हा अनुभव माझ्या वडिलांनी मला सांगितला होता. जो बऱ्याच वर्षांपूर्वी चा आहे. ते त्यांच्या मित्रांबरोबर माथेरान ला गेले होत तेव्हाचा आहे. हॉटेल मध्ये रूम बुक करून दुसऱ्या दिवशी दुपारी ते आणि त्यांचे मित्र चालतच एका पॉइंट वर जायला निघाले. रस्त्यावर ते दोघेच होते. ते जसे त्या पॉइंट जवळ येऊ लागले त्यांच्या मागे एक कुत्रा ही येऊ लागला. सुरुवातीला त्यांनी लक्ष दिले नाही. पण नंतर तो कुत्रा बराच वेळ त्यांच्या मागेच होता. काही मिनिटात ते त्या पॉइंट वर येऊन पोहोचले तसे तो कुत्रा अतिशय विचित्र आवाजात रडू लागला. तितक्यात त्यांचे लक्ष एके ठिकाणी गेले. तिथे एक जोडपं बसलं होतं.

विशेष म्हणजे ते अगदी लग्नात घालावे तसे कपडे परिधान करून बसले होते. ते ही प्रोटेक्तीव रेलिंग च्या पुढे. हे सगळे बघून त्यांना विचित्र च वाटले. आजू बाजूला त्या दोघा व्यतिरिक्त दुसरे कोणीही नव्हते. पण बघता बघता त्या दोघांनी त्या दरीत उडी घेतली. माझे वडील आणि त्यांचे मित्र तो भयाण प्रसंग पाहून जोरात ओरडले.

धावत जाऊन त्यांनी रेलिंग च्या बाहेर पाहण्याचा प्रयत्न केला पण खाली कोणीही दिसले नाही. ते सगळे लगेच तिथून निघाले. एव्हाना त्यांच्या सोबत असलेला कुत्रा ही कुठे तरी दिसेनासा झाला होता. ते जास्त विचार न करता पुन्हा हॉटेल रूम वर आले. त्यांनी हॉटेल मालकाला या बाबत विचारणा केली. तेव्हा कळले की काही दिवसांपूर्वी एक नवीन जोडपं घडोसवारी करत त्या पॉइंट वर जात होत. घोड्यांना अंदाज आला नाही की काय माहित त्यांनी व्हॅली मध्ये अचानक उडी घेतली. त्यातच ते गेले. त्या नंतर काही जणांना ते दिसायला लागले. बहुतेक ते तुम्हाला ही दिसले. 

Leave a Reply