अनुभव नेहमी पेक्षा बराच वेगळा आहे. कधी आपण असे प्रसंग अनुभवतो जे विश्वास बसण्याच्या पलीकडचे असतात.

हा अनुभव साधारण ३ वर्षांपूर्वी चा आहे. म्हणजे २०१८ मधला. मी मर्चंट नेवी मध्ये नेवीगेशन ऑफिसर पदावर कार्यरत आहे. त्यामुळे नेहमी बाहेरगावी असतो. माझे संपूर्ण काम शीप वर असते. त्या वर्षी ही मी शीप वर होतो. आम्ही पोर्ट ऑफ सिंगापूर वरून पोर्ट ऑफ डर्बन ला निघालो होतो. म्हणजे साऊथ आफ्रिका साठी. शीप ऑपरेट करायला माझ्या सोबत २ अजुन ऑफिसर होते. आम्ही नेहमी सारखे गप्पा गोष्टी करत शीप ऑपरेट करत होतो. २ दिवसानंतर माझी नाईट शिफ्ट होती. सगळे काही अगदी सुरळीत चालू होते. दोन दिवस उलटले तेव्हा आम्ही अर्ध्याहून जास्त अंतर ओलांडले होते. मी नाईट शिफ्ट साठी तयारी केली. शिफ्ट बदलण्याच्या काही वेळ आधीच मी डेक वर आलो. सूर्यास्त कधीच होऊन गेला होता त्यामुळे आधार व्हायला सुरुवात झाली होती. मी नेवीगेशन ऑफिसर असल्याने डेक फ्रंट ला असायचो. साधारण ४-५ तासानंतर आम्ही मादागास्कर देशापासून सुमारे २५० नोटिकल माईल लांब होतो. समुद्र ही अगदी शांत होता. 

तेवढ्यात आमच्या शीप चे कॅप्टन कॉफी घेऊन आमच्याकडे आले. आमच्यात जुजबी बोलणे झाले. तितक्यात अवघ्या काही मिनिटांमध्ये वातावरणात बदल होत असलेला जाणवू लागला. हळू हळू समुद्र ही खवळला. आम्ही सुरुवातीला जास्त काही लक्ष दिलं नाही. वाटलं की नेहमी अस होत आणि नंतर वातावरण नॉर्मल होत. पण हळु हळू प्रमाणापेक्षा जास्त धुक साचू लागले. तसे कॅप्टन ने ऑर्डर दिली की शीप चा स्पीड कमी करा. असे करत करत आमची शीप एका जागी थांबवली. तितक्यात मोठ मोठ्याने स्फोट झाल्यासारखे आवाज येऊ लागले. पण ते आवाज आमच्या शीप वरून येत नव्हते. मी त्या धुक्यातून आजूबाजूला काही दिसतंय का ते पाहू लागलो. तसे मला एक जहाज दिसले जे आमच्या शीप च्या दिशेने च येत होते. आम्ही पटापट रडार वर चेक करू लागलो जेणेकरून आम्हाला कळेल की समोर कोणते जहाज आहे. पण सगळ्यात भयानक प्रकार म्हणजे ते जहाज आम्हा क्रू ला डोळ्यांनी जरी दिसत असले तरी रडार वर डी टे क्ट होत नव्हते. मी पटकन याची माहिती कॅप्टन ला दिली. 

मी अंदाज घेऊ लागलो तेव्हा मला कळले की ते जहाज आमच्या दिशेने अगदी वेगाने येतंय. कॅप्टन ने पटकन कंट्रोल रूम ला संपर्क केला पण त्यांचा ही प्रतिसाद गोंधळात टाकणारा आणि घाबरवून सोडणारा होता. त्यांनी सांगितले की त्या एरिया मध्ये फक्त तुमचीच शीप दिसतेय बाकी कोणतेही जहाज नाही. मी त्यांचा रिस्पॉन्स ऐकल्यावर प्रचंड घाबरलो. ते जहाज आमच्या शीप च्याच अगदी जवळ आले होते आणि त्याचा वेग ही मंदावला होता. दोघांमधले अंतर काही जास्त नव्हते. नाईट शिफ्ट असल्यामुळे आमचा स्टाफ हा ५-६ जणांचा च होता. डेक वरचे आम्ही सगळे ते जहाज पाहू शकत होतो. मी अजून एक विचित्र गोष्ट पाहिली. ते जहाज आता च्या शीप सारखे मुळीच वाटत नव्हते. असे वाटत होते की ते जहाज ३००-४०० वर्ष जुने असावे. कारण त्याची रचना अगदी जुन्या काळातल्या जहाजासारखी होती. त्याला मोठे पडदे लावले होते जे वाऱ्याच्या दिशेने जहाज पुढे न्यायला मदत करतात. आम्ही नाईट व्हिजन बायनो क्यूलर ने जहाजावर पाहिले तेव्हा त्यावर आम्हाला कोणीही दिसले नाही. त्यामुळे आम्ही अजूनच घाबरलो. 

काय पाहतोय काही कळत नव्हतं. तितक्यात वातावरण अजुन खराब झालं. हा सगळा प्रकार इतक्या लवकर घडतं होता की आम्हाला काही उमजेनासे झाले. तितक्यात त्या जहाजावर पुन्हा ब्लास्ट होऊ लागले आणि बघता बघता ते जहाज नजरे समोरून अचानक दिसेनासे झाले. काही क्षणासाठी तर डोळ्यावर विश्वास च बसला नाही. आम्ही सगळे एकमेकांकडे घाबरलेल्या अवस्थेत पाहू लागलो. नक्की काय झाले हे आम्हाला समजले नाही. तेवढ्यात प्रसंगावधान राखत कॅप्टन ने पटकन शीप मुव करण्याची ऑर्डर दिली. तसे आम्ही हळु हळू करत पुढे जाऊ लागलो. अवघे काही मिनिट झाले असतील तितक्यात एक मोठा प्रकाश त्या जागेवर पडला आणि ते जहाज पुन्हा एकदा आम्हाला दिसले. मी तर घाबरून हनुमान चालीसा म्हणू लागलो. कारण एव्हाना मला हा प्रकार विचारशक्ती च्याच पलीकडचा आहे हे कळून चुकले होते. ऑपरेटर ने शीप चा वेग वाढवला. समुद्र इतका खवळला होता की त्याचे पाणी डेक केबिन वर ही उडत होते. थोड्या वेळाने हळु हळु सगळे शांत होऊ लागले पण आम्ही मात्र खूप घाबरलो होतो. 

दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही पोर्ट ऑफ डर्बन ला पोहोचलो. पोहोचल्यावर आमच्या कॅप्टन ने पुन्हा कंट्रोल रूम ला सगळी माहिती दिली पण ते म्हणाले की काल रात्री तुमच्या शीप शिवाय त्या भागातून दुसरे कोणतेच शीप पास झाले नाही. आमच्या सोबत नक्की काय घडले, ते जहाज कुठून आले होते, अचानक कुठे दिसेनासे झाले आणि त्या नंतर चा तो प्रखर प्रकाश कुठून आला, त्या मागचे कारण याचे उत्तर आम्हाला आज पर्यंत सापडले नाहीये. 

ते आलेले जहाज जुन्या काळातून प्रवास करून म्हणजे टाईम ट्रॅव्हल करून इथे आले असेल का..? की हा फक्त एक ग्ली च होता..? की शीप काही वेळा साठी एका टाईम लूप मध्ये अडकली होती जिथे जुन्या काळातले जहाज ही त्याच जागी अडकले असेल..? तुम्हाला काय वाटतं हे मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा..

Leave a Reply