अनुभव – ऋषिकेश सुर्वे

अनुभव माझ्या मित्राने मला सांगितला होता. प्रसंग तेव्हाचा आहे जेव्हा तो १५-१६ वर्षांचा होता. त्याच्या गावाला जायचा बेत ठरला होता. घरच्यांना इतर कामे असल्यामुळे रात्री जेवण उरकल्यावर बस ने निघणार होते. साधारण ८ च्याच सुमारास सगळे आटोपले आणि ते घराबाहेर पडले. मित्रा ला सोडायला त्याचे वडील आले होते. निघायला जरा घाई झाली. कारण ८.१५ ला एक बस होती आणि ती चुकली की मग डायरेक्ट ११.५० ची. घाई करत ते बस स्टँड वर अगदी वेळेवर येऊन पोहोचले. सुदैवाने त्याला ८.१५ ची बस मिळाली. वडिलांचा निरोप घेऊन तो बस मध्ये बसला. त्यांना म्हणाला की सुट्टी संपल्यावर मी येईन. कंडक्टर ने बेल मारली आणि बस गावाच्या रस्त्याला लागली. बऱ्याच महिन्यांनी तो एकटाच गावाला चालला होता. अर्ध्या पाऊण तासात त्याला झोप लागली. प्रवासात मध्येच त्याला जाग आली आणि त्याने वेळ पाहिली तर रात्री चे १२.१५ झाले होते. पण गावी पोहोचायला अजुन १ तास तरी लागणार होता. म्हणून तो डोळे मिटून तसाच बसून राहिला. काही वेळानंतर कंडक्टर चा आवाज कानावर पडला आणि त्याला जाग आली. 

तो गावाच्या एस टी स्टॉप वर उतरला. वेळ पाहिली तर दीड वाजत आला होता. तो एस टी स्टॉप गावाच्या वेशीवर आहे त्यामुळे तिथून गावात चालत जावे लागते. म्हणजे तशी जरा गैरसोय च आहे असे म्हंटले तरी वावगे ठरणार नाही. त्या स्टॉप समोर एक गणपती चे छोटे से मंदिर आहे. कोणी तरी नक्कीच घ्यायला आले असणार याची त्याला खात्री होती. आणि आजीच असेल असे वाटले. चौफेर नजर फिरवली आणि आजी उभी दिसली. तिला इतक्या महिन्यांनी बघितल्या नंतर त्याला खूप आनंद झाला. तो धावतच तिच्या जवळ गेला. ती म्हणाली “पोरा तुला यायला उशीर झाला म्हणून आले.. रातच्यान एकट्यान येणं बरं नव्हे..” तसे तो म्हणाला “हो ग आजी.. उशीर झाला यायला..” ते गप्पा करतच घराच्या वाटेला लागले. आजीने येताना सोबत मोठी बॅटरी आणली होती. एव्हाना दीड वाजून गेला होता आणि अश्या वेळी वाटेवर कोण असणार म्हणा. त्यात एस टी तून त्या बस स्टॉप वर उतरणारा तो एकटाच होता. वाट अगदीच निर्मनुष्य होती. त्यात तो रस्ता ही दोन्ही बाजूने झाडाझुडपानी वेढला गेला होता. चालताना आजीने त्याला विचारले “तुझा प्रवास कसा झाला..”. तो तिच्या प्रश्नाचे उत्तर देणार तितक्यात समोरच्या झाडीतून कसलीशी चाहूल जाणवली. त्याला का कोण जाणे पण असे वाटू लागले की कोणीतरी त्यांच्याकडे पाहतेय, त्या झाडीत नक्की काहीतरी आहे. 

त्याने आजीच्या हातातून बॅटरी घेतली आणि तिला म्हणाला “तू थांब इथेच मी आलो..” मी बॅटरी च्या प्रकाशात वाट काढत त्या झाडीत शिरलो. एक मोठी काठी दिसली ती पटकन हातात घेतली. त्याच काठी ने झाडी झुडूप बाजूला सरकवत तो आत जाऊ लागला. तितक्यात अचानक समोरचे दृश्य पाहून त्याची पावलं जागेवरच खिळली. एक ८ ते ९ वर्षांचा लहान मुलगा समोर उभा दिसला. तो त्याच्या कडे च एक टक पाहत होता. या गर्द झाडीत, ते ही अश्या अवेळी तो काय करत असेल हे कळायला मार्ग नव्हता. त्याचे कपडे फाटलेल्या अवस्थेत होते. काटेरी झाडी असल्याने खूप काटे लागले होते, त्यातून रक्त ही येत होते. वाटले की नक्कीच हा हरवला असेल, याला बाहेर काढायला हवे. तो त्याला म्हणाला “चल माझ्या सोबत..” पण तो लहान मुलगा समोरून काहीच बोलला नाही. जास्त विचार न करता त्याने त्या लहान मुलाचा हात धरला व बाहेर घेऊन जाऊ लागला. इतक्यात पाठून कुबट जळका वास येऊ लागला. तसे त्याने पाठी वळून पाहिले आणि त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. तो लहान मुलगा एका जळालेल्या अवस्थेत होता. एके क्षणी तर त्याला त्याच्या डोळ्यांवर विश्वास च बसला नाही की तो नक्की काय पाहतोय. 

त्याने हात झटकला आणि त्याच्यापासून तो लांब झाला. पण तितक्यात एक विचित्र प्रकार घडायला सुरुवात झाली. त्या लहान मुलाची उंची हळु हळु करत वाढू लागली. तो घाबरून धावत सुटला. मागे जे काही होते त्याची उंची आता एका मोठ्या माणसा एवढी झाली होती. त्याचा चेहरा दिसत नव्हता पण अंधारात त्याची महाकाय सावली मात्र दिसत होती. घाबरल्या मुळे तो वाट चुकला आणि त्या गर्द झाडीत हरवून गेला. बॅटरी च्या प्रकाशात वाट दिसेल तिथे धावत सुटला. मागून सतत त्याची चाहूल जाणवत होती. तितक्यात त्याचे नशीब चांगले म्हणून तो गावाच्या वाटेवर च्या रस्त्याला लागला. आजी तिथेच उभी होती. तिने झटकन त्याचा हात धरला आणि झपाझप पावले टाकत जवळच्या देवळात गेली. तो प्रचंड घाबरला होता. त्याने धापा टाकतच आजीला विचारले “आजी मी तिथे जायला नव्हते पाहिजे, एक लहान मुलगा दिसला आणि..” त्याचे बोलणे संपते न संपते तसे आजी म्हणाली “girhya असेल तो.. याच्या तावडीत कोणी सापडला की त्याची सुटका होत नाही.. तू का गेलास पण झाडीत..” तो तिची माफी मागत म्हणालो “आपण चालत जात असताना तिथे मला कोणी तरी असल्याची चाहूल लागली म्हणून मी गेलो.. पण आत गेल्यावर मला रस्ताच सापडत नव्हता.. मी पुन्हा असे कधीही करणार नाही आजी..  माहीत नव्हते की असे काही घडेल..’

ते दोघं ही मंदिरातच बसून राहिले. बाहेर सुसाट्याचा वारा सुटला होता. त्याला अजूनही समोरच्या झाडीतून काही तरी सळसळत गेल्याचा भास होत होता. तितक्यात बाहेरून हाका ऐकू येऊ लागल्या. त्या सगळ्या हाका ओळखीच्या आवाजात होत्या. त्याच्या काका, काकू, आजोबांच्या आवाजातल्या. आजी म्हणाली की लक्ष देऊ नकोस. आपल्याला भास होत आहेत. आजी सोबत होती म्हणून तिचा आधार होता. त्याने जीव मुठीत धरून ती रात्र जेमतेम काढली. पहाट झाली आणि हळु हळू उजाडू लागले. तितक्यात दुरून काका येताना दिसला. संपूर्ण गाव शोधून झाल्यावर त्यांना शोधत तो गावाच्या वेशीवर आला होता. माहीत नाही काका ला कसे कळले पण तो त्यांना म्हणाला की थोडक्यात वाचलात तुम्ही. पण या गोष्टीचे कारण देवळाबाहेर पडल्यावर कळले. देवळा पासून काही अंतरावर एक रिंगण आखले होते. ते त्या रात्री जर बाहेर पडले असते तर त्यांचे काही खरे नसते. ते थोडक्यात गिऱ्याच्या घेऱ्यातून वाचलो होतो. या प्रसंगाला आज कित्येक वर्ष उलटली.. तो नंतर ही बऱ्याच वेळेला गावी वेळा पण त्याला असा भयानक प्रसंग कधी आला नाही. आजही कधी त्याला त्या रात्रीची आठवण आली की अंगावर शहारे आल्याशिवाय राहत नाही.

Leave a Reply