अनुभव – पुनम धावडे

मी ११ वी मध्ये एडमिशन घेतले होते. हॉस्टेल ला राहणार होते त्यामुळे मी आणि माझी मैत्रीण प्रिया आम्ही एकत्र राहायचे ठरवले. प्रिया ची मावस बहीण पनु ही आमच्या सोबतच हॉस्टेल ला राहणार होती. आम्ही कॉलेज जवळची काही हॉस्टेल स पाहिली. त्यातल्या एका हॉस्टेल मध्ये आम्ही राहण्याचा निर्णय घेतला. तिथल्या रूम्स वैगरे पहिल्या आणि आम्हाला त्या आवडल्या सुद्धा. एका रूम मध्ये ४ जणी साठी राहण्याची सोय होती. आम्ही तिघी जणी तर होतो म्हणजे मी, प्रिया आणि पनु. मी आणि प्रिया ने खिडकी जवळचे बेड घेतले. अजुन एकीची जागा रिकामी होती त्यामुळे तो बेड तसाच होता. बऱ्याच दिवसानंतर आमच्या सोबत राहायला एक मुलगी आली. दीक्षा तिचे नाव. तसे आमची जास्त ओळख नव्हती पण हळु हळू ती आमच्यात पूर्ण मिसळून गेली. आमच्या ग्रुप चा एक भाग झाली. 

प नु आणि माझ खूप छान जमायचं. आम्ही एकाच डिवी जन मध्ये होतो त्यामुळे नेहमी सोबत असायचो. एकत्र अभ्यास करायचो. ती नेहमी माझ्या खिडकी जवळ च्याच बेड वर बसायला यायची. तिथेच आम्ही अभ्यास करायचो, असाईन मेंट पूर्ण करायचो, वाचन करायचो. आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे मस्तीही तितकीच करायचो. आम्ही नेहमी मेस मध्ये जेवायला उशीराच जायचो. म्हणजे उशिरा गेलो की गर्दी कमी असायची आणि निवांत जेवता यायचे. नेहमी प्रमाणे त्या रात्री ही आम्ही मुद्दामून उशिरा मेस मध्ये गेलो. मेस खालच्या मजल्यावर होती. अर्ध्या पाऊण तसाच आम्ही जेवण उरकून पुन्हा रूम वर आलो. आम्ही सगळेच आप आपली काम म्हणजे अभ्यास करत होतो. कोणी लिहीत होत तर कोणी वाचत होत. माझे ही लक्ष माझा अभ्यास करण्यात होते. 

आमच्या नकळत पनु उठून रूम बाहेर गेली. मला ही बऱ्याच नंतर लक्षात आले की ती रूम मध्ये नाहीये. बराच वेळ उलटून गेला. ती काही रूम वर आली नाही. आम्हाला दार लाऊन झोपायचे होते म्हणून मी एकटीच तिला पाहायला रूम बाहेर पडले. सगळ्यात आधी खाली जाऊन मेस मध्ये पाहिले पण तिथे कोणीही नव्हते. मेस वाले कधीच मेस बंद करून निघून गेले होते. मला लक्षात आले की बराच उशीर झालाय. मध्य रात्र व्हायला आली आहे. मला तिची काळजी वाटू लागली. ही अशी न सांगता अचानक गेली कुठे. मी हॉस्टेल च्या बाकी बिल्डिंग मध्ये ही राऊंड मारून आले पण ती कुठे ही दिसली नाही. मला वाटल की कोणा मैत्रिणीच्या रूम वर असेल. म्हणून माझ्या माहितीतल्या १-२ मैत्रिणींच्या रूम वर ही जाऊन पाहिले पण ती तिथे ही नव्हती. 

बराच वेळ तिला शोधून झाल्यावर मी कंटाळून पुन्हा आमच्या रूम वर आले. साधारण ५-१० मिनिटानंतर प नू आली. आल्या नंतर ती शक्यतो माझ्या बेड वर येऊन गप्पा करायची त्यामुळे ती माझ्या बेड वर येऊन बसली. पण काही बोलण्या ऐवजी खिडकी तून बाहेर पाहू लागली. मी तिच्या कडे पाहिले तर ती बाहेरच्या झाडाला अगदी टाकत लाऊन पाहत होती. तिच्या हाताकडे लक्ष गेले. तिने हातात एक लिंबू आणला होता. मला वाटले की मेस मध्ये जाऊन आणला असेल म्हणून मी तिला त्या बद्दल काहीच विचारले नाही. काही मिनिटा नंतर ती उठली आणि आत जाऊन लिंबू सरबत केले, ते एका बाटलीत भरले आणि बाहेर आली. पुन्हा बेड वर बसून खिडकीतून त्या झाडाकडे पाहू लागली. मला जरा आश्चर्यच वाटत होत कारण आल्यापासून ती एकही शब्द बोलली नव्हती. 

मी विचार करतच होते तितक्यात ती झाडाकडे पाहत हसू लागली आणि हसतच बोलू लागली “तुला प्यायच आहे का..?”. मला जरा वेगळेच वाटले की ही अशी का वागते य. पण नंतर मला वाटले की ही नक्कीच मुद्दामून करत असेल. कारण आमच्या ग्रुप मध्ये अशी मजा मस्ती नेहमी चालू असायची. पण बराच वेळ झाला तरी ती थांबतच नव्हती. तिचे हसणे चालूच होते आणि विचित्र गोष्ट म्हणजे ते हसणे आता एक विक्षिप्त वळण घेऊ लागले. मी जरा दचकले च आणि झटकन तिच्या हातातून ती बाटली काढून घेतली. तशी ती अचानक माझ्या अंगावर ओरडत आली आणि अतिशय रागात चिडून म्हणाली “तुझ झाड तोडून टाकणार आहे मी..” मी खरंच घाबरले. ती पुन्हा पुन्हा तेच वाक्य बोलत होती. एक तर मला तिचे ते असंबंध बड बडणे अजिबात कळत नव्हते. 

ती तावा तास वात उठून आत गेली तसे मी तिच्या मागे धावले. आत जाऊन तिने चाकू काढला आणि आपल्या हातावर फिरवायला गेली. मी झटकन तिच्या हातातून चाकू काढून घेतला आणि बाहेर फेकून दिला. तिच्या हातावर वार होता होता राहिला. एखाद्या डोक्यावर परिणाम झालेल्या मुली सारखी ती वागत होती. पण मी तिला तिच्या मनासारखे करू दिले नाही म्हणून ती अजुन चवताळ ली. तिच्या तोंडून सतत असमंध बदब चालू होती. मलाच काय पण रूम मध्यल्या कोणालाच तिचे ते बोलणे उमजत नव्हते. आम्ही तिघी ही खूप घाबरलो होतो. तिला कडे बसे तिच्या बेड वर झोपवले. ती काही वेळा साठी शांत झाली. आम्ही लांब बसून तिच्याकडे फक्त पाहत होतो. आम्हाला काहीच कळत नव्हत की ती असे का करतेय. 

१५-२० मिनिट झाले असतील. एका क्षणी ती अचानक उठली आणि रूम च्याच बाहेर धावत सुटली. आम्ही तिघी ही तिला धड धडत्या काळजा ने पाहतच राहिलो. मला तिची खरंच काळजी वाटत होती म्हणून मी तिच्या मागे जायला निघाले पण तितक्यात दीक्षा ओरडून म्हणाली “नको जाऊस तिच्या मागे”. मी आधीच खूप घाबरले होते म्हणून जागीच थांबले. अवघ्या दोन तीन मिनिटात ती धावत पुन्हा रूम मध्ये आली आणि मला मिठी मारून अतिशय जोरात रडू लागली. तू खूप मोठ्याने हुंदके देत रडत होती. आम्ही तिघी ही तिला सतत विचारात होतो की काय झाले पण ती काहीच सांगण्याच्या मनस्थिती त नव्हती. आम्ही तिला शांत करण्याचा प्रयत्न करू लागलो. काही वेळ रडून ती शांत झाली आणि बोलू लागली.

आपण जेवण करून आल्यावर माझ्या पोटात दुखू लागले म्हणून मी खाली मेस मध्ये लिंबू आणायला गेले. लिंबू सरबत करून प्यायले तर बरे वाटेल या उद्देशाने. ४-५ लिंबू घेतले आणि पुन्हा वर येऊ लागले. आपल्या विंग चा दरवाजा मामांनी बंद केला होता म्हणून मी दुसऱ्या जिन्याने वरती आले. तिथून येताना मी ठेच लागून मी पडले. पण पुढचे काहीच मला आठवत नाहीये. आम्ही तिला पुन्हा विचारले की मग आता तू पुन्हा कुठून आलीस. तसे ती पुन्हा रडत म्हणाली “मी जिथे पडले होते तिथूनच आले. त्या जिन्यावरून ते झाड स्पष्ट दिसते जे आपल्या रूम मधून ही दिसते. तिथे एक माणूस उभा होता. अर्धा जळाला होता.. मला म्हणत होता की तू माझ्या सोबत चल, मी तुला घ्यायला आलो आहे. मी अचानक भानावर आले आणि रूम मध्ये धावत आले. पण तू असे का विचारले स की मी पुन्हा कुठून आले. मी याआधी रूम वर आले होते का…

तिच्या या प्रश्नाला आम्ही कोणीही काहीच उत्तर देऊ शकलो नाही. आम्ही अर्वर्जून उत्तर देणे टाळले असे म्हंटले तरी वावगे ठरणार नाही. तिच्या तोंडून हे सगळे ऐकून आमचे डोके सुन्न व्हायची पाळी आली होती. काय करावे काही सुचत नव्हते. पण तिला धीर देणे खूप गरजेचे होते. मी तिला म्हणाले की तू घाबरु नकोस.. मी जाऊन पाहून येते. तसे ती ओरडून म्हणाली की तू जाऊ नकोस नाही तर तो तुला घेऊन जाईल. आणि पुन्हा रडू लागली. आम्ही तिला कसे बसे सावरले आणि झोपवले. त्या रात्री आम्हा कोणालाच झोप लागली नाही. घडलेला विचित्र प्रकार सतत डोक्यात घोळत होता. ती म्हणत होती की मी येताना ४-५ लिंबू आणले होते पण तिच्या हातात तर फक्त एकच लिंबू होता. ती रात्र आम्ही कशी बशी काढली आणि दुसऱ्या दिवशी आप आपल्या घरी जायला निघालो. 

प नू च्याच मावशीने तिला एका बाई कडे दाखवायला नेले. तिने सांगितले की पोरीच्या पापण्या लांबल्या आहेत. उतारा ठेवावा लागेल. त्यांनी सांगितलेले उपाय केले. नंतर कधी असा प्रकार तिच्या बाबतीत पुन्हा कधीच घडला नाही. आज त्या प्रसंगाला बरीच वर्ष उलटून गेली पण आजही तो प्रसंग डोळ्यांच्या समोर अगदी तसाच जिवंत आहे. 

Leave a Reply