लेखक – अमित लाड

अमित आणि राकेश दोघं जिवलग मित्र.. यांची मैत्री अगदी बालपणापासूनची असल्यामुळे या दोघानमध्ये खूप घट्ट नाते होते. दोघांनीही आपले शिक्षण आणि कसेतरी आपले ग्रॅड्युएशन पूर्ण करून, जवळपास ५ वर्ष जॉब केला. या ५ वर्षात काही रक्कम जमा करून त्यांनी चायनीज चे हॉटेल काढायचे ठरवले.आणि त्याचवेळी राकेश ने लग्न सुद्धा केले. प्रेम विवाह असल्यामुळे सगळे पटापट जमले, आणि त्याने थोडक्यात लग्न उरकले, एवढा काही खर्च झाला नाही. ठरल्याप्रमाणे त्यांनी मुंबई मध्ये एक जागा भाड्याने घेऊन लहानसे हॉटेल काढले. अगदी दीड वर्षाच्या आत त्यांना या हॉटेल च्या व्यवसायात भरपूर नफा होऊ लागला. सर्व काही चांगल घडू लागले होते. एके दिवशी संध्याकाळी हॉटेल मध्ये राकेशला त्याच्या गावातून फोन आला. आणि फोन वर बोलून झाल्यानंत्तर तो निराश झाला. अमित त्या वेळी तिथेच होता आणि राकेशला निराश झाल्याच कारण विचारू लागला. राकेश ने सांगितले कि, ” आईची तब्येत बरी नाही, मला गावी जावं लागेल.”  हे ऐकल्यावर अमित ने ही राकेश बरोबर गावी यायचे ठरवले. तेवढाच आधार मिळेल म्हणून… त्या दोघांनी लगेचच गावी निघायचे ठरवले म्हणून त्यांनी सर्व प्रथम आपापल्या घरी कळवले आणि गावी जाण्यासाठी बॅग भरायला सांगितली. त्यांनी ह्यावेळी जेवण हॉटेल मधेच केले आणि कॅश काऊंटर मधून काही रुपये घेतले. त्यांच्यातला वैभव ला हॉटेलकडे लक्ष्य द्यायला सांगितले.

सव्वा नऊ च्या सुमारास ते दोघे राकेश च्या गाडीने आपापल्या घरी बॅग घ्यायला निघाले. हॉटेल पासून अमितच घर जवळ असल्यामुळे गाडी थेट अमितच्या घराकडे थांबवली. अमित घरी गेला. त्याच्या आईने त्याची बॅग त्याला दिली. सोबत भूक लागेल म्हणून फळ दिली. नंतर गाडी राकेशने त्याच्या घरी थांबवली. त्याच्या घरी त्याची बायको प्रीतिका आणि त्यांचा मुलगा विराज हे दोघेच होते. राकेश घरी गेला त्यावेळी त्यांनी प्रीतिका ला बोलावून आपली बग मागवली आणि फोन वर झालेले बोलणे नीट समजवून सांगितले, आणि विराजची काळजी घे असे सांगून त्याने तिचा निरोप घेतला. रात्रीचे १०.०० वाजले. त्यांनी पेट्रोल ची टाकी फुल करून, गाडी गावी जाण्याच्या दिशेने वळवली. अमितला ड्राईव्ह करता येत नव्हते म्हणून राकेश लाच संपूर्ण प्रवासात ड्राईव्ह कराव लागणार होत. दिवसभर व्यवसाय सांभाळून आणि काम करून हे दोघे आधीच खूप दमले होते, त्यात राकेशला ड्रायव्हिंग करताना अधूनमधून झोपेची डूलकी येऊ लागली. त्याचे डोळे सुद्धा लाल झाले होते. आणि आत्ता गाडीचे स्टिअरिंग कसबसे फिरवून तो गाडी चालवत होता. अधूनमधून अमितचा सुद्धा डोळा लागत होता, त्याला हे हि कळले कि राकेशला झोप येत आहे म्हणून तो राकेशला सावध राहायला सांगत होता. घाटाचा रस्ता सुरु झाला. शेवटी काय घडायचे ते घडलेच. झोपेच्या ग्लानीत राकेश ने गाडी घाटामध्ये चुकीच्या म्हणजे दरीच्या दिशेने फिरवली. अचानक अमितचे लक्ष्य गेले आणि त्याने स्टिअरिंग उलट दिशेला वळवून गाडी सावरायचा प्रयत्न केला तसे गाडी रस्त्या कडेच्या झाडाला जाऊन जोरात आदळली.

काही क्षणासाठी सगळं काही एकदम शांत झालं. आवाज होता तो त्या घाटातून वाहणाऱ्या वाऱ्याचा. काही वेळाने दोघं भानावर आले. सीट बेल्ट लावला असल्याने त्या दोघांना इजा झाली नाही पण गाडीच्या पुढचा लोखंडी रॉड वाकला होता. त्यांनी आजूबाजूला नजर फिरवली आणि असे वाटले की घाटाच्या अगदी मधोमध येऊन अडकले आहेत. जवळपास कसलीही वस्ती दिसत नव्हती. साधे एक घर किंवा दुकानही नजरेस पडत नव्हते. दोघांनीही गडीच्य काचा खाली सरकवल्या तसे चोहोबाजूंनी रातकिड्यांची किरिर कानावर पडली. जणू काही त्यांची सभाच भरली होती. एका बाजूला घनदाट झाडी आणि दुसऱ्या बाजूला खोल दरी. अमित पटकन गाडीतून खाली उतरला आणि दुसऱ्या बाजूने राकेश ला उतरायला सांगितले. त्याने पाण्याची बॉटल दिली आणि म्हणाला की तोंड धुवून घे, म्हणजे जरा फ्रेश वाटेल आणि लगेच गाडी काढता येईल. राकेश तोंड धूत असताना त्याची नजर अचानक एका पुढच्या टायर वर पडली.  टायर पंक्चर झाले होते. अमित हे सांगणार तितक्यात त्याला मागून एक कर डा आवाज कानावर पडला.. “काही मदत हवी आहे का साहेब?”  त्या विचित्र आवाजामुळे ते दोघे दचकले कारण एवढ्या रात्री एखादी व्यक्ती मदतीसाठी कशी आणि कुठून धाऊन आली ? त्यांनी हळू हळू वळत मागे पाहिले. तो गावातला एक फेरीवाला भासत होता. पण खूप जखमी वाटत होता, जसा आत्ताच कोणाचातरी मार खाऊन आला आहे.

त्याचे कपडे फाटले होते, डोक्याला मार लागला होता. नाकातून रक्त वाहत होत. त्याला अश्या अवस्थेमध्ये बघून अमितने धाडस करून विचारले, “कोण आहात तुम्ही भाऊ? इतक्या रात्री इथे कसे काय ? तुम्हाला एवढ कस लागला?”.. आणि इथे राकेश गाडीचे चाक बदलण्यासाठी सीट खाली ठेवलेला पाना काढत होता, पाना काढत असताना त्याची नजर गाडीच्या मिरर वर गेली.. त्यात त्याने जे पाहिलं ते बघून त्याची झोपच उडाली. त्याने पाहिलं कि मिरर मध्ये अमित तर दिसतोय पण त्याच्याबरोबर तो माणूस मात्र दिसत नव्हता. राकेशला कळून चुकले होते की आता आपले काही खरे नाही. तो इतका घाबरला की काय करावे ते त्याला कळेनासे झाले. त्याच्या तोंडातून शब्दच फुटत नव्हता. अमित ला सावध कसे करायचे, हा एकच विचार त्याच्या डोक्यात घोळत होता. इथे अमित त्या फेरीवाल्याची चौकशी करत बसला होता. त्याने त्याचे नाव अक्षय असे सांगितले. तो त्याच्या मित्रांसोबत शिकारी साठी आला होता पण कोणीच मिळाल नाही म्हणून तो एकटा मागे फिरला. परतत असताना त्याला रस्त्याच्या कडेचा अंदाज आला नाही म्हणून तो एका दगडावर आपटला आणि खूप जोरादार मार लागला. त्याचे कारण अमित ला कितपत पटले ते माहीत नाही पण मला सगळे कळून चुकले होते. तो पुढे म्हणाला ” मी तुमची मदत करायला तयार आहे साहेब, पण तुम्ही मला पुढ परेंत सोडा”.. अमितने त्याला होकार दिला आणि राकेश कडे गेला. 

राकेश गाडीत सुन्न होऊन बसला होता. त्याने एकदा हाक दिली पण राकेश मात्र त्याच्याच धुंदीत होता. दुसऱ्यांदा हाक दिली पण काहीच प्रतिसाद नाही. तिसऱ्यांदा तो ओरडुन च बोलला आणि राकेश भानावर आला. पण त्याची अवस्था खूप वाईट झाली होती. त्याला घाम फुटला होता, तो अक्षरशः धापा टाकत होता. राकेश ला इतके घाबरलेले त्याने बहुतेक पहिल्यांदाच पाहिले होते. पण त्याला कारण कळत नव्हते. राकेश ला खाली उतरायला सांगितले. दोघांनी धक्का मारून गाडी हायवे च्या टोकाला आणली आणि अमितने राकेशला गाडीचे चाक बदलण्यासाठी सांगितले. गाडीचे चाक गाडीच्या मागच्या बाजूला होते पण राकेश तिथे जायला तयार न्हवता कारण तो जो कोणी होता तो गाडीच्या मागच्या बाजूलाच उभा होता. त्याने अमित ला चाक काढायची विनंती केली. तसे त्याने पटकन चाक काढून दिले. राकेश अगदी शांत होता, काहीच बोलत नव्हतं त्याच अस अचानक बदलेले विचित्र वागणे अमित ला उमगत नव्हत. अमितने वेळ बघण्यासाठी खिश्यातून मोबाईल बाहेर काढला. पावणे तीन वाजत आले होते. मोबाईल ची बॅटरी सुद्धा थोडीशी शिल्लक राहिली होती. कारण निघण्याच्या धावपळीत मोबाईल चार्ज करायला वेळच मिळाला नव्हता. म्हणून मग तो गाडीमध्ये मोबाईल चार्ज करण्यासाठी वळला. मोबाईल चार्जर ला लाऊन तो बाहेर येणार तितक्यात त्याची नजर मिरर मध्ये गेली आणि अंगावर सर्रकन काटा येऊन गेला. 

मागे उभा असलेला व्यक्ती आरश्यात दिसत नव्हता. आता त्याला राकेश गप्प असण्याचे खरे कारण कळले होते. काही तरी करावे लागणार.. राकेश ही बोलत नाहीये. यातून बाहेर पडायला काही तरी मार्ग नक्कीच काढावा लागणार. तितक्यात त्याची नजर मोबाईल वर गेली. त्याने पटकन मोबाईल मध्ये एक मेसेज टाईप केला आणि चार्जर लागत नाही असे सांगून राकेश ला गाडीत बसायला सांगितले. तो गाडीत बसल्यावर अमित ने पटकन त्याला मोबाईल मधला मेसेज वाचायला दिला. त्याने मान डोलवून होकार दिला. त्या मेसेज मध्ये लिहील होत कि, “तू गाडीच चाक बदलून गाडीत जाऊन बस, गाडीला धक्का मारायला लागेल हे मी बोलेन. पण मी सांगे पर्यंत गाडी स्टार्ट करू नकोस.. ठरल्याप्रमाणे राकेशने गाडीच चाक बदलून आत बसला. अमित ने ते जे काही होत त्याला गाडीला मागून धक्का मारायची विनंती केली. आणि स्वतः डाव्या बाजूने धक्का मारायला लागला. थोडा वेळ धक्का मारून झाल्यावर गाडी उतारावर लागली तसे गाडीचा वेग वाढला. हीच ती वेळ होती, अमित जोरात ओरडला “गाडी चालू कर.. आणि त्याचसोबत दरवाजा उघडून गाडीत शिरला. अमित आत शिरल्याचे कळताच राकेश ने गाडी चा वेग वाढवला. ते जो कोणी होत ते आता मागेच राहील असेल असे त्या दोघांना वाटले पण त्याची हद्द अजुन संपली नव्हती. मागून चित्र विचित्र आवाज येऊ लागले. 

या सगळ्या प्रकारात त्यांना एकही गाडी येताना किंवा जाताना दिसली नाही. त्यांना कळून चुकले होते की आपण याच्या घेऱ्यात अडकलो आहोत. हा आपल्याला सहजा सहजी जाऊ देणार नाही. मागून येणारा तो आवाज गाडीच्या हळु हळू जवळ येताना जाणवू लागला. त्यांनी एक चूक केली, मागे वळून पाहिले. तो त्याच्या खऱ्या रूपात आला होता. शरीर कोणीतरी चाऊन खाल्ल्यासारख वाटत होत, त्याच मासं शरीराला चिटकून गळत होते आणि उरलेलेया मासामध्ये त्याची हाडं दिसत होती… इतकच नाही तर त्याच डोकं फुटल होतं, डोळे एकदम बाहेर आल्यासारखे आणि एकदम लाल बूँद वाटत होते, एकूणच त्याचे ते भयाण रूप पाहून एखाद्याला हृदय विकाराचा झटका च येईल. तो अतिप्रचंड वेगात गाडीचा पाठलाग करत होता.  अमित राकेशला गाडीचा वेग वाढवायला वारंवार सांगत होता. पण राकेश जेवढा वेग वाढवत होता तेवढ्याच वेगाने तो गाडीच्या मागून येताना दिसत होता. काही क्षणात तो गाडीच्या बाजूला येताना दिसला. राकेशने थरथरत्या हाताने गाडीच्या सर्व खिडकीच्या काचा वरती केल्या. आता याहून जास्त वेग वाढवणे शक्य नव्हते कारण गडीवरचे नियंत्रण सुटू लागले होते. त्या दोघांनी देवाचा धावा सुरू केला. हनुमान चालीसा बोलायला सुरुवात केली..

तरीपण त्या शैतनाचा बाहेरून किळसवाणा आवाज येत होता आणि पळता पळता त्याने राकेशच्या बाजूला जोरात थाप मारली आणि अचानक एके क्षणी कुठेतरी नाहीसा झाला  गाडीला थाप मारताच राकेशने करकचून ब्रेक मारला. गाडी जागेवरच थांबली. २ मिनिटे गाडीत भयाण शांतता पसरली होती, ते दोघे खूपच घाबरले होते. नकळतपणे बाहेर एका झाडाखाली लक्ष गेले. शिव शंकराचा फोटो दिसला.. जणू आत्ताच कोणीतरी देवाजवळ दिवा ठेऊन गेल होत.. गाडीखाली उतरून त्यांनी देवाला नमस्कार केला आणि हर हर महादेव म्हणत गाडी परत चालू केली. राकेश ने गावाच्या वेशी पर्येंत गाडी चालवण्याचा निर्णय घेलता. काहीच तासात ते दोघे एका गावात चहा पिण्यासाठी उतरले, तिथे चहा पिताना त्यांच्यामध्ये तोच विषय चालू  होता. त्यांच बोलणे ऐकून एक जण मध्येच बोलला, ”खरच वाचलात तुम्ही भाऊ, नाहीतर तुम्हीपण….” राकेश ने विचारलं, “म्हणजे?? तुम्हाला माहित आहे का?”   त्यावर तो व्यक्ती म्हणाला ” हो… तो रात्री शिकारीला गेला होता आणि त्याचीच शिकार झाली, कोणत्यातरी जंगली प्राण्यांनी फाडून खाल्ले अस पोलीसांनी सांगितल… बर जाऊदे परत कधी आमावस्येच्या रात्री गाडीने प्रवास करू नका” इतकं बोलून तो माणूस निघून गेला.

अमावास्येबद्दल लक्ष्यात आल्यावर वाटलं. आईच्या काळजीपोटी काहीच न पाहता ते निघाले होते. राकेश स्वतःशीच बोलला. चहाचा शेवटचा घोट घेऊन झाल्यावर लगेच गाडी सुरू केली आणि थेट गावी घराजवळ थांबवली. राकेश ची आई झोपली होती. तिच राकेशच्या वडिलांसोबत थोड भांडण झाल होत. त्यामुळे नाराज होऊन ती जेवलीच नव्हती. राकेशने आणि अमितने कशी बशी त्यांची समजूत काढली आणि अमितने सोबत आणलेली फळ त्यांना खायला दिली. त्यांना खूप बर् वाटल आणि त्यांचा राग ही शांत झाला. आईने हट्ट सोडला, हे बघून राकेशची चिंता मिटली आणि त्याला खूप बर् वाटल. त्याने बाहेर येउन अमितचे खूप आभार मानले… ”इतक्या मोठ्या संकटामध्ये आणि आत्तासुद्धा तू खूप मला मदत केलीस मित्रा“ अस बोलून राकेशने अमितला मिठी मारली आणि दोघांमध्ये गप्पा सुरु झाल्या, बोलता बोलता विषय त्या भयानक घाटाचा निघाला आणि हे सर्व राकेशच्या बाबांनी ऐकलं. राकेशच्या बाबांनी दोघांना बोलावून काय घडल ते विचारयला सुरवात केली. तेव्हा त्यांनी सर्व घडलेला प्रकार नीट सांगितला. त्यावर बाबांनी वर बघून देवाला हात जोडले आणि देवाचे आभार मानू लागले.

“काका…! तुम्हाला माहित आहे का कोण होता तो ? चहा पीत असताना एक जण बोलत होता तो शिकारी होता” , अमित ने विचारले.    

त्यांनी सांगितले, ” होय.. तो शिकारीला गेला होता.. तो आणि त्याचे ४ मित्र, त्यापैकी ३घे जण सख्खे भाऊ होते. रात्री शिकारी साठी जंगलात गेले होते, एका गोष्टीवरून त्यांच्यात वाद झाला आणि एक मोठं  शिकार नजरेसमोरून पळून गेल. त्याच्या चुकीमुळे त्या चौघांनी त्याला खूप मारले आणि तो रागात शिवीगाळ करून जखमी अवस्थेमध्ये घरी यायला निघाला. तेव्हा त्याच्यावर जंगली प्राण्यांनी हल्ला केला आणि तो मरण पावला.

Leave a Reply