अनुभव – महेश राठोड
मला कब्बडी खेळण्याचा छंद आहे. आमच्या गावची टीम असल्याने आम्ही ८-९ जण फोर व्हीलर भाड्याने करून बाहेर गावी टुर्नामेंट खेळायला जायचो. रोज संध्याकाळी आम्ही ७ नंतर गावातल्या मैदानात सराव करायचो. दिवाळी संपली होती पण काही दिवस सुट्टी अजुन बाकी होती. म्हणून आम्ही आमची टीम घेऊन एका टुर्नामेंट ला जायचे ठरवले. मी आमच्या टीम मधील मुख रेड र असल्याने कधी कधी माझी इच्छा नसताना सुद्धा मला जावे लागायचे. आमच्या टीम मधल्या एकाला व्हॉट्सॲप वर कबड्डी टुर्नामेंट चा एक मेसेज आणि सोबत पॅ प्लेट आले. ज्या गावी ते आयोजित केले होते ते गाव आम्ही गुगल मॅप वर शोधले तेव्हा कळले की ते जवळपास १५० किलोमिटर लांब आहे. आम्ही फोन करून चौकशी केली. ज्या व्यक्तीने फोन उचलला त्याने आम्हाला संध्याकाळी यायला सांगितले. त्यामुळे दुसऱ्या दिवशी आम्ही १ वाजता निघायचे ठरवले. बऱ्याच तासानंतर चा प्रवास करून आम्ही तिथे पोहोचलो.
आम्ही अगदी वेळेवर पोहोचलो. जसे गाडीतून उतरलो तसे आमच्या टीम ची अनाऊंस मेंट झाली. आम्ही पटापट तयारी करून ४-५ मिनिटात ग्राउंड मध्ये हजर झालो. सामना सुरू झाला आणि आम्ही तो ४५-२० असा जिंकला. सामना झाल्यानंतर आम्ही जरा फ्रेश झालो आणि तिथेच मैदानात थोड्या आतल्या भागात जेवायला गेलो. तो पर्यंत इतरही सामने संपले होते त्यामुळे मैदानात अगदी तुरळक लोक होती. तिथं आमच्याशी कोणी जास्त बोलले नाही. बहुतेक आम्ही त्या गावात अनोळखी असल्यामुळे आमच्याशी कोणी बोलले नसावेत असे मला वाटले. इतक्या प्रवासानंतर मग लगेच खेळल्यामुळे आम्हा संगल्याना खूप भूक लागली होती. आम्ही ज्या भागात बसलो होतो तो झाडी झुडपांचा भाग होता. म्हणजे मुख्य मैदानापासून थोड्या आतल्या भागातला. त्यामुळे रस्त्याकडे ला असलेल्या स्ट्रीट लाईट चा उजेड ही जेमतेम येत होता. आमच्याकडे मोबाईल होते म्हणून आम्ही फ्लॅश लाईट चालू केले होते. जेवण करत असताना सामन्याबद्दल ची चर्चा चालू होती.
तितक्यात मला कोणी तरी रडत असल्याचा आवाज येऊ लागला. मी बाकीच्यांकडे पाहिले पण त्यांना तो आवाज येत नसावा असे मला वाटले. म्हणून मग मला ही भास झाला असेल असा विचार करून मी दुर्लक्ष केले. जेवण झाल्यावर आम्ही ती टुर्नामेंट आयोजित करणाऱ्या व्यक्तीला जाऊन पुन्हा भेटलो ज्याच्याशी आम्ही आधी फोन वर बोललो होतो. रात्रीचा पुन्हा प्रवास शक्य नव्हता म्हणून त्या व्यक्तीने आम्हाला राहायला एक रूम अरेंज करून दिली. ती मैदानापासून जवळच होती. आम्ही त्याचे आभार मानून त्या रूम वर गेलो. एव्हाना १२ वाजत आले होते. तो परिसर अगदीच सामसूम झाला होता. आम्ही झोपायची तयारी केली तितक्यात आम्हाला बाहेरून कसलीशी चाहूल जाणवली. आणि पुन्हा रडण्याचा आवाज येऊ लागला. या वेळेस तो आवाज मला एकट्याला नाही तर सगळ्यांना ऐकू येत होता. मी त्यांना म्हणालो चला रे बघून येऊ कोण आहे ते. आम्ही रूम मधून बाहेर आलो तर जाणवले की तो आवाज मैदानातून येतोय. सामन्यासाठी लावलेले हलोजेन फोकस आता बंद झाले होते.
पण तरीही आम्ही त्या आवाजाचा माग काढत मैदानात गेलो. काही अंतर चालत गेल्यावर आम्हाला दिसले की एक बाई त्या मैदानाच्या मधोमध बसून रडतेय. मला जरा वेगळेच वाटले कारण तिचा आवाज बऱ्याच लांब पर्यंत ऐकू येत होता. मी म्हणालो की आपण जाऊन विचारपूस करू, काही मदत करता आली तर.. आम्ही तिच्या दिशेने चालू लागलो. पण तिच्यापासून काही अंतरावर आलो आणि ती बाई अचानक नजरेसमोरून दिसेनाशी झाली. आम्ही सगळे प्रचंड घाबरलो आणि रूम च्याच दिशेने धावत सुटलो. काही सेकंदात आम्ही रूम मध्ये आलो, दरवाजा लाऊन घेतला. आमच्यातल्या एकाने विचारले “अरे काय पाहिले आपण आता..?, उगाच आलो यार इकडे, थांबायला ही नको होते या भागात..”. त्याचे बोलणे संपते न संपते तोच पुन्हा रडण्याचा आवाज येऊ लागला. ती बाई बहुतेक आमच्या रूम च्याच बाहेर होती कारण तो रडण्याचा आवाज अगदी जवळून येत होता. त्या रात्री कोणालाही झोप लागणे अशक्य होते. पहाट होत नाही तितक्यात आम्ही तिथून बाहेर पडलो आणि गावाबाहेर आलो.
जसे आम्ही गावाच्या वेशी बाहेर आलो तशी आमची गाडी अचानक बंद पडली. वाटले की डिझेल संपले असेल म्हणून गाडी मधला डिझेल चा कॅ न काढला. फ्युएल टँक मध्ये डिझेल टाकण्यासाठी चावी लाऊन झाकण उघडले आणि आम्ही सगळेच घाबरलो. आत ले डिझेल अक्षरशः उकळत होते. हे मात्र आता एखाद्या स्वप्ना सारखे भासू लागले. घडणारा प्रकार कल्पना शक्तीच्या पलीकडचा होता. आम्ही आजूबाजूला कोणाची मदत मिळते का ते पाहू लागलो तसे दिसले की आमची गाडी जिथे थांबली होती तिथून रस्त्याच्या आतल्या भागात एक स्मशान भूमी होती. आमच्यासोबत हे काय घडतंय तेच कळत नव्हत. माझ्या मित्राने लगेच त्या सामना आयोजित करणाऱ्या व्यक्तीला फोन केला करत तोच एक होता जो आम्हाला मदत करू शकणार होता. त्याने बऱ्याच वेळानंतर फोन उचलला. पण त्याने जे सांगितले ते ऐकून आम्हाला विश्वासाचं बसला नाही. त्याने पहिला प्रश्न विचारला.. “कोण बोलतंय..”. माझ्या मित्राने सांगितले की आम्ही सामना खेळायला होतो, तुम्ही आम्हाला राहायला रूम अरेज करून दिली होती.. त्यावर तो म्हणाला की कसला सामना…?
तसे मित्राने सगळे सविस्तर सांगितले. त्यावर तो माणूस म्हणाला की गेल्या १० वर्षात आमच्या गावात एकही कबड्डी स्पर्धेचे आयोजन झाले नाहीये. माझा मित्र जरा बुचकळ्यात पडला आणि त्याने पुन्हा विचारले की असे काय बोलता य तुम्ही.. त्यावर तो पुन्हा तेच म्हणाला की १० वर्षांपूर्वी आमच्या गावातल्या मैदानात सामना सुरू असताना संपूर्ण मैदान प्रेक्षकांनी भरले होते आणि तेव्हा विजेची तार तुटून बरेच लोक मरण पावले होते. तेव्हा पासून आमच्या गावात असे कोणताही सामने भरवला जात नाही. त्याचे बोलणे ऐकून आम्हाला विश्र्वासच बसला नाही. माझ्या मनात असंख्य प्रश्न होते.. आपण नक्की कोणासोबत खेळलो, ते व्हॉट्सॲप वरचे पेंप लेट..?.. मला आजही असे कित्येक प्रश्न. अनुत्तरीत आहेत..