणी

स्वाती ने हळूच आपल्या बाजूच्या रस्त्यावर ऑटो च्या मागच्या सीट वरून बसल्या बसल्या बाहेर एक नजर टाकली. चांदण्यांच्या मंद प्रकाशात अगदीच निर्मनुष्य अश्या रस्त्या वरून त्या अमानवी शांततेला भेदत त्यांची ऑटो पुढे चालली होती. स्वतःच्या कपाळा वर हळूच हात मारत ती मनात विचार करू लागली “आज अमावस्या आहे. मी हे कस विसरली. आई ने अमावस्येच्या रात्री प्रवास करायला नाही म्हटलंय” तिच्या मनात ही चाल बीचल सुरू असतानाच ऑटो च्या ऑडियो प्लयेर वर स्वामी समर्थांचा तारक मंत्र सुरू झाला आणि तीला जरा हायसे वाटले. बाजू ला बसलेली शीला ही ते सोबत म्हणू लागली. ते ऐकता ऐकता कधी मृत्युंजय बंगल्यावर येऊन पोहोचले त्यांना कळलंच नाही. स्वाती ऑटो वाल्याला पैसे देत खाली उतरली. मागून शीला नी उतरता उतरता त्याला विचारले “दादा इथे सहज ऑटो मिळते का?” 

“नाही ताई. हे शहरा हून खूप दूर आहे. इथे रहदारी नसल्याने ऑटो मिळण्या चे काही नक्की नाही”

“तुमचा नंबर देता का मग म्हणजे आम्ही एक दीड तासाने इथून परत जायला निघू. तेव्हा तुम्हाला कॉलl लावू तुम्ही याल ना?” 

“हो ताई हरकत नाही”.. 

शीला आणि ऑटो वाल्याचा हा संवाद सुरू असताना स्वाती ची नजर मात्र बंगल्याच्या गेट वर असलेल्या कोरीव कामावर टीकली होती. अस वरून पाहायला खूप सुंदर पण काही क्षण बघत राहिले तर त्या कलाकृत्या खूप विचित्र भासत होत्या. ती त्यांचा अर्थ लावायचा प्रयत्न करत असतानाच मागून शीला तिच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाली “चला स्वाती teacher जाऊया आत”.. स्वाती होकारार्थी मान डोलवत गेट उघडुन आत जाऊ लागली. दोन्ही बाजूला सुंदर लॉन आणि मधून दगडांच्या केलेल्या पायवाटेवरून त्या दोघी आत जात होत्या. तिथे एक वेगळीच शांतता भासत होती. इतकी हिरवळ असूनही एखाद्या रात किड्याचा देखील आवाज तिथे नव्हता. त्या दोघी ही निमूटपणे चालत आत बंगल्याच्या दारा समोर येऊन थांबल्या. दार उघडच होत.त्यांनी तरी ही दार ठोठावण्या साठी हात वर केला एवढ्यात आतून एका लहान मुलाची हाक ऐकू आली “या टीचर आम्ही तुमचीच वाट पाहतोय”..

त्या दोघी ही जरा चपापल्या. त्यांनी हळू च आत येऊन आवाजाच्या दिशेने पाहिलं. समोर एका आलिशान प्रशस्त सोफ्यावर त्या बांगल्याचे मालक आणि सुप्रसिद्ध ventriloquist (वेंट्री क्यु लिस्ट) मिस्टर झुंझार राव बसले होते.त्यांच्या हातात त्यांचा एक बोलका बाव्हला होता. त्या दोंघिंकडे हॅलो चा हात्वरा करत त्यांनी पुन्हा त्या बाव्हल्याच्या आवाजातून म्हटले ” टीचर या ना आम्ही कधी पासून तुमची वाट पाहतोय”

त्या दोघी ही स्मित हास्य करत पुढे येऊन झुंझार रावांच्या समोरच्या सोफ्यावर बसल्या. 

“रस्ता शोधण्यात काही त्रास तर नाही झाला ना टीचर”

“नाही तुमचा हा बंगला शह राहून लांब अस ला तरी खूप प्रसिद्ध आहे” स्वाती हातातली पर्स बाजूला ठेवत म्हणाली.

“विज्या, पाहुणे आलेत पाणी आण” ती हाक त्या भव्य बैठकी मध्ये गुंजल्या सारखी झाली. त्या प्रत्येक पसरणाऱ्या प्रतिध्वनी सोबत स्वाती ची नजर तिथे ठेवलेल्या वेग वेगळ्या कलाकृती आणि पेंटिंग्ज वर फिरू लागली. तिथल्या प्रत्येक वस्तूंना पाहून स्वाती ला काही वेगळीच अस्वस्थता वाटत होती. तिथल्या प्रत्येक चित्रात तीला डोळ्यांना दिसण्याच्या पलीकडले काही वेगळेच भासत होते.

“कुठे हरवलात स्वाती मॅडम? पाणी घ्या.तुम्ही आज माझ्या आमंत्रण ला मान देऊन इथे आलात मला खरंच खूप आनंद झाला”

“तुम्ही आम्हाला तुमच्या बोलक्या बाव्हल्यांचा संग्रह दाखवण्या साठी बोलावलं हे आमचच भाग्य आहे.” शीला पाण्याचा रिकामी ग्लास समोर ट्रे मध्ये ठेवत म्हणाली.

“स्वाती मॅडम अहो तुम्ही का गप्प आहात. माझा हा नवा बाव्हला तुम्हाला फारच आवडलेला दिसतोय”

स्वाती त्या बाव्हल्या वर लागलेली तंद्री हटवत म्हणाली “हो छान आहे. खूप जिवंत वाटतो आहे. तुम्ही खूपच उत्तम puppets बनवता.. का कोण जाणे पण हा चेहरा कुठे तरी पहिल्या सारखा वाटतोय.”

“हे त्याला घातलेल्या पोषाखा मुळे.. तुमच्या लक्षात आलं नाहीये वाटतं हा तुमच्याच शाळे चा युनिफॉर्म आहे”

“अरे हो. हे का बर?” स्वाती स्वतःच्या मनातली अस्वस्थता तिच्या कृत्रिम हास्या मागे लपवत म्हणाली

“माझा नियम आहे. मी जितक्या शाळांमध्ये माझ्या बोलक्या बाव्हल्यांचे शो करायला जातो तिथली आठवण म्हणून मी तिथून स्वतः सोबत काही घेऊन येतो”

“म्हणजे?”

“म्हणजे गेल्या आठवड्यात जेव्हा तुमच्या शाळेत माझा शो झाला त्या नंतर मी तुमच्या शाळेचा युनिफॉर्म आणून त्याला साजेसा बाव्हला बनवला आणि आता हा माझ्या संग्रहाचा भाग होणार. माझ्या कडे असे अनेक शाळेच्या युनिफॉर्म मधले विद्यार्थ्यांचे बाव्हले आहेत”

हे ऐकून स्वाती ची अस्वस्थता अजून ही वाढत चालली होती.हे खूप विचित्र होत. तीनी पुढे एकही प्रश्न विचारला नाही आणि निमूटपणे हातातल्या गलासातल पाणी पिऊ लागली.

“टीचर मला वाचवा”.. एक केविलवाणी हाक स्वातीच्या कानावर पडली.. तो आवाज एका लहान मुलाचा होता. तिची नजर पटकन समोर ठेवलेल्या बाव्हल्या वर गेली.

“असं का म्हणालात?”तिने झुंजार रावांना विचारलं.

“काय म्हणालो?”

“आत्ता तुम्ही ह्या बावल्या च्या आवाजात म्हणालात ना”

“अहो स्वाती टीचर झुंजारराव कधीचे माझ्याशी बोलत आहेत” शीला म्हणाली

स्वातीला काही कळेनासे झाले.. तिने तो आवाज नक्की ऐकला होता.. तो तिचा भास नव्हता.

तेवढ्यात विज्या म्हणजे त्यांचा नोकर ग्लास मध्ये निळसर रंगाचे सरबत घेऊन आला.

“हे खास परदेशातून मागवलेलं सरबत आहे मी माझ्या प्रत्येक पाहुण्यांना हे सरबत नक्कीच देतो”

त्या सरबताचा पहिलाच घोट घेतला होता आणि तेवढ्यात झुंजार रावांचे हे वाक्य ऐकून पुढे सरबत प्यायची स्वातीला इच्छाच नाही झाली काहीतरी विचित्र होतं ह्या सगळ्या मध्ये. पण तिला नाईलाजाने ते प्यावे लागले.

“तुमचे सरबत पिऊन झाले की मी तुम्हाला माझे बाहुल्यांचे कलेक्शन दाखवतो. तोपर्यंत विज्या टेबलवर जेवण लावेल. माझ्या सगळ्या बाहुल्या मधलं माझं सर्वात आवडतं आहे शाळेतल्या विद्यार्थ्यांचे कलेक्शन पण ते अजून पूर्ण नाही आहे त्यात एका बाहुलीची कमतरता आहे.”

“कसली?” 

“त्या विद्यार्थ्यांच्या टीचर ची”

हे ऐकून स्वातीला ठसकाच लागला.

“सावकाश टीचर तुम्हाला कलेक्शन बघण्याची फारच घाई झालेली दिसते”

स्वाती त्यावर काहीच नाही बोलली. तिला बस आता तिथून पटकन परत घरी जायचे होते.

त्यांचे सरबत पिऊन झाले तसे झुंजारराव हातातला बा हूला घेऊन उभे झाले “चला टीचर तुम्हाला माझे कलेक्शन दाखवतो”

स्टोर रूम च्या दारा जवळ आलेच होते तेवढ्यात शीला चा फोन वाजला.

“इथे आत मध्ये रेंज येणार नाही तुम्हाला बाहेरच थांबून बोलावे लागेल”

तसं शीलाने फोन उचलून पुन्हा सोफ्याजवळ जाऊन बोलायचे सुरू केले.

“स्वाती टीचर, हा घ्या बाहुला” झुंजार रावांनी हातातला भाऊला स्वातीला देत म्हटले “तुम्ही आत जाऊन सगळे बाहुले बघा मी आलोच जरा मला काही काम आठवलं. ह्याला सगळ्यात शेवटच्या शेल्फवर रिकाम्या जागी ठेवा.”

एक गुढ हास्य करत झुंजार रावांनी स्वातीला स्टोर रूम च दार उघडून दिलं.

आत जायला स्वातीचा पायाच उठत नव्हता पण तेवढ्यात मागून झुंजार रावांचा आवाज आला “जा… मॅडम”

स्वातीचे मन लाख नाही म्हणत असतानाही कोण जाणे का तो आवाज ऐकून आपोआप तिची पावलं त्या स्टोअर रूम मध्ये पडली.

त्या खोलीतले वातावरण काही वेगळेच होते. तिथे खूपच गार वाटत होते. घरामध्ये एसी लावलेला नव्हता पण ह्या रूम मध्ये कोल्ड स्टोरेज असल्यासारखे वाटत होते. पण स्वातीच्या हातातला तो बाहुला मानवी शरीरा सारखा गरम होता. हातामध्ये एखादा बॉम्ब घेऊन चालत असल्यासारखे तिला वाटत होते. त्या रूम मध्ये तिथले बाहुले बघण्यासाठी ती आली होती पण आता नजर वर करून बघायची तिची हिम्मत होत नव्हती. 

ती मान खाली घालून झपाझप पाउले उचलत शेवटच्या शेल्फ कडे जाऊ लागली. तिच्या मनात एक अनामिक भीती दाटून आली होती. तिला हृदयाची धडधड ऐकू येत होती आणि असे वाटत होते की ही तिच्या हातातल्या बाहुल्या मधून येतेय.. ती खूप घाबरलेली असल्याने तिच्या स्वतःच्याच हृदयाचे ठोके तिला जोरात ऐकू येत असावे अशी ती स्वतःच्या मनाला समज देऊ लागली. कसेबसे घड्याळाचे प्रत्येक सेकंद मोजत ती शेवटच्या सेल्फ जवळ पोहोचली आणि पटकन हातातला उतारा सोडून द्यावा तसे तिने तो बाहुला तिथल्या रिकाम्या जागेत ठेवला आणि पुन्हा बाहेर जायला फिरली. पण तेवढ्यात तिची ओढणी कोणीतरी पकडल्यासारखे तिला वाटल. मनात देवाचं नाव घेत ती घाबरत मागे फिरली आणि समोरचे दृश्य पाहून जरा हायसे वाटले. त्या शेल्फ च्याच एक बाहेर निघालेल्या खील्या मध्ये तिची ओढणी अडकली होती. तिने पटकन ती मोकळी केली आणि पुन्हा बाहेर जायला फिरली पण ह्या वेळेस विपरीत घडले. 

तिच्या पायाला कोणीतरी दोन्ही हाताने पकडल्या सारखे तिला वाटले. तिने घाबरत घाबरत मागे वळून पाहिले आणि तिच्या काळजाचा ठोकाच चुकला. तिने आत्ताच तिथे ठेवलेला बाहुला खाली तिच्या पायात पडला होता. पण सगळ्यात विचित्र गोष्ट म्हणजे त्या बाहुल्याचे दोन्ही हात तिच्या पायाला विळखा घालून होते. ती त्याला पुन्हा उचलून वर ठेवण्या साठी खाली वाकली पण तेवढ्यात त्या बाहुल्याने मान वर उचलून तिच्या डोळ्यात पाहून म्हटले “टीचर मला वाचवा”. तो भीषण प्रकार पाहून तिच्या तोंडून एक आर्त किंकाळी बाहेर पडली आणि आपला पाय तसाच जोरात झटकून ती स्टोअर रूम च्याच दरवाजाच्या दिशेने पळू लागली. पण तिला बाहेर निघायचे दारच सापडेना. ति सैर भैर होऊन त्या शेल्फ च्याच रांगान मधून पळू लागली पण तिला बाहेर कुठून पडायचे हेच कळत नव्हते.

पळता पळता एका टेबल ला ठेच लागून ती खाली पडली आणि त्या टेबलवर ठेवलेले पेपर चे कटिंग खाली पडले. त्या कटिंग वरची बातमी वाचून तिच्या अंगावर सर्रकन काटा आला. ति ज्या शाळेत शिकवत होती तिथल्याच एका विद्यार्थ्या ची बेपत्ता होण्याची ती बातमी होती. गेल्या आठवड्यात त्यांच्या शाळेचे ए न्यु अल फंक्शन झाल्यानंतर शाळेला सुट्टी असल्याने सगळी मुलं आपापल्या घरी गेली होती.. होस्टेलवर कोणीच नव्हते त्यामुळे तिला ही खबर माहित नव्हती. पण सर्वात धक्कादायक म्हणजे त्या बातमीमध्ये त्या मुलाचा फोटो होता. तो फोटो हुबेहूब तिने आत्ताच शेल्फ मध्ये ठेवलेल्या बाहुल्या सारखा होता. त्या कोल्डस्टोरेज रूम मध्ये सुद्धा तिला भीतीने घाम फुटायला लागला. ती पटकन तिथून उठली आणि तिथे ठेवलेल्या इतर बाहुल्यांना पाहू लागली. आता तिथले दृश्य काही वेळापूर्वी पाहिलेल्या दृष्यापेक्षा वेगळे होते.

प्रत्येक बाहुली च्या मागे शेल्फ बर वेगवेगळ्या भाषेतल्या न्यूज पेपर चे कटिंग लावले होते. वेगवेगळ्या शहरातून बेपत्ता झालेल्या शाळेतल्या मुलां ची बातमी होती त्यावर आणि मधले फोटो ज्या त्या बाहुली सारखेच दिसत होते. ते सारे पाहून तिचा मेंदू बधीर व्हायची पाळी आली होती. हे सगळं तिच्या विचार शक्तीच्या पलीकडचे होते. ती पुन्हा तिथून बाहेर पडायचा रस्ता शोधु लागली. तिला आवाज येऊ लागले लहान मुलांच्या हाकेंचे “टीचर वाचवा टीचर वाचवा”.

तिथून पळता पळता तिची नजर त्या शेल्फच्या वर गेली आणि ते दृश्य पाहून तिचे शरीर जखडल्या सारखे झाले. शेल्फ च्या वर खूप साऱ्या काचेच्या बरण्या ठेवल्या होत्या. त्यात काही तरी होत. पिवळसर रंगाच. त्यात वेग वेगळे मानवी अवयव ठेवलेले होते. तिला जोरात ओरडावस वाटत होतं पण तिच्या गळ्यातून अवजाच बाहेर पडत नव्हता. त्या सगळ्या बाहुल्या थेट तिच्या कडे पाहू लागल्या आणि ती भोवळ येऊन तिथेच बेशुध्द पडली.

काही वेळानी तिचे डोळे उघडले तर ती सोफ्यावर होती. शीला तिच्या तोंडावर पाणी मारत होती.

स्वाती ला जशी शुद्ध आली तशी ती विचारू लागली..

“तुम्ही काय ठेवलंय त्या स्टोअर रूम मध्ये. काय होत ते सगळं. शीला टीचर पोलिसांना फोन लावा”

“शांत व्हा स्वाती मॅडम. तुम्हाला काही वाईट स्वप्नं पडलं वाटतं.” झुंझार राव म्हणाले..

“स्वप्नं पडायला मी काही झोपले नव्हते.” स्वाती जरा रागातच म्हणाली.

“स्वाती टीचर शांत व्हा प्लीज. तूम्ही काय म्हणताय हे सगळं.मी ही त्या स्टोअर रूम मध्ये जाऊन आली आहे. कश्या बद्दल बोलताय तुम्ही..”

“कस शक्य आहे.. चला माझ्या सोबत पुन्हा”

पण तिथे जाऊन स्वाती लाच स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसला नाही.. ती रूम आता कोल्ड स्टोरेज नव्हती वाटत. तिथे ते न्यूज पॅपर कटिंग्ज ही नव्हते. आणि सगळ्यात महत्त्वाचं तिथे त्या काचेच्या बरण्या नव्हत्या ज्यात तिला ते मानवी अवयव दिसले होते. तिचा डोकं भिर्भीरायला लागलं. हे कसं शक्य आहे. तिला खात्री होती तो सगळा तिचा भास नव्हता.ती पुढे त्यांना काही बोलली नाही की तिला काय दिसला होतं नाहीतर त्यांनी तिला वेड्यात काढल असतं. तिनी शांतपणे झुंझार रावांची माफी मागितली आणि शीला ला तिथून लगेच निघायची विनंती केली.

“आम्हाला तुमच्या बाहुल्यांचा संग्रह दाखवायला तुम्ही इन वाईट केले त्याचा आम्हाला खूप आनंद आहे.. thank यू..” शीला झुंझार रावांचा निरोप घेत म्हणाली.

“It’s my pleasure. तूम्ही इथे आलात ह्यात माझाच फायदा होता.. माझ्या संग्रहाला पूर्णाहुती मिळाली”

“म्हणजे?” स्वाती ने न राहुन विचारले.

झुंझार रावांनी फक्त एक स्मित हास्य केलं पण त्या मागे लपलेल्या गूढ वृत्तीचा ती विचार करू लागली.

“मी ऑटो वाल्याला कॉल केला होता. आमची ऑटो आली आहे चला निघतो मग आम्ही”शीला म्हणाली

स्वाती त्या दगडी पायवाटे वरून एकही अक्षर न बोलता मुकाट्याने शीला च्या मागे चालत बाहेर जाऊ लागली. तिच्या मनात प्रश्नाचे काहूर माजले होते. तिला समजत नव्हते की जे सगळं तीनी त्या खोली मध्ये अनुभवल ते खरंच घडला होता की तिचा फक्त भास होता.. अजून ही तिला झुंझार रावांच्या वागण्याचा आणि कित्येक वाक्यांचा अर्थ लागत नव्हता”त्यांनी असा का म्हटलं असेल की त्यांचा संग्रह पूर्ण झाला. ते निळ सरबत, त्यात काही मिसळून तर दिला नसेल त्यांनी ज्या मुळे मला हे सगळे भास होत होते. पणते सरबत पिण्या आधी ही मला तो बाहूला काही बोलला अस वाटल होत. की मी उगीच खूप घाबरली होती म्हणून मला असा सगळा वाटत होत?”

मनात हे विचार करता करता ती ऑटो जवळ येऊन पोहचली. शीला आत बसली. स्वाती ऑटो मध्ये बसण्या आधी पुन्हा एक नजर मृत्युंजय बंगल्यावर फिरवली तसे झुंझार राव तिथून त्यांचाच बाजूला चालत येताना दिसले. स्वाती पटकन आत बसली आणि शीला ला म्हणाली “चला टीचर निघुया आपण..” पण एवढ्यात झुंझार राव पोहोचले आणि म्हणाले “काय स्वाती मॅडम माझे बोलके बाहुले इतके आवडले की सोबत एक घेऊन जाता आहात?” 

तसे स्वाती आश्चर्याने म्हणालो “नाही मी कोणताही बाहुला सोबत घेतला नाही”

“अहो मग हे काय आहे” त्यांनी स्वाती च्या बाजूच्या सीट वर इशारा करत म्हटलं

स्वाती नी बाजूला पहिले आणि विजेचा तीव्र झटका लागून संपूर्ण शरीर पेटून उठाव अस भासल. कारण तिच्या बाजूला शीला नव्हती पण शीला सारखी हुबेहूब दिसणारी बाहुली होती. झुंझार रावांनी ती बाहुली उचलली आणि पुन्हा बंगल्यात गेले. जे काही घडलं ते समजण्याचा प्रयत्न करत स्वाती अगदी शांत पणे बसून राहिली.. स्वाती नी पुन्हा एक शेवट ची नजर बंगल्याच्या दिशेने फिरवली. झुंझार राव ती शीला सारखी दिसणारी बाहुली घेऊन बाल्कनी मध्ये उभे होते. ती बाहुली स्वाती ला हात हलवत इशारा करत होती. पण तिचे हात झुंझाररावांचे दोन्ही हात बाल्कनी च्या कठड्यावर होते.

Leave a Reply