अनुभव क्रमांक – १
हा अनुभव आपल्या चॅनल च्याच एका सबस्क्राईब र ने पाठवला असून त्यांनी त्यांचे नाव गुपित ठेवण्याची विनंती केली आहे.
ही गोष्ट साधारणतः ६ वर्षांपूर्वीची आहे. मी काकू कडे सुट्टी मध्ये राहायला गेले होते. तेव्हा नेमकी दादाची क्रिकेट टुर्नामेंट होती. म्हणून मी सुद्धा काका काकुंसोबत गेले होते. टूर्नामेंट झाल्यावर कार्यक्रम होता आणि नंतर माझा भाऊ आमच्या सोबत गाडी ने घरी येणार होता. साधारण ११ च्याच आसपास ची वेळ होती. माझ्या भावाची टुर्नामेंट खूप उशिरा होती त्यामुळे सगळा कार्यक्रम संपायला बराच वेळ लागला. निघताना माझे आजोबा आम्हाला म्हणाले होते की येताना उशीर करू नका, आणि रस्त्यात मध्ये कुठे ही थांबू नका..’. मला त्यांचे असे बोलणे नीट काही समजले नाही. पण काका काकूंना ते कळले असावे कारण त्यांच्या चेहऱ्यावर तसे भाव मला जाणवले. ११ वाजून गेले तसे त्यांनी निघायची तयारी सुरू केली.
त्यांनी आम्हाला म्हणजे मला मला आणि माझ्या भावाला गाडीत बसायला सांगितले. अजून सगळा कार्यक्रम नीट संपला ही नव्हता. आणि काका काकू असे घाई करत सांगत होते ते पाहून दादा ने काकू ला विचारले “एवढे लवकर का निघालो आपण..” काकी ने सांगितले की उशीर झालाय, घरी आजोबा वाट पाहत असतील. पुढच्या काही मिनिटात आम्ही तिथून घरी जायला निघालो. काकी आम्हाला पुन्हा सूचना देत म्हणाली “तुम्ही दोघेही आता झोपून जा.. घर जवळ आले की मे तुम्हाला उठ वीन.” आम्ही दोघांनी होकारार्थी माना डोला वल्या. पण आम्हाला अजिबात झोप येत नव्हती. घर तसे बरेच लांब होते. साधारण २ तास झाले असतील. आम्ही एका पुलावर आलो. काकांनी गाडीचा वेग अगदी कमी केला आणि सावकाश गाडी चालवू लागले. तितक्यात अचानक दादाचे लक्ष बाहेर गेले आणि त्याला तिथे काही तरी दिसले तसे तो म्हणाला “ते बघा तिकडे.. तो माणूस कोण आहे..?”
आम्ही सगळ्यांनी तो इशारा करत असलेल्या दिशेला पाहिले. तिथे खरंच कोणी तरी उभ होत. पण त्या माणसाची उंची इतर माणसा सारखी नव्हती. गाडी जस जशी त्याच्या जवळ जाऊ लागली तसे मला दिसले की त्या माणसाचे डोकेच दिसत नव्हते. हा सगळा प्रकार अवघ्या काही सेकंदात घडला. तितक्यात काकू दादा ला ओरडली “तुम्हा दोघांना झोपायला सांगितले होते ना.?” आम्ही काहीच बोललो माझी. काही वेळात आम्ही तो पुल ओलांडला आणि दादा अचानक थरथरू लागला. त्याने बुबुळ वळवली आणि त्याचे डोळे पांढरे दिसू लागले. तोंडातून फेस येऊ लागला. आम्ही तिघही घाबरून गेलो. काकांनी गाडी चा वेग वाढवला. पुढच्या काही मिनिटात आम्ही एकदाचे घरी येऊन पोहोचलो. काकू ने दादाची रात्री २ वाजता दृष्ट काढली. दादा तर बेशुद्ध झाला होता. ती रात्र मी तशीच दादाच्या काळजीपोटी जागून काढली. सकाळी काकू ला न राहवून विचारले की काल नक्की काय झाले होते..?
ती मला काही सांगायला तयार च नव्हती. खुप टाळाटाळ करत होती. पण मी तिच्या मागे लागून तिला नक्की काय झाले ते सांगायला भाग पाडले. तिने जे सांगितले त्यावर माझा विश्वास च बसला नाही. ती म्हणाली की लहान पणापासून तुझा भाऊ जेव्हा कधी ही अमावस्येला बाहेर असतो तेव्हा त्याला अश्या अनैसर्गिक गोष्टींचा त्रास होता. त्याचा मनुष्य गण आहे आणि त्यात सर्व पित्री अमावस्या होती काल. आजोबांनी ही लवकर यायला सांगितले होते पण आपल्याला यायला उशीर झाला. म्हणून आम्ही शक्यतो अश्या वेळी त्याला बाहेर पडू देत नाही.
अनुभव क्रमांक – २ – आस्तिक पाटील
अनुभव तसा बऱ्याच वर्षांपूर्वीचा आहे जो माझ्या मामा ला आला होता. मामा चे वय तेव्हा २० ते २२ असेल. या वयात आपल्या सगळ्यांना एक वेगळाच जोश असतो. आणि भूत प्रेत अश्या गोष्टी बहुतेक जण मस्करित घेतात. किंवा या गोष्टी आपल्याला पटतच नाहीत. मामा चे विचार ही असेच काहीसे होते. आमच्या गावात अश्या अनेक जागा आहेत ज्या आजही बाधित मानल्या जातात. त्यामुळे तिथे रात्री अपरात्री शक्यतो कोणी फिरकत नाही. त्या रात्री मामा आणि त्याचे सगळे मित्र नेहमी सारखे एकत्र जमले होते. अमावस्या दोन दिवसांवर असेल बहुतेक. त्यांच्या गप्पा चालल्या होत्या. रात्र ही बरीच झाली होती. तो त्यांचा निरोप घेऊन निघणार इतक्यात एका मित्राने त्याच्या सोबत पैज लावली. त्याने सांगितले की अमावस्येच्या रात्री गावातल्या नदीच्या पुलावरून एकट्याने बाईक घेऊन एक फेरी मारून यायची. आणि ते ही १२ वाजल्या नंतर.
मामा कसलाही विचार न करता लगेच तयार झाला. तसाही त्याचा अश्या गोष्टींवर विश्वास नव्हता आणि त्यात काही तरी थ्रिल करून मित्रांमध्ये मोठेपणा घेण्याची ही संधी त्याला घालवायची नव्हती. अमावस्येच्या रात्री इथेच १२ वाजता भेटायचं ठरलं. दोन दिवस उलटले आणि ती भयाण रात्र आली. मामा त्याची बाईक घेऊन नेहमीच्या ठिकाणी पोहोचला. त्याचे मित्र आधीच त्याची वाट बघत थांबले होते. त्यांच्या ठिकाणापासून तो पुल तसा लांब होता पण तिथून त्यांना नीट दिसायचा. पैज लावलेल्या मित्राने त्याला विचारले “लक्षात आहे ना काय करायचे ते..” तसे मामा हो म्हणाला. मामा ने बाईक स्टार्ट केली आणि त्या पुलाच्या दिशेने निघाला. त्याचे सगळे मित्र त्याला तिथेच उभे राहून पाहत होते. तो पुल तसा मोठा होता. काही मिनिटात तो पुलाच्या दुसऱ्या बाजूला पोहोचलो. तोपर्यंत सगळे नीट होते. पण जशी त्याने गाडी वळवली तशी त्याची गाडी अचानक बंद पडली.
गाडीत बिघाड होण्यासारखे काहीच कारण नव्हते. मित्रांनी त्याला पाहिले आणि त्यांना जाणवले की काही तरी गडबड नक्कीच आहे. ते त्याच्या दिशेने मदतीसाठी चालत येऊन लागले. मामा त्यांच्या कडे पाहत होता तितक्यात त्याच्या समोर एक भला मोठा धिप्पाड देहाचा माणूस येऊन उभा राहिला. तो नक्की कुठून आला, कसा आला ते मामा ला कळलेच नाही. त्याने पायापासून वर पाहायला सुरुवात केली. आणि पाहतो तर काय त्या माणसाच्या शरीराला मुंडकेच नव्हते. मामा भीतीने थर थर कापू लागला. तो घाबरून गाडी टाकून तिथून पळू लागला तितक्यात ते जे काही होते त्याने एक जोरदार फटका दिला. तो आघात इतका जोरात होता की मामा पुलाच्या खाली फेकला गेला. त्याच्या मित्रांना काही कळले च नाही की काय झाले. त्यांनी थेट पुलाच्या खाली धाव घेतली. त्यांच्याजवळ पोहोचले. त्याला डोक्याला मोठी जखम झाली होती आणि त्यातून रक्त वाहत होते.
त्यांनी लगेच त्याला उचलून घरी आणले. झालेला सगळा प्रकार घरी सांगितला. दुसऱ्या दिवशी त्याला शुद्ध आली तसे मित्रांनी त्याला विचारायला सुरुवात केली की पुलावर काय झाले. तू अचानक खाली कसा काय पडलास. तसे मामा ने सगळे सांगितले. त्याच्या मित्रांना तो माणूस दिसला नव्हता, तो फक्त मामा ला दिसला होता. नंतर कळले की तो मान काप्या होता. असे म्हणतात की हा प्रकार खूप ठिकाणी पाहायला मिळतो. त्याला मान नसते आणि तो सारखे आपले दोन्ही हात फिरवत राहतो. त्याचा फेरा त्या पुलावर होता आणि नेमका त्याच वेळी मामा तिथे गेला आणि त्याच्या विळख्यात सापडला. त्याचे दैव बलवत्तर म्हणून तो थोडक्यात वाचला. आजही त्या पुलावर रात्री जायला लोक घाबरतात.