अनुभव – पूनम कदम

ही घटना २०१३ मधली आहे. दर वषी आम्ही न चुकता मामाच्या गावी जातो. तसेच त्या वर्षी पण परीक्षा संपताच आम्ही मामाच्या गावी गेलो.  लहानपानापासून मला कोकणातील वातावरण खूप आवडत. तिथल्या भुता खेतांच्या गोष्टी खूप वेळा ऐकल्या होत्या पण माझ्या साठी या काल्पनिक गोष्टी होत्या आणि मला त्यावर अजिबात विश्वास नव्हता. जर खरं असं काय असेल तर मला त्याचा अनुभव घेण्याची खूप इच्छा होती. मामा च्या घरचे कुटुंब फार मोठे होते. सगळ्यांची आंघोळ होईपर्यंत दुपारचे ११ व्हायचे. त्या दिवशी ही तसेच झाले. मे महिना असल्यामुळे पाण्याची टंचाई होती. म्हणून आम्ही कपडे धुण्यासाठी जवळ असलेल्या नदीवर जायचो. आज मी आणि माझी आजी आम्ही दोघीच कपडे धुण्यासाठी नदीवर आलो. खूप कपडे असल्या मुळे धुवून होईपर्यंत दुपारचे १२-१ झाले. असं म्हणतात की जेव्हा सूर्य डोक्यावर असतो म्हणजे मध्यान्ह होतो तेव्हा नदीवर शक्यतो कोणी जात नाही. पण मी एक एकदम बिनधास्त होते. सहज म्हणून मी आजूबाजूला नजर फिरवली पण कोणीही दिसत नव्हत. मला वाटले की आमच्या गावातल्या अजुन काही बायका ही कपडे धुवायला आल्या असतील पण त्या नदी काठावर आम्हा दोघी शिवाय साधे चिटपाखरू ही नव्हते. 

परिसर अगदी शांत आणि भकास वाटत होता. मे महिना असल्यामुळे उन्हाचा जोर ही आता वाढला होता. मला खूप त्रास होत होता. कधी एकदाचे कपडे धुवून होतील याची मी वाट पाहत होते. काही वेळानंतर मी पुन्हा उठून उभी राहिले आणि आजूबाजूला कोणी दिसतेय का ते बघू लागले. तसे मला नदीच्या पलीकडे एक बाई आमच्या दिशेने चालत येताना दिसली. एक विचित्र गोष्ट म्हणजे तिने वेगळी च नारिंगी रंगाची साडी नेसली होती. केस मोकळे सोडले होते. सहसा मी गावात असे कोणाला पाहिले नव्हते. मोकळ्या केसांमुळे तिचा चेहरा मला नीट दिसत नव्हता. पण मनात विचार आला की आता काही वेळापूर्वी पाहिलं तेव्हा कोणी नव्हत मग ही बाई अचानक कुठून आणि कशी आली. माझ्या मनात शंकेची पाल चुकचुकली. मी आजी ला म्हणाले “आजी.. ती बघ ना कोण आहे.. केस मोकळे सोडून नदीकिनारी फिरते य.. कोण आहे ती..” पण आजी काही तिच्याकडे पाहायला तयार नव्हती. मला लक्षात आले की आजी घाबरली आहे. 

ती तिथून लवकर निघायचा प्रयत्न करत होती. पण माझे भलतेच चालले होते. जर समोरची बाई कोणी साधी सुधी बाई नसून एखादी चेटकीण असेल तर असा काही तरी विचित्र विचार माझ्या मनात घोळू लागला. तितक्यात मी ठरवले की तिला हाक द्यायची म्हणजे ती माझ्याकडे वळून बघेल आणि मला तिला पाहता येईल. पण ही कृती मला किती महागात पडणार होती याची तेव्हा मला कल्पनाही नव्हती. मी जोरात ओरडुन तिला हाक दिली. तिने माझ्याकडे पाहायचे सोडून ती जोरात एका झाडाजवळ पळत गेली. मी तिच्या दिशेने पाहत होते. तसे काही वेळानंतर पुन्हा बाहेर आली आणि माझ्या दिशेने पहिले. ती बरीच लांब असल्यामुळे आणि त्यात तिचे केस मोकळे सोडल्यामुळे मला काही तिचा चेहरा दिसला नाही. ती बराच वेळ माझ्याकडे एक टक बघत होती आणि मग पुन्हा त्या झाडाच्या दिशेने धावत निघून गेली. त्या नंतर मात्र ती परत बाहेर आली नाही. मी खूप वाट पाहिली पण ती पुन्हा दिसली नाही. मी नीट निरखून पहिल्या वर कळले की ते एक पिंपळाचे झाड आहे. मी काहीशी घाबरले तर होते पण त्याहून जास्त मला अस्वस्थ वाटत होत. जे या आधी मला गावी आल्यावर कधीही जाणवले नाही. 

काही दिवस सगळे सुरळीत गेले. पण त्या रात्री मला खूप भयानक स्वप्न पडले. मी एका अनोळखी ठिकाणी आली आहे. मला एका बाईच्या रडण्याचा आवाज ऐकू येतोय. मी त्या आवाजाच्या दिशेने गेल्यावर मला एक बाई रडत बसलेली दिसते. मी तिला विचारते की काय झालंय.. तुम्ही का रडत आहात, मी तुमची काही मदत करू का.. त्यावर ती बाई म्हणते की हो मला तुझ रक्त हवंय आणि अंगावर धावून येते.. हेच स्वप्न पुन्हा पुन्हा पडू लागले. रोज रात्री मी घाबरून झोपेतून उठायचे. हृदयाचे ठोके वाढलेले असायचे. रात्री पुरेशी झोप मिळत नसल्यामुळे मी आजारी पडले. मी डॉक्टरांना दाखवले पण काही फरक पडत नव्हता. बऱ्याच महिन्यांनी मी घरच्यांना त्या दिवशी नदीवर घडलेला प्रसंग सांगितला. तेव्हा त्यांनी गावात चौकशी केली. ती बाई खरंच एक चेटकीण होती. तिला मी डिवच ले होते म्हणून ती मला त्रास देत होती. नंतर एक विधी करण्यात आला आणि माझी तिच्यापासून सुटका करण्यात आली. या प्रसंगानंतर मात्र मी नको तिथे मस्ती करायची सोडून दिली कारण तो प्रसंग माझ्या जीवावर बेतला होता.

Leave a Reply